🪔🪷 🌿 आनंदी सोहळा - ७ 🌿🪷 🪔
(featured)
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
आज "आनंदी पाऊस" सात वर्षाचा झाला. त्यानिमित्ताने हे सप्तरंगी इंद्रधनुष्य! "आनंदी पावसा"च्या नियमित वाचकांपैकी सात वाचक, "आनंदी पावसा"च्या आपापल्या अभिप्रायासह आपल्या भेटीस आले आहेत. प्रत्येकाची सविस्तर ओळख करून द्यायची म्हटली, तर एक मोठ्ठा लेखच तयार होईल. हे सारेच आपापल्या व्यक्तिगत आयुष्यात अतिशय व्यस्त असतात. हे सर्वच निरनिराळ्या प्रकारचे लेखन सुद्धा करतात. तथापि त्यांनी त्यांच्या व्यस्त दैनंदिनीतून वेळ काढून अभिप्राय लिहून पाठविले आहेत. ते सर्व खाली जोडलेले आहेत!
🪔🪔🪔 शनिवार
दिनांक : ४/७/२०२६
विषय : - आनंदी पाऊस
शीर्षक : - वर्षाभिनंदन 💐
सर्वच जाणतात की पाऊस फक्त वर्षा ऋतूतच पडतो. पण आमच्या वर्षाचा "आनंदी पाऊस" मात्र सतत वर्षभर पडत असतो. हे एक विशेष आहे 😀
तोच आमच्या वर्षाचा आनंदी पाऊस आता सात वर्षाचा झाला.
अभिनंदन आनंदी पाऊस! सातव्या वाढदिवसाच्या खूप खूप आनंदी शुभेच्छा 💐
👍😀
तर असा हा आनंदी पाऊस कुठेही केव्हाही कसाही बरसतो. त्याला काळ,वेळ,ऋतू, काही काही लागत नाही.
कधी गच्चीतल्या बागेत, तर कधी रेल्वेच्या रूळावर, सर्व प्रेक्षणीय स्थळी, दळण नेताना एकावर एक रचलेली उडतन, कधी खाद्य भ्रमंती, किती किती सांगायचं त्याच्याबद्दल काही समजत नाही. तो जिथे पडला तिथे सगळा आनंदी आनंद!
आमच्या वर्षाच्या नावातच वर्षा ऋतू आहे. तो सतत आनंद घेऊन आनंदी पाऊस पडत असतो. खरंच ते वाचताना मन इतके आनंदी होते, कधी कधी हसून पुरे वाट होते. आमची वर्षा म्हणजे जॉली आहे. आनंदी पावसात सगळ्यांना चिंब चिंब भिजवून टाकते. मी तर वाटच बघत असते कधी आनंदी पाऊस पडतो माझ्या घरात आणि मी कधी त्याचा आनंद घेते! तिला कुठून कसं सुचतं असं त्याच मला आश्चर्य वाटतं. खरंच तिच्या बुद्धीच्यातुर्याचं कौतुक करावंसं वाटतं. तिला ती ईश्वरी देणगीच आहे. कुठून काय विषय शोधून आणते आणि त्याचा आनंदी पाऊस पाडते आणि सर्वांना प्रफुल्लित करते. आनंदी पाऊस पडून गेल्यावर सगळे टवटवीत होतात. काय जादू करते ते मला माहिती नाही. या सात वर्षात कितीतरी वेळा आनंदी पावसाची बरसात झाली असेल ते अगणित आहे, मोजता न येण्यासारखं!! हा असा आनंदी पाऊस सर्वांनाच पाडायला जमत नाही, ती किमया मात्र वर्षांमध्ये आहे. आणि ती किमया जरी दुसऱ्याकडे असली तरी ते सादर करण्याची जिद्द तुझ्यात जेवढी आहे तेवढी कोणातच नसेल.तू पुरेपूर प्रतिभा संपन्न आहे. तुझ्यातील प्रतिभेला खरोखरच मनापासून आनंदी सलाम 🫡🥰✒️
असाच आनंदी पाऊस सर्वांच्या घरात पडो आणि सर्वांना आनंद प्राप्त होवो. कोमेजलेल्या मनाला या आनंदी पावसामुळे टवटवीत होण्याचे भाग्य लाभू दे. आनंदी पाऊस शतायुषीतर झालाच असेल " तुम जियो हजारो साल "
हीच आनंदी सदिच्छा.
