Skip to main content

Posts

Showing posts with the label घरातील गमती जमती

थोडं(खूप सार?) गोडाचं-६ (सांजरी/सांजोरी) (घरातील गमती-जमती)

  थोडं(खूप सार?) गोडाचं-६  ( सांजरी /सांजोरी) (घरातील गमती-जमती)                               खानदेशातील अनेक लोकप्रिय गोड पदार्थांपैकी एक गोड पदार्थ. अगदी दराब्याच्या तोडीसतोड. सर्वांचाच अतिशय लाडका पदार्थ म्हणजे सांजरी/सांजोरी! हा लेख बऱ्याच दिवसांपासून(जवळ-जवळ दोन अडीच वर्षांपासून) लिहायचा राहतोय. खरंतर तो ताबडतोब लिहिता यावा आणि त्यासोबत त्याची प्रकाशचित्रं जोडता यावी म्हणून मी स्वतःच सांजऱ्या केल्या आणि करता करता प्रत्येक पायरी गणिक प्रकाशचित्रं सुद्धा काढत गेले. तथापि या ना त्या कारणांनी लिहायचे राहूनच जात होते. मुहूर्तच लागत नव्हता. आनंदी पावसाच्या वाचक सीमाताई यांनी काही दिवसापूर्वीच या लेखाची विचारणा केली. त्यांना सांगितले लेखन बाकी आहे. आज त्यांनी परत विचारणा केली, मग मात्र सगळी काम बाजूला ठेवून आधी हे लेखन हाती घेतले. आशा करते पुढील दोन दिवसांत हे पूर्ण होईल. कारण अक्षय्य तृतीया तोंडावर आलीये.                    ...

😆थोडं(खूप सारं) गोडाचं(लाडू)-६ (घरातील गमती जमती)

 😆 थोडं(खूप सारं) गोडाचं(लाडू)-६  (घरातील गमती जमती)                     आधीच्या भागात म्हणजे थोडं गोडाचं-४   https://www.anandipavus.com/2022/01/blog-post.html   मध्ये जिलेबीच्या मेजवानीचा आस्वाद घेतलाच आहे. त्यात सांगितल्याप्रमाणे, याच काळातील म्हणजे हिवाळ्यातील अजून दोन गोड? पदार्थांची मेजवानी आणि गमती जमती (त्या पदार्थांच्या आग्रहाच्या)या भागात बघू या.                      वरील वाक्यात गोड शब्दापुढे प्रश्नचिन्ह चुकून पडले की काय असे वाटण्याची शक्यता आहे, तुम्हा सगळ्यांना. पण ते चुकून पडले नाही, तर अगदी जाणीव पूर्वक घातले आहे. का? ते पुढे समजेलच. आजचे दोन गोडाचे पदार्थ म्हणजे हिवाळा खास आणि अतिशय आरोग्यकारक, पौष्टिक. तर हे दोन पदार्थ म्हणजे दोन प्रकारचे लाडू. तर आधी त्या वरच्या प्रश्नचिन्हाचे उत्तर मिळेल अशा लाडू पासून सुरवात करते.                      अर्थातच तुम्हा चाणाक्ष वाचकांनी आधीच ओळ...

काही व्यक्ती आणि खास कामं-५ (घरातील गमती-जमती)

