Skip to main content

भाग-५ (निवडक रा श्री मो)

 भाग-५

(निवडक रा श्री मो) 


🪔🪔🪔

🌷🌷🌷

🪔संत आणि संतकार्य🪔

🪔मातृभूमी साठी संतांचे योगदान-एक वेगळा दृष्टीकोन!🪔

🌷🌷🌷

🪔🪔🪔


ज्ञानदेवांच्या व्यक्तीमत्वात तत्त्वज्ञान(इंटरप्रिटेटिव्ह) व काव्य(क्रिएटिव्ह) ह्या परस्परविरोधी प्रवाहांचा विहंगम संगम झाल्याचे स्पष्ट होते.

सच्चं भण गोदावरी

🌷🌷🌷

🪔🪔🪔

🌷🌷🌷


नामदेवांनी ज्ञानोत्तर भक्तीचा प्रसार पंढरपूर तथा महाराष्ट्रभर केला एवढेच नसून त्यांनी भक्ती धर्माची पताका पंजाब मधील अमृतसर (घुमन) पर्यंत पोहोचविली. म्हणून शीख धर्म संस्थापक गुरु नानकांनी आपल्या लिखाणातून (गुरु ग्रंथ साहिब) त्यांना अमर केले आहे आणि आजही शिखांमध्ये नामदेवांचे स्थान अत्यंत पुजनिय आहे. नांदेड येथील हुजूर साहेब गुरुद्वाराला भेट देणारे यात्रेकरू आवर्जून नामदेवांच्या नरसी गावाला भेट देतात हे विशेष होय.

सच्चं भण गोदावरी

🌷🌷🌷

🪔🪔🪔

🌷🌷🌷


ज्ञानदेवांनी एकनाथांच्या स्वप्नात जाऊन आळंदी येथील समाधी अवस्थेमध्ये आपल्या गळ्याभोवती अजान वृक्षाच्या मुळीचा फास आवळला जात असून त्या त्रासातून आपली मुक्तता करावी असा दृष्टांत दिला. याचाच अर्थ समाजातील ज्ञानदेवांची शिकवण ही काहीशी मागे पडत होती, तिला गतिमान करणे आणि महाराष्ट्राचे ऐक्य दुभंगू नये म्हणून भक्ती चळवळ प्रभावी करणे आवश्यक होते. एकनाथांना ह्या दृष्टांताचा अर्थ नक्की समजला आणि त्यांनी भक्ती चळवळ प्रभावी करण्यासाठी भागवतावर आधारित उद्धवगीता हा ग्रंथ लिहून एकीकडे भक्तीचा पुरस्कार केला आणि दुसरीकडे आळंदी येथील ज्ञानदेवांच्या समाधीचा शोध घेऊन तेथे ज्ञानदेव मंदिर उभारले.

सच्चं भण गोदावरी

🌷🌷🌷

🪔🪔🪔

🌷🌷🌷




समाज संघटन करून प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करण्याची प्रेरणा एकनाथांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिली आणि बयेच्या दरवाज्यावर थाप मारून आत्मबल जागृत करण्याचे महान कार्य केले. परिणामी शिवरायांच्या छत्राखाली सारा महाराष्ट्र एक झाला आणि इस्लामी आक्रमण(भौतिक आणि सांस्कृतिक) यापासून महाराष्ट्राचे संरक्षण केले. मित्रांनो हा जाणता राजाही वेरुळच्या भोसले राजकुलाचा दैदीप्यमान वंशज होय.

सच्चं भण गोदावरी

🌷🌷🌷
🪔🪔🪔
🌷🌷🌷


समाजातील फाटक्यातील फाटक्या माणसांच्या हातात वेदांताची शिकवण पोहोचवणारे एकनाथ एक सर्वश्रेष्ठ संत ठरतात.

सच्चं भण गोदावरी

🌷🌷🌷
🪔🪔🪔
🌷🌷🌷


शक्तीची उपासना करणे आणि आपल्या परीने संस्कृती संरक्षणाच्या कार्याला तत्पर राहणे हा संदेश समर्थ रामदास यांनी गावोगावी हनुमंताची मंदिरे म्हणजेच शक्ती केंद्रे स्थापन करून दिला. त्यामुळे महाराष्ट्रात एकप्रकारचे चैतन्य निर्माण झाले आणि राष्ट्ररक्षणासाठी समर्पित होण्यासाठी तरुणांना प्रेरणा मिळाली. त्यासाठी त्यांनी अनेक मठ निर्माण करून शक्ती केंद्राचे संवर्धन व जतन केले, हे त्यांचे राष्ट्रीय महान कार्य होय.

