Skip to main content

बाकावरच्या गमती जमती (गॅलरीतील गमती जमती)

बाकावरच्या गमती जमती 
(गॅलरीतील गमती जमती)

                                                         

                                                          आमच्या या गॅलरीत , समोरच्या बाजूने म्हणजे मुख्य रस्त्याच्या बाजूने एक लाकडी बाक ठेवलेला होता कायमचा ! आमची आई(आजी) आणि आम्हा मुलांचा दिवसातला बराच वेळ मुक्काम असे , या बाकावरच . या बाकावर बसले , की आरामात रस्त्यावरची सगळी गम्मत दिसत असे आणि बाकावर बसल्या बसल्या हवे ते उद्योग सुद्धा करता येत असत . 
                                                           आषाढी आणि कार्तिकी एकादशी आणि महाशिवरात्री म्हणजे आमची जाम चंगळ असे ! या दिवशी शाळेला सुट्टी असे . त्यामुळे सकाळी उठून , अंघोळी वगैरे आटोपून तयार झालं की खादाडीला सुरुवात होत असे . सकाळी सकाळी एक मोठ्ठा कुकर , जवळ जवळ आठ-दहा लिटरचा , भरून भुईमुगाच्या शेंगा उकडल्या जात असत , मीठ घालून . कुकरची वाफ गेली की या शेंगा एका टोपलीत घालून ठेवल्या जात , स्वयंपाक घरातील सिंक जवळ . टोपलीत ठेवल्याने शेंगातील सगळे पाणी निथळून जाई आणि सिंक मध्ये वाहून जात असे . मग आम्ही आमचे आवरले की एक मोठ्ठ ताट भरून या शेंगा घेऊन या बाकावर बसत असू .  एक रिकामे ताट सुद्धा सोबत घेऊन जात असू . आता सगळ्यांना शंका येईल , हे रिकामे ताट का ? किंवा काहींना वाटेल शेंगांची टरफल टाकण्यासाठी असेल . पण असे अजिबातच नाही . आम्ही बाक सरळ पुढे ओढून घेऊन बसत असू . त्यामुळे शेंगा  सोलल्या की त्यांची टरफल सरळ वरून खाली टाकता येत असत . हे तीनही दिवस बँकेला सुट्टी असे , त्यामुळे खाली एकदम सामसूम असे . आम्ही फेकलेल्या टरफलांचा खाली चांगला सडाच पडत असे खाली . गाईगुरे बरीच फिरत तेव्हा सगळीकडे आणि रस्ता झाडणारे सुद्धा दिवसातून दोनदा नियमितपणे येत . त्यामुळे सगळं लगेच स्वच्छ होत असे . 
                                                           तर दुसरे ताट , त्याबद्दल सांगत होते मी ! तर काही शेंगा दोन दाण्यांच्या , काही तीन दाण्यांच्या , काही चार दाण्यांच्या , काही पाच दाण्यांच्या असत . तर काही एकाच दाणा असलेल्या असत . मग आम्ही या शेंगा अगदी हळुवारपणे आणि काळजीपूर्वक सोलत असू . असे केल्याने एकाच शेंगेतले दाणे एकमेकांना चिकटलेले बाहेर काढता येत असत . मग हे "जोड दाणे" निघाले की आम्हाला कोण आनंद होत असे . मग हे "जोड दाणे" आम्ही या रिकाम्या ताटात ठेवत असू . आमच्यात चढाओढच लगे मग , कुणाचे सर्वात जास्त "जोड दाणे" निघतात ते ! शेंग सोलली आणि सुटे सुटे दाणे निघाले तर ते लगेच खाऊन घेत असू . "जोड दाणे" निघाले की ते त्या ताटात ठेवत असू . खाण्यापेक्षा "जोड दाणे" काढण्याचाच जास्त उत्साह ! सारखेच सुटे सुटे दाणे निघाले की मग हिरमुसल्यासारखे होत असे . मग बराच वेळ हाच खेळ चालत असे आणि सरते शेवटी मोजून बघत असू कुणाचे किती "जोड दाणे" निघाले ते . तो पर्यंत सुटे सुटे दाणे खाऊन आमचे मन आणि पोट दोन्ही भरलेले असे . मग हे ताट घरात नेवून मम्मीला दाखवल्यावर आणि कुणाचे सगळ्यात जास्त "जोड दाणे" निघाले हे सांगितल्यावरच हा अध्याय संपत असे .
                                                                                                      ------------------------------------------------ 
