🪈कृष्ण कथा शिल्पं - जन्माष्टमी विशेष, जलकंठेश्वर मंदिर, वेल्लोर, तामिळनाडू🪈 (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)
🪈🪈🪈 कृष्ण कथा शिल्पं - जन्माष्टमी विशेष 🪈🪈🪈 संदर्भ : जलकंठेश्वर मंदिर, वेल्लोर, तामिळनाडू (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) आपल्या भक्ती प्रधान भारत देशात असंख्य प्राचीन मंदिरे आहेत. हल्ली सार्वजनिक माध्यमाच्या माध्यमांतून त्याबद्दलची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचतच असते. तसेच अनेक प्रकारच्या सहली नियोजन करणारे सुद्धा या स्थळांना भेट द्यायला पर्यटकांना घेऊन जातात. त्या त्या ठिकाणी गेल्यावर तिथे मार्गदर्शक सुद्धा असतात, त्यांच्या मदतीने ती ठिकाणे आपण समजून घेऊ शकतो. शक्यतो त्यापैकी ASI संस्थेने नियुक्त केलेल्या मार्गदर्शकांची मदत घ्यावी, कारण त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिलेले असते. तथापि मंदिरे बघायची झाल्यास, त्यांच्या मदतीशिवाय सुद्धा आपले आपल्यालाच बऱ्याच प्रमाणात समजून घेता येते. ते कसे? तर आपण सर्वच बालपणी आपल्या घरातील जेष्ठ व्यक्तींकडून रामायण, महाभारत, देव-देवता, त्याचे अवतार, त्यांचे कार्य इत्यादी बद्दलच्या गोष्टी ऐकतच असतो. तसेच हल्ली...