लाकडी गल्ला
(माझा वारसा)
मी आता पर्यंत , वारसा स्पर्धा आणि माझा वारसा या सदरातून माझ्या/आमच्या बऱ्याच वारसा असलेल्या गोष्टी आणि त्यांच्या विषयी माहिती सांगितली . अजूनही अशा बऱ्याच वारसा असलेल्या गोष्टी सांगणार आहेच . या सगळ्या उपक्रमांच्या आधी मला यातील फारच मोजक्या गोष्टी माहिती होत्या . पण या उपक्रमामुळे मला बऱ्याच गोष्टींची नीट , पूर्ण आणि खोलवर माहिती झाल्या . पैकी सगळी माहिती मला दादांकडून (वडील) मिळाली . पण माझ्या दोन काकूंनी , या सगळ्या वस्तू अजूनही नीट जपून ठेवल्या आहेत . एक काकू म्हणजे जी अजूनही आमच्या मूळ घरात राहते आणि दुसरी काकू , जी खूप वर्ष आमच्या मूळ गावी असलेल्या घरात राहिलेली आहे . यापैकी फार थोड्या वस्तू वापरात आहे आज , बाकीच्या वापरात नसलेल्या वस्तूही त्यांनी नीट , अगदी निगुतीने जपून ठेवल्या आहेत . म्हणजे खऱ्या अर्थाने वारसा जपून ठेवण्याचे काम त्यांनीच केले आहे आणि अजूनही करत आहेत . या वस्तू जपून ठेवणे म्हणजे खूप सोपे काम नसते खरतरं . वेगळ्या अर्थाने काहीही उपयोगाच्या नसतात . ठेवायला भरपूर जागा लागते . तसेच वेळोवेळी साफसफाई करावीच लागते . या सगळ्या कारणांमुळे अशा वस्तू बर्याच वेळा मोडीत काढल्या जातात . पण त्या दोघींनी असे न करता , त्या सगळ्या वस्तू अगदी नीट जपून ठेवल्या आहेत . दोघीं चे अगदी शतशः आभार ! कारण त्यांनी अप्रत्यक्षपणे माझ्या पूर्वजांची भेट घडवून दिली , त्यांच्या सहवास आणि स्पर्श अनुभवण्याची एक छान , दुर्मिळ आणि अशक्य अशी संधी प्राप्त करून दिली ! खरतरं हे सगळे शब्दांच्या पलीकडले आहे , पण काही वेळा आपल्या जवळ असेल त्या तोकड्या शब्दांत व्यक्त होणे गरजेचे असते .
असेच काही महिन्यांपूर्वी मी काकूकडे गेले होते . तेव्हा ती म्हणाली , "अगं आपल्या गावाच्या घरात एक लाकडी पेटी होती . मला ती खूप आवडते , म्हणून मी ती इथे घेऊन आलेय . पण ती कसली पेटी आहे वगैरे बद्दल मला काहीच माहिती नाही . मी बघते आहे तेव्हापासून त्यात आईची(लहान आजी) पैठणी ठेवलेली असे ." मी म्हटले दाखव तरी . बघितले आणि ती लाकडी पेटी उघडून पाहिली तर , तिच्या झाकणाला आतल्या बाजूने लांबीच्या बाजूला समांतर काही लाकडी पट्ट्या लावलेल्या , त्यामुळे त्यात काही कागदपत्र वगैरे ठेवण्यासाठी जागा तयार झालेली दिसली . पेटीत पाहिले तर , त्यात अगदी मामुली खोली असलेले वेगवेगळ्या मापाचे काही कप्पे दिसले . पण पेटीची उंची तर बरीच दिसत होती . काकू म्हणाली अगं , ते बाहेर निघतात सगळे कप्पे . मध्यभागी उचलायचा प्रयत्न केला तर फक्त मधले , त्यातल्या त्यात मोठे दोन कप्पेच फक्त हातात आले . काकू म्हणाली सगळंच बाहेर काढता येतं ते , काढ बाहेर म्हणजे सगळे नीट बघता येईल . मग बाकी उरलेला भाग सुद्धा बाहेर काढला , तर खाली एक मोठ्ठा कप्पा आणि उजवीकडे एक छोटासा कप्पा दिसला , पेटीच्या तळापर्यंत असलेले .
सगळे नीट बघितले , काय असेल ही पेटी नक्की , विचार चालूच होते . काकू म्हणाली आजीची पैठणी होती त्यात , त्यामुळे वाटले , आजीची ठेवणीतील पातळं आणि वरचे छोटे कप्पे दागिने वगैरे ठेवण्यासाठी असतील . पण नक्की काय असेल ते मात्र समजत नव्हते . या सगळ्या गोष्टींचा खुलासा एकच व्यक्ती करू शकणार होती , ते म्हणजे दादा . मग त्या पेटीचे भरपूर फोटो काढून घेतले , सगळ्या बाजूने परत परत बघून घेतली .