                                                         ह्या शेंगांच्या टरफलांचा , खाली तांबूस पांढरा सडा पडे . असाच अजून लाल रंगाचा सुद्धा सडा पडे या दिवशी !  या दिवशी सकाळी दोन कुकर लावले जात . एक तर समजला तुम्हाला , भुईमुगाच्या शेंगांचा ! दुसरा कुकर लागत असे वाळलेल्या आंबट बोरांचा ! ही वाळवलेली बोरं वर्षभरासाठी साठवून ठेवलेली असत . या तीन दिवशी , क्वचित दुसऱ्या एखाद्या उपवासाला आणि शेपू-पालकाचे पिठले केले की त्यात घालायला लागत . पिठल्याची गम्मत नंतर स्वयंपाक घरात गेल्यावर सांगेन . तर या दिवशी ही बोरं कुकर मध्ये शिजवून नंतर त्यात मीठ आणि गुळ घालून परत शिजवली जात . मग हा जो पदार्थ तय्यार झाला त्याचे नाव बोरोणी ! खास खान्देशी पदार्थ आणि नाव सुद्धा खास खान्देशी ! छान अशी शिजलेली बोरं त्यात गुळाची आणि मिठाची चव , अहाहा ! एकदम भारी !! मग एका ताटलीत ही बोरोणी  घ्यायची , सोबत चमचा हे खायला आणि जाऊन बसायचे बाकावर ! चमच्याने खात जायचे , बोरं छान चाखून चाखून खायची आणि त्याच्या बीया तोंडातून तशाच खाली उडवायचा ! मग थोडा वेळाने खाली पहिले की लाल लाल सडा पडलेला दिसे या बियांचा ! काही वेळा मात्र या बीया नीट संभाळून ठेवत असू आणि छान कोरड्या होईपर्यंत वाळवून ठेवायच्या . मग या वाळलेल्या बीया छोटयाश्या लाकडी किंवा लोखंडी ठेचणीने काळजीपूर्वक फोडायच्या . यातून दोन-दोन बीया निघतात प्रत्येकी , एकदम भारी लागतात चवीला ! खाऊन पाहिल्या नसतील आजतागायत तर लगेच खाऊन बघा !!!
                                                                                                 --------------------------------------------------------
                                                      काही वेळा मम्मीलोक भाजी बाजारात , काही वेळा किराणा सामान घ्यायला तर काही वेळा अजून वेगवेगळ्या कामांनी बाहेर जात , आम्हा मुलांना घरी सोडून . एव्हढ्या लोकांचा भाजीबाजार किंवा किराणा सामान आणणे म्हणजे प्रमाण खूप आणि वेळही खूप लागे मग . घरात त्यांची वाट बघून बघून जीव थकला की मग हा बाक आमच्या मदतीला धावून येत असे . आम्ही बाहेर गॅलरीत जाऊन या बाकावर बसत असू आणि रस्त्यावर लांबवर नजर लावून वाट बघत असू त्यांची . मग रस्त्यावरून लांबवरूनच एकदा का त्या येतांना दिसल्या की एकदम खुश होऊन जात असू . एकदा का घराच्या कोपऱ्यावर आल्या की जीन्याशी धावत जाऊन , जिन्याचे दार उघडून त्यांची वर यायची वाट बघत असू . काय मस्त वाटे , एकदा का त्या जिन्याने वर आल्या की !!! वाट बघतांना पोटात अगदी पिळवटून येत असे , एकदा कधी दिसतील असे होऊन जाई . मग एकदा का लांबवर रस्त्याने चालत येतांना दिसल्या की कोण आनंद होत असे ! अगदी  परमोचच क्षण आणि पमोचच आनंद ! मग नंतर त्या हातापायावर पाणी घेऊन आणि पाणी पिऊन थोड्या निवांत झाल्यावर सगळ्या पिशव्या रिकाम्या करत बाजारातून आणलेल्या . एखाद्या पिशवीतून आमच्या साठी काही खाऊ निघतो का बघणे . मग तो खाऊ बघून आणीच आनंद होत असे . पण हा आनंद मघाच्या परमोच्चआनंदापुढे फारच फिक्का !
                                                                                                ------------------------------------------------------------
                                                     घरात कायम एक ना एक चिल्लू-पिल्लू असेच . बऱ्याच वेळा आमची आई(आजी) या चिल्ल्या-पाल्ल्यांना घेऊन या बाकावर बसत असे . त्यांच्याशी बोलत असे , रस्त्यावरची गम्मत दाखवत असे . बसल्या बसल्या गम्मत बघत काही वेळा वाटीत काही खाऊ घेऊन खाणे , काही वेळा काही खेळणे घेऊन खेळणे चालले असे यांचे . मग एकदम यांचा मूड बदलत असे आणि क्षणात हातातली वस्तू गॅलरीच्या कठड्याला लावलेल्या आसाऱ्यांच्या फटीतून एकदम खाली रस्त्यावर पोहोचत असे . कधी लगेच लक्षात येत असे , कधी बऱ्याच वेळाने . मग शोधाशोध चालू होई आणि खाली पडली आहे का तेही बघितले जाई . ती वस्तू जर का खाली पडलेली दिसली की जाम पळापळ . कुणीतरी एकाला खाली जाऊन ती वस्तू आणावी लागे , खाली कुणी पोहोचत नाही तोपर्यंत वर गॅलरीत उभे राहून कुणाला तरी त्या वस्तूवर लक्ष ठेवावे लागे . हे तर अगदी वारंवार होत असे . एखादी छोटी-मोठी वस्तू किंवा खेळणे सापडले नाही की हमखास समजायचे , हे खाली रस्त्यावर पोहोचले आणि तिथून कुणीतरी उचलून नेले . 
                                                                                                