अशा आमच्या वर्षा राणीच्या आनंदी पावसाला सातव्या वाढदिवसाच्या खूप खूप आनंदी शुभेच्छा. 👍👍💐💐👏👏🤝🌹✒️🥰🙋♀️👑🪷🌺🌸🌈
🌈श्रीमती लिला प्रभाकर गाजरे. ठाणे.
या लीला काकूंना मी चार वर्षापूर्वी एकदाच भेटले आहे.
🪻🍁🪻🍁🪻🍁🪻🍁🪻
🪔🪔🪔 यावर्षी आनंदी पाऊसला सात वर्ष झाले.
माझी यांच्याशी ओळख साधारण तीन चार वर्षांपूर्वी झाली असेल. नावच खूप कलात्मक आहे..... वर्षाताईंच्या नावाचा अर्थ आहे पाऊस... आणि त्यांच्या लेखणीतून झरझरणारा हा पाऊस आपल्या सर्वांच्या मनाला आनंद देऊन जातो... त्यामुळे त्यांचा ब्लॉग म्हणजे शब्दशः आनंदी पाऊसच आहे..
चौथीपर्यंत मी भुसावळला होते . त्यामुळे तेथील बऱ्याचश्या पारंपारिक पद्धती अगदी जवळून बघितलेल्या आहेत. अर्थात एवढ्या वर्षानंतर काही मनावर बिंबलेल्या आहेत तर काही विस्मरणात गेल्यात. त्या सगळ्यांची एक झलक मला परत आनंदी पावसात बघायला मिळाली. यातील लेखांच्या मार्फत मला माझ्या बालपणात परत एकदा डोकावता आले.. आणि मग जाणवले की मी किती नशीबवान होते मला असं बालपण मिळालं. प्रत्येक लेख म्हणजे इथंभुत आणि सविस्तररित्या तरीही रंजकपणे मांडलेला माहितीचा खजिनाच आहे . ते कुठेही कंटाळवाणं होत नाही. आणि त्यासोबत असलेल्या चित्रांनी सगळं काही अगदी डोळ्यासमोर येत. उन्हाळ्यातली वाळवण करण्याचा घातलेला घाट, लोणचं करण्याची प्रक्रिया... या साऱ्या गोष्टी ज्यांनी कधी ऐकल्याही नसतील त्यांना देखील नक्कीच खास वाटल्या असतील. मोठ्या माणसांची लगबग , माणसांचं बायकांना मदत करणं, त्यात लहान मुलांचं मध्येच लुडबुड करण.... असं वाटतं परत एकदा त्या काळात जावं. आणि ती संधी आनंदी पाऊसने मला दिली.
त्यांचे गुरु मोरवंचीकर यांच्यावरचे लेख, स्थापत्यशास्त्रामधील रंजक माहिती, रांगोळ्यांवरचे विशेष लेख आणि सुंदर रांगोळ्यांचे फोटो हे सगळंच मला खूप आवडलं. विशेष आवडली ती त्यांनी काढलेली चित्र आणि नमुन्यादाखल सादर केलेले विविध भांड्यांचे , वस्तूंचे फोटो.....
बऱ्याच देशांमध्ये आनंदी पाऊसचा आधीच प्रसार झालेला आहे...
दिवसेंदिवस तो प्रसार आणखीन वृद्धिंगत व्हावा आणि उत्तर उत्तर आनंदी पाऊस ची यशोगाथा वाढत जावी यासाठी वर्षाताईंना माझ्या खूप खूप शुभेच्छा .
🌈- डॉ सुवर्णा नारखेडे, ठाणे
यांची आणि माझी तर प्रत्यक्ष भेट झालीच नाही अजून.
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
🪔🪔🪔 आनंदी पाऊस भरभरून पडतो आहे आणि आपण सगळे वाचक त्या सोहळ्यात चिंब भिजून जातो आहोत.
