भाग-१
(निवडक रा श्री मो )
सस्नेह नमस्कार!
बऱ्याच दिवसापासून हे सदर चालू करावे असे मनात होते. तथापि काही कारणाने किंवा योग्य वेळ आणि मुहूर्त न मिळाल्याने राहून जात होते. पण आजच्या सारखा योग्य आणि सुंदर मुहूर्त असणे नाही. आज रा श्री मो म्हणजे माझे गुरु आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहास आणि पुरातत्व संशोधक, संस्कृती-पुरुष, ऋषीतुल्य डॉ.प्रा. रा श्री मोरवंचीकर यांचा जन्मदिवस! आज त्यांनी ८४व्या वर्षांत पदार्पण केले आहे! त्यांना 🪔🌷🌷🌷उत्तम आरोग्य संपदा लाभो🌷🌷🌷🪔 अशा सप्रेम सदिच्छा व्यक्त करते! आणि निवडक रा श्री मो हे सदर आज पासून सुरू करते.
त्यांचे खास आणि एकमेवाद्वितीय वैशिष्ट म्हणजे अतिशय सूक्ष्म, सर्वस्पर्शी अभ्यास, संशोधन! या अभ्यासावर, संशोधनावर त्यांनी अमाप लिखाण सुद्धा केले आहे, अजूनही करत आहेत. इतिहासासारखा बोजड आणि अतिशय नावडता विषय. पण त्यांच्या या सूक्ष्म अभ्यासामुळे हा विषय, ह्या विषयाचा अभ्यास इतका मनोवेधक, चित्तवेधक आणि रंजक होऊन जातो की इतिहासाला शत्रू मानणारा वाचक/अभ्यासक(माझ्यासारखा) इतिहासाच्या प्रेमात अखंड बुडून जातो. हा अभ्यास एका वेगळ्याच जादुई दुनियेत घेऊन जातो, जिथून परत यावेसेच वाटत नाही, कधीच! त्यांचे भाषेवरील,शब्दावरील प्रभुत्व तर काय वर्णावे!
या सगळ्याची झलक दाखविणारी, अतिशय खोल गर्भितार्थ असलेली, मला अतिशय भावलेली काही वाक्य, जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावी, माझ्या सारखा सर्वांनाच हा आनंद अनुभवता यावा अशी माझी इच्छा होती. अर्थातच या उपक्रमासाठी त्यांची पूर्वपरवानगी घेतलेली आहेच.
तर आनंदी पाऊस सहर्ष सादर करीत आहे "निवडक रा श्री मो"!🙇♀️🙇♀️🙇♀️
Nice words
ReplyDeleteनिवडक घोस वाक्यच जणू अप्रतिम सुंदर
ReplyDeleteआजच्या उतरत्या काळात आपल्या सारख्या विचारवंत व्यक्तींची जुन्या पीढीबद्दल असणारी ओढ आणि आदराची भावना बघून मनाला अत्यंत सुखाचा वर्षाव झाल्यासारखा आनंद होत आहे .आपला उपक्रम खूपच स्तुत्य आहे मॕडम. त्या साठी अनेकदा धन्यवाद .नमस्कार
ReplyDeleteछान आहेत quotes
ReplyDeleteअतिशय स्तुत्य उपक्रम. तुझ्या अभ्यासू वृत्तीमुळे आम्हा आळशी वाचकांना पण मोरवचिंकर सरांच्या साहित्यिक खजिन्याचे दार किलकिले होईल. तुझ्या ह्या साहित्यिक यज्ञाला सरांचे तर आशीर्वाद आहेतच पण आम्हा वाचकांच्या शुभेच्छा पण तुझ्या पाठीशी कायम राहतील. 👍👍👍
ReplyDeleteसरांना जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🎂💐🌹🙏🙏
ReplyDeleteसर ना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा...🙏🏻
ReplyDeleteव्वा!! अतिशय उत्तम उपक्रम.स्पंदने पुन्हा अनुभवता येतील🙏🙏🙏🙏🙏
ReplyDeleteछान उपक्रम. आम्हालाही त्यांचे साहित्य वाचल्याचा आनंद मिळेल. सरांना वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा
ReplyDeleteसरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🙏
ReplyDeleteनिवडक quotes 👌
Sir happy birthday to you🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🏵️🏵️🏵️🏵️
ReplyDelete||वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ||
ReplyDeleteसारेच "Good Thoughts"are The Bestच..वाचल्यावर " Achieved learning Something..
.just striked..these lines...
||गुरूसंगे शिष्यही बि घडला..आम्ही बि घडलो..||
ता.क.:त्यांच पुस्तक मी पुस्तक भिशीतून मागवलय.waiting to read.....
तुमच्या रा श्री मो सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांचे विचार समजून घ्यायला नक्कीच आवडतील. मला तुम्ही मांडलेले सगळेच विचार आवडले पण विशेष बद्दलचा विचार खूप आवडला.
ReplyDeleteप्रा सौ वैशाली चौधरी
ठाणे (प)
सरांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा🎉💐
ReplyDeleteखूप छान👌🏻👌🏻
ReplyDeleteसमाधीची स्पंदने हे पुस्तकं वाचताना त्यांची प्रचिती येते
अश्या व्यक्ती मार्गदर्शक असणे भाग्याचे आहे!
सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार खूप सुंदर लेख
ReplyDeleteसरांचे विचार खूपच छान सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा🙏🏻🙏🏻
ReplyDelete