🦁🦁🦁 सिंह, सिंहव्याल आणि नरसिंह, सोमेश्वर मंदिर.🦁🦁🦁 (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) ब्रह्मा, विष्णू, महेश. ब्रह्मा म्हणजे या सृष्टीचा निर्माता, विष्णू म्हणजे या विश्वाचा पालनकर्ता आणि रक्षणकर्ता, महेश म्हणजेच शिव, हा या जगाचा संहारक मनाला जातो. तिघांचे एकत्रित कार्य म्हणजे एक चक्र. सृष्टीच्या तीन अवस्था, उत्पत्ति, स्थिती आणि संहार. आज यापैकी विष्णू या देवतेच्या मूर्ती बद्दलचा अभ्यास. विष्णू देवतेचा प्रथम उल्लेख कुठे येतो असे बघितले तर आपल्याला पार पूर्व वेद काळात म्हणजेचे ऋगवेद काळात जावे लागते. विष्णूचा सर्वात प्रथम उल्लेख ऋग्वेदांत येतो. याशिवाय पुराणांतून सुद्धा विष्णू बद्दल पुष्कळ माहिती मिळते. विष्णू पुराण. विष्णू पुरणाची रचना साधारण दुसऱ्या ते चौथ्या शतकांत झाली असावी असे अभ्यासकांचे मत आहे. विष्णू प्रतिमा योग, भोग, वीर व अभिचारक अशा प्रकारच्या असतात. त्या आसनस्थ, स्थानक, यानक आणि शयन अवस्थांमध्ये असतात. विष्णूच्या आयुधांचा विचार केला तर शंख, चक्र, पद...