दळणं (घरातील गमती जमती) या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही. ...
साबुदाणा खीर (उपवासाचे काही....) उपवास. उपवासाचे पदार्थ. हल्ली या पदार्थांची यादी अगदी न संपणारी आहे. तथापि काही दशकांपूर्वी असे नव्हते. उपवासाचे पदार्थ तुलनेत मर्यादित होते. या मर्यादित यादीतील एक पदार्थ म्हणजे "साबुदाणा खीर." आजच्या भागात या साबुदाणा खीर बद्दल थोडी माहिती आणि ती कशी करायची, लागणारे साहित्य असे सारे थोडक्यात. साबुदाणा खीर, उपवासासाठी असलेला पदार्थ. तथापि ही खीर, पोट बिघडले असले तर, फार उपयोगी पदार्थ आहे. साबुदाण्याचा कुठलाही पदार्थ करायचा झाल्यास, आदल्या दिवशी रात्री साबुदाणा भिजवून ठेवावा लागतो. साबुदाण्याची खीर करण्यासाठी सुद्धा साबुदाणा आदल्या दिवशी रात्री भिजवून ठेवावा लागतो. तथापि पोट कधी बिघडणार, हे आपल्याला माहिती नसते. तसेच काही वेळा आपण साबुदाणा भिजत घालण्यासाठी विसरूनही जातो. यापैकी कुठलीही परिस्थिती असली तरी ही साबुदाण्याची खीर करता येते. ...