आईस क्रीम पार्टी
(गच्चीवरील गमती जमती)
हल्ली आईसक्रीम म्हणजे घरात कायमच असतेच , फ्रीझ घरात असल्याने . पण चौधरी सदन मध्ये राहात असतांना घरात फ्रीझ नव्हते . त्यामुळे ही आईसक्रीम पार्टी खूपच खास असे ! अगदी मला आठवते आणि समजते तेंव्हापासून आमच्याकडे ही आईसक्रीम पार्टी उन्हाळ्यात एकदा हमखास होतेच होते !
ही पार्टी म्हणजे सुद्धा एक मोठ्ठा सोहळाच असे . जवळ जवळ दिवसभर लगबग आणि तयारी चालू असे . बऱ्याच गोष्टींची तयारी करावी लागे यासाठी . सगळ्यात महत्वाचा म्हणजे आईस क्रिम पॉट . हा भाड्याने मिळत असे . आमचा नेमका दिवस ठरला , की त्याच्या आदल्या दिवशी जाऊन , काही पैसे देऊन , आगाऊ राखून ठेवावा लागे . या पार्टीचा दिवस सुद्धा ठरलेला होता . तो म्हणजे आमच्या पिटूचा वाढदिवस . पण त्याच्या नक्की कितव्या वाढदिवसापासून ही प्रथा चालू झाली हे मात्र नीट आठवत नाही मला . पण अगदी आत्ता आत्ता पर्यंत , म्हणजे त्याला मुलगा होईपर्यंत , हा दिवस अगदी नक्कीचा ठरलेला होता .
मग सकाळीच दूध घेऊन यावे लागे . हे काही थोडे थोडके नसे . कमीतकमी पंधरा ते वीस लिटर ! मग हे दूध तापवणे आणि थोडे आटवणे . त्यात साखर आणि खवा घालून , ते गार होण्यासाठी ठेवून दिले जाई . मग दुपारून आईस क्रीम पॉट घेऊन यावा लागे . तो चांगला घासून धुवून ठेवला जात असे आणि त्याच्या बाहेरच्या लाकडी पिंपात पाणी भरून ठेवले जाई , ते कुठे कुठे गळके आहे हे बघण्यासाठी . संध्याकाळी बर्फ सुद्धा आणून ठेवला जाई , तो ही जवळ जवळ वीस-पंचवीस किलो . हा वेगाने वितळून जाऊ नये म्हणून तरटात गुंडाळून ठेवला जात असे . आणि आणून बाथरूम मध्ये ठेवला जाई . कारण हीच जागा त्यातल्या त्यात थंड जागा आणि दुसरे म्हणजे बर्फ वितळून होणाऱ्या पाण्याचा आपोआप निचरा होऊन जात असे . एक महत्वाची गोष्ट म्हणजे खडी मीठ . हे आधीच आणून ठेवलेले असे . घरात सैपाकाला सुद्धा खडे मीठच वापरले जाई , पण हे एकदम पांढरे शुभ्र असे . आईसक्रीम साठी वापरले जाणारे मीठ मात्र काळपट असे , अशी ही या सगळ्या सामुग्रीची जुळवाजुळव चालू असे दिवसभर .
या दिवशी संध्याकाळी आम्ही मुलं जेवतच नसू . मोठे लोकही थोडी थोडी मुगाची खिचडी खात असत फक्त आणि मग पोटभर आईस क्रीम ! नुसते आईस क्रीम ! आणि फक्त आईस क्रीम !!! आणि मग सगळी पुरुष मंडळी घरी आली , त्यांची जेवणं झाली , की तोपर्यंत थोडा अंधारही पडलेला असे आणि वातावरणातील उष्णताही कमी झालेली असे . मग एक एक करत सगळे सामान गच्चीवर आणले जाई , बर्फ सोडून . अगदी आईसक्रीम पॉट पासून ते खाण्यासाठी लागणारे चमचे वाट्यांपर्यंत सगळे . आईसक्रीम खाण्यासाठी खास असलेले वाडगे फक्त चार किंवा सहाच होते . ते घरातील सगळ्यात लहान मुलांना मिळतं . एक लहान खाणारे भावंडं वाढले की मोठ्या भावंडांची संधी हुकत असे या वाडग्यामध्ये खायची . खास सपाट चमचे सुद्धा होते , आईस क्रीम खाण्यासाठी . हे सगळे फक्त ह्याच दिवशी वापरात निघत असत . बाकीचे तीनशे चौसष्ट दिवस सैपाक घरातील शोकेसची शोभा वाढवत असत . आता अगदी आम्हा प्रत्येकाच्या घरी कित्येक डझनानी वाडगी आणि चमचे असतील पण त्यातील कित्येक , वर्षानुवर्षे वापरलेही जात नसतील . ......