सतत ७ वर्ष, प्रत्येक महिन्यातील प्रत्येक आठवड्यात ब्लॉगवर कमीत कमी एक तरी लेख प्रकाशन करणे सोपे काम नाही. वर्षाली, ज्या आत्मीयतेने आणि उत्साहाने हे लिहीत आहेस ना त्याचे खरोखर कौतुक आहे. सोप्या भाषेतील आणि भरपूर माहिती देणारे तुझे लेखन आमच्यापण ज्ञानात भर पाडतात, आम्ही समरस होऊन जातो.
इंद्रधनुष्यातील रंगांप्रमाणे तुझे लेख पण वेगवेगळे रंग दर्शवितात. तू सगळेच विषय सहजगत्या लिहून काढलेस. सुरवात केलीस माहेरून, चौधरी सदनातून आणि नंतर तुझे पर्यटन, व्यक्ती विशेष, चित्र मालिका, वारसा स्पर्धा, पुस्तक परिचय, काही अनुभवलेले, अश्या एक ना अनेक शीर्षकांखाली कितीतरी गोष्टी आम्हा वाचकांपर्यंत कौशल्याने लिहून पोचवल्यास. काही निवडक लेख जे तुझ्या गुरूंनी लिहिले तेपण आम्हा सगळ्यांना तुझ्यामुळे वाचावयास मिळाले. आणि गंमत म्हणजे तू तुझ्या लेखांची ध्वनिफीत पण केलीस, फारच छान .
तुझी ७ वर्षाची यात्रा अशीच पुढे ७० वर्ष चालू राहू दे हीच सदिच्छा!
🌈- रुपाली, लंडन
हिला भेटून जवळपास २७-२८ वर्ष उलटून गेली असतील.
🪷 🌱🪷 🌱🪷 🌱🪷 🌱🪷
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
🪔🪔🪔 आनंदीपाऊस.कॉम – ७ वा आनंदसोहळा
आज आनंदीपाऊस.कॉम आपल्या यशस्वी प्रवासाची सात वर्षे पूर्ण करत आहे. हा केवळ वर्धापनदिन नसून, सातत्य, समर्पण आणि सकारात्मक विचारांच्या देवाणघेवान,अखंड प्रवासाचा आनंदसोहळा आहे.गेल्या सात वर्षांत आनंदीपाऊस.कॉमने ज्ञान, संस्कार, अध्यात्म आणि प्रेरणादायी गोष्टी, माहिती, विचारांचा वर्षाव करून असंख्य वाचकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रत्येक लेख, प्रत्येक विचार आणि प्रत्येक उपक्रमाने समाजात आशावाद, आनंद आपुलकिचि आणि माणुसकीची भावना अधिक दृढ केली आहे. या सात वर्षांच्या प्रवासामागे असंख्य शुभेच्छा, वाचकांचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम आहेत. माझ्या कडून वर्षा ताईना शुभेच्छा असाच हा प्रवास अधिक समृद्ध आणि यशस्वी होवो.या ७ व्या आनंदसोहळ्याच्या निमित्ताने आनंदी पावूस आनंदी अभिनंदन! पुढील वाटचालही अशीच प्रेरणादायी, समाजहिताची आणि आनंदाचा वर्षाव करणारी ठरो, हीच हीच सदिच्छा.
हार्दिक शुभेच्छा अजून नविन गोष्टी साठी!
🌈- डॉ अर्चना महाजन, बंगळूरू
यांची सुद्धा अजून प्रत्यक्ष भेट झालेली नाही.
🌼🍂🌼🍂🌼🍂🌼🍂🌼
🪔🪔🪔 आनंदी पाऊस - एक आनंददायी अनुदिनी
२५ ऑगस्ट या अनुदिनीचा वर्धापन दिन!
आपल्या वैशिष्टपूर्ण लेखनाने मनाला, रिमझिम आनंदी पावसाने मनाला आल्हाददायक टवटवी आणणाऱ्या सदरच्या निमित्ताने...
काहीतरी मनातलं...
मनापासून....
