भाग-९ (निवडक रा श्री मो) 🪔🪔🪔 🪔🏵️🏵️🏵️🪔 🪔🪔🪔 ज्ञानेश्वर-तुकारामांच्या दिंड्यांमध्ये सामील होऊन पंढरीची वारी करण्याची स्पर्धा अलीकडे उच्चविद्या विभूषितांमध्येही पहावयास मिळते. शिक्षित-अशिक्षित वारकरी वर्षानुवर्षे दिंड्या-पताकांचे पालख्यांचे वारसदार आहेतच. पण अहंकार विसरून हे तथाकथित विद्याविभूषित खऱ्या अर्थाने वारकऱ्यांपर्यंत पोहोचत असतील तर भावी काळात समाजधारणेत परिवर्तन झाल्याचे दृश्य खरोखरच पहावयास मिळू शकेल आणि ज्ञानेश्वरांनी अपेक्षा केल्याप्रमाणे "विश्व हे मोहरे लावावे" याची अनुभूती कदाचित येऊ शकेल. 🌸🌼🌸🌼🌸 🌸🪔🌸🪔🌸 🌸🌼🌸🌼🌸 अहंकाराचा त्याग ही असामान्य बाब या वारकऱ्यांनी सहजतेने आचरणात आणलेली असते. ही सहजता ज्याला ज्ञानदेवांनी सहजसमाधी असे म्हटले आहे, ती सहजसमाधी विठ्ठल भक्तीने भारावलेल्या या समाजाचे अविभाज्य अंग असते. 🌸🪔🌸🪔🌸 🌸🌼🌸🌼🌸 🌸🪔🌸🪔🌸 सर्व सजीवांमध्ये खलप्रवृत्तीचा अंश कायमच कार्यरत असतो. या खलप्रवृत्तीला आपण प्रयत्नपू...