Skip to main content

Posts

Showing posts from October, 2026

केकी मूस-१, एक अवलिया कलाकार(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

केकी मूस-१,  एक अवलिया कलाकार (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) केकी मूस                          करोना काळ. आजही हे नुसते शब्द जरी उच्चारले तरी, अंगावर काटा येतो, भीती वाटते या सारख्या कितीतरी भावना येतात मनात. सारे जण घरात बंदिस्त. फक्त बंदिस्त नाही तर भयावह सुद्धा. तथापि मला काही व्यक्तिगत कारणाने प्रवास करावा लागला, घरी जावे लागले. प्रवासाचे नियम वगैरे अभ्यासून त्याप्रमाणे प्रवास करून घरी गेले. वातावरण फारसे बरे नव्हतेच. तरीही माझ्या संशोधनाचा भाग म्हणून मला खानदेशातील मंदिरांना भेट देणे गरजेचे होते. मंदिरांत प्रवेश मिळतो का वगैरे चौकशी करून काही मंदिरांना भेट देण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे चाळीसगाव तालुक्यातील मंदिरांना भेट देण्यासाठी गेले. करोना काळ म्हटल्यावर बाहेर खाणे अशक्य. त्यामुळे घरूनच शिदोरी बांधून नेली होती. दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत काही मंदिरे बघून झाली. अजून काही बाकी होती. परंतु पोटात कावळे ओरडत असल्याने त्यांना शांत करणे गरजेचे होते.                ...