🐈🐈वाघाची मावशी🐈🐈 खरतरं हे उंदीर मामाचे मानाचे दिवस! तथापि ह्या वाघाच्या मावश्यांनी प्रचंड धुमाकूळ घातलाय बऱ्याच काळापासून. हत्ती मालिका पूर्ण झाली, वृक्ष मालिका सुद्धा झोकात चालू आहेच. परंतु सुरुवात मनीमाऊच्या मालिकेने झाली होती. बऱ्याचशा मनीमाऊ इथे प्रकाशित झाल्या, तरीही बऱ्याच बाकी आहेत. त्या मला खूपच छळत आहेत. मी झोपली की, एक माझ्या डोक्यावर टुणकन उडी मारते, एक माझ्या पोटावर येऊन बसते, एक पायाशी येऊन झोपते, काम करायला लागले की एखादी पायात घोटाळत असते, लॅपटाॅप घेतला हातात की एखादी बटानांवर येऊन बसते, तर एखादी मांडीवर. आमचा नंबर कधी येणार? असा सततचा प्रश्न विचारत असतात. त्यामुळे आज उंदीर मामाचा मान असला तरी आनंदी पावसात मात्र या वाघाच्या मावश्यांचा मान! एक दारा आडून बघतेय कधी नंबर लागतो याची वाट बघत. एक वाट बघून आळसावल्याचे नाटक करतेय लाडात येऊन. तर एक आपल्या समस्त पिल्लांसह माझ्याकडे बघतेय, एक मासा तोंडात धरून पोझ देतेय, एक तर चक्क योग करतेय, दोघी रुसल्याचे नाटक करत एकमेकींकडे पाठ करून बसल्यात, तर हे एक कुटुंब चेहऱ्यावर शून्य भाव असल्...