Skip to main content

अडीच अक्षर - २ (मैत्री दिन विशेष) (काही अनुभवलेलं..)

 🌷अडीच अक्षर - २ (मैत्री दिन विशेष)🌷

 (काही अनुभवलेलं..)

               भारतीय डाक विभागाने गेल्या वर्ष अखेर अडीच अक्षर/ढाई अक्षर अशा शीर्षकाखाली एक निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्यात मला माझा सहभाग नोंदवता आला नव्हता, तथापि त्याकारणे आनंदी पावसात "अडीच अक्षर" ह्या नवीन सदराची सुरुवात झाली. या सदरातील पहिला भाग प्रकाशित झालेला आहे. आज म्हणजे ३ ऑगस्ट २०२५ रोजी मैत्री दिनाच्या निमित्ताने हा दुसरा भाग आपल्या भेटीस येत आहे. 

              भारतीय टपाल खात्याशी अगदी लहान वयापासून ते आजतागायत माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या सर्व प्रवासात म्हणजे डाक विभागाशी संबंधित प्रवासात कायम साथ लाभलेल्या अनेक व्यक्तींपैकी एक महत्वाची व्यक्ती म्हणजे माझी सख्खी मैत्रीण. वास्तुकला महाविद्यालयात असल्या पासूनची ही मैत्री आणि तितक्याच वयाचा हा आमचा सोबतीने केलेला टपाल-प्रवास. आज मैत्री दिनाच्या निमित्ताने या आनंदी प्रवासाची झलक आनंदी पावसाच्या वाचकांसाठी! 

               आम्ही एकमेकींना अगदी नियमित पत्र लिहित असू, त्यासाठी कसल्याच खास निमित्ताची गरज भासत नसे. अगदी रोजच्या जीवनाचा हा अविभाज्य भाग. त्याकाळी भ्रमणध्वनी तर सोडाच, पण दूरध्वनी सुद्धा सगळ्यांच्या घरात नसत. त्याचे दर सुद्धा त्यामानाने बरेच असतं, त्यामुळे निवांत आणि सविस्तरपणे संवाद साधण्याचा पत्र हा एक अतिशय सोयीचा, परंतु आपल्या संयमाची परीक्षा पाहणारा मार्ग होता. पत्र लिहून टपाल पेटीत टाकल्यावर समोरच्या व्यक्तीस ते पत्र पोहोचण्यासाठी अक्षरशः काही दिवसच नाही तर आठवड्यांचा सुद्धा कालावधी लागत असे. पण रोजच्या जीवनातील असंख्य गोष्टींबद्दल आम्हाला एकमेकींशी संवाद साधायचा असे, काही गोष्टी सांगायच्या असतं, तर काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतं. त्यामुळे आमचा हा पत्र रुपी संवाद अगदी अखंडपणे चालू असे. आम्ही दोघीही वास्तुकलेच्या विद्यार्थिनी, कालांतराने वास्तूविशारद झालो. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे दोघीनाही सर्व प्रकारच्या कलांबद्दल अतिशय आकर्षण, जिज्ञासा, आवड होती/आहे. त्यामुळे हा संवाद म्हणजे एक सुंदर कलारुपी संवाद असे. वर्षभरात कितीतरी खास निमित्त असतं, जेव्हा आम्ही एकमेकींना शुभेच्छा-पत्र स्वतःच्या हाताने तयार करून पाठवत असू. 

               हल्ली काही-काही कारणाने तिची माझी वारंवार भेट झाली. अगदी गेले दोन-तीन दिवस आम्ही सोबत होतो. आज मैत्री-दिन म्हटल्यावर या सगळ्या शुभेच्छा-पत्रं संग्रहाची आठवण झाली. वाटले छान मुहूर्त, योगायोग आहे. आजच्या दिवशी "अडीच अक्षर" या सदरात या संग्रहाची आणि माझ्या या मैत्रिणीच्या चित्रकलेची झलक आनंदी पावसाच्या वाचकांना दाखवावी. लगेचच कामाला लागले. अतिशय व्यापक संग्रह आहे हा आणि घरात निरनिराळ्या ठिकाणी ठेवला गेला आहे. त्यातील जो भाग समोरच म्हणजे लगेच हाताला लागेल असा होता, त्यातील काही भाग आज प्रकाशित करत आहे. 

