Skip to main content

पाव-विश्व(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)


पाव-विश्व 
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)


                         अवघ्या विश्वात 'शेती प्रधान देश' अशी आपल्या भारताची ओळख आहे. किनारपट्टीच्या भागात भात अतिशय मुबलक प्रमाणात पिकत असल्याने, त्या भागातील भात हे मुख्य अन्न. तथापि उर्वरित भारतात सर्वत्र पोळी, भाकरीचे विविध प्रकार, हा मुख्य अन्नाचा भाग असतो. यात पोळीचे प्रकार म्हटले तर, फुलका, घडीची पोळी, पुरणपोळी, शेंगापोळी, गुळपोळी, फुटण्याची पोळी, खव्याची पोळी, खोबऱ्याची पोळी, गुलाबजामची पोळी, पेढ्याची पोळी, गोड दशमी, सांज्याची पोळी; पराठ्याचे प्रकार म्हणजे मेथी-पालक या सारख्या पालेभाज्यांचे पराठे, लाछा/केरला पराठा, तिखटमिठाचे पराठे, सारण भरून करायचे पराठे म्हणजे बटाट्याचे, पनीरचे, कांद्याचे, कोबीचे अशी न संपणारी यादी आहे. भाकारीचेही तसेच ज्वारीची, बाजरीची, मेथीची, तांदुळाची, बेसनाची, नाचणीची असे बरेच प्रकार आहेत.  
                        तथापि आपल्या भारत देशाच्या बाहेर पडले की आपली गाठ पडते ती, पावांच्या दुनेयेशी! भारतात जसे पोळी-भाकरीचे असंख्य प्रकार बघायला, खायला मिळतात, तसेच भारता बाहेर पडले की असंख्य पावाचे प्रकार बघायची आणि चाखायची संधी मिळते. व्यक्तिगत रित्या मला, पाव आणि इतर सगळे बेकरीत तयार होणारे पदार्थ फारसे आवडत नाही. त्याचे मुख्य करणे म्हणजे यापैकी कशाचाही एक छोटा तुकडाही जिभेवर ठेवला तरी लगेच माझे पित्त डोकं वर काढते. तरीही मला वाढदिवसाचे केक म्हणजे भरपूर क्रीम असलेले, फार म्हणजे फारच आवडतात. पूर्वी मी अगदी किलोने हे खात असे, आता अगदी तोलून मापून खावे लागतात. असो 
                         खायला अडचणी असल्या तरी, हे सगळे बघायला काहीच अडचणी नसतात. त्यामुळे जिथे कुठे हे पदार्थ असतात, तिथे मी माझ्याही नकळत आकर्षित होते. डोळे भरून सारे बघते आणि माझे मन आणि पोट दोन्हीही अगदी आनंदाने तुडुंब भरते. त्यासोबतच मला या सगळ्या छान-छान आकाराच्या आणि झळाळत्या रंगांच्या पदार्थांची प्रकाशचित्रे टिपायला फार आवडते. त्यामुळे चालता-चालता सुद्धा मी भराभर भरपूर प्रकशचित्रे टिपून घेत असते, अगदी माझ्याही नकळत. या प्रवासात सुद्धा हे पदार्थ माझ्या भ्रमणध्वनित न टिपले तरच नवल.
                        तर ही गोष्ट आहे फ्रँकफर्ट विमानतळावरील पाव-विश्वाची गोष्ट!  फ्रँकफर्ट विमानतळावर उतरल्यावर पुढच्या विमानासाठी आम्हाला थोडा वेळ होता. या विमानतळावर अनेक दुकानं थाटलेली होती. त्यात असंख्य प्रकारचे पाव किंवा बेकरीत बनवलेले पदार्थ विक्री साठी ठेवलेले होते. अर्थातच, मला खाण्याची इच्छा तर झालीच नाही, परंतु माझ्या भ्रमणध्वनीला मात्र मोह आवरला नाही. चालता-चालता भराभर काढलेली ही काही प्रकाशचित्रं खाली जोडत आहेत. त्याच्या रंगाचा, आकाराचा, मापाचा, पोताचा, प्रदर्शित करण्याचा पद्धतीचा मी अगदी भरभरून आनंद लुटला. तोच आनंद आपणा सर्वांनाही निश्चितच लुटता येईल!
                         यापैकी एकही प्रकाराचे नाव मला माहिती नाही. काही ठिकाणी त्यांच्या नावाचे फलक आहेत, किंमत आहे. पण ते सर्व फारच प्रेक्षणीय आहेत हे निश्चित. त्यामुळे त्यांची नावे, ते बनविण्यासाठी लागणारे साहित्य, त्याची कृती या सगळ्या गोष्टी फार गौण होऊन जातात. असे माझे स्पष्ट मत आहे. सोबतच बऱ्याच वाचकांना या सहलीची प्रकाशचित्रं पाहण्याची सुद्धा खूप इच्छा होती. मग निरनिराळे विषय योजून, त्याप्रमाणे विषयवार काही प्रकाशचित्रे, त्यांच्या माहिती सहित प्रकाशित करण्याचा मानस आहे. त्यातील आजचा विषय पाव-विश्व! या पाव-विश्वाचा भरभरून आनंद लुटा. डोळे इतके तृप्त होतील की माझ्या सारखे तुमचे मन आणि पोट दोन्हीही तुडुंब भरून जातील...
🍞🥐🥖🥨🥯🫓🥞🧇🍔🍕🌭🥪🍩🍪🥮🥧    


























©®आनंदी पाऊस
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)
१० जुलै २०२६


Comments

Popular posts from this blog

दळणं (घरातील गमती जमती)

दळणं (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                  ...

💃गुलाबाईची गाणी💃 (गच्चीवरील गमती जमती )

  💃गुलाबाईची गाणी💃  (गच्चीवरील गमती जमती ) 💃💃💃💃💃💃💃💃💃💃 💃गुलाबाईची गाणी💃  पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा गुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून गुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा गुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउले पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून गुलाबाईचे माहेर दिसे. 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃  सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफि...

थोडं (खूप सारं😉😆) गोडाचं-१(दराबा) (घरातील गमती जमती)

थोडं (खूप सारं) गोडाचं-१(दराबा) (घरातील गमती जमती)                        दराबा! तर या शब्दाचा अर्थ काय? हा शब्द कुठून आला? तर हा पदार्थ बऱ्हाणपूर येथील दरबारातील खास पदार्थ. हा पदार्थ रोबुन रोबुन करावा लागतो म्हणून हा दराबा!                                                           घरात सगळेच खाण्याचे शौकीन, मुख्य म्हणजे आमचे बाबा सुद्धा! त्यामुळे सारखं काही ना काही करणं आणि खाणं अखंडपणे चालूच असे. खाण्याच्या बाबतीत तर सगळ्यांचा भरपूर उत्साह होताच, पण करणाऱ्यांचा (सगळ्या मम्मी लोकांचा) सुद्धा उत्साह तेव्हढाच किंवा काकणभर जरा जास्तच मी तर म्हणेन. सगळं अगदी उत्साहाने करत. त्यांच्या या उत्साहाला आणि मेहनतीला तर कायमच आणि वारंवार सलाम करावासा वाटतो. कारण कुठलीही गोष्ट करायची असो, कधीही थोडी थोडकी करून भागतच नसे. त्यामुळे खूप बांधीलकी आणि वचनबद्धता असणे आवश्यक असे. बरं त्यां...