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या खानदेशच्या वारसा लाभलेल्या, आमच्या गावच्या सुनबाई, लेखिका उच्च विद्या विभूषित असून, गुरुवर्य डॉ रा. श्री. मोरवंचीकर यांच्या आशीर्वादाने मंदिर स्थापत्य या विषयावर संशोधन करीत आहे. जलव्यवस्थापन, मंदिर आणि शिल्पं आवडीचा विषय आणि पर्यटनाचा छंद! त्यांचे जन्मस्थान असलेली इमारत 'चौधरी सदन' हे त्यांचे स्फूर्तीस्थान! त्यांच्या लेखनात गावरान मातीची झलक, बहिणाबाई यांच्या भाषेचा गोडवा आणि पूज्य साने गुरुजी यांची ओघवती भाषा; यामुळे आपल्या लेखानाने रसिक जनांचे मन चिंब चिंब रिझवून टाकतात.
मला त्यांच्या लेखनातील भावलेले वैशिष्ठे -
आनंदी पाऊस एक आनंदी अनुदिनी -
त्यावर मराठी संस्कृती, आठवणी, घरगुती गोष्टी, कला आणि निसर्ग संबंधित सुंदर लेख व चित्रं रेखाटन मला खूप आवडतात.
त्यातील गावाकडच्या आठवणी, गच्चीवरील गमती-जमती, स्वयंपाक घरातील पदार्थ, वाळवणं इत्यादी लेख हे माझ्या स्मृतीची पाने चाळतात व काहीतरी सतत नवीन करण्यासाठी प्रेरणा देतात.
येत्या भविष्यकाळात हा "आनंदी पाऊस" असाच टपटप पडत राहो. रसिक जनांचे मन आनंदाने चिंब चिंब भिजत राहो, ही शुभेच्छा!
धन्यवाद!
🌈- श्री प्रफुल्ल पाटील, पुणे.
काकांच्या बाबतीत सुद्धा तेच, अद्याप प्रत्यक्ष भेट नाही.
🪻🍃🪻🍃🪻🍃🪻🍃🪻
🪔🪔🪔 आनंदी पाऊस
“आनंदी पाऊस” कथासंग्रह वाचतांना मन माझ्या लहानपणीच्या आठवणीत रमून गेले वेगवेगळे सण, त्या सणांच्या साजरे करण्याच्या पद्धती. त्यांना अनुसरून केलेले खाद्यपदार्थ यांची वर्णने वाचून मन त्यावेळच्या गोड आठवणीत हरखून गेले. मन बालपणात हरवून गेले. लहानपणीची मौज मजा परत अनुभवता आली.
“आनंदी पाऊस” ही माला ७ वर्षे पूर्ण करतेय हे पाहून आनंद झाला.
वर्षाली यांचे “आनंदी अभिनंदन” आणि पुढील लिखाणाबद्दल “आनंदी शुभेच्छा”
🌈डॉ. सुभाष ओरोसकर, मुंबई
यांना एकदाच भेटले, सात वर्षापूर्वी.
🌻☘️🌻☘️🌻☘️🌻☘️🌻
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
अणि
🪔🪔🪔 आनंदी पावसाने सप्तरेषा ओलांडून जगभरात अत्यंत लोकप्रियता निर्माण केलेली आहे. या आजच्या धावपळीच्या व AI युगात वर्षा मॅडम यांनी लिहिलेले आपले बालपणाचे अनुभव वाचकांना त्यांच्या बालपणाची ओळख करून देणारे असेच आहे. सदर मॅडम यांचे अनुदिनीतील पहिला प्रस्तावनेचा लेख त्यांच्या बालपणाच्या स्मरणशक्तीची ओळख करून देतो. त्यांनी त्यांच्या आजोबांच्या चौधरी सदन विषय लिहिलेले बालपणीचे अनुभव खरंच बालपणात घेऊन जातात. त्यातून त्यांच्या बालपणाचे यथार्थ वर्णन, त्यांचे अनुभव मनाला एक वेगळ्या बालपणाच्या आठवणीत घेऊन जातात. धावपळीच्या युगात दर आठवड्याला एक नवीन विषय घेऊन