मग गच्चीवर आईसक्रीम पॉट ची जुळवाजुळव सुरु होत असे . सगळ्यात किचकट आणि मनावर ताण हे आणणारे काम . कारण हे नाहीच झाले , तर पुढे काहीच शक्य नसे . मग जुळवाजुळव नीट झाली की नाही हे बघण्यासाठी , तो आधी रिकामाच फिरवून बघावा लागे . तो सहज पणे फिरायला हवा . त्यानंतर एकदा का खात्री पटली , की मग त्याचे झाकण उघडून आतल्या धातूच्या भांड्यात दूध घातले जाई . मग नीट बंद करून पुन्हा फिरवून पहिला जात असे . सगळे सुरळीत झाल्यावर मग खालून कुणीतरी मोठ्या मंडळी पैकी बर्फ फोडून देत असत त्या बर्फाच्या लादीतून आणि मग आम्ही मुलं तो एका भांड्यात घालून वर आणत असू . हे भांडं वर आणण्याच काम आम्हा सगळ्यांनाच आवडे . त्याच कारण म्हणजे आम्हाला बर्फ खायला फार आवडे ! मग वर आणता आणता भांड्यातील एकदा छोटासा तुकडा पटकन मटकावता येत असे .
मग हे वर आणलेले बर्फाचे तुकडे धातूच्या आणि लाकडी पिंपाच्या फटीत टाकले जात आणि मध्ये-मध्ये मिठाचे थर . अगदी वरपर्यंत भरले जाई . या लाकडी पिंपाला जे एक भोक असे , ते कापडी चिंधीने किंवा वर्तमानपत्राच्या कागदाच्या घड्या घालून , त्याने बंद केले जात असे . बर्फ वितळून त्याचे झालेले पाणी वाहून जाऊ नये म्हणून केलेली ही योजना . तेंव्हा मग कुठे प्रत्यक्ष आईसक्रीम तयार करण्याची क्रिया सुरु होत असे . ह्याला असलेली एक मूठ धरून फिरवायला सुरु करावे लागे , म्हणजे मग ते धातूचे भांडे आणि त्याच्या आत असलेला पंखा दोन्ही फिरत असतं . हे फिरवण्याचे काम आम्हा मुलांना फार आवडत असे . पण बऱ्याच वेळा या पॉट मध्ये काही ना काही गडबड असे आणि तो नीट फिरतच नसे . मग कोणातरी मोठया व्यक्तीला त्यावर दाब द्यावा लागे , तेंव्हा तो नीट फिरत असे . कधी कधी जर फारच वाईट अवस्था असेल , तर चक्क घरातील एखाद्या सगळ्यात लहान मुलाला त्यावर उभे करण्याची वेळ येत असे , तेव्हा कुठे तो सुरळीत पणे फिरत असे . लहान असल्याने त्या मुलाला स्वतःचा तोल सांभाळता येत नसे , त्याला कुणालातरी आधार द्यावा लागे आणि ही सगळी कसरत आईसक्रीम पूर्ण तयार होईपर्यंत चालत असे ! बर जो फिरवत असे , त्याचे कितीही हात दुखून आले तरी तो तसे मान्यच करीत नसे . पण प्रत्येकाला संधी मिळावी आणि आमच्यात भांडण होऊ नये म्हणून मग कोणीतरी मोठी व्यक्ती निर्णय घेऊन एकाला बाजूला करून दुसऱ्याला संधी देत असे .
सुरवातीला हे सगळे फार सोप्पे जात असे फिरवायला . पण हळूहळू जसजसे आतील दूध गोठायला लागे , तसतसे हे फिरवायला थोडे थोडे कठीण होत जात असे आणि जास्त शक्ती लावावी लागत असे . खूप त्रास पडत असे , पण आनंदही तितकाच होत असे . कारण आईस क्रीम लवकरच तयार होणार याची ती पक्की खुण असे ! हे सगळे चालू असताना एक फार महत्वाची बाब , ती म्हणजे बर्फ वितळून त्याचे पाणी होत असे . मग ह्या पाण्याच्या पातळीकडे नीट लक्ष द्यावे लागे . आतल्या धातूच्या भांड्याच्या झाकणाच्या जवळपास येत कामा नये . मग ही पातळी कमी करण्याकरिता लाकडी पिंपाला असलेले चिंध्या लावून बंद केलेले भोक थोडा वेळ उघडायचे आणि थोडे पाणी वाहून जाऊ द्यायचे . हे पाणी सोडतांना सुद्धा ते आमच्या बसण्याच्या जागी येणार नाही याची काळजी घ्यावी लागे, अन्यथा बसण्यासाठी अंथरलेल्या सतरंज्या ओल्या होणार आणि पाण्याची पातळी वाढली की ते पाणी धातूच्या भांड्यात जाऊन सगळा आईस क्रीम खारट होण्याची शक्यता असे . फारच वाईट लागते मग ते आईसक्रीम .
