नृत्य गणेश (अभ्यासातून रंजन...) श्री चन्न केशव मंदिर, बेलूर, हसन, कर्नाटक, भारत गणराज रंगि नाचतो नाचतो पायि घागऱ्या करिती रुणझुण नाद स्वर्गि पोचतो... कटि पीतांबर कसून भर्जरी बाल गजाननास नर्तनास करी तुंदिल तनु तरी चपल साजिरी लावण्ये साजतो... नारद तुंबरू करिती गायन करी शारदा वीणावादन ब्रह्मा धरितो तालहि रंगून मृदंग धिमि वाजतो... देवसभा घनदाट बैसली नृत्यगायने मने हर्षली गौरीसंगे स्वये सदाशिव शिशुकौतुक पाहतो... या गाण्यातून गणेशाची नृत्य निपुणता तर दिसतेच , पण त्यातून नृत्य गणेशाचे मुर्तीशास्त्र सुद्धा कळते. शांताबाई शेकळेच त्या , त्यांच्याबद्दल मी काय बोलणार ? शांताबाई सादर प्रणाम तुम्हाला , अगदी वारंवार ! गणेशाला चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती मानले जाते. ज्ञानेश्वरांनी सुद्ध...