भाग-५
(निवडक रा श्री मो)
🪔🪔🪔
🌷🌷🌷
🪔संत आणि संतकार्य🪔
🪔मातृभूमी साठी संतांचे योगदान-एक वेगळा दृष्टीकोन!🪔
🌷🌷🌷
🪔🪔🪔
ज्ञानदेवांच्या व्यक्तीमत्वात तत्त्वज्ञान(इंटरप्रिटेटिव्ह) व काव्य(क्रिएटिव्ह) ह्या परस्परविरोधी प्रवाहांचा विहंगम संगम झाल्याचे स्पष्ट होते.
सच्चं भण गोदावरी
🌷🌷🌷
🪔🪔🪔
🌷🌷🌷
नामदेवांनी ज्ञानोत्तर भक्तीचा प्रसार पंढरपूर तथा महाराष्ट्रभर केला एवढेच नसून त्यांनी भक्ती धर्माची पताका पंजाब मधील अमृतसर (घुमन) पर्यंत पोहोचविली. म्हणून शीख धर्म संस्थापक गुरु नानकांनी आपल्या लिखाणातून (गुरु ग्रंथ साहिब) त्यांना अमर केले आहे आणि आजही शिखांमध्ये नामदेवांचे स्थान अत्यंत पुजनिय आहे. नांदेड येथील हुजूर साहेब गुरुद्वाराला भेट देणारे यात्रेकरू आवर्जून नामदेवांच्या नरसी गावाला भेट देतात हे विशेष होय.
सच्चं भण गोदावरी
🌷🌷🌷
🪔🪔🪔
🌷🌷🌷
ज्ञानदेवांनी एकनाथांच्या स्वप्नात जाऊन आळंदी येथील समाधी अवस्थेमध्ये आपल्या गळ्याभोवती अजान वृक्षाच्या मुळीचा फास आवळला जात असून त्या त्रासातून आपली मुक्तता करावी असा दृष्टांत दिला. याचाच अर्थ समाजातील ज्ञानदेवांची शिकवण ही काहीशी मागे पडत होती, तिला गतिमान करणे आणि महाराष्ट्राचे ऐक्य दुभंगू नये म्हणून भक्ती चळवळ प्रभावी करणे आवश्यक होते. एकनाथांना ह्या दृष्टांताचा अर्थ नक्की समजला आणि त्यांनी भक्ती चळवळ प्रभावी करण्यासाठी भागवतावर आधारित उद्धवगीता हा ग्रंथ लिहून एकीकडे भक्तीचा पुरस्कार केला आणि दुसरीकडे आळंदी येथील ज्ञानदेवांच्या समाधीचा शोध घेऊन तेथे ज्ञानदेव मंदिर उभारले.
सच्चं भण गोदावरी
🌷🌷🌷
🪔🪔🪔
🌷🌷🌷
👍🏻
ReplyDeleteआनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫
Deleteसर्व संतांना 🙏🏻
ReplyDeleteत्यांनी सांगितलले तत्वज्ञान, शिकवणूक यावरच आपल्य् संस्कृतीचा पाया आहे. जीवनगौरव पुरस्काराने खरोखरच
मोरवंचीकरसरांच्या कार्याचा गौरवच केला आहे 🙏🏻
प्रा सौ वैशाली चैाधरी
ठाणे
खूप छान. संतांचे कार्य खूप महान आहे. मोरवंचीकर सरांचे खूप खूप अभिनंदन 👏👏
ReplyDeleteखूप छान माहिती आहे संतांविषयी मी फक्त ऐकलं होतं आज वाचल्यावर थोडं लक्षात आले...
ReplyDeleteKhuf Chan vachun annd vatla👌👌👌👌🏵️🏵️🏵️
ReplyDeleteसंतांची माहिती खूपच छान आहे ही माहिती आजच्या पीढी ला देणे फार गरजेचे आहे
ReplyDeleteआपल्या कार्यात आणि प्रयत्नात निर्मळ प्रेम तसेच सातत्याचा साक्षात्कार होतो एवढे अप्रतिम काम आपण करता आहात .धन्यवाद ...गुलाबराव पाथरकर औरंगाबाद .
ReplyDelete|| संताची महती आणी माहीती अप्रुपच.सर्व स्पंदने व त्यातील मंत्र व तंत्र हे अदभुतच|
ReplyDeleteवाचून त्यातील भावार्थ कळाला व प्रेरणा मिळाली.रामदासस्वामी यांचे सज्जनगड व शिवथर घळ येथे गेल्यावर ही प्रसन्न वाटते...तसेच काही वाचून प्रसन्न वाटलेच ||
Khup chan mahiti santan baddal. Tyanche kary pan mothe aahe 🙏🙏
ReplyDeleteमोरवंचीकर सरांचं जास्त काही लिखाण मी वाचलेलं नाही, पण जे काही थोडं थोडकं वाचलं आहे,त्या वरुन सरांच्या अभ्यासाचा आणी लिखाणाच्या ताकदीचा अंदाज येतो. सोप्पी भाषा रचना आणी त्याला supportive असे अभ्यासपूर्ण संशोधन हा त्यांच्या लिखाणाचा एकंदरीत मला तरी स्थायीभाव वाटतो. महाराष्ट्राच्या अतिशय अभिमानास्पद अशा संत परंपरेबद्दल त्यांचे लिखाण पण त्याच ताकदीचे असणार. तू संकलित केलेले थोडे फार paragraphs त्यांची चुणूक देतात. नव्या पिढीला , जे मराठीचे वाचक पण नाहीत, त्यांच्यापर्यंत जर हे विचार गेले तर समाजाला एकंदरीत केवढा फायदा होईल. त्या निमित्ताने तुझ्या लेखाचा हा खारीचा वाटा स्तुत्य आहे.
ReplyDelete