सच्चं भण गोदावरी

🌷🌷🌷
🪔🪔🪔
🌷🌷🌷






©️आनंदी पाऊस
(निवडक रा श्री मो) 
४जाने२०२३   




Comments

  1. सर्व संतांना 🙏🏻
    त्यांनी सांगितलले तत्वज्ञान, शिकवणूक यावरच आपल्य् संस्कृतीचा पाया आहे. जीवनगौरव पुरस्काराने खरोखरच
    मोरवंचीकरसरांच्या कार्याचा गौरवच केला आहे 🙏🏻
    प्रा सौ वैशाली चैाधरी
    ठाणे

    ReplyDelete
  2. खूप छान. संतांचे कार्य खूप महान आहे. मोरवंचीकर सरांचे खूप खूप अभिनंदन 👏👏

    ReplyDelete
  3. खूप छान माहिती आहे संतांविषयी मी फक्त ऐकलं होतं आज वाचल्यावर थोडं लक्षात आले...

    ReplyDelete
  4. Khuf Chan vachun annd vatla👌👌👌👌🏵️🏵️🏵️

    ReplyDelete
  5. स्मिता पाटीलJanuary 27, 2023 5:41 pm

    संतांची माहिती खूपच छान आहे ही माहिती आजच्या पीढी ला देणे फार गरजेचे आहे

    ReplyDelete
  6. आपल्या कार्यात आणि प्रयत्नात निर्मळ प्रेम तसेच सातत्याचा साक्षात्कार होतो एवढे अप्रतिम काम आपण करता आहात .धन्यवाद ...गुलाबराव पाथरकर औरंगाबाद .

    ReplyDelete
  7. || संताची महती आणी माहीती अप्रुपच.सर्व स्पंदने‌ व त्यातील मंत्र व तंत्र हे अदभुतच|
    वाचून त्यातील भावार्थ कळाला व प्रेरणा मिळाली.रामदासस्वामी यांचे सज्जनगड व शिवथर घळ येथे गेल्यावर ही प्रसन्न वाटते...तसेच काही वाचून प्रसन्न वाटलेच ||

    ReplyDelete
  8. Khup chan mahiti santan baddal. Tyanche kary pan mothe aahe 🙏🙏

    ReplyDelete
  9. Rigorventure@gmail.comFebruary 05, 2023 12:34 pm

    मोरवंचीकर सरांचं जास्त काही लिखाण मी वाचलेलं नाही, पण जे काही थोडं थोडकं वाचलं आहे,त्या वरुन सरांच्या अभ्यासाचा आणी लिखाणाच्या ताकदीचा अंदाज येतो. सोप्पी भाषा रचना आणी त्याला supportive असे अभ्यासपूर्ण संशोधन हा त्यांच्या लिखाणाचा एकंदरीत मला तरी स्थायीभाव वाटतो. महाराष्ट्राच्या अतिशय अभिमानास्पद अशा संत परंपरेबद्दल त्यांचे लिखाण पण त्याच ताकदीचे असणार. तू संकलित केलेले थोडे फार paragraphs त्यांची चुणूक देतात. नव्या पिढीला , जे मराठीचे वाचक पण नाहीत, त्यांच्यापर्यंत जर हे विचार गेले तर समाजाला एकंदरीत केवढा फायदा होईल. त्या निमित्ताने तुझ्या लेखाचा हा खारीचा वाटा स्तुत्य आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

  🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕 (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) प्राचीन होयसळ श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा, जिल्हा तुमकुरु, कर्नाटक बंगळूरू पासून साधारण १२७ किमी. गूगल सर्च इंजिन मध्ये Ancient Hoysala Shri Kedareshwar Swami temple, Nagalapura असे शोधले की लगेचच गूगल ते दाखवते, तिथे जायचा रस्ताही दाखवते. त्याचे सगळे ऐकायचे की बरोब्बर तिथे पोहोचता येते.                 होयसळ राजवट, मूळ कर्नाटकात. त्यांनी अकरावे ते चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले. या कालावधीत त्यांनी जी मंदिरे उभारली, त्या मंदिरांना होयसळ मंदिर आणि त्या शैलीला होयसळ शैली म्हणून ओळखले जाते. होयसळ राजवट काळात जवळ-जवळ दीड हजार मंदिरे उभारली. तथापि त्यातील आज फक्त शंभर-दीडशेच मंदिरे अस्तित्वात आहेत. त्यातील फार थोडी सुस्थितीत आहेत. त्यापैकी अगदी बोटावर मोजण्या इतकी मंदिरे सर्वज्ञात आहेत. ती म्हणजे चन्न केशव मंदिर, बेलूर, होयसाळेश्वर मंदिर, हाळेबिडू आणि चन्न केशव मंदिर, सोमनाथपुर. ही तीनही स्थळे जागतिक वारसा या...

दळण (घरातील गमती जमती)

दळण (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                   ...