इतर पापड आणि वाळवणं -२ (गच्चीवरील गमती जमती) यात एक फारच मनोरंजक आणि चित्तवेधक प्रकार म्हणजे कऱ्होडे! हा खास आमच्याकडचा शब्द. बाकी लोक याला वडे, सांडगे वगैरे म्हणतात. ह्याची गम्मत म्हणजे ह्यासाठी लागणारे मिश्रण एकदा तयार झाले, की हे करण्यासाठी कुठलेही उपकरण लागत नाही. बाकी वाळवणाचे तसे नाही. एकेकाचे एकेक नखरे, कुणाला हे उपकरण लागते तर कुणाला ते. प्रत्येकाचे एक एक खास उपकरण! ...