पाव-विश्व (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) अवघ्या विश्वात 'शेती प्रधान देश' अशी आपल्या भारताची ओळख आहे. किनारपट्टीच्या भागात भात अतिशय मुबलक प्रमाणात पिकत असल्याने, त्या भागातील भात हे मुख्य अन्न. तथापि उर्वरित भारतात सर्वत्र पोळी, भाकरीचे विविध प्रकार, हा मुख्य अन्नाचा भाग असतो. यात पोळीचे प्रकार म्हटले तर, फुलका, घडीची पोळी, पुरणपोळी, शेंगापोळी, गुळपोळी, फुटण्याची पोळी, खव्याची पोळी, खोबऱ्याची पोळी, गुलाबजामची पोळी, पेढ्याची पोळी, गोड दशमी, सांज्याची पोळी; पराठ्याचे प्रकार म्हणजे मेथी-पालक या सारख्या पालेभाज्यांचे पराठे, लाछा/केरला पराठा, तिखटमिठाचे पराठे, सारण भरून करायचे पराठे म्हणजे बटाट्याचे, पनीरचे, कांद्याचे, कोबीचे अशी न संपणारी यादी आहे. भाकारीचेही तसेच ज्वारीची, बाजरीची, मेथीची, तांदुळाची, बेसनाची, नाचणीची असे बरेच प्रकार आहेत. तथापि आपल्या भारत देशाच्या बाहेर पडले की आपली गाठ पडते ती, पाव...