Skip to main content

Posts

Showing posts with the label काही अनुभवलेलं.....

📮 अडीच अक्षर-१ 📮 (काही अनुभवलेलं...)

📮   अडीच अक्षर-१ 📮 (काही अनुभवलेलं...) 📮 ✉️ ✉️ ✉️ ✉️ ✉️ ✉️ 📮 मुन्शीराम डाकिया 📮 लेकर पिला पिला थैला  पत्र बांटने आता  यह है मुन्शिराम डाकिया  सब की चिठ्ठी लता है  सर्दी हो या गर्मी हो  पानी गिरता  छर छर छर  चला जायेगा  नही रुकेगा  चिट्ठी देता घर घर घर... बडे डाक खानेसे आता कभी लाता रुपैय्या  कभी किताबे दे जाता है  मुझको हस हस भैय्या  गाव गाव जाता है  पर कभी नहीं है थकता  लाता है सबकी खुशखबरी  सब के मन को भाता  ✉️  ✉️ ✉️ ✉️ ✉️ ✉️                      शालेय जीवनात हिंदीच्या पाठ्य पुस्तकांत असलेली ही कविता! आज इतक्या वर्षांनीही जरा सुद्धा कष्ट न करता अगदी सहजपणे आठवते आणि गाताही येते. ही कविता वाचल्यावर, मग ती वेळ पहिली असो की दुसरी की शंभरावी असो, डोळे नकळत पाणावतातच, अगदी आजच्या इमेलच्या जमान्यात सुद्धा!                    अडीच अक्षर! अडीच अक्षर म्हटले की स...

सुचलेलं काही-८ (काही अनुभवलेलं...)

सुचलेलं काही-८  (काही अनुभवलेलं...) 

🐍🌸नागबंध🌸🐍

🐍🌸नागबंध🌸🐍 नाग. नागपंचमी. संपूर्ण भारतात नाग-पूजन केले जाते. हल्ली नागा संबंधी अभ्यासाने बरीच माहिती नव्याने समोर येत आहे. त्यामुळे या प्रथेवर बरेच निर्बंध आले आहेत. बाकी पारंपारिक सण-प्रथे प्रमाणेच,   नाग-पूजन प्रथाही जवळ-जवळ बंदच झाल्यात जमा आहे. नवीन पिढीला असा काही सण असतो, ह्याची कल्पनाही नसणार, अगदी खात्रीने. संस्कृती सतत प्रवाही असते! त्यामुळे त्यात कालामानानुसार स्थित्यंतरं ही होणारच. असो. मागील नाग आणि नागपंचमी संबंधी लेखांतून,  नाग, साप एकंदरीतच सर्व  सरपटणाऱ्या प्राण्यांसंबंधी  माझे मत सांगितलेच आहे. तथापि  आता या चित्रांतील नागांशी तरी माझी मैत्री झाली आहे. ते आवडू लागले आहेत. त्यांची आणखी आणखी चित्रं काढावीशी वाटू लागली आहे.  दुसरे महत्वाचे कारण म्हणजे आपले पूर्वज! भारतात उत्तरेपासून दक्षिणेकडे, पुर्वेपासुन पश्चिमेकडे  कुठल्याही मंदिरात गेले तरी, नागाचे शिल्पांकन बघायला मिळतेच, अगदी खात्रीने! मंदिराच्या निरनिराळ्या भागांवर, विविध पद्धतीचे नागबंध नजरेस पडतात,  नव्हे तर, ते आपले लक्ष वेधून घेतात, ब...

🏃‍♀️🤾‍♀️ऑलिंपिक-२०२४ च्या निमित्ताने 🏋️‍♀️🚴‍♂️ (काही अनुभवलेलं...)

🏃‍♀️🤾‍♀️ऑलिंपिक-२०२४ च्या निमित्ताने 🏋️‍♀️🚴‍♂️ (काही अनुभवलेलं...) अधिकृत प्रतिक चिन्ह                                     ऑलिंपिक-२०२४ चे प्रतिकचिन्ह बऱ्याच आधी पासून बघायला मिळत होते. फारच लक्षवेधी वाटले. मनापसून आवडले. सर्जनशील वाटले. ते निर्माण करणाऱ्या कलाकाराला दाद द्यावीशी वाटली. माझ्या बौद्धिक कुवतीनुसार त्याचा अर्थ लावला. नंतर खरा अर्थ शोधला, अर्थातच आंतरजालात! तो असा, 'According to the official Paris 2024 website, the logo has significant historical meaning - and a name:Marrianne. within the logo are three symbols: the gold medal, the olympic flame, Marrianne the embodiment of The French Republic, bourn out of the 1789 French Revolution. म्हणजेच, अधिकृत पॅरिस २०२४ वेबसाइटनुसार, या प्रतिक चिन्हाचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक अर्थ आहे आणि नाव - मारियान. लोगोमध्ये तीन चिन्हे आहेत - सुवर्णपदक, ऑलिम्पिक ज्योत आणि मारियान, फ्रेंच प्रजासत्ताकाचे मूर्त स्वरूप, 1789 च्या फ्रेंच क...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

एक मायाळू अभ्यासक (काही अनुभवलेलं...)

  एक मायाळू अभ्यासक (काही अनुभवलेलं...)  निमित्त, धरोहर यात्रा. भोपाळ शहरातील छोट्याश्या हाॅटेल मधील पिटुकली खोली.  पहाटे ४-५ दरम्यानची वेळ. खोलीत मी एकटीच झोपलेली. ठरल्या प्रमाणे, दोन विद्यार्थिनी आल्या. एक माझ्या बाजूला झोपणार अणि एक जमिनीवर घातलेल्या गादीवर झोपणार असे ठरलेले. तथापि आलेल्या दोघींनाही जमिनीवर घातलेल्या गादीवरच झोपायचे होते. त्यांचा झोपण्याचा अजिबातच मूड नव्हता, त्यांना गप्पा मारायच्या होत्या. त्यांना थोडे समजावले, पुढचा अख्खा दिवस खूप थकवणारा असणार आहे, तेव्हा आता जे काय दोन-तीन तास मिळाले आहेत, तेव्हढा वेळ झोपून घ्या, विश्रांती घ्या. झोपल्या मग. काही मिनिटातच हळूच दार वाजले. दरवाजा उघडला, एक महिला आत आल्या. त्या दोघींना अगदी हळू आवाजात सांगितले, ही आपली खोली नाही. झोपलेल्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या आणि बाहेर या. त्यांनी मला नीटसे पाहिलेही नसावे, ओळखणे तर फारच दूर. कारण या आधी आम्ही कधी भेटलोच नव्हतो.                                मी मात्र त्याक्षण...