आईस क्रीम पार्टी (गच्चीवरील गमती जमती) हल्ली आईसक्रीम म्हणजे घरात कायमच असतेच, फ्रीझ घरात असल्याने. पण चौधरी सदन मध्ये राहात असतांना घरात फ्रीझ नव्हते. त्यामुळे ही आईसक्रीम पार्टी खूपच खास असे! अगदी मला आठवते आणि समजते तेंव्हापासून आमच्याकडे ही आईसक्रीम पार्टी उन्हाळ्यात एकदा हमखास होतेच होते! ...