त्यांनी केलेले लिखाण व एखाद्या विषया विषयी केलेले वस्तुनिष्ठ वर्णन अतिशय वाचनिय असते. माझ्या मतानुसार त्यांनी अनुदिनीच्या माध्यमातून स्थानिक इतिहासाच्या अनेक संकल्पना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा उत्तम प्रयत्न केलेला आहे. या माध्यमातून कधीही न वाचलेल्या संकल्पना, स्थळे, सण, उत्सव, परंपरा, संस्कृती, मंदिर स्थापत्य, अनुभव याविषयीचे त्यांचे लेख जनसामान्य व वाचकांना प्रेरणा देणारे अभूतपूर्व आहे. सप्तरेषा ओलांडल्यानंतर व्यक्ती आचार्य होतो. अशी कथा आहे. खरंच आनंदी पावसाने सप्तरेषा ओलांडल्या नंतर आचार्य या पदाला मार्गक्रम करीत आहे, असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. देशात आणि परदेशात त्यांची अनुदिनी नित्याने वाचक आवडीने व हौशीने वाचतात. आपला अभिप्राय ही नोंदवितात. एवढेच नव्हे तर त्यांच्या मनातील एखादा विषय ही पुढच्या आठवड्यात यावा अशी शक्यता ते वर्तवतात. यावरून वाचक आणि वर्षा मॅडम यांची वैचारिक देवाणघेवाण पहावयास मिळते. मी पण मॅडमची ओळख झाल्यापासून नित्याने आठवड्यात त्यांची अनुदिनी वाचत आहे. त्यांची साधी सोपी मनाला काळजाला भिडणारी एखाद्या विषयाची मांडणी नेहमी वाचनीय ठरते. एखाद्या विषयाचे वर्णन कशा स्वरूपात वाचनिय केले पाहिजे. हा त्यांचा नित्याचा अनुदिनी लिहिण्याचा प्रयत्न एखाद्या साहित्यिकांपेक्षा कमी नाही. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेऊन सुद्धा व संसार प्रपंचात राहून नित्याने अनुदिनी लिहिण्याचे त्यांचे काम वाखाण्याजोगेच असेच आहे. शब्दातील ,वाक्यातील, वाक्यरचनेतील चढउतार, प्रत्यक्ष प्रसंग समोर उभे करण्याची त्यांची शब्दांची मर्यादा व सामर्थ्य उल्लेखनीय व प्रेरणादायी असेच आहे. त्यामुळे वाचक कितीही दैनंदिन काम करून आला तरी आनंदी पाऊस या अनुदिनीच्या लिंकला भेट देतोच!!
सप्तरेषा ओलांडलेल्या आनंदी पावसाला व वर्षा मॅडम यांना खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा!! त्यांच्या हातून अजून असेच लिखाण भविष्यातही होत राहो अशीच आशा व अपेक्षा...💐
-डॉ दीपक शिरसाट
यांच्याशी मात्र गेल्या २-३ वर्षांपासून अधून मधून भेट होत असते.
यासोबतच सांगण्यास अतिशय आनंद होत आहे, की आनंदी पाऊस जगभरात कान्याकोपऱ्यात पोहोचला आहे. आजपर्यंत जवळपास १४२ देशांतून आनंदी पावसाचे वाचन होत आहे. खाली या देशांच्या नावाची यादी जोडलेली आहे. मला तर यातील बऱ्याच देशांची नावे आणि स्थान सुद्धा माहिती नव्हते. आनंदी पावसामुळे मला त्याबद्दल माहिती झाली!
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
जगभरातील आनंदी वाचकांचे, आनंदी देश!
