काही रान-फुलं(गवत-फुलं)
गवतफुला रे गवतफुला;
असा कसा रे सांग लागला,
सांग तुझा रे तुझा लळा.
मित्रासंगे माळावरती,
पतंग उडवित फिरताना;
तुला पाहिले गवतावरती,
झुलता झुलता हसताना.
विसरुनी गेलो पतंग नभिचा;
विसरून गेलो मित्राला;
पाहुन तुजला हरवुन गेलो,
अशा तुझ्या रे रंगकळा.
हिरवी नाजुक रेशिम पाती,
दोन बाजुला सळसळती;
नीळ निळुली एक पाकळी,
पराग पिवळे झगमगती.
मलाही वाटे लहान होऊन,
तुझ्याहुनही लहान रे;
तुझ्या संगती सडा रहावे,
विसरून शाळा, घर सारे.
ही कविता शिकल्या पासून, वाचल्या पासून या गवत फुलांची ओढ मनात कायमच होती. तथापि त्यांना जवळून बघण्याचा, निरीक्षण करण्याचा, त्यांच्या रंग-रूपाचा आनंद घेण्याची संधी मात्र मिळाली नव्हती. अलीकडेच हंपीला गेले होते. माझ्या अभ्यासासाठी अतिशय महत्वाचे स्थळ. तिथे गेले आणि पूर्णपणे स्वतःला हरवून गेले होते. अगदी त्याकाळात जगण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. अर्थातच हा मोठा विषय आहे. त्या बद्दल परत कधीतरी.
या सगळ्या सोबतच तिथे ही निरनिराळ्या प्रकाराची रान-फुलं भेटली. हो, भेटलीच! अगदी थेट इंदिरा संत यांच्या कवितेतील गवत-फुलं प्रत्यक्षात भेटली! बरच वेळ निवांतपणे त्यांच्या सोबत घालवता आला. अवर्णनीय आनंद होता तो! शब्दांत व्यक्त करणे केवळ अशक्य. या सगळ्याची साक्षीदार म्हणजे त्या सर्व फुलांची ही छायाचित्रं. तिचं इतकी बोलकी आहेत की, मी बोलायची, काही सांगायची गरजच नाही...










छान🌹
ReplyDeleteKhup chan ranfuleche photos v tyanchi mahiti pan sunder 👌👌
ReplyDeleteKhup chan ranfuleche photos v tyanchi mahiti pan sunder 👌👌
ReplyDeleteखुपच सुंदर!!👌
ReplyDeleteसुंदर 👍
ReplyDeleteकोणाच्याही काळजी शिवाय वाढलेली आहेत, म्हणूनच त्या रानफुलात एक प्रकारचा बिनधास्तपणा राकटपणा आहे जो मनाला भावतो...
ReplyDeleteयाचं उत्तम उदाहरण कास पठारावर आढळतं... लेखात याचं उत्तर छान निरीक्षण आहे उतरलं आहे.
खूपच सुंदर छायाचित्रे आहेत. 'रानफुल ' किती सुंदर दिसतात! त्या फुलांकडे पाहून कोणी म्हणेल का , ही फुलं "रानटी " आहेत !
ReplyDeleteतसे तर कुठलीही फुलं खूपच सुंदर आणि मनाला मोहवणारे असतात.
खूपच सुंदर छायाचित्रे आहेत. 'रानफुल ' किती सुंदर दिसतात! त्या फुलांकडे पाहून कोणी म्हणेल का , ही फुलं "रानटी " आहेत !
ReplyDeleteतसे तर कुठलीही फुलं खूपच सुंदर आणि मनाला मोहवणारे असतात.
Beautiful flowers 👌
ReplyDeleteUttam, chukas nirikshan aahe aapl. Sundary drishti🙏🏻
ReplyDeleteIndira Santanchi kavita …🙏🏻
Lajalu ch phool khoop sundar
ReplyDeleteBeautiful wild flowers👌🏻
ReplyDeleteकसला विषय कशी मांडणी आणि रसभरित तरल विशदिकरण, सारेच भारी, व अप्रतिम. ❤️👍❤️👍🥰
ReplyDeleteSuperb
ReplyDeleteखूप छान रानफुलांचे फोटो काढले आहेत.तुझे निरीक्षण खरेच छान आहे.
ReplyDeleteअगदी मस्तच रान फुलाचे सूक्ष्म प्र.चि टिपले..
ReplyDeleteत्याला साजेशी कविता इंदिरा संताची कविता आवडली....
हंपी पाहायचय माला...हंपीच्या प्रशस्त देशात कोमल फूलांचं माळरानी खडकात रूजून कलर फुलं उगवण हे नैसर्गिक सौंदर्य आवडलं
आपल्याला...worm's eye photography पण आवडेल पाहायला....#संजिता
आधी कास पठार आणि नंतर नॉर्वे येथे या फुलांचा आनंद लाभला 👌लेख .
ReplyDeleteकिती सुंदर रानफुले आहेत ही! अगदी दृष्ट लागण्यासारंखी, अगदी लळा लागण्यासारखी, एकेक फुल मी निरखून पाहिले👌👍 खूपच सुंदर
ReplyDeleteजय श्रीराम...!!! 🙏🏻🙏🏻
ReplyDeleteजय हिंद...!!!
तुझा रानफुलांचा लेख मस्तच आहे. सोबतची चित्रेही 👌👌👌
इंदिरा संतांची ही कविता लहानपणापासून खूप आवडते. वडिलांसोबत नदी पलीकडे असलेल्या शेतात या गवत फुलांना पाहून ती गुणगुणायचे क्षण आज पुन्हा जिवंत झाले. आपल्या सुंदर शब्दांमुळे सरपंचत्या गोड आठवणी ताज्या झाल्या - खूप मनापासून आभार.
ReplyDeleteकोणताही विषय असो. सुंदर विवेचन! त्याबरोबर चित्रसंग्रह . खूपच छान.👏🏻
ReplyDeleteमलाही ही रानफुले खूप आवडतात.नेहमी नवीन विषय. त्याचं बारीकसारीक तपशीलासहित वर्णन. मी तर पुढे काय असेल याविषयी उत्सुक असते ताई. हॅट्स ऑफ यू 👏🏻