                ही सगळी शुभेच्छा-पत्रं आज अचानक बघतांना मला फारच दैवी आनंद मिळाला! काळाच्या एका मोठ्या भागाचा प्रवासच झाला जणू या माध्यामतून! माझ्या या मैत्रिणीला सुद्धा हा एक आनंदी आश्चर्याचा धक्का असेल. परंतु तिचाही अनुभव आणि भावना माझ्यासारख्याच असतील, यात दुमत नाही. 

              आपल्या सगळ्यांना मैत्री दिनाच्या खूप साऱ्या आनंदी शुभेच्छा! 

या सगळ्यात योगायोगाचा भाग म्हणजे 

🌸 पत्रं 🌸

🌸 प्रेमं 🌸

🌸 मैत्री 🌸

🍃तीनही शब्द अडीच अक्षराचे आहेत!🍃

              तर आज या माझ्या मैत्रिणीने मला वेळोवेळी निरनिराळ्या निमित्ताने स्वतः तयार करून पाठविलेली ही शुभेच्छा-पत्र आज आपल्या भेटीला आलीत! ही सगळी शुभेच्छा-पत्रं तेव्हा उपलब्ध असतील किंवा तेव्हा जे माध्यम हाताळवेसे वाटत असेल अशा माध्यमांतून तयार केलेली आहेत. 


हाताने तयार केलेला कागद (hand made paper)
आणि पाण्याचे रंग 
A३ या मापाचे आहे.


 
 
tinted sheet वापरून केलेले 
A४ मापाचे आहे.


चित्रकला कागद आणि पाण्याचे रंग 



चित्रकला कागद आणि पाण्याचे रंग 
डावीकडे मुखपृष्ठ आणि उजवीकडे आतील भाग 




हे छापील चित्र आहे 
त्याचा सर्व तपशील लिहिलेला आहे.


रक्षाबंधनानिमित्त 
रक्षाबंधन हा सण आमच्यासाठी खूप खास आहे.
त्याची सविस्तर गोष्ट येईलच आनंदी पावसात, खात्रीने!

कागदाचे कोलाज 


राखी शुभेच्छा!



  
जन्मदिन शुभेच्छा!
चित्रकलेचा कागद आणि पाण्याचे रंग 
समोरचा आणि आतला भाग 
दिवाळी निमित्त 
कागद कोलाज 

जन्मदिन शुभेच्छा!
मोर, झाडाच्या फांद्या आणि ढग 
सारेच अतिशय गोड!


साध्या पत्रात सुद्धा कलाकारी असणारच!


नवीन वर्ष शुभेच्छा!


कागद कोलाज 


चित्रकलेचा कागद आणि पाण्याचे रंग 

🌾 II विश्व मैत्रीला अर्पण II 🌾

©®आनंदी पाऊस 
(काही अनुभवलेलं...)
मैत्री दिन २०२५ 



































Comments

  1. रुपाली मुतालिकAugust 03, 2025 5:59 pm

    मस्त आठवणींचा खजिना

    ReplyDelete
  2. ज्योती किरंगेAugust 03, 2025 6:21 pm

    🌼🌸🌺🌷🌾🪻🥀🪷
    खूप मस्त झालाय लेख😍

    ReplyDelete
  3. डॉ दिनेश महाजनAugust 03, 2025 6:30 pm

    खूप छान ......

    ReplyDelete
  4. डॉ सुनील पुरीAugust 03, 2025 7:08 pm

    सुरेख आहे 💐💐

    ReplyDelete
  5. Manjusha ChaudhariAugust 03, 2025 7:09 pm

    Mast 🌹

    ReplyDelete
  6. खूप मस्त ! सगळी चित्रं पण छान! 👌👌👌

    ReplyDelete
  7. खूपच मस्त.
    तुझे आणि सीमाच अक्षर ही सेम वाटते क्षणभर मला कळलेच नाही तूच तुला कसे काय लिहिले? खाली सीमाच नाव बघितल्यावर लक्षात आले.
    असो लेख छान त्यात छायाचित्र अप्रतिम.

