Skip to main content

काही रान-फुलं(गवत-फुलं)

काही रान-फुलं(गवत-फुलं)

रंगरंगुल्या, सानसानुल्या,
गवतफुला रे गवतफुला;
असा कसा रे सांग लागला,
सांग तुझा रे तुझा लळा.


मित्रासंगे माळावरती,
पतंग उडवित फिरताना;
तुला पाहिले गवतावरती,
झुलता झुलता हसताना.

विसरुनी गेलो पतंग नभिचा;
विसरून गेलो मित्राला;
पाहुन तुजला हरवुन गेलो,
अशा तुझ्या रे रंगकळा.

हिरवी नाजुक रेशिम पाती,
दोन बाजुला सळसळती;
नीळ निळुली एक पाकळी,
पराग पिवळे झगमगती.

मलाही वाटे लहान होऊन,
तुझ्याहुनही लहान रे;
तुझ्या संगती सडा रहावे,
विसरून शाळा, घर सारे.
- इंदिरा संत 

ही कविता शिकल्या पासून, वाचल्या पासून या गवत फुलांची ओढ मनात कायमच होती. तथापि त्यांना जवळून बघण्याचा, निरीक्षण करण्याचा, त्यांच्या रंग-रूपाचा आनंद घेण्याची संधी मात्र मिळाली नव्हती. अलीकडेच हंपीला गेले होते. माझ्या अभ्यासासाठी अतिशय महत्वाचे स्थळ. तिथे गेले आणि पूर्णपणे स्वतःला हरवून गेले होते. अगदी त्याकाळात जगण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. अर्थातच हा मोठा विषय आहे. त्या बद्दल परत कधीतरी. 

या सगळ्या सोबतच तिथे ही निरनिराळ्या प्रकाराची रान-फुलं भेटली. हो, भेटलीच! अगदी थेट इंदिरा संत यांच्या कवितेतील गवत-फुलं प्रत्यक्षात भेटली! बरच वेळ निवांतपणे त्यांच्या सोबत घालवता आला. अवर्णनीय आनंद होता तो! शब्दांत व्यक्त करणे केवळ अशक्य. या सगळ्याची साक्षीदार म्हणजे त्या सर्व फुलांची ही छायाचित्रं. तिचं इतकी बोलकी आहेत की, मी बोलायची, काही सांगायची गरजच नाही...


















लाजाळूचे फुल 

एक निरीक्षण. थोडे लक्ष देऊन पाहिले तर लक्षात येते, या विश्वात सर्वात जास्त पिवळ्या, 
म्हणजेच सूर्य-प्रकाशाच्या रंगाची फुलं आहेत!
ही सगळी रान-फुलं हम्पी परिसरातील आहेत. या सर्वांची नावे मला नीटशी माहिती नाहीत. परंतु ही सर्व फुलं माळरानावर, कुठ कुठे वाढलेली दिसली. कुणाच्याही काळजी आणि देखभाली शिवाय ती वाढलेली. पण त्यांचे
सौंदर्य, रंग, रूप अतिशय देखणे, मनमोहक, अतिशय आकर्षक! 
काही फुलं तर नखापेक्षाही कितीतरी लहान मापाची आहेत. मात्र त्यांची छायाचित्रं जवळून आणि मोठी करून 
काढलेली आहेत, त्यामुळे ती मोठाली दिसत आहे, त्यामुळे त्यातील सर्व बारकावे, परागकण, पाकळ्या, त्यांचे आकार, रंग इत्यादी गोष्टी स्पष्ट आणि सविस्तर दिसत आहेत.

©️®️आनंदी पाऊस 
९ एप्रिल २०२६





Comments

  1. डॉ दीपक शिरसाठApril 10, 2026 6:41 am

    छान🌹

    ReplyDelete
  2. Khup chan ranfuleche photos v tyanchi mahiti pan sunder 👌👌

    ReplyDelete
  3. Khup chan ranfuleche photos v tyanchi mahiti pan sunder 👌👌

    ReplyDelete
  4. खुपच सुंदर!!👌

    ReplyDelete
  5. अमोल चाफळकरApril 10, 2026 7:30 am

    सुंदर 👍

    ReplyDelete
  6. उदय बोरगावेApril 10, 2026 7:33 am

    कोणाच्याही काळजी शिवाय वाढलेली आहेत, म्हणूनच त्या रानफुलात एक प्रकारचा बिनधास्तपणा राकटपणा आहे जो मनाला भावतो...
    याचं उत्तम उदाहरण कास पठारावर आढळतं... लेखात याचं उत्तर छान निरीक्षण आहे उतरलं आहे.

    ReplyDelete
  7. खूपच सुंदर छायाचित्रे आहेत. 'रानफुल ' किती सुंदर दिसतात! त्या फुलांकडे पाहून कोणी म्हणेल का , ही फुलं "रानटी " आहेत !
    तसे तर कुठलीही फुलं खूपच सुंदर आणि मनाला मोहवणारे असतात.

    ReplyDelete
  8. खूपच सुंदर छायाचित्रे आहेत. 'रानफुल ' किती सुंदर दिसतात! त्या फुलांकडे पाहून कोणी म्हणेल का , ही फुलं "रानटी " आहेत !
    तसे तर कुठलीही फुलं खूपच सुंदर आणि मनाला मोहवणारे असतात.