शेवटी हे फिरवणे इतके कठीण होऊन बसे , की आम्हा मुलांना ते फिरवणे शक्यच होत नसे . मग घरातील पुरुष मंडळी शेवटचे फिरवून आईसक्रीम तयार करत असत . मग एकदा का आईसक्रीम तयार झाला की कधी एकदा वाडगा हातात मिळतो आणि कधी एकदा तो आईस क्रीम तोंडात आणि पोटात टाकतो असे होऊन जाई . आधी साहजिकच मुलांचा नंबर लागे . लहान म्हणून , लवकर झोपी जाणार म्हणून आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आम्ही संध्याकाळी जेवलेलो नसल्याने प्रचंड भूक सुद्धा लागलेली असे ! मग काय एकदा का खाणे सुरु झाले की एकावर एक वाडगी खाऊन रिकामी होत असत . स्पर्धाच असे जणू कुणाचे आधी रिकामे होते आणि कोण सगळ्यात जास्त खाते याची . त्यात आम्ही कुणी थकलेले दिसले खावूनखाऊन , की मोठे लोक चिडवत , अरे काय इतक्यात थकली , घे अजून एक वाडगे ! असे करत करत अगदी पोट तुडुंब भरल्यावर सुद्धा थकले नाहीये हे दाखवायला अजून जास्तीचे खाल्ले जाई . अगदी थोडा वेळातच ते दहा लिटरचे आईसक्रीम फस्त होत असे . आता वाटते लहानपणी किती किलो आईसक्रीम खाल्लेय तो एक देवच जाणे !
मग दुसरा घाणा आईसक्रीमचा . या वेळी लाकडी पिंपातील शिल्लक राहिलेला बर्फ आणि पाणी काढून घ्यावे लागे आणि मग आतले धातूचे भांडे नीट बसवावे लागे जागच्या जागी . परत सगळी क्रिया क्रमाक्रमाने सुरु होत असे . पण तो पर्यंत आम्ही सगळी मुलं जाम थकलेली असू , पॉट फिरवून फिरवून आणि अतिरेकी प्रमाणात आईस क्रीम खाऊन !आम्ही बऱ्याचदा गच्चीवरच सतरंजी वर पेंगून झोपून जात असू . आई-बाबा (आजी-आजोबा) मात्र सहसा गच्चीवर येत नसत . आईसक्रीम तयार झाले की त्यांना पुरेल असे आईस क्रीम एका मोठ्या वाडग्यात घालून खाली घरात पोहोचते होत असे .
मग दुसऱ्यांदा आईसक्रीम तयार झाले की मम्मी आणि पप्पा लोक जरा निवांतपणे खाऊ शकत असत . कारण तो पर्यन्त आम्हा मुलांची जिथे तिथे लुडबुड कमी झालेली असायची . हे तयार झालेलं आईसक्रीम काढून वाढण्याचे काम पप्पांचे ( दोन नंबरचे काका ) करत . या आईसक्रीमची पण एक मजा असते . वरचे आईस क्रीम फारसे घट्ट नसते . मात्र जसजसे खाली खाली जावे तसतसे एकदम घट्ट असते आणि हेच फार भारी लागते . खरी मजा हे आईस क्रीम खाण्यातच असते ! पण आम्हाला कायम खायची घाई , त्यामुळे सहसा वरचेच आईसक्रीम खात असू आम्ही . पण दुसरे संपत येईपर्यंत परत खाण्याची इच्छा झाली , किंवा झोपेतून जाग आली , तर मात्र हे थोडे खात असू .
