🌧️💧💦😇 आनंदी पावसासोबत मनमोकळ्या गप्पा😇💦💧🌧️ (featured) आनंदी पावसाचे मनोगत! त्याच्या जन्म कसा, केव्हा झाला अशा बऱ्याच गोष्टींचा तपशील आज पर्यंत अनेक लेखांमधून या ना त्या कारणाने येत गेला. तथापि सलग तासभराचा गप्पांचा कार्यक्रम किंवा ध्वनीफीत स्वरूपात मात्र उपलब्ध नव्हता. आज मात्र हा मनमोकळ्या गप्पांचा कार्यक्रम ध्वनिफीत स्वरूपात उपलब्ध झालेला आहे. त्याची यु-ट्युब लिंक खाली दिलेली आहे. त्यावर जाऊन आपणास ती ऐकता येईल. आता थोडे या गप्पांबद्दल. तर माझी अगदी सख्खी मैत्रीण, वास्तूविद्या महाविद्यालयातील वर्ग मैत्रीण, आता बारामतीच्या वास्तुविद्या महाविद्यालयात, प्राध्यापक आणि शैक्षणिक प्रमुख अशा दुहेरी भूमिकेत कार्यरत आहे. आपली सख्खी मैत्रीण, तिची कार्यभूमी, तिचे शैक्षणिक कार्यात योगदान हे सारे मला कौतुकाने प्रत्यक्ष बघण्याची अगदी मनापासून इच्छा होती. तसेच तिनेही बऱ्याचदा त्यांच्या महाविद्यालयात येण्याचे आमंत्रण दिले होते. परंतु योग आल्याशिवाय कुठलीही गोष्ट तडीस ...