एक ठळक चित्रं (गॅलरीतील गमती जमती) तेव्हा दररोजचे दूध काचेच्या बाटल्यांतून मिळत असे. या बाटल्या ने-आण करण्याकरिता एक धातूचे शिंक मिळत असे, दोन बाटल्यांचे, चार बाटल्यांचे, सहा बाटल्यांचं. आमच्या कडे चार बाटल्यांचे होते. सकाळी चार बाटल्या आणल्या जात. एक बाटली अर्धा लिटरची असे. पहाटेच जावे लागे. तेव्हा आम्ही उठलेल्या नसू अजून आणि एव्हढ्या चार दुधाने भरलेल्या बाटल्या आम्हाला उचलून आणणे शक्यही नसे. पण संध्याकाळी एक किंवा दोन बाटली गरजेप्रमाणे आणली जात असे. हे मात्र आम्हाला नक्कीच शक्य असे. त्या चार बाटल्यांच्याच शिंक्यात गरजेप्रमाणे एक किंवा दोन रिकाम्या बाटल्या ठेवून ते घेऊन जायचे आणि एक किंवा दोन भरलेल्या बाटल्या घेऊन यायच्या. या बाटल्यांची एक गम्मत असे! या बाटल्यांचे तोंड वरून, अल्युमिनियमच्या...