मग सगळे खाऊन संपले आणि आम्ही जागे असलो किंवा थोडी थोडी झोप काढून जागी झालेल्या असू तर मग आमचा एक वेगळाच खेळ चाले थोडा वेळ . या लाकडी पिंपात काही बर्फाचे तुकडे आणि पाणी शिल्लक असे . पण सगळे खूप खारट ! बर्फ खाण्याच्या लायकीचा नसे . तो फेकून देणे इतकाच पर्याय असे . किंवा क्वचित आईस क्रीम शिल्लक राहिला तर तो रात्र भर ह्या उरलेल्या बर्फात आणि थंड पाण्यात ठेवावा लागे फ्रीझ नसल्यामुळे . मग आम्ही गुपचूप या बर्फाचे छोटे छोटे तुकडे घेऊन कुणाच्यातरी पाठीमागे जाऊन त्याच्या कपड्यात टाकत असू आणि एकदम पाठीला थंड चटका बसुन ती व्यक्ती जोरात दचकत असे आणि मग आम्ही खदाखदा हसायचो ! मग बर्फाचा तुकडा टाकण्यासाठी एकमेकांच्या पाठीमागे धावत सुटायचो . मग काही वेळ हाच धमाल खेळ चालत असे ........
आनंदी पाऊस
गच्चीवरील गमती जमाती
१५ जुलै २०१९
Ahaha !!!
ReplyDeleteTondala pani sutale
खरंय ! लगेच सगळ्यांनी जमून आईस्क्रीम पार्टी करावीशी वाटतेय !!!🍦🍧🍨🍨🍧🍦🍦🍨🍨🍨🍨🍨🍨🍨
Deleteलेख वाचून तोंडाला पाणी सुटले आणि खाण्याची इच्छा झाली
Delete😀😁😍❤️👍👍
Deleteमस्तच आईस्क्रीम...😋😋😋 आता आईस्क्रीमचीच पार्टी द्या!!! 👍👍👌👌🤣🤣
ReplyDeleteयेस्स्स !!! आपल्याकडे आईस्क्रीम पॉट आईस्क्रीम सहित मिळते ! तू गच्चीची चावी आणि परवानगी काढून ठेव , लगेच जंगी पार्टी करू या !!!
DeleteThanda Thanda kool look
ReplyDeleteवावा ! क्या बात है !!! आपण कोण कळेल का? 🍨🍨😇😇
Deleteछान वर्षा ताई. संयुक्त कुटुंबात अश्या ice-cream ची मज्जा काही वेगळी च असते...
ReplyDeleteविलास किनगे
हो ! हे तितकेच खरे आहे !!!!💖💃😍
Deleteफार छान वाटते विलास तू इथे अगदी नियमित भेटतोस !!!😇😍
Khup chan ...nostalgic zhale mi 👌👌♥️♥️
Deleteमनःपूर्वक धन्यवाद🙏 ! नाव नाहीये त्यामुळे कुणाचा अभिप्राय आहे कळत नाहीये ! नाव कळेल का?🤔
Delete😋tonadalater panich sutale
ReplyDeleteTey icecream potmadhale chanch
Malapan pan aamacha gavakadil gachivaril party athavali pan mi bharpur Sare barik barik ghoshti mi visarale hote pan Tu agadi mudesud mandale👌
तू माझ्या कौतुक करण्याचा एकही चान्स सोडत नाहीस💖💖💖 ! देवाचे मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏🙏🙏
Deletealways be there for me !!!😇😇
खूप छान gg वर्षा किती अगदी बारीक सारीक तपशील आठवतो तुला.. मस्त जमलीय ice-cream पार्टी.. 😍
ReplyDeleteमनीषा तुझ्या शिवाय सुद्धा ही आईस क्रीम पार्टी अपूर्ण होती💃💃💃 ! मनःपूर्वक धन्यवाद !!! 🙏🙏🙏
DeleteWow, u took me to those days. ..
ReplyDeleteWe too had such icecream parties.
But I am thinking to have such party again. .Can we get such pots now?
💃💃💃 i think nilesh have one ! u can ask him . in thane u get ice cream pot ice cream ! dont have much information about pune . 😍😇
Deleteसध्या बाहेरगावी असल्याने आपला लेख निवांतपणे वाचता आला.. लेख खूप चांगला जमला आहे. सगळा तपशील चोख आहे. हा नुसता आईस्क्रीम सेवन विधी नव्हता तर तो एक सांस्कृतिक - कौटुंबिक मालिकेचा live स्पेशियल एपिसोड असायचा ! छानच !!