 आनंदी पाऊस 
गॅलरीतील गमती जमती
१५ सप्टेंबर २०१९




लाकडी बाक 




उकडलेल्या शेंगा 





उकडलेल्या शेंगा 





वाळलेली बोरं 
ही बोरं शिजवून त्यात गुळ घालून बोरोणी 
तयार केली जाते 





बोरोणी 


Comments

  1. Zakkas. Shabdach nahi dusara. Ramya te balpan ani Ramya tya aathawani.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरंय , रम्य ते बालपण आणि रम्य त्या आठवणी !

      Delete
  2. स्वाती प्रभुणेFebruary 14, 2020 12:22 pm

    शेंगा व बोरोनी बोरा च मस्तच लागत आमच्या शाळे बाहेर एक अजी स्टोव्ह घेऊन गरमगरम विकायची व त्या काळी बाहेरच खायला पर्वागी नसायची मग ते आम्ही चोरून खायचो त्याची आठवण झाली व तोंडाला पाणी सुटले बोराच्या बियाच्या आत असे असते हे मला आताच कळले नवीन माहिती मी नक्कीच करून बघेन
    मस्त लिहतेस सोपे व सुटसुटीत

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय तेव्हा बाहेर खायला परवानगी नव्हती आणि पैसे सुद्धा नसत आपल्याकडे बाहेर खायला , अगदी कधीतरीच मिळत पाच दहा पैसे गोळ्या खायला   खूप खूप धन्यवाद !😍🙏

      Delete
  3. wow boroni wachun tondala pani sutale gg kharach ase balpan aaplya mulanchya watyala nahi aale ��

    ReplyDelete
    Replies
    1. 😄मुलांचा काळ वेगळा आणि त्यांच्या आनंद म्हणायच्या गोष्टी सुद्धा वेगळ्या ..... 

      Delete
  4. निलिमा झोपेFebruary 14, 2020 1:30 pm

    wa kiti chan varan kele aahes tu agadi barik sarik pan boroni, shenaga khupch sunder ����
    Agadi tumhi sarv bakavar basun he khat aahe ase vatle��

    ReplyDelete
    Replies
    1. अरे वा , ही खरी पावती , खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !😇😇🙏🙏

      Delete
  5. मनिषा जोशीFebruary 14, 2020 1:32 pm

    खूप च मस्त लिहीत आहेस ,,तुझ्या प्रत्येक लेखात मी तिथून फेरफटका मारून येतीये ,,इतके छान ओघवते लिखाण आहे ,,कुठेही कंटाळवाणे नाही होत ,,एव्हढे इतक्या आठवणी ,,कित्ती छान ,,
    त्याचे फोटो पण छान ,,