1. India
2. USA
3. France
4. UAE
5. UK
6. Germany
7. Chin
8. Canada
9. Qatar
10. Russia
11. Singapore
12. Australia
13. Japan
14. Netherlands
15. Myanmar
16. New Zealand
17. Sweden
18. Kuwait
19. Saudi Arabia
20. Ukraine
21. Oman
22. South Africa
23. Finland
24. Switzerland
25. Ireland
26. Nepal
27. Peru
28. Norway
29. Israel
30. Taiwan
31. CaymanIslands
32. Turkey
33. Hongkong
34. Indonesia
35. Brazil
36. Uganda
37. Jordan
38. Serbia
39. Poland
40. Pakistan
41. Argentina
42. Thailand
43. Denmark
44. Azerbaijan
45. Bahrain
46. Morocco
47. Iran
48. Kenya
49. Spain
50. Belgium
51. Colombia
52. Moldova
53. Philippines
54. Luxemburg
55. Hungary
56. Mauritius
57. South Korea
58. British Virgin island
59. Vietnam
60. Bangladesh
61. Romania
62. Belarus
63. Malaysia
64. Cameroon
65. Bulgaria
66. Seychelles
67. Lithuania
68. Mexico
69. Italy
70. Georgia
71. Bulgaria
72. Armenia
73. Mozambique
74. Antigua & Barbuda
75. Zambia
76. Chile
77. Ecuador
78. Paraguay
79. Tunisia
80. Uruguay
81. Dominican Republic
82. Ethiopia
83. Botswana
84. Lebanon
85. Panama
86. Palestine
87. Egypt
88. Guyana
89. Honduras
90. Jamaica
91. Senegal
92. Kosovo
93. Kazakhstan
94. Kyrgyzstan
95. Latvia
96. Cote D'ivoire
97. Nicaragua
98. Venezuela
99. Slovenia
100. Nigeria
101. Angola
102. Bolivia
103. Costa Rica
104. Algeria
105. Guatemala
106. Mongolia
107. North Macedonia
108. Congo Brazzaville
109. El Salvador
110. Uzbekistan
111. Sri Lanka
112. Albania
113. Czechia
114. Gabon
115. Togo
116. Syria
117. Turkmenistan
118. Croatia
119. Slovakia
120. Malta
121. Western Sahara
122. Poland
123. Mali
124. Puerto Rico
125. Greece
126. Magnolia
127. Ethiopia
128. Portugal
129. Georgia
130. Bosnia & Herzegovina
131. Sierra
132. Maldives
133. Cape Verde
134. Rwanda
135. Bru Brunei
136. Bermuda
137. Barbados
138. Austria
139. Cyprus
140. Andorra
141. Burkina Faso
142. Sao Tome & Principe
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
गूगल म्हणजे जादुगारच आहे असे म्हणावे वाटते, बऱ्याच वेळा. "आनंदी पाऊस" या ब्लॉग बाबत बरीच माहिती देत असतो. म्हणजे कुठल्या देशातून किती वेळा वाचला गेला, कुठला ब्लॉग किती वेळा वाचला गेला, गेल्या तीन तासात, चोवीस तासात, सात दिवसात, एक महिन्यात ते संपूर्ण काळात कुठला लेख किती वेळा वाचला गेला, कुठले साॅफ्टवेअर वापरले गेले, कुठला भ्रमणध्वनी किंवा संगणक वगैरे वापरला गेला असे एक न अनेक प्रकारची माहिती देत असतो. आज पर्यंत "दळण" हा लेख सर्वात जास्त वेळा म्हणजे चार हजार चारशे वेळा पेक्षा जास्त वेळा वाचला गेला आहे!
असेच आपणासर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद यांचा "आनंदी पावसा"वर वर्षाव होत राहो! तुमच्या स्नेहामुळे खरतरं "आनंदी पाऊस"च अगदी आतून, मनापासून आनंदी झाला आहे. तुम्हा सर्वांच्या या ऋणात असण्यातच धन्यता वाटते....
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
आपणा साऱ्यांच्या कायम ऋणात....
(आज या रंगीत अक्षरांमुळे वाचन करणे थोडे गैरसोयीचे झाले आहे, त्याबद्दल क्षमस्व.... इंद्रधनुष्याचे सप्त रंग दाखविण्याचा माझा अट्टाहास आणि सोहळा आहे..... सारे कसे झळाळते रंगीत दिसायला हवेच म्हणून)
🪔🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪔
II या सप्तभूमीवरील आनंदी पावसाच्या समस्त वाचकांस अर्पण मस्तु II
🪔🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪔
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
©️®️आनंदी पाऊस
(featured)
२५ ऑगस्ट २०२६
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔












💐अनेकोत्तम शुभेच्छा💐
ReplyDeleteGreat वर्षाली
ReplyDeleteखूप सुंदर लेख आहेत सगळेच..
तू insta gram वर का नाही येत हे लेख घेऊन?
Readability आणि viewers दोन्ही जास्त होतील.
आपल्या अथक प्रयत्नास " सलाम " आपले मनापासुन अभिनंदन जी
ReplyDelete