ReplyDelete*** मकरंद करंदीकर.
sir feeling so proud n happy😇😍 !!! m very very happy to see u here !! बऱ्याच दिवसांची वाट बघत होते तुमच्या अभिप्रायाची माझ्या या ब्लॉग वर ! आज खूप खूप भारी वाटतंय💃💃💃 ! चौधरी सदनात आपले अगदी मनःपूर्वक स्वागत आहे कायमच !!! खूप खूप धन्यवाद !🙏🙏🙏
Deletewa khup sunder lihile aahe agadi samor ice-cream bante aahe v te kadhi khaylaa milel ase vatate ������
ReplyDeleteचौधरी सदनात अगदी मनःपूर्वक स्वागत आहे मामी तुझे😍😇 ! आणि खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏
Deleteआता फ्रिजमधिल आइसक्रीम खायला एवढी गम्मत येत नाही न खरोखरच खुप धमाल केली आधी
ReplyDeleteखरंय ग अगदी ! त्या आईस क्रीम ची मज्जाच काही और होती , त्याची सर कशालाच नाही ! धमाल म्हणजे जामच धम्माल केलीय आपण !!!😇😍💃💖
Deleteमी पण ही अनुभवलय आत्याकडे एक गोष्ट आठवतेय.....समजा एखाद्याला बरे वाटत नसेल /सर्दी झाली असेल तर आत्यकडे त्यावर रामबाण उपाय होता.
ReplyDeleteअसा जो कोणी असेल त्याच्या ��वर आत्या तुळशीचे बी टाकत असे...म्हणजे ��तसा ऊष्ण &तुळशी चे बी थंड.....म्हणजे काही त्रास होत नसे.....पण ��सगळ्यांनी खाल्लच पाहिजे असा सगळ्यांचा अट्टाहास असे.....हो की नाही आत्या....
������������������������....................तुळशीचे बी पण दिलाय बिनधास्त खा
.
अरे खरंच की ! हे गोष्ट तर मी विसरूनच गेले होते🤦♀️ ! मनःपूर्वक धन्यवाद या आठवणी बद्दल🙏 ! आता खरी आईस पार्टी पूर्ण झाली !🍨🍨🍨🍨💃💃
DeleteKhup chan varnan kela aahe, ice cream pot cha ice cream best hota, i really miss it.
ReplyDeleteNikhil Mahajan
मनःपूर्वक धन्यवाद ! 😍😇💖
DeleteAll micro level details captured very nicely.
ReplyDeleteWe also use to have icecream party the same way with rented pot.
You hsve taken us in the past smoothly to remember those sweet memories.
Thanks.
अनिल , चौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत आहे तुझे🙏🙏 ! छान वाटले तुला इकडे बघून , सगळ्या जुन्या आठवणी , ती मस्ती आठवली चौधरी सदनात केलेली !😇😇💃💃
DeleteIce cream party khup mast. Aamchya gharihi ashi party hot ase mala aathavtay. Lekh vachun punha lahanpan aathvale. Lahanpan dega deva mukhi ice cream cha gola.
ReplyDeleteVery good A. P. ��������
फारच छान वाटले तुम्हाला इकडे बघून😇😇 ! चौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत तुमचे 😍💖! आणि मनःपूर्वक धन्यवाद !!🙏🙏🙏
Deleteमला ते दिवस आठवले pot फिरवण्यासाठी आपण सगळे लाइन लाऊन उभे असल्याचे आठवले, ती धमाल आठवली, & आता परत अशी धमाल करावी असे वाटते आहे.
ReplyDeleteअक्का सगळ्या मुलांना घेऊन ही धमाल करूया आपण परत म्हणजे त्यांना पण अनुभवायला मिळतील हे दिवस!!!
अगदी खरंय ग😍💖 ! आता खरंच ठरवून मुलांना सोबत घेऊन अशी पार्टी करायला हवी जाम धम्माल येईल 💃💃💃💃🍨🍨🍨🍨!!!
DeleteSo much fun you guys had....������
ReplyDelete😍💃💃💃😇
DeleteHello Varsha read your live & detailed write-up on family ice-cream party on terrace. Extremely minute detailing makes the whole process as live as if taking place in front of you ! Highly Commendable !!
ReplyDeleteनमस्कार मामा😊 ! या चौधरी सदनात तुमचे मनःपूर्वक स्वागत ! आणि कौतुकाबद्दल खूप खूप धन्यवाद !🙏😍😇
Deleteवाचल्यावर पाँट मधील आईस्क्रीम पारटी ची आठवण झाली खूप छान वाटले.������
ReplyDeleteचौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत आहे तुझे😊 ! आणि मनःपूर्वक धन्यवाद !!🙏
DeleteWa !! त्या आइस्क्रीम ची चव च न्यारी असणार....!!! ती लगबग, ती आइस्क्रीम खाण्याची घाई,त्याची तयारी....सर्वच वर्णन अतिशय सुरेख. चालू दे...आता पुढील लेखात नवीन पदार्थ? आम्ही आपले ओठावरून जीभ फिरणार बिचारे !
ReplyDeleteहा हा हा 😃😄😆! मकरंद आता तर जास्तच मज्जा येणार आईस क्रीम पार्टी ला😉😉😎 !!! हनी मावा आईस क्रीम !!!!😋😋😋🤤🤤🤤💃💃💃
DeleteVershali ice creame party lekh khoop sunder vernan zale sahaj sopi bhasha lekh wachta wachta te chitra doliya samor ubhe rahate ani tuza ice creame manala thandava deun gela mast
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !!🙏
Deleteआईसक्रिम पॉट वर मेहनत करून नंतर ते खायला जास्त मजा यायची :)
ReplyDeleteअगदी खरंय अमित !!😊😃
Deleteकिती मजा येते आईस्क्रीम पारटिचि आम्ही डबा आईस्क्रीम पारटि करतो अजून सुद्धा
ReplyDelete🥰😋😍
Deleteथंडीत थंडगार लेख वाचून थंडच झालाे.आॅईसक्रिमसाठी एवढा खटाटाेप,पळापळ,क्वचितच ! तुम्हीखरा आनंद लुटलास... लेखन सुंदर����
ReplyDeleteखरंच वेळच चुकली तुमची आईसक्रिम पार्टीला यायची , पण थंडीत किंवा पाऊस पडतांना आईस्क्रिम खायची मजा काही औरच असते 😍💃🤤! फक्त तब्बेतीला झेपले पाहिजे . खूप सारे धन्यवाद !!🙏😇
Deleteखुप खुप छान
ReplyDeleteमाझ्या तोंडाला पाणी आले वाचुन
यासाठीच हा सगळा प्रपंच ! तोंडाला पाणी सुटले म्हणजेच लेख चांगलाच जमलाय , धन्यवाद या छानशा पावतीची !
Deleteखूप छान लिहिले आहेस. एकदम ओघवती शैली आहे. अगदी रमून जातो.
ReplyDeleteमला पण आमच्या घरातील आईस्क्रीम पार्टी ची आठवण झाली.
खूप खूप मनापासून धन्यवाद🙏 ! फारच छान वाटतंय तुम्ही इथे मुळे 😍🤩! या लिखाणाचा मुख्य उद्देश हाच वाचतांना , वाचकाच्या चेहऱ्यावर आनंदाची लकीर उमटावी !!
Deleteआज तुझे सर्व लेख वाचलेत (बायको कृपा ती शॉपिंग करते आहे)
ReplyDeleteआइस्क्रीम ची गम्मत मुलांना कळावी म्हणून पॉट विकत घेतला मागच्या वर्षी व 3 महिने दर शनिवारी 3/4 कुटुंब जमा करून हीच धमाल उडवून दिली सर्वजण विचारतात दादा आइस्क्रीम परत कधी 😋😅😀
अरे वावा मस्तच रे ! आता मला पण बोलावं एकदा या आईस क्रिम पार्टी ला , i will just love it !!!🤩😍🙏
Deleteमनःपूर्वक धन्यवाद !
कधी येतेस सांग फक्त करू लगेच पार्टी सध्या तर तुझा भाचा पण एक्स्पर्ट झालाय
Deleteवावा मस्तच!
Deleteटाळे बंदी संपली की लगेचच येते, मग करू या party !! 😁🎉🍦🍧🍨🍦🍧🍨
थांडी मधे, थाण्ड गर लेख वाचून हुड हुडी भरली
ReplyDelete😊😉😃😄
DeleteWah!
ReplyDeleteपु ल देशपांडे म्हणतात तशी "काही आधाशी आणि आगाऊ कार्टी पॉट पंख्याची पाती पण चाटून पुसून स्वच्छ करीत" असे नव्हते वाटते कोणी चौधरी सदनात.
सगळ्यात आधी या चौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत! तुमचे 😁 ती सगळी आगाऊ कार्टी म्हणजे आम्हीच. पण आम्ही जरा लहानच, त्यामुळे पाहिल्या pot मधेच धारातीर्थी पडत होतो. दुसरा pot होवून तो संपेपर्यंत आम्ही स्वप्नांच्या दुनियेत...
Deleteत्यामुळे हे सगळे घरातील मोठी मंडळीच करत!
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
Ase vatat aahe ki aappan chaudhari sandan la ice-cream khat aahot todal la Pani sutale
ReplyDeleteखूप सारे सप्रेम धन्यवाद 😍 😇
Delete����मस्तच आमच्या कडे नागपूर ला असा पॉट भाड्याने मिळत नसे पण माझे वडिलांना भारी हौस त्यामुळे त्यांनी तो पुण्याहून विकतच घेतला होता पण पूर्वी चा काळ हा वेगळा होता त्याच्या ठरलेल्या वेळा असत आज सारखे केव्हाही उठ सूट काही केले जात नसे व त्यामुळे पण आपल्याला त्याचे अप्रूप होते माझे कडे तो पॉट आहे एकदा गडबडीत आतील पंखा च आत ठेवायचा राहून गेला आम्ही फिरवतोय फिरवतोय ��का होत नाही मग माझा मुलगा ओरडत आला हे काय पंखा नाही घालायचा का? आम्ही पण गच्चीवर रच करतो ती मजा वेगळीच पण आजकाल पूर्वी सारखे नाही कधी पण करतो त्यामुळे त्याच अप्रूप गोडी तेव्हढी नसते असे मला जाणवते
ReplyDeleteतुझ्या लेखा मुळे मागची आठवण आली लेख मस्त झाला आहे
बर्फ दूध पण आजकाल सारख सहज मिळत नसे
आईकडे तर ते दूध चुलीवरआटवत
खरंय ठराविक वेळ ठराविक गोष्टी, त्यामुळे अप्रुप....
Deleteतयार करताना खुप मजेशीर गडबडी होत😁😂
खुप सारे धन्यवाद 😍
मस्त आठवण आहे varshali. माझ्या लहानपणीच्या पण थोड्या फार फरकाने exactly ह्याच आठवणी आहेत. पण तुझ्या सारखं writing skill आणि sharp memory नसल्यामुळे लिहिलं जात नाही. Anyway thanks for penning your memories, तुझ्या मुळे आम्हाला पण आमच्या आठवणीत डुंबता येतं...... 👍👍👍👍👍
ReplyDeleteया निमित्ताने का होईना तुम्हाला तुमच्या बालपणीच्या आठवणी काही काळ तरी रमता येते अणि तो आनंद लुटता येतो, यातच सगळे आले!
Deleteसप्रेम धन्यवाद 😍 😇
वा.. खूपच छान वर्णन केलंय..आधी आम्ही पण करायचो सगळे जमल्यावर,पण आता सगळे जास्त जमतच नाहीत .आता आम्ही मैत्रिणी मिळून करतो त्यातही खूप धमाल येते.
ReplyDeleteनाव नसल्याने कुणाचा अभिप्राय आहे ते कळत नाही, पण मैत्रिणीं सोबत तर अजूनच धमालच येत असेल!!
Deleteधन्यवाद 🙏 ☺
Aahaha
ReplyDeletePot cha ice cream mhanje swarg sukh. Khup varsh zali khayla bhetla nahiye pan chav matra aathvtey.
हो ना 😔..... कधी मिळेल ते पण सांगता येत नाही, त्यातच ही टाळेबंदी....
Deleteमस्त आईस क्रीम पार्टी
ReplyDeleteमस्त लेख
मज्जा आली वाचतांना
काकू खूप खूप सप्रेम धन्यावाद 🙏 😊😇
DeleteWoww Ice cream party ..… .😋😋
ReplyDeleteNow I can't offer u ice-cream 🍦 ....
DeleteSo tons of love 😍
Khupach chhan...kityek varshat khalle nhiye aata he ice-cream...thnx for remembering
ReplyDeleteहो ना, आता हे सगळे भूतकाळात जमा झाले. पण फार मिस करते मी हे सगळं
DeleteIce cream पार्टीचा लेख खरतर मागेच वाचला होता आणि अभिप्राय ही नोंदवला होता. पण ह्या रखरखित उन्हाळ्यात परत आइस्क्रीमची आठवण मनाला आल्हाददायक थंडावा देऊन गेली. ����������
ReplyDeleteवावा मस्तच 💃💃खूप सारे धन्यवाद 😍
DeleteWa garegar lekh v sunder ice-cream party mast��������
ReplyDeleteTuza lekh vachun yevhdhi khaychi echha zali ki mi mango ice-cream v kulffi banvili v tula pan pathavili aahe ��
एकदम भारी 😊, फारच छान वाटतेय हे वाचून तर !! ❤
DeleteDil icecream icecream हो gaya... mast lihilay... Kadhi ekada icecream party karu asa watatay
ReplyDeleteYessss दिल आईस क्रीम आईस्क्रीम हो गया...
ReplyDelete😃
अक्का आमची पण आईस्क्रीम पार्टि व्हायची पण आम्हाला गच्ची नव्हती बाहेर अंगणात च पार्टि व्हायची तुझ्या वरिल लेखा मुळे आज ती आठवण ताजी झाली
ReplyDeleteवावा! अंगणात तर अजुनच मज्जा! पण नाव नाही, त्यामुळे कोण आहे ते नाही समजले.
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
खूप छान.no words
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
Deleteआम्ही पण अनुभवलेली आहे. त्यावेळची मजा काही औरच हेाती. अर्थात प्रत्येक पिढीच्या गंमतीजमती त्या त्या नुसार वेगवेगळ्याच असणार.
ReplyDeleteजुन्या काही गोष्टी नाहीत त्याचे दुःख करत न बसता पुढील पिढीच्या आनंदात सहभागी होणे ही सुद्धा एक खूप मोठी सकारात्मक गोष्ट आहे!
Deleteखूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!
पोट भरून आईस्क्रीम ओसांडण्याचि वेळ आल्या शिवाय पाँट पासून दूर व्हायचे नाही असा जणू अलिखित नियम होता.व सगळ घरातिल मेंबरांचा आनंद आओसांडून जात होता. आतापर्यंत हा सिरस्ता चालूहोता.आणि त्याचि आठवणपण येत असते
ReplyDeleteफार छान होते हे सगळेच लिखित नियम अणि शिरस्ता!,
Deleteत्या आनंदाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही!
We all are blessed souls to experience that happiness!
आमच्यापण आठवणी ताज्या झाल्या.आम्ही ३-४ मित्र
ReplyDeleteकुटुंबासोबत असा आईस्क्रीम बनवायचा खुप वेळा प्रयत्न करायचो.पण ब-याचदा आईस् क्रीम घट्टच होत नसे.तेंव्हा ते थंड दुधच पिऊन टाकत.😂😂😂😂
ही वेगळीच मजा!! काही वेळा असे होत असे किंवा खूप वेळ फिरवावा लागे
Deleteआनंदी धन्यवाद!
😋😋🤡🤡
Deleteवा छान फ्रिज मधल्या आईस्क्रीम पेक्षा याची मजा काही औरच असते आम्ही तर डालडाचा डबा बर्फामध्ये फिरवून आईस्क्रीम तयार करायचो हे आईस्क्रीम खायला खूप मजा यायची असे वर्णने वाचायला पण मज्जा येते चालू ठेव आनंद वाटला
ReplyDeleteखूप छान वर्षा.अप्रतिम ice cream चे वर्णन.लहानपणीचे दिवस आठवले.चौधरी सदन मधील ice cream बनविण्यासाठी सगळ्यांनी घेतलेले श्रम आणि त्यावरती यथेच्छ ताव मारताना होणारा आनंद ,खूपच छान वर्णन केले आहेस.अशा प्रकारे ice cream बनविण्याचा मी केलेला आणि थोड्या प्रमाणात फसलेला प्रयोग आठवला.
ReplyDeleteफक्त आम्ही छोट्या भांड्यात करायचो आणि हातांनी फिरवायचे. मेहनत घ्यावी लागे आणि कधी कधी थंड मिल्कशेक वर भागवावे लागत असे 😄
ReplyDeleteआता हा गारेगार लेख वाचून...ice cream खाल्ल्याशिवाय राहवत नाही..आता pot 🍯 icecream party तुम्ही द्या....
ReplyDeleteMilky icecream recipe aani.paryichi majja bharich वर्णिलेआहे...त्यातला हा गोड आनंद अशा गर्मीतही थंडावा देतोय...इकडे सोलापूरातपण लहानपणी सोलापूर इडलीगृह आणि दत्त कोल्ड्रिंक्स मध्ये pot 🍯 icecream मिळत ase....Luv...घनगोलशितगट्टू- संजिता
आता हा गारेगार लेख वाचून...ice cream खाल्ल्याशिवाय राहवत नाही..आता pot 🍯 icecream party तुम्ही द्या....
ReplyDeleteMilky icecream recipe aani.paryichi majja bharich वर्णिलेआहे...त्यातला हा गोड आनंद अशा गर्मीतही थंडावा देतोय...इकडे सोलापूरातपण लहानपणी सोलापूर इडलीगृह आणि दत्त कोल्ड्रिंक्स मध्ये pot 🍯 icecream मिळत ase....Luv...घनगोलशितगट्टू- संजिता
Akdam mast ice cream 🍦🍧😋😋 mouth watering
ReplyDelete