    ReplyDelete
  8. जितेंद्र महाजनAugust 03, 2025 8:45 pm

    खुप मस्त ताई 👍👍💐💐

    ReplyDelete
  9. सुवर्णा नारखेडेAugust 03, 2025 8:47 pm

    👌🏻👌🏻khup chan....
    लेख आणि चित्र दोन्ही

    ReplyDelete
  10. अनिता पाठकAugust 03, 2025 8:47 pm

    छान लिहिलं आहे.👌👌👌
    चित्रं पण छान काढली आहेत.

    ReplyDelete
  11. खूप सुंदर आहेत शुभेच्छा पत्र. मी सुद्धा शुभेच्छा पत्र स्वतः तयार करत असे, स्वतः केलेली शुभेच्छा पत्र पाठवणे खूप आनंददायक होते

    ReplyDelete
  12. रमेश शिवडेकरAugust 03, 2025 10:16 pm

    वाहवा, एकदम झकास मैत्रीपर्व! (की मैत्री-पत्र?) दोघीही कलाकार, त्यामुळे अजूनच बढीया....👌👌👍👍

    ReplyDelete
  13. Chan aahe PatraPrapanch.

    ReplyDelete
  14. स्मिता पाटीलAugust 03, 2025 10:50 pm

    लेख व चित्र अतिशय सुंदर आहे ♥️♥️

    ReplyDelete
  15. क्या बात है। हे सगळं किती जपून ठेवलंस आणि किती छान मांडलंस.. A trip down memory lane.. ❤️❤️❤️❤️

    ReplyDelete
  16. You are lucky to have such an epicure friend, we r lucky to have a writer friend who has good hand in painting also, keep it up, Happy friendship day 💖

    ReplyDelete
  17. खूप भारी.. आपल्या मैत्रीचं आत्मचरित्र च जणू.. ।

    ReplyDelete
  18. संध्या रघोजीAugust 04, 2025 8:06 am

    अतिशय सुंदर शुभेच्छा पत्रे 👌

    ReplyDelete
  19. राकेश शेटेAugust 04, 2025 8:29 am

    छान अनुभव व रंग 👍

    ReplyDelete
  20. असीम चाफळकरAugust 04, 2025 8:30 am

    अडीच अक्षर मैत्री दिन विशेष लेख खूप छान झालाय!🤗

    ReplyDelete
  21. सम्राट वानोळेAugust 04, 2025 9:00 am

    खूपच छान... 👌

    ReplyDelete
  22. अमोल चाफळकरAugust 04, 2025 10:29 am

    वा 👌👌

    ReplyDelete
  23. रेखा अत्तरदेAugust 04, 2025 1:15 pm

    फारच सूंदर!👌👌

    ReplyDelete
  24. अनिला देशपांडेAugust 04, 2025 2:18 pm

    खूपच सुंदर, एका एका वयात लिहिलेली पाठवलेली अशी पत्रे आणि शुभेच्छा पत्रे पुन्हा पुन्हा पाहताना छान वाटले.
    मीही पहिल्यांदा अमेरिकेला गेले तेंव्हा माझ्या मामीला चार पानी पत्र लिहिले होते. मामीने सुद्धा सांभाळून ठेवले आहे. माझ्या कार्यालयातील मैत्रिणींना सुद्धा चार पानी पत्र लिहिले आणि आल्यावर कितीतरी वेळा त्याचे सर्व मिळूनही वाचन करीत होतो.
    आमची आई मावशी आजी मामा सर्व नेहमी पत्र व्यवहार करत. एखादे पूर्ण पत्र सांकेतिक भाषेत. कधी चाची भाषा तर कधी सरमिसळ करून लिहत असू.
    एकमेकांच्या अक्षराला हसणे, शुद्धलेखनाच्या चुका दाखवून परत पाठवणे, कधी मधे सुरवात करून पूर्ण गोल पत्र लिहायचो. त्यात आम्ही भावंडेही सामील होत असू.

