परीचा महाल (माझा वारसा) याबद्दल बऱ्याच दिवसांपासून लिहायचे मनात होते. पण मुख्य अडचण म्हणजे त्याची छायाचित्रं माझ्याजवळ नव्हती. याचा सांभाळ ज्या काकूने केला, ती अगदी सगळ्यात अलीकडच्या काळात चौधरी सदनातच राहात होती. त्यामुळे हा चौधरी सदनातच होता. मध्यंतरी काकू बरोबर इथे-तिथे स्थलांतरित झाला. पण परत शेवटी चौधरी सदनातच येऊन विसावला. फरक असा की तो प्रथम चौधरी सदनात आला. तेव्हा घर माणसांनी अगदी गजबजलेले होते. आता तो एकाकी आहे तिथे आणि वापरात सुद्धा नाही ... या लेखाचे शीर्षक आहे परीचा महाल ! पण ही गोष्ट आहे माझ्या लाडक्या प्रसाधन/शृंगार मेजची. थोडक्यात ड्रेसींग टेबलची. याचा उलगडा होईलच पुढे. विकत घेतलेला आहे. आमच्या दादांना त्या दुकानाचे नाव वगैरे पासून त्याच्या खरेदीचा पूर्ण प्रसंग अगदी नीट आठवतोय आजही. अर्थातच माझ्या खूप आवडीचा, मना-हृदयाचा एक कोपरा कायमचा व्यापलेला आहे, त्याने. आज त्याबद्दल व्यक्त व्हा...