    ReplyDelete
  9. Beautiful flowers 👌

    ReplyDelete
  10. Uttam, chukas nirikshan aahe aapl. Sundary drishti🙏🏻
    Indira Santanchi kavita …🙏🏻

    ReplyDelete
  11. Lajalu ch phool khoop sundar

    ReplyDelete
  12. Beautiful wild flowers👌🏻

    ReplyDelete
  13. जनार्दन चौधरीApril 10, 2026 2:41 pm

    कसला विषय कशी मांडणी आणि रसभरित तरल विशदिकरण, सारेच भारी, व अप्रतिम. ❤️👍❤️👍🥰

    ReplyDelete
  14. खूप छान रानफुलांचे फोटो काढले आहेत.तुझे निरीक्षण खरेच छान आहे.

    ReplyDelete
  15. अगदी मस्तच रान फुलाचे सूक्ष्म प्र.चि टिपले..
    त्याला‌ साजेशी कविता इंदिरा संताची‌ कविता आवडली....
    हंपी पाहायचय माला...हंपीच्या प्रशस्त देशात कोमल फूलांचं माळरानी खडकात रूजून कलर फुलं उगवण हे नैसर्गिक सौंदर्य आवडलं
    आपल्याला...worm's eye photography पण आवडेल पाहायला....#संजिता

    ReplyDelete
  16. डॉ संध्या रघोजीApril 11, 2026 6:31 pm

    आधी कास पठार आणि नंतर नॉर्वे येथे या फुलांचा आनंद लाभला 👌लेख .

    ReplyDelete
  17. उषा पाटीलApril 12, 2026 7:01 am

    किती सुंदर रानफुले आहेत ही! अगदी दृष्ट लागण्यासारंखी, अगदी लळा लागण्यासारखी, एकेक फुल मी निरखून पाहिले👌👍 खूपच सुंदर

    ReplyDelete
  18. रमेश शिवडेकरApril 13, 2026 7:40 am

    जय श्रीराम...!!! 🙏🏻🙏🏻
    जय हिंद...!!!
    तुझा रानफुलांचा लेख मस्तच आहे. सोबतची चित्रेही 👌👌👌

    ReplyDelete
  19. इंदिरा संतांची ही कविता लहानपणापासून खूप आवडते. वडिलांसोबत नदी पलीकडे असलेल्या शेतात या गवत फुलांना पाहून ती गुणगुणायचे क्षण आज पुन्हा जिवंत झाले. आपल्या सुंदर शब्दांमुळे सरपंचत्या गोड आठवणी ताज्या झाल्या - खूप मनापासून आभार.

    ReplyDelete
  20. भारती फेगडेApril 14, 2026 10:27 am

    कोणताही विषय असो. सुंदर विवेचन! त्याबरोबर चित्रसंग्रह . खूपच छान.👏🏻
    मलाही ही रानफुले खूप आवडतात.नेहमी नवीन विषय. त्याचं बारीकसारीक तपशीलासहित वर्णन. मी तर पुढे काय असेल याविषयी उत्सुक असते ताई. हॅट्स ऑफ यू 👏🏻

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दळण (घरातील गमती जमती)

दळण (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                   ...

💃गुलाबाईची गाणी💃 (गच्चीवरील गमती जमती )

  💃गुलाबाईची गाणी💃  (गच्चीवरील गमती जमती ) 💃💃💃💃💃💃💃💃💃💃 💃गुलाबाईची गाणी💃  पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा गुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून गुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा गुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउले पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून गुलाबाईचे माहेर दिसे. 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃  सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफि...

🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

  🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕 (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) प्राचीन होयसळ श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा, जिल्हा तुमकुरु, कर्नाटक बंगळूरू पासून साधारण १२७ किमी. गूगल सर्च इंजिन मध्ये Ancient Hoysala Shri Kedareshwar Swami temple, Nagalapura असे शोधले की लगेचच गूगल ते दाखवते, तिथे जायचा रस्ताही दाखवते. त्याचे सगळे ऐकायचे की बरोब्बर तिथे पोहोचता येते.                 होयसळ राजवट, मूळ कर्नाटकात. त्यांनी अकरावे ते चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले. या कालावधीत त्यांनी जी मंदिरे उभारली, त्या मंदिरांना होयसळ मंदिर आणि त्या शैलीला होयसळ शैली म्हणून ओळखले जाते. होयसळ राजवट काळात जवळ-जवळ दीड हजार मंदिरे उभारली. तथापि त्यातील आज फक्त शंभर-दीडशेच मंदिरे अस्तित्वात आहेत. त्यातील फार थोडी सुस्थितीत आहेत. त्यापैकी अगदी बोटावर मोजण्या इतकी मंदिरे सर्वज्ञात आहेत. ती म्हणजे चन्न केशव मंदिर, बेलूर, होयसाळेश्वर मंदिर, हाळेबिडू आणि चन्न केशव मंदिर, सोमनाथपुर. ही तीनही स्थळे जागतिक वारसा या...