Skip to main content

Posts

Showing posts with the label गच्चीवरील गमती जमती

💃गुलाबाईची गाणी💃 (गच्चीवरील गमती जमती )

  💃गुलाबाईची गाणी💃  (गच्चीवरील गमती जमती ) 💃💃💃💃💃💃💃💃💃💃 💃गुलाबाईची गाणी💃  पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा गुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून गुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा गुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउले पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून गुलाबाईचे माहेर दिसे. 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃  सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफि...

गच्चीवरून खाली उतरतांना......

गच्चीवरून खाली उतरतांना......                                                                                           गेले जवळ जवळ पाच महिने झाले , गच्चीवर जाम धमाल चाललीय . इतर गमती जमती २ हा सध्यातरी शेवटचा लेख , गच्चीवरील गमतीजमती या भागातील . आता वेळ आलीय गच्चीवरून खालच्या मजल्यावर म्हणजे घराच्या मजल्यावर उतरण्याची . हा मजला म्हणजे तेव्हाचा  तिसरा मजला  आणि आताचा  दुसरा मजला , कारण तेव्हा 'ग्राउंड फ्लोअर' ही संकल्पना नव्हती . एकदम पहिला मजला , दुसरा मजला वगैरे वगैरे . म्हणून तेव्हाचा तिसरा मजला . तेव्हा या मजल्या विषयी थोडी माहिती . आधीच्या एका लेखात उल्लेख केल्या प्रमाणे या इमारतीला तीन बाजुंनी रस्ते आहेत आणि एक बाजू , बाजूच्या इमारतीची सामायिक बाजू आहे . तर या रस्ते असलेल्या तीनही बाजूने एक सलग इंग्रजी अक्षर सी आकाराची संपू...

गच्चीची सफर -छायाचित्रांमधून

गच्चीची सफर -छायाचित्रांमधून दोन काकांच्या म्हणजे नाना आणि पप्पांच्या खोल्या .  या खोल्यांच्या समोर असलेल्या भागात आमचे नाच होत  असत गुलाबाई विसर्जनाच्या दिवशी ! गच्ची , सगळे खेळ खेळण्याची मोठ्ठी  मोकळे मैदान ! मुळतः ही निळी पाण्याची टाकी नव्हती .  या जागी भट्टी होती , नीट बघितले तर  त्या भट्टीच्या आयताकृती खुणा दिसत आहेत .  आणि डावीकडे जी पडदी दिसतेय त्याला लागून  सगळी फुल झाडांची खोकी ठेवलेली होती . जिना खाली जायचा आणि बाजूला इंग्रजी L  अक्षराच्या आकाराची एक खोली .  खाली जायचा जिना आई(आजी) सोबत दोन्ही धाकटे काका आणि आम्ही बहिणी , (जिन्याच्या बाजूच्या खोलीच्या दारा समोर )

इतर गमती जमती -२(गच्चीवरील गमती जमती)

इतर गमती जमती -२ (गच्चीवरील गमती जमती)                                                                                                                    लहानपणापासून गच्ची तशी खूपच लाडकी आणि मनाच्या जवळची होतीच . पण हे सगळे लिखाण करायला घेतले आणि वाटतेय अख्ख आयुष्यच गच्चीवर गेलंय आपलं ! कितीही लिहीत गेलं तरी एक ना एक , काही ना काही आठवतच आहे  आणि नीट आठवून लिहावेसेही वाटते आहेच. हा सगळा  प्रवास इतका भारी होतोय , की मला तर हा भूतकाळ न वाटता हाच वर्तमानकाळ आहे असे वाटू लागले आहे . मी चौधरी सदन मध्येच राहतेय जणू आत्ता ! बऱ्याच गोष्टी आहेत छोट्या छोट्या , पण अगदी न टाळता येण्यासारख्या अशाच  काही छोट्या छोट्या गोष्टी , आठवणी या लेखात !          ...

इतर गमती जमती-१ (गच्चीवरील गमती जमती)

इतर गमती जमती-१ (गच्चीवरील गमती जमती)                                                                                                                    खरंतर गच्चीने आयुष्याचा आणि मनाचा खूप मोठ्ठा भाग व्यापलेला आहे . प्रत्येक दिवसाचा, अगदी दररोजचा काही तासांचा वेळ गच्चीवरच जात असे . उन्हाळ्यात तर रात्रींचाही ! कारण उन्हाळ्यात गर्मी फार , त्यामुळे आमचे बाबा (आजोबा) आणि आम्ही तिघी बहीणी आमच्या परीक्षा संपल्या की गच्चीवरच झोपत असू रात्रीच्या . मग तो रोजचा एक मोठ्ठा कार्यक्रमच असे . गच्चीवर झोपायचे म्हणजे पाणी सुद्धा न्यावे लागे . मग आम्ही छान नवीकोरी पाण्याची घागर किंवा छोटं मडकं आणि त्यावरचा छोटा लोटा सुद्धा भरून नेत असू . अक्षय्य तृतीया उन्हाळ्यातच . आमच्याकडे अक्षय्य तृती...

उपवासाचे पापड आणि वाळवणं (गच्चीवरील गमती जमती)

उपवासाचे पापड आणि वाळवणं  (गच्चीवरील गमती जमती)                                                                                                        पापड आणि वाळवणं यामध्ये एक मोठ्ठा आणि महत्वाचा भाग असे उपवासाच्या पदार्थांचा . यात सगळेच प्रकार असतं . पापड , चकल्या , वेफर्स , किस असे सगळे काय काय . मुख्यतः साबुदाणा आणि बटाटा या पासून बनवलेले शिवाय थोड्या प्रमाणात भगर सुद्धा असे .                                                     साबुदाण्याच्या चकल्या करायच्या म्हणजे साबुदाणा भिजवणे, भगर भिजवणे असे सगळे . पण हे जे काय सगळे ते खाली घरातच केले जात असे . अगदी चकल्या करण्या...