घरी आल्यावर दादांना फोटो दाखविले . त्यांनी बघितल्याबरोबर सांगितले , ही पेटी म्हणजे त्यांच्या आजोबांची म्हणजे माझ्या पणजोबांचा वखारीवरचा गल्ला आहे . मी म्हटले त्यात तर लहान आईची पैठणी होती ठेवलेली . ते म्हणाले त्यांच्या आजोबांची लाकडाची वखार होती , त्या वखारीत रोख रक्कम आणि कागदपत्र ठेवण्याचा गल्ला होता तो . इतके भारी वाटले ते ऐकून , कारण अप्रत्यक्षपणे का होईना मला माझ्या पणजोबांच्या सहवासात राहत आले होते , त्याचा सहवास , स्पर्श अनुभवता आला होता . आपोआपच डोळे भरून आले ! ते फारच लवकर वारले , त्यामुळे वखार बंद झाली आणि मग हा गल्ला घरी आला असावा आणि त्याचा घरातच उपयोग करण्यात आला असावा . ते गेल्यानंतर त्याला पॉलिश सुद्धा केलेली नसेल खचीतच . पण बघून अजिबातच वाटत नाही तो शंभर सव्वाशे वर्ष जुना आहे ते . अगदी नवाचं वाटतो . फारच छान आहे अजूनही . पणजोबा फारच लवकर गेल्याने त्यांचा एकही फोटो नाही घरात . मात्र पणजीचा आहे , मोठ्ठा , फ्रेम करून लावलेला आहे भिंतीवर आमच्या मूळ गावाच्या घरामध्ये !
©आनंदी पाऊस
(माझा वारसा)
२जुलै २०२१
लाकडी पेटी / गल्ला
उघडल्यावर दिसणारे कप्पे
मागील बाजू , झाकण उघडल्यावर ते पडून जाऊ नये
म्हणून छोटासा लाकडी आधार दिलाय
आमची पणजी
जुने ते सोने म्हणतात ते खोटे नव्हे कारण पूर्वजांनी जे जतन करून ठेवले आहे ते खरेच सोने होते. माझ्या घरी देखील माझ्या पणजी चे हाताची विळी (पावशी) आज हि माझे घरात वापरली जात आहे आणि महत्वाचे म्हणजे तिला अजून देखील धार लावलेली नाही आज जवळ जवळ ८० वर्षाचे वर होऊन गेले पण तिची धार जशी चे तशी आहे आज ताई ने पेटी ची आठवण लिहिली म्हणून लक्षात आले. ग्रेट
ReplyDeleteपावशी खूपच छान प्रकार आहे. माझ्या आवडीचा. एक मात्र नक्की खरे जुन्या पावश्या ना कधीही धार लावावी लागत नाही! जुने ते सोने!!
Deleteमनःपूर्वक धन्यवाद, ही माहीती शेअर केल्याबद्दल!
खुप सुंदर लेख आहे. मी ईतकी र्वष येथे राहून मला बघायला मिळाली नाही. तु भाग्यवा न आहेस. सौ. मंदा चौथरी.
ReplyDeleteत्या बाजूला गेलीस की आठवणीने बघ नक्की. खर तर मलाही परत पहायची आहे 😊 😍 ❤
Deleteवारसा मध्ये लाकडी पेटी , पाळणा या वस्तूंचा संग्रह अजूनही आहे.हे आश्चर्य वाटते. खडके पणजोबा आणि ज.सु. आबांची आठवण त्यांच्याविषयी आदर आणि प्रेम व्यक्त करतांना दिसते. ����
ReplyDeleteआहे सगळे अजून अणि अगदी छान आहेत!
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏
खुपच सुरेख अमुल्यअशी धनाची पेटी व सोनेरी आठवण
ReplyDeleteजपली आहे आणी लेखातून पहिल्यादांच एवढय़ा कप्प्यांची पाहीली.खुपच मस्त. Loved dis Treasure Box
N I always love 😍 ur अभिप्राय!!! I will be always waiting very egarly! Tons of love 😍
Deleteलाकडी पेटीचा लेख खुप छान मांडला आहे तु!
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद 🙏 ☺ 😇 😍
DeleteChan aathavani ����peti pan agadi navinya purn aahe
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏
Deleteखुप छान माहिती आहे.माझ्याकडे पण अशी एक पेटी आहे.👌👌
ReplyDeleteछान जपून ठेव , अमूल्य ठेवा आहे तो ! आणि जमलं तर दाखव मला कधीतरी , मनःपूर्वक धन्यवाद !
Deleteछान.. गल्ल्याचा उपयोग आजी पैठणी ठेवण्यासाठी करायची.. आयडिया मस्तच..आणि लेख पण मस्त 👍
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !🤩🙌
Delete