Skip to main content

Posts

Showing posts from March, 2026

पोटभर मैत्री, पोटभर जीवनानंद! (काही अनुभवलेलं...)

  पोटभर मैत्री, पोटभर जीवनानंद!  (काही अनुभवलेलं...) रागी रोटी  (टीप - महाराष्ट्रेतर भागातील मराठी भाषिकांसाठी एक निबंध स्पर्धा आयोजित केली होती. मला मात्र या बद्दल शेवटच्या दिवशी सकाळी या बद्दल माहिती मिळाली. आयोजकांना सांगितले आजच्या आज अजिबातच शक्य नाही. त्या म्हणाल्या प्रयत्न तर करा. परंतु मला मात्र खात्री होती, की हे काही शक्य नाही, विचार सोडून द्यावा. तथापि थोडा वेळाने मला वाटले, मला या विषयावर मला बऱ्याच दिवसापासून लिहायचे होते. तथापि मुहूर्त लागत नव्हता. त्यामुळे या संधीचे सोने करावे. मग काय बाकी सगळी कामं बाजूला ठेवली आणि हे काम हातात  घेतले. लिहून पूर्ण झाल्यावरच उठले. तोच निबंध आज आनंदी पावसाच्या वाचकांसाठी! ऐन वेळेवर लिहिण्याचा पुष्कळ आनंद मिळाला, परंतु एका बाजूला वाटले निवांत लिहायला मिळाले असते तर अजून छान झाले असते. असो. आता तुम्ही वाचकाच ठरवा आणि आपल्या अभिप्रायातून सांगा लेखन कसे वाटले.) किती गुणगान I करावे मैत्रीचे I नाते हे खात्रीचे I फक्त एक II मैत्रीमध्ये नाही I सान थोर काही I सदा सम राही I मित्रवत II  जगामध्ये आहे I स्वार्थी नाते सारे I फक्...

💧💦🫧नदी मातृक संस्कृतीत गंगा(featured)🫧💦💧

💧💦🫧  नदी मातृक संस्कृतीत गंगा🫧💦💧 (featured) जलपुरुष डॉ रा श्री मोरवंचीकर  🪻🌿🪻 💧विश्व जल दिवस 💧 यापूर्वी मी बऱ्याच वेळा माझे गुरु डॉ रा श्री मोरवंचीकर यांचा 'जलपुरुष' म्हणून केलेला आहे. तसेच त्यांच्या नावा आधी असलेल्या बिरुदांमध्ये 'जलपुरुष' हे बिरूद कायमच असते. सोबतच त्यांचे जल या विषयावरील संशोधन, अभ्यास या बद्दलही उल्लेख केलेला आहे. त्यांचा जल संस्कृती वरील एक एकमेवाद्वितीय ग्रंथ म्हणजे "भारतीय जल संस्कृती - स्वरूप आणि व्याप्ती" . या ग्रंथाचा उल्लेख पंचम वेद म्हणजेच पाचवा वेद असाही केला जातो. याच ग्रंथातील हा एक लेख. आपण सर्व वाचकांना अगदी मनापासून आवडेल, एव्हढेच नव्हे तर त्यातून बऱ्याच गोष्टी आकळतील. त्यातील शब्द न शब्द आपणास एक उर्जा देईल, विचार करण्यास प्रवृत्त करेल. अगदी आत पर्यंत पोहोचेल आणि एक प्रकारची स्वर्गीय तृप्ती देईल. गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती   नर्मदा सिंधू कावेरी जलैस्मिन सन्निधिं कुरु   💧💦🫧नदी मातृक संस्कृतीत गंगा🫧💦💧                गंगेचे महात्म्य भारतभर गायले जाते. कोणतीही गोष्ट ह...

🔯🕉️🔯 रांगोळी नायिका - २ 🔯🕉️ (व्यक्ती विशेष)

  🔯🕉️🔯  रांगोळी नायिका - २ 🔯🕉️ (व्यक्ती विशेष) अक्षय कलश आनंदाचा सुखसमाधानाचा  समृध्दिचा प्रगतीचा आरोग्याचा  आणि अक्षय्य मैत्रीचा   अक्षय्य तृतीया  वैशाख शुद्ध तृतीया “आयुष्यात मला भावलेल एक गुज सांगतो  उपजिविके साठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या.  पोटा पाण्याचा उद्योग जिद्दीने करा,  पण एवढ्यावरच थांबू नका.  साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ  ह्यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा.  पोटा- पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील.  पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.” - पु . ल . देशपांडे                उपरोक्त उल्लेखित ओळी आपल्या जीवनातील केलेचे महत्व अगदी अचूक रित्या विशद करतात. तर आता कला म्हणजे काय? हा शब्द कसा आला? याचा नेमका अर्थ काय? तर यातील मूळ संस्कृत शब्द आहे कल. कल म्हणजे प्रकट करणे. थोडक्यात कला म्हणजे मानवी मनातील भावनांचे प्रकटीकरण. झोप आणि आहार मानवाच्या मुलभूत भौतिक गरजा. म्हणजेच शारीरिक पातळीवरील मुलभूत गरजा. तथापि यापलीकडे ...