व्यक्ती-पितापुत्राची जोडी
(माझा वारसा)
आमचे सुरुवातीपासुन एकत्र कुटुंब . आजीआजोबा , आईवडील , दोन काका-काकू आणि आम्ही सात बहिणी , दोन भाऊ . एकत्र राहत असल्या कारणाने सगळी नाती एकदम घट्ट होती . ज्या हक्काने आईच्या माहेरी , आजोळी जात असु सुट्टीचे , त्याच हक्काने काकूंच्या माहेरी सुद्धा जात असु . त्यामुळे आम्हाला तीन आजोळ ! केव्हढी श्रीमंती!
ही पितापुत्रांची जोडी म्हणजे माझे पणजोबा आणि आजोबा , म्हणजे माझ्या सगळ्यात धाकट्या काकूचे आजोबा आणि वडील ! सुका मन्साराम खडके (१८७५-१९८५) पणजोबा , एकशे दहा वर्षांचे निरोगी आयुष्य जगले . शिक्षण अजिबात नाही , शेती हाच व्यवसाय . शिक्षण नसले तरी , देवाचे काय काय तोंडपाठ . मी साधारण सात-आठ वर्षांची असल्यापासून पहिले त्यांना . सकाळी उठुन अंघोळ झाली की व्यायाम , मग हरिपाठ म्हणत , गोठ्यात काम करत , साफसफाई आणि म्हशीला चारा घालणे वगैरे . मोठा प्लॉट होता आणि थोड्या जागेतच घर . बाकी जागेत बाग . त्यात बदाम , आंबा , उंबर , लिंब , पेरु असली बरीच झाड होती . यांच्या हातात कायम एक खुर्पी(विळा) , बागेची साफसफाई करणे , तण काढून टाकणे सतत चालू असे . शिवरात्री , आषाढी-कार्तिकी एकादशी अशा खास दिवशी आणि मनात आले , लहर लागली की घरून निघत , ओंकारेश्वर मंदीर , जुने गाव , आमचे घर आणि परत त्यांच्या घरी असे सगळे चालत जात . सगळे जवळ जवळ सात-आठ किलोमीटर तरी असेल आणि हे सगळे वयाची शंभरी पार केल्यांनतर ! कधीच काही आजार नाही , औषध नाहीत . शेवटचे पाच दिवस फक्त पलंगावर आडवे होते . सारखे म्हणत मी सव्वाशे वर्ष जगणार , पण एकशे दहा वर्षांचे अगदी निरोगी आयुष्य जगले !
जनार्दन सुका खडके (आजोबा १९१९-२००४) , एम ए एम एड करून महाराष्ट्रात पहिले आलेले . स्वातंत्र लढ्यात अगदी सक्रीय सहभाग , जेल मध्ये सुद्धा गेलेले काही काळ . असेच एकदा काही कामाने चालत जात असतांना , त्यांची चप्पल तुटली . सोबत पूज्य साने गुरुजी होते , स्वतःची चप्पल त्यांनी आजोबांना दिली आणि स्वतः अनवाणी चालले , असे आपले पूज्य साने गुरुजी ! भारत सरकारने आजोबांना ताम्रपट देऊन गौरविलेले आहे . आधी ट्रेनिंग कॉलेज आणि नंतर काशीबाई विद्यालयाचा मुख्यध्यापक म्हणून भार सांभाळला सेवा निवृत्ती पर्यंत !
©आनंदी पाऊस
माझा वारसा (व्यक्ती)
जुन २०२०
आमच्या अण्णांना मिळालेला ताम्रपट!
Pitaputrachi jodi 🙏
ReplyDeletevarnan chan
Kharach tin tin ajol kevhadi hi shrimanti
हो , खरंच खूपच श्रीमंती ! धन्यवाद !
Deleteखूप छान....
ReplyDelete-सोनल चौधरी
खूप मनःपूर्वक धन्यवाद !
DeleteKharech aapan natyanchya babtit khupach shrimant! Tyamule लाड पण खुप व्हायचे. खुप खाऊ पण मिळत असे. खुप छान लेख आहे.
ReplyDeleteखरंय , खूप सारे लाड आणि खूप सारा खाऊ या सारखा दुसरा आनंद नाही या जगात !
DeleteVeey nice article....
ReplyDeletethnk u so much !
Deleteखुपच छान आहे लेख. तुझ्या कल्पनाशक्तीला खुपच पंख फुटायची आधीपासूनच. खुप मस्त आहे तुझे लेख.हे सगळं तुम्ही बहिण भावंडांनी अनुभवलेले आहे. सौ.मंदा चौधरी. भवलेले आहे
ReplyDelete