🌷अडीच अक्षर - २ (मैत्री दिन विशेष)🌷 (काही अनुभवलेलं..) भारतीय डाक विभागाने गेल्या वर्ष अखेर अडीच अक्षर/ढाई अक्षर अशा शीर्षकाखाली एक निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्यात मला माझा सहभाग नोंदवता आला नव्हता, तथापि त्याकारणे आनंदी पावसात "अडीच अक्षर" ह्या नवीन सदराची सुरुवात झाली. या सदरातील पहिला भाग प्रकाशित झालेला आहे. आज म्हणजे ३ ऑगस्ट २०२५ रोजी मैत्री दिनाच्या निमित्ताने हा दुसरा भाग आपल्या भेटीस येत आहे. भारतीय टपाल खात्याशी अगदी लहान वयापासून ते आजतागायत माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या सर्व प्रवासात म्हणजे डाक विभागाशी संबंधित प्रवासात कायम साथ लाभलेल्या अनेक व्यक्तींपैकी एक महत्वाची व्यक्ती म्हणजे माझी सख्खी मैत्रीण. वास्तुकला महाविद्यालयात असल्या पासूनची ही मैत्री आणि तितक्याच वयाचा हा आमचा सोबतीने केलेला टपाल-प्रवास. आज मैत्री दिनाच्या निमित्ताने या आनंदी प्रवासाची झलक आनंदी पावसाच्या वाचकांसाठी! ...