Skip to main content

Posts

Showing posts with the label व्यक्ती विशेष

नाना(धा.श्वशुर) (व्यक्ती विशेष)

🪻🪻🪻 नाना(धा.श्वशुर)🪻🪻🪻 (व्यक्ती विशेष) व्यक्ती-गुण विशेष! बऱ्याच दिवसांपासून हे सदर सुरु करण्याची इच्छा होती. पण मुहूर्तच लागत नव्हता. आता मुहूर्त आणि कारणच तसे आहे. नानाच्या आयुष्यातील एक अतिशय आनंदाचा आणि महत्वाचा दिवस! त्यामुळे मी पक्क ठरविले, काहीही झाले तरी हे सदर सुरु करावे, त्यांच्या बद्दलच लिहून.  सर्वप्रथम, 🌿🪻त्यांचे नाव अरुण.  अरुण म्हणजे सूर्य देवाच्या रथाचा सारथी! सूर्य देवाला योग्य वेळेला, योग्य स्थानी नेणारा, पोहचविणारा, त्यांचा सारथी अरुण! नाना, तुम्हा उभयतांना,  आजच्या दिवसाच्या  खूप खूप  आनंदी शुभेच्छा!🪻🌿 तर, काय असते, प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर काही न काही काम करीत असते. पोटासाठी, कुटुंबासाठी, स्वतःच्या मानसिक, बौद्धिक गरजे करिता. काहींना आपल्या आवडीचे काम करायला मिळते, तर काहींना आपल्या आवडीचे काम करता येत नाही. तथापि या रोजच्या काम-कौशल्या व्यतिरिक्त, बाकी कितीतरी कौशल्य, प्रत्येक व्यक्तीच्या ठायी असतात. आणि ते या न त्या कारणाने, निमित्ताने प्रकट होतात. तथापि, हे गुण-विशेष अवती-भवती असलेल्या व्यक्तींच्या लक्षात येतात किंवा येत न...