Skip to main content

Posts

Showing posts with the label उपवासाचे काही....

साबुदाणा खीर(उपवासाचे काही....)

 साबुदाणा खीर  (उपवासाचे काही....)                          उपवास. उपवासाचे पदार्थ. हल्ली या पदार्थांची यादी अगदी न संपणारी आहे. तथापि काही दशकांपूर्वी असे नव्हते. उपवासाचे पदार्थ तुलनेत मर्यादित होते. या मर्यादित यादीतील एक पदार्थ म्हणजे "साबुदाणा खीर." आजच्या भागात या साबुदाणा खीर बद्दल थोडी माहिती आणि ती कशी करायची, लागणारे साहित्य असे सारे थोडक्यात.                             साबुदाणा खीर, उपवासासाठी असलेला पदार्थ. तथापि ही खीर, पोट बिघडले असले तर, फार उपयोगी पदार्थ आहे. साबुदाण्याचा कुठलाही पदार्थ करायचा झाल्यास, आदल्या दिवशी रात्री साबुदाणा भिजवून ठेवावा लागतो. साबुदाण्याची खीर करण्यासाठी सुद्धा साबुदाणा आदल्या दिवशी रात्री भिजवून ठेवावा लागतो. तथापि पोट कधी बिघडणार, हे आपल्याला माहिती नसते. तसेच काही वेळा आपण साबुदाणा भिजत घालण्यासाठी विसरूनही जातो. यापैकी कुठलीही परिस्थिती असली तरी ही साबुदाण्याची खीर करता येते.    ...

साबुदाण्याची गोड खिचडी(उपवासाचे काही....)

 साबुदाण्याची गोड खिचडी  (उपवासाचे काही....)                          उपवास म्हटले की काय खायचे? काय करायचे हा मोठ्ठा प्रश्न असतो. "मोठी एकादशी" या लेखात काही पदार्थ आलेलेच आहेत. तथापि "सोमवारची कहाणी" या लेखात सांगितल्या प्रमाणे चौधरी सदनात आमच्या सगळ्यांचाच सक्तीचा उपवास असे. आमचा मुलांचा मुख्य हेतू साबुदाण्याची खिचडी खाणे हाच होता. कारण तेव्हा साधारणपणे उपवास असेल तरच घरात साबुदाण्याची खिचडी होत असे. परंतु आम्ही मुलं नेहमीची साबुदाण्याची खिचडी खात असू. तथापि आमच्या तिन्ही मम्मी सोमवारचा उपवास फार वेगळ्या पद्धतीने करत असत. म्हणजे फार कडक. कडक उपवास म्हणजे काय तर, त्या तिघीही सोमवारी दिवसातून एकदाच तिखट-मीठ खात असतं, ते म्हणजे सोमवारचा उपवास दुपारी सोडतांना, जे जेवण करीत त्यातच तिखट-मीठ असे. दिवसातून दुसऱ्यांदा तिखट-मीठ खात नसत. त्यामुळे नेहमीची साबुदाण्याची खिचडी किंवा इतर पदार्थ त्या खात नसत/खाऊ शकत नसत.                          सोमवारी दिवसातून ...