    ReplyDelete
  25. खूप छान लेख आणि चित्रे पन👌👌👍
    खरच असे पत्र बघून वेगवेगळ्या प्रकारच्या आठवणी नि
    मन् भरून येते

    ReplyDelete
  26. शशी आत्याAugust 04, 2025 4:56 pm

    खूप छान वाटले.
    तसे तर हे शब्द फारच तोकडे,
    बरेच काही अव्यक्त असते
    त्याची भाषा तुम्हा मैत्रिणींना
    अवगत होती
    रंग रूप आकार बिंदू यातून
    व्यक्त होणारे कलावंत तुम्ही...
    रेषांच्या जाळीतून आणि वळणा तून लिपीचे सौंदर्य_
    आविष्कृत करणारे तुम्ही..
    रंगातून भावना आणि रिकाम्या जागेतून (स्पेस)
    अर्थ समजणारे तुम्ही लोक असता...
    संवेदनशील कलाकाराचे मन
    उलगडणारी बोटे आणि त्यातला तळ आजमावणारे मन असे परस्परावलंबी नाते.. म्हणजे मैत्री आणि त्याही पलीकडचे काही तुम्ही जपले, यातच सारे आले...
    👍👍👍👍 असे किती emoji लिहिले तरी ते अपुरे मला व्यक्त व्हायला असे आहे.
    So... या निमित्ताने एवढेच सांगेन....
    हृदयातील स्पंदने,
    जणू उमटतील अक्षरे
    अडीच असो वा अर्धे
    राहो अतूट सारे

    ReplyDelete
  27. शशी आत्याAugust 04, 2025 5:06 pm

    मैत्रीत wave length जुळते म्हणजे काय हे या सगळ्या पत्रां बद्दलच्या भावना व्यक्त केल्यावर कळते.शिवाय जपणे देखील तितकेच महत्वाचे.इतक्या कालानंतर तसे यावर व्यक्त होणे अप्रूपच आहे.
    अशी एक जागा आपल्या आयुष्यात आहे याची जाण निरंतर असणे,आणि ती एकमेकांना तितक्याच intensity ne जाणवणे हे विरळाच.

    ReplyDelete
  28. भारती फेगडेAugust 05, 2025 10:35 am

    छान मैत्री जपलीत दोघींनी 🎊 👍🏻 मस्त लिहिले आहे .