    ReplyDelete
    Replies
    1. मनीषा सगळ्यात आधी तुझे मनःपूर्वक स्वागत या चौधरी सदनात !!! खूपच आनंद झाला तुला इथे भेटून ! आणि या छान अभिप्रायाबद्दल सप्रेम धन्यवाद !😍😇🙏

      Delete
  6. शैलजा चौधरीFebruary 14, 2020 2:25 pm

    व्वा बोरोणी किती छान लागते
    पण आता मुलांना आवडत
    तुझा लेख वाचून बरेच लोक बोरोणी करतील
    खूप छान वर्णन केले आहे

    ReplyDelete
    Replies
    1. बोरोणी ला जगात कसलीच तोड नाही ! हो वाचून बरेच लोक करून बघतीलच , मला तसे बरेच निरोप सुद्धा आले ! सप्रेम धन्यवाद काकू !!बोरोणी ला जगात कसलीच तोड नाही ! हो वाचून बरेच लोक करून बघतीलच , मला तसे बरेच निरोप सुद्धा आले ! सप्रेम धन्यवाद काकू !!🤩😇🙏

      Delete
  7. नेहमीप्रमाणे एकदम छान वर्णन....

    ReplyDelete
    Replies
    1. 😇🙏मनःपूर्वक धन्यवाद !

      Delete
  8. boroni varnan ani chitra doghehi pahun 😋tonadala pani sutale tyat khandeshi padarth ani nav pan khadeshi 👌

    ReplyDelete
  9. भुईमूगाच्या उकडलेल्या शेंगा टरफलांसह खाणे फक्त बालपणीचं होवू शकते. खूपचं मजा असते तसं खाण्यात

    ReplyDelete
  10. संजिता श्रीकांतFebruary 15, 2020 11:55 am

    Apratim," walkthrough time" experiencing that Era with aura..
    .Boroni प्रथमच पाहिलंय...
    seems me tasty... similar jam or spread ??
    will try with brown bread / चपाती

    ReplyDelete
    Replies
    1. तुझे अद्वितीय अभिप्राय म्हणजे मला एक पर्वणीच असते , मी अगदी वाट बघत असते तुझ्या अभिप्रायाची ! हो फारच भारी बोरोणी , पण त्यात बिया बसल्याने स्प्रेड म्हणौन वापराणे फारसे सोयीचे होणार नाही पण बिया काढून टाकल्या तर नक्कीच . सप्रेम धन्यवाद !🤩😇😋😍

      Delete
  11. तुमच्या लेखनामुळे बालपणाचा परत एकदा फेरफटका मारून होतो मेहरूणी बोर वाळवून ठेवायचे ते नुसते खायला आंबट गोड बोरोणी करायला वाळलेले लोणचे पण आठवते का?
    सुंदर लिहिते आहेस

    ReplyDelete
    Replies
    1. हो , खरंय , मी तर जणु माझं बालपण परत जगतेय , किती स्वर्गीय संधी आहे मला ही ! आणि हो मेहरूण बोरं नुसती खाण्यासाठी वाळवायची आणि आंबट गोड बोरं बोरोणी साठी आणि दुसरे म्हणजे शेपू-पालकाच्या पिठल्यासाठी . मला खार तर तेव्हा पिठलं हा प्रकार अजिबात आवडेना पण निव्वळ त्या आंबट बोरांमुळे मला आवडे हे शेपू पालकाचे पिठले ! खूप सारे धन्यवाद !😇🙏

      Delete
  12. छान वर्णन केले आहेस....बर्याच बारिकसारिक गोष्टी आठवून लिहिल्या आहेस....ते सोपे नाही. ������������

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे धन्यवाद !😇🙏🤩🤩🤩

      Delete
  13. वा.मस्त. बोरोणी नवीनच आमच्यासाठी.
    आईची वाट पाहून परत भेटल्यानंतरचा परमोच्च आनंद मात्र तंतोतंत तसाच. पुढे तिचं पत्र आल्यावर तसंच वाटायचं. अन आता फोनवर आवाज ऐकून सेम तेच वाटतं..

