Skip to main content

भाग-१ (निवडक रा श्री मो )

 भाग-१ 

(निवडक रा श्री मो )

   सस्नेह नमस्कार!

 बऱ्याच दिवसापासून हे सदर चालू करावे असे मनात होते. तथापि काही कारणाने किंवा योग्य वेळ आणि मुहूर्त न मिळाल्याने राहून जात होते. पण आजच्या सारखा योग्य आणि सुंदर मुहूर्त असणे नाही. आज रा श्री मो म्हणजे माझे गुरु आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहास आणि पुरातत्व संशोधक, संस्कृती-पुरुष, ऋषीतुल्य डॉ.प्रा. रा श्री मोरवंचीकर यांचा जन्मदिवस! आज त्यांनी  ८४व्या वर्षांत पदार्पण केले आहे! त्यांना 🪔🌷🌷🌷उत्तम आरोग्य संपदा लाभो🌷🌷🌷🪔 अशा सप्रेम सदिच्छा व्यक्त करते! आणि निवडक रा श्री मो हे सदर आज पासून सुरू करते. 
त्यांचे खास आणि एकमेवाद्वितीय वैशिष्ट म्हणजे अतिशय सूक्ष्म, सर्वस्पर्शी अभ्यास, संशोधन! या अभ्यासावर, संशोधनावर त्यांनी अमाप लिखाण सुद्धा केले आहे, अजूनही करत आहेत. इतिहासासारखा बोजड आणि अतिशय नावडता विषय. पण त्यांच्या या सूक्ष्म अभ्यासामुळे हा विषय, ह्या विषयाचा अभ्यास इतका मनोवेधक, चित्तवेधक आणि रंजक होऊन जातो की इतिहासाला शत्रू मानणारा वाचक/अभ्यासक(माझ्यासारखा)  इतिहासाच्या प्रेमात अखंड बुडून जातो. हा अभ्यास एका वेगळ्याच जादुई दुनियेत घेऊन जातो, जिथून परत यावेसेच वाटत नाही, कधीच! त्यांचे भाषेवरील,शब्दावरील प्रभुत्व तर काय वर्णावे! 
या सगळ्याची झलक दाखविणारी, अतिशय खोल गर्भितार्थ असलेली, मला अतिशय भावलेली काही वाक्य, जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावी, माझ्या सारखा सर्वांनाच हा आनंद अनुभवता यावा अशी माझी इच्छा होती. अर्थातच या उपक्रमासाठी त्यांची पूर्वपरवानगी घेतलेली आहेच. 
तर आनंदी पाऊस सहर्ष सादर करीत आहे "निवडक रा श्री मो"!🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️ 



 














©️आनंदी पाऊस
(निवडक रा श्री मो) 
६ डिसेंबर २०२२  













    

Comments

  1. निवडक घोस वाक्यच जणू अप्रतिम सुंदर

    ReplyDelete
  2. गुलाबराव पाथरकरDecember 06, 2022 8:20 am

    आजच्या उतरत्या काळात आपल्या सारख्या विचारवंत व्यक्तींची जुन्या पीढीबद्दल असणारी ओढ आणि आदराची भावना बघून मनाला अत्यंत सुखाचा वर्षाव झाल्यासारखा आनंद होत आहे .आपला उपक्रम खूपच स्तुत्य आहे मॕडम. त्या साठी अनेकदा धन्यवाद .नमस्कार

    ReplyDelete
  3. गीतांजलीDecember 06, 2022 8:21 am

    छान आहेत quotes

    ReplyDelete
  4. अतिशय स्तुत्य उपक्रम. तुझ्या अभ्यासू वृत्तीमुळे आम्हा आळशी वाचकांना पण मोरवचिंकर सरांच्या साहित्यिक खजिन्याचे दार किलकिले होईल. तुझ्या ह्या साहित्यिक यज्ञाला सरांचे तर आशीर्वाद आहेतच पण आम्हा वाचकांच्या शुभेच्छा पण तुझ्या पाठीशी कायम राहतील. 👍👍👍