    ReplyDelete
  29. अतुल अग्रवालAugust 06, 2025 10:28 am

    🙌 khupach chhan ahe. Apratim🌈

    ReplyDelete
  30. प्रा ए पी पाटीलAugust 08, 2025 1:26 pm

    मैत्री दिनाच्या निमित्ताने आनंदी पावसामध्ये तू जो पत्र लेखनाचा उल्लेख केला तो खरच वाचनीय आहे. आजकाल पत्रलेखन हे इतिहास जमा झाले आहे. परंतु पूर्वी संपर्कासाठी लांबवर असलेल्या मित्र, नातलग, नोकरी करता किंवा एखाद्या कॉलेजला किंवा विद्यापीठात ऍडमिशन साठी साधे पत्र, आंतरदेशीय पत्र किंवा पोस्टाचे पाकीट, फार फार तर एखादे घरी तयार केलेले मोठे पाकीट आणि त्यावर चिकटवलेली पोस्टाची तिकीटे, एवढेच साधन होते. तुझा जुने नवे मित्र मैत्रिणी आणि आनंदी स्वभावामुळे व आनंदी पावसाच्या निमित्ताने असलेला जनसंपर्क तसेच तू हाती घेतलेल्या संशोधनाच्या निमित्ताने होत असलेला जनसंपर्क खूप
    मोठा आहे त्याबद्दल हार्दिक अभिनंदन! त्यामानाने माझा जनसंपर्क खूपच कमी होता आणि आहे.
    सदर आनंदी पावसाच्या निमित्ताने माझ्याही लहानपणीच्या आठवणी जागृत झाल्या. मी हिंगोण्याला शिकत होतो. घरी आई आणि मीच असायचो. वडील नोकरीच्या गावावर, दोघं भाऊ जळगावला किंवा पुण्याला शिकायला होते. हिंगोण्याला काही घटना घडली किंवा आईने म्हटले की मला त्यांना पत्र लिहावे लागत होते. ति. वडिलांचे किंवा वडील भावाचे चरण सेवेशी, कृ.शि.सा.न. वि.वि. पत्र लिहिण्यास कारण की...... काही कळो न कळो, अशी साचेबंद सुरुवात असायची.
    काही मजकूर आई सांगायची, उदाहरणार्थ, आजोबांना दोन-तीन दिवस बरे नव्हते, यंदा ज्वारी चांगली झाली, अमुक अमुक नानाला मुलगा झाला, वगैरे. काही मजकूर माझा असायचा, उदाहरणार्थ मी शाळेत नियमित जातो, मला अमुक अमुक परीक्षेत इतके मार्क मिळाले, इत्यादी. शेवटी आम्ही सर्व सुखरूप आहोत. काळजी नसावी, आपला आज्ञाधारक... असा शेवट ठरलेला असायचा. या सवयीमुळे प्राथमिक शाळेत पत्रलेखनात चांगले गुण मिळायचे, असो.
    आज-काल मोबाईलचा जमाना असल्यामुळे पत्रलेखन शून्यवत झाले आहे. पत्रलेखनामुळे जो भावनिक जिव्हाळा असायचा तोही कमी झालेला आहे. मला वाटतं आता परीक्षेतही पत्रलेखनाचा प्रश्न नसावा. कॉलेजला असतानाही पत्र लेखन चालूच होते. सर्विस मध्ये असताना पत्रलेखन कमी झाले, लँडलाईन फोन आले पण त्यावर बोलताना भीती वाटायची. आता मोबाईल आल्यामुळे काय परिस्थिती आहे हे मी सांगायला पाहिजे असं नाही. काकूनी कुणाला फोन केला किंवा तिला कोणाचा फोन आला की ती किती वेळ बोलते याचा मी अकारण हिशोब ठेवत असतो. तिकडून बोलणं संपलं किंवा तिकडून "थांबा कोणाचातरी फोन येतो आहे" किंवा थांबा कोणीतरी आलं आहे मी बघते, असा आवाज आला म्हणजे नाईलाजाने फोनवर बोलणं संपतं. अशी एकंदरीत सर्वसामान्यपणे परिस्थिती आहे. ठीक आहे, आता पत्र लेखन, नाही, पत्र-मोबाईल
    प्रवचन संपवतो. तुझ्या आनंदी पावसाला धन्यवाद!😄

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दळण (घरातील गमती जमती)

दळण (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                   ...

🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

  🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕 (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) प्राचीन होयसळ श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा, जिल्हा तुमकुरु, कर्नाटक बंगळूरू पासून साधारण १२७ किमी. गूगल सर्च इंजिन मध्ये Ancient Hoysala Shri Kedareshwar Swami temple, Nagalapura असे शोधले की लगेचच गूगल ते दाखवते, तिथे जायचा रस्ताही दाखवते. त्याचे सगळे ऐकायचे की बरोब्बर तिथे पोहोचता येते.                 होयसळ राजवट, मूळ कर्नाटकात. त्यांनी अकरावे ते चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले. या कालावधीत त्यांनी जी मंदिरे उभारली, त्या मंदिरांना होयसळ मंदिर आणि त्या शैलीला होयसळ शैली म्हणून ओळखले जाते. होयसळ राजवट काळात जवळ-जवळ दीड हजार मंदिरे उभारली. तथापि त्यातील आज फक्त शंभर-दीडशेच मंदिरे अस्तित्वात आहेत. त्यातील फार थोडी सुस्थितीत आहेत. त्यापैकी अगदी बोटावर मोजण्या इतकी मंदिरे सर्वज्ञात आहेत. ती म्हणजे चन्न केशव मंदिर, बेलूर, होयसाळेश्वर मंदिर, हाळेबिडू आणि चन्न केशव मंदिर, सोमनाथपुर. ही तीनही स्थळे जागतिक वारसा या...

💃गुलाबाईची गाणी💃 (गच्चीवरील गमती जमती )

  💃गुलाबाईची गाणी💃  (गच्चीवरील गमती जमती ) 💃💃💃💃💃💃💃💃💃💃 💃गुलाबाईची गाणी💃  पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा गुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून गुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा गुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउले पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून गुलाबाईचे माहेर दिसे. 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃  सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफि...