Skip to main content

व्यक्ती पितापुत्राची जोडी (माझा वारसा)

 व्यक्ती-पितापुत्राची जोडी 

(माझा वारसा)


                                          आमचे सुरुवातीपासुन एकत्र कुटुंब . आजीआजोबा , आईवडील , दोन काका-काकू आणि आम्ही सात बहिणी , दोन भाऊ . एकत्र राहत असल्या कारणाने सगळी नाती एकदम घट्ट होती . ज्या हक्काने आईच्या माहेरी , आजोळी जात असु सुट्टीचे , त्याच हक्काने काकूंच्या माहेरी सुद्धा जात असु . त्यामुळे आम्हाला तीन आजोळ ! केव्हढी श्रीमंती!
                                          ही पितापुत्रांची जोडी म्हणजे माझे पणजोबा आणि आजोबा  , म्हणजे माझ्या सगळ्यात धाकट्या काकूचे आजोबा आणि वडील ! सुका मन्साराम खडके (१८७५-१९८५) पणजोबा , एकशे दहा वर्षांचे निरोगी आयुष्य जगले . शिक्षण अजिबात नाही , शेती हाच व्यवसाय . शिक्षण नसले तरी , देवाचे काय काय तोंडपाठ . मी साधारण सात-आठ वर्षांची असल्यापासून पहिले त्यांना . सकाळी उठुन अंघोळ झाली की व्यायाम , मग हरिपाठ म्हणत , गोठ्यात काम करत , साफसफाई आणि म्हशीला चारा घालणे वगैरे . मोठा प्लॉट होता आणि थोड्या जागेतच घर . बाकी जागेत बाग . त्यात बदाम , आंबा , उंबर , लिंब , पेरु असली बरीच झाड होती . यांच्या हातात कायम एक खुर्पी(विळा) , बागेची साफसफाई करणे , तण काढून टाकणे सतत चालू असे . शिवरात्री , आषाढी-कार्तिकी एकादशी अशा खास दिवशी आणि मनात आले , लहर लागली की घरून निघत , ओंकारेश्वर मंदीर , जुने गाव , आमचे घर आणि परत त्यांच्या घरी असे सगळे चालत जात . सगळे जवळ जवळ सात-आठ किलोमीटर तरी असेल आणि हे सगळे वयाची शंभरी पार केल्यांनतर ! कधीच काही आजार नाही , औषध नाहीत . शेवटचे पाच दिवस फक्त पलंगावर आडवे होते . सारखे म्हणत मी सव्वाशे वर्ष जगणार , पण एकशे दहा वर्षांचे अगदी निरोगी आयुष्य जगले !
                                        जनार्दन सुका खडके (आजोबा १९१९-२००४) , एम ए एम एड करून महाराष्ट्रात पहिले आलेले . स्वातंत्र लढ्यात अगदी सक्रीय सहभाग , जेल मध्ये सुद्धा गेलेले काही काळ . असेच एकदा काही कामाने चालत जात असतांना , त्यांची चप्पल तुटली . सोबत पूज्य साने गुरुजी होते , स्वतःची चप्पल त्यांनी आजोबांना दिली आणि स्वतः अनवाणी चालले , असे आपले पूज्य साने गुरुजी ! भारत सरकारने आजोबांना ताम्रपट देऊन गौरविलेले आहे . आधी ट्रेनिंग कॉलेज आणि नंतर काशीबाई विद्यालयाचा मुख्यध्यापक म्हणून भार सांभाळला सेवा निवृत्ती पर्यंत !

©आनंदी पाऊस 
माझा वारसा (व्यक्ती)
जुन २०२०





आमच्या अण्णांना मिळालेला ताम्रपट! 









Comments

  1. Pitaputrachi jodi 🙏
    varnan chan
    Kharach tin tin ajol kevhadi hi shrimanti

    ReplyDelete
    Replies
    1. हो , खरंच खूपच श्रीमंती ! धन्यवाद !

      Delete
  2. खूप छान....
    -सोनल चौधरी

    ReplyDelete
    Replies
    1. खूप मनःपूर्वक धन्यवाद !

      Delete
  3. Kharech aapan natyanchya babtit khupach shrimant! Tyamule लाड पण खुप व्हायचे. खुप खाऊ पण मिळत असे. खुप छान लेख आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय , खूप सारे लाड आणि खूप सारा खाऊ या सारखा दुसरा आनंद नाही या जगात !

      Delete
  4. खुपच छान आहे लेख. तुझ्या कल्पनाशक्तीला खुपच पंख फुटायची आधीपासूनच. खुप मस्त आहे तुझे लेख.हे सगळं तुम्ही बहिण भावंडांनी अनुभवलेले आहे. सौ.मंदा चौधरी. भवलेले आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दळणं (घरातील गमती जमती)

दळणं (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                  ...

थोडं (खूप सारं😉😆) गोडाचं-१(दराबा) (घरातील गमती जमती)

थोडं (खूप सारं) गोडाचं-१(दराबा) (घरातील गमती जमती)                        दराबा! तर या शब्दाचा अर्थ काय? हा शब्द कुठून आला? तर हा पदार्थ बऱ्हाणपूर येथील दरबारातील खास पदार्थ. हा पदार्थ रोबुन रोबुन करावा लागतो म्हणून हा दराबा!                                                           घरात सगळेच खाण्याचे शौकीन, मुख्य म्हणजे आमचे बाबा सुद्धा! त्यामुळे सारखं काही ना काही करणं आणि खाणं अखंडपणे चालूच असे. खाण्याच्या बाबतीत तर सगळ्यांचा भरपूर उत्साह होताच, पण करणाऱ्यांचा (सगळ्या मम्मी लोकांचा) सुद्धा उत्साह तेव्हढाच किंवा काकणभर जरा जास्तच मी तर म्हणेन. सगळं अगदी उत्साहाने करत. त्यांच्या या उत्साहाला आणि मेहनतीला तर कायमच आणि वारंवार सलाम करावासा वाटतो. कारण कुठलीही गोष्ट करायची असो, कधीही थोडी थोडकी करून भागतच नसे. त्यामुळे खूप बांधीलकी आणि वचनबद्धता असणे आवश्यक असे. बरं त्यां...

दाय गंडोरी-पद्धत१(मिरचीची भाजी)(थोडं झणझणीत...)

  दा य गंडोरी-पद्धत१ (मिरचीची भाजी)   (थोडं झणझणीत...)                           दाय गंडोरी ! खास खानदेशी शब्द आणि खास खानदेशी भाजी! अवघ्या खानदेश वासीयांची अतिशय लाडकी, आवडती भाजी.                          दाय गंडोरी यातील दाय शब्दाचा अर्थ आहे डाळ आणि गंडोरी म्हणजे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे. थोडक्यात मिरचीची डाळ घालून केलेली भाजी. दाय गंडोरी खास 'लेवा गणबोली' तील शब्द!                          यासाठी लागणारे साहित्य म्हणजे तुरीची डाळ, हिरव्या मिरच्या, आंबटचुका, वांग, कच्चे टमाटे, आलं, लसूण, हळद, शेंगदाणा कुट, सुक्या खोबऱ्याचा कीस, भरपूर, खूप सारी कोथिंबीर, तेल मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि मीठ. उपरोक्त उल्लेखाप्रमाणेच ही भाजी अतिशय झणझणीत असते. परंतु आता सगळेच तिखट थोड्या कमी प्रमाणात खातात त्यामुळे फार तिखट नसते. पण आवड असलेले, पट्टीचे खाणारे असलेल्या घरांतून अजूनही चांगली झणझणी...