    ReplyDelete
  5. लीलाधर कोल्हे सरDecember 06, 2022 10:53 am

    सरांना जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🎂💐🌹🙏🙏

    ReplyDelete
  6. मनिष चिरमाडेDecember 06, 2022 10:53 am

    सर ना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा...🙏🏻

    ReplyDelete
  7. व पु होले सरDecember 06, 2022 11:15 am

    व्वा!! अतिशय उत्तम उपक्रम.स्पंदने पुन्हा अनुभवता येतील🙏🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  8. छान उपक्रम. आम्हालाही त्यांचे साहित्य वाचल्याचा आनंद मिळेल. सरांना वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा

    ReplyDelete
  9. सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🙏
    निवडक quotes 👌

    ReplyDelete
  10. Sir happy birthday to you🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🏵️🏵️🏵️🏵️

    ReplyDelete
  11. ||वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ||
    सारेच "Good Thoughts"are The Bestच..वाचल्यावर " Achieved learning Something..
    .just striked..these lines...
    ||गुरूसंगे शिष्यही बि घडला..आम्ही बि घडलो..||
    ता.क.:त्यांच पुस्तक मी पुस्तक भिशीतून मागवलय.waiting to read.....

    ReplyDelete
  12. तुमच्या रा श्री मो सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांचे विचार समजून घ्यायला नक्कीच आवडतील. मला तुम्ही मांडलेले सगळेच विचार आवडले पण विशेष बद्दलचा विचार खूप आवडला.
    प्रा सौ वैशाली चौधरी
    ठाणे (प)

    ReplyDelete
  13. ज्योती किरंगेDecember 08, 2022 6:22 am

    सरांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा🎉💐

    ReplyDelete
  14. प्रथमेशDecember 08, 2022 6:55 am

    खूप छान👌🏻👌🏻
    समाधीची स्पंदने हे पुस्तकं वाचताना त्यांची प्रचिती येते
    अश्या व्यक्ती मार्गदर्शक असणे भाग्याचे आहे!

    ReplyDelete
  15. सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार खूप सुंदर लेख

    ReplyDelete
  16. जितेंद्र महाजनDecember 23, 2022 6:19 pm

    सरांचे विचार खूपच छान सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा🙏🏻🙏🏻

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

  🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕 (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) प्राचीन होयसळ श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा, जिल्हा तुमकुरु, कर्नाटक बंगळूरू पासून साधारण १२७ किमी. गूगल सर्च इंजिन मध्ये Ancient Hoysala Shri Kedareshwar Swami temple, Nagalapura असे शोधले की लगेचच गूगल ते दाखवते, तिथे जायचा रस्ताही दाखवते. त्याचे सगळे ऐकायचे की बरोब्बर तिथे पोहोचता येते.                 होयसळ राजवट, मूळ कर्नाटकात. त्यांनी अकरावे ते चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले. या कालावधीत त्यांनी जी मंदिरे उभारली, त्या मंदिरांना होयसळ मंदिर आणि त्या शैलीला होयसळ शैली म्हणून ओळखले जाते. होयसळ राजवट काळात जवळ-जवळ दीड हजार मंदिरे उभारली. तथापि त्यातील आज फक्त शंभर-दीडशेच मंदिरे अस्तित्वात आहेत. त्यातील फार थोडी सुस्थितीत आहेत. त्यापैकी अगदी बोटावर मोजण्या इतकी मंदिरे सर्वज्ञात आहेत. ती म्हणजे चन्न केशव मंदिर, बेलूर, होयसाळेश्वर मंदिर, हाळेबिडू आणि चन्न केशव मंदिर, सोमनाथपुर. ही तीनही स्थळे जागतिक वारसा या...

दळण (घरातील गमती जमती)

दळण (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                   ...