  काही व्यक्ती आणि खास कामं-५ (घरातील गमती-जमती) दाह्या, मुरमुरे,  फुटाने,शेंगदाने, लाह्या घ्या वो...... साधारण दुपारी ३-४ वाजेच्या सुमारास, आधी अगदी लांबून बारीक आवाजात आरोळी कानी पडत असे. मग हळूहळू जवळ येणारी आणि आवाज क्रमक्रमाने मोठा होत जाणारी. नंतर एकदम जिन्याच्या दरवाज्यावर लावलेली बेलच ऐकू येत असे. ठराविक वेळा सोडल्या तर एरवी कधीही दरवाजा उघडायला न जाणारी आम्ही मुलं खुश होऊन दरवाजा उघडायला जात असू. कारण आधीच पक्के माहिती असे कोणी बेल वाजविली आहे ते! वरील आरोळी वरून तुम्हा वाचकांना समजलेच असे ती कोणाची ते. तर त्या असतं आमच्या भोईण आजी म्हणजे फुटाणे वगैरे विकणाऱ्या.आम्ही दरवाजा उघडून, त्या भोईण आजी आत येईपर्यंत, घरातील कुणीतरी महिला तिथे पोहोचलेल्याच असत. सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे त्या आजी विक्री करत असलेले सगळे जिन्नस एका मोठ्या टोपलीतून आणि पोत्यात भरून आणत असत. ही टोपली आणि त्यावर ती पोती ठेऊन, ती टोपली त्या एकट्याच त्यांच्या डोक्यावर ठेऊन आणत असतं. मग ही टोपली त्यांच्या डोक्यावरून उतरवून खाली जमिनीवर ठेवायला त्या टोपलीला, कुणीतरी हात लावून मदत क...

थोडं (खूप सारं ?) गोडाचं-५(श्रीखंड)(घरातील गमती-जमती)

  थोडं (खूप सारं?) गोडाचं -५(श्रीखंड) (घरातील गमती-जमती)                           थोडं गोडाचं मालिकेतील आज पाचवा लेख, खास मराठी नूतन वर्षारंभा निमित्त, अर्थातच गुढी पाडवा विशेष! गुढी पाडवा म्हटलं की घराघरात श्रीखंड-पुरीचा बेत असतो. पण बऱ्याच घरात बाजारातून विकत आणलेलं श्रीखंड असतं. बऱ्याच वेळा ते कितीतरी जुनं असतं. विकत आणलेलं म्हणजे ते जास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी त्यात काय काय रसायनं घातलेली असतात. ती शरीराला घातकच असतात. तसेच चव सुद्धा कशी असेल याची खात्री नसते. खायला घेतल्यावर कळते. मग जेवणातील सगळी मजा आणि आनंद निघून जातो. बऱ्याचदा ते जास्त टिकावे म्हणून त्यात साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे बरीच मंडळी त्यात थोडं दूध घालून ते चांगलं मिसळून घेतात आणि मग खातात. तसेच त्यात रंग सुद्धा घातलेले असतातच. ते सुद्धा हानिकारकच. घरी करायचे म्हटलं तर बऱ्याच जणांना ते किचकट वाटते. म्हणून आज हा "श्रीखंड प्रपंच!" श्रीखंडाची गोष्ट, माझी वैयक्तिक.                ...

मनोहारी माणिक-पैंजण (घरातील गमती जमती)

  मनोहारी माणिक-पैंजण  (घरातील गमती जमती)                           आता आजचे शीर्षक वाचून कुणाच्याही लगेचच मनात येईल, आजची गोष्ट कुठल्यातरी पैंजणाशी संबंधित आहे किंवा एखाद्या पैंजण घालून केलेल्या नृत्याशी संबंधित आहे. पण तसे अजिबातच नाहीये. आजच्या गोष्टीचा अगदी दूरदूरपर्यंत पैंजण किंवा नृत्याशी कुठल्याही प्रकारचा काहीही संबंध नाही. तर आजची गोष्ट आहे एका खाद्य पदार्थाची! शीर्षकातच त्या पदार्थाची दोन नावं दडली आहेत. एक नाव अस्सल खान्देशी आहे आणि दुसरे नाव मला अलीकडेच आभासी सामाजिक माध्यमावर म्हणजेच सोशिअल मीडिया वर समजले आहे. नक्की कुठल्या भागात वापरले जाते ते नाही माहीती, पण गम्मत वाटली आणि आवडलेही. तसे नाव का पडले असावे हा मात्र विचार करण्यासारखा विषय आहे. तर आजची गोष्ट आहे मनोहरा/ मनोहर म्हणजेच माणिक पैंजणाची. पैकी पहिला शब्द म्हणजे मनोहरा/मनोहर शब्द अस्सल खान्देशी. अगदी सोप्प्या शब्दात सांगायचे तर आजची गोष्ट आहे फोडणीच्या पोळीची!            ...