    ReplyDelete
    Replies
    1. बोरोणी नक्की करून बघ एकदा , आवडेल तुला नक्कीच . आणि हो आईबद्दल सगळे एकदम तंतोतंत खरे ...... 😇😇😇🤩🤩🤩

      Delete
  14. ओघवते शब्दांकन आणि शब्दांचि जुळवण तसेच बारिक सारिक बाबिंचि वेळेवर आठवण यांचा मेळ खरच वाखाणण्याजोगे आहेच

    ReplyDelete
    Replies
    1. आणि वडिलांचं काळीज , लेकीच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीच कौतुक कायमच करत😇😇😇 !! खूप खूप सारे प्रेम !!!🤩😍🥰💖

      Delete
  15. दिपाली चौधरीMarch 04, 2020 11:54 am

    खूप छान लिहिले आहे अक्का
    मी तर खुप वर्ष झाली खावून त्यामुळे वाचल्यावर तोंडाला पाणी सुटले आणि खाण्याची इच्छा झाली

    ReplyDelete
    Replies
    1. सगळ्यांच्याच तोंडाला सारखे पाणी सुटते आहे , आता इथे ब्लॉग  पाण्याचा पाटच वाहायला सुरुवात होईल 😛😆

      Delete
  16. भूमिका चौधरीMarch 04, 2020 12:05 pm

    Mast g
    Ekadshi chya padarthanchi aathvan karun dilis
    Boroni khaun tr khup varsh zale

    ReplyDelete
    Replies
    1. हे लिहिता लिहिता मला तर बऱ्याचदा वाटते समोरचे सगळे सोडावे आणि सगळ्यांनी काही  दिवस तरी परत तसेच एकत्र राहावे आणि हे सगळे परत अनुभवावे 😇

      Delete
  17. मंदा चौधरीMarch 04, 2020 12:07 pm

    हे सगळे वाचून खुप गंमत वाटली आणि सगळे आठवले खूपच मस्त

    ReplyDelete
    Replies
    1. खरंच गम्मत तर वाटतेच हे सगळे आठवून , आणि परत अनुभवावेसे वाटते😍🤩

      Delete
  18. एल झेड कोल्हेMarch 11, 2020 6:44 pm

    ��उपवासाला शेंगा व बोरोलीच वर्णन छान तुमची खायची धडपड छान ��

    ReplyDelete
  19. हा लेख length अणि effect wise perfect झाला आहे. ह्या लेखात पण बरेच points include केले आहेत पण compact लिखाणामुळे तो जास्त effective झाला आहे. लेखाचा खरा नायक बेंच आहे पण त्याच्या अनुषंगाने तू वेगवेगळ्या प्रसंगांची गुंफण केली आहेस.
    वाफवलेल्या आणी खारवलेल्या शेंगांची नुसती आठवण झाली तरी तोंडाला पाणी सुटते. तुम्ही ती खायची Majja सोडून नुसते जोड दाणे शोधत बसायचे म्हणजे कमाल आहे. ह्या शेंगा खाताना टरफलं फेकायचा मोठा इश्यू असतो, पण तुमच्या बेंच च्या position मुळे तुम्ही तो प्रॉब्लेम easily solve केला होता 😜😜.
    Bench chi position इतकी strategically छान होती की तुम्ही त्यावर खूप गोष्टी एन्जॉय केल्या असतिल. बोरोणी ही स्पेशल खानदेशी गम्मत पहिल्यांदाच कळली.
    एकंदरीत bench किंवा टेहळणी बुरुज छान जमला आहे..... 👌👌👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. अरे जोड दाणे शोधण्यात  मज्जा आहे  ती  त्या वयात , हे फक्त ज्यांनी अनुभवले आहे त्यांनाच माहिती . now  dont have that chance even , so leave it , as there is no option 😉😆 बरेच किस्से आहेत उकडलेल्या शेंगांचे , आशा करते तुम्ही विसरला नसाल . आणि टरफलांबद्दल तर न बोललेलेच बरे 🤣😂
      खरंच बाक म्हणजे अगदी हिरो किंवा छान सखाच होता म्हणा ना ! 😍🤩
      असो मंडळ आपले आभारी आहे या संवादाबद्दल 😇🙏!

      Delete
  20. Wa boroni v ukadlela shenga khup chan lagtat v varan pan mast vachun todala pani sutale
    Tumache lahanpanichya god v sunder aathavani aahet vachun changle vatate

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺

      Delete
  21. अगदी खर आहे. एकादशी अणि दुप्पट खाशी असाच काहीतरी हा प्रकार ���� महाशिवरात्री म्हणजे खाऊ chi पर्वणीच. खूप छान boroni mule तोंडाला पाणीच आल राव ����

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...