वर शीर्षकात सप्ताह म्हटलंय खरं , पण हा सोहळा जवळ जवळ आठ-दहा दिवस चाले , चौधरी सदनाच्या गच्चीवर ! तर बिबडे म्हणजे एक खास प्रकारचे ज्वारीचे पापड . हे खास करून खान्देशातच केले जातात आणि विदर्भातही काही भागात केले जातात हे अलीकडेच कळले मला . चवीला एकदम भारी ! पण करायला अतिशय कष्टाचे ! आणि खूप कौशल्याची गरज असते ! करतांना खूप खबरदारी घ्यावी लागते . जरा कुठे चुकले , की चुकतच जाते आणि मग सहसा ते दुरुस्त करता येत नाहीत . तर या बिबडे सप्ताहाच्या गमती जमती सांगणार आहे मी आज . ह्या पापडांचे शिजवण्यापासून ते पापड वाळेपर्यंत , सगळे गच्चीवरच होत असे , म्हणून हा लेख गच्चीवरच्या गमती जमती मध्येच घेतला आहे .
अगदी समजायला लागल्यापासून हे सगळं बघतेय मी . ढोबळ मानाने सगळे माहीत होते पण सविस्तरपणे नीट माहित नव्हते . म्हणजे काय काय , किती वेळ , क्रम वगैरे वगैरे , पण आता चौधरी सदनच्या निमित्ताने ह्यावर सुद्धा नीट मुद्देसूद चर्चा केली आणि सगळी नीट माहिती मिळवली . आता ती माहिती आणि त्याबरोबरच आमच्या धमाल गमती जमती पण सांगणार आहे .
तर हे बिबडे बनवण्यासाठी सगळी ज्वारी ओली करून घ्यावी लागते आणि मग ती रात्रभर सुती कापडात बांधून ठेवायची , साधारण बारा तास तरी . त्यानंतर ती सावलीतच कापडावर पसरून थोडी वाळू दिली जाते . एकदम बरोबर शब्द म्हणजे आंबट ओली असावी . मग गिरणीवर रव्यासारखी जाडसर दळून घ्यावी आणि त्यातील कोंडा काढून घेण्यासाठी चाळून घ्यावी . मग हा जाडसर ज्वारीचा रवा भांड्यात घालून पाण्यात भिजत घालून ठेवायचा . एक-दोन नाही तर तब्बल आठ दिवस . पण दररोज यातील पाणी फेकून द्यायचे आणि रोज नवीन पाणी घालायचे . सरते शेवटी , हे आठ दिवसांनी शिजविण्यास योग्य होते .
ज्या दिवशी शिजवायचे आणि बिबडे करायचे असत , त्याच्या आदल्या दिवशी रात्री बरीच तयारी करावी लागते , मगच सकाळी सगळं सुरळीत पार पडत असे . यातही थोड्या थोड्या वेगळ्या पद्धती आहेत . काही लोक तांदूळही घालतात . मग ते तीन दिवस आधी भिजवून ठेवावे लागतात . काही लोक साबुदाणा घालतात थोडा , मग हा आदल्या दिवशी भिजवून ठेवावा लागतो . काही वेळा गव्हाचा चीक सुद्धा घातला जातो थोडा . हा ही आदल्या दिवशी भिजवलेले गहू वाटून काढून ठेवावा लागतो . या व्यतिरिक्त आदल्या दिवशी पाणी आल्यावर जास्तीचे पाणी सुद्धा भरून ठेवावे लागते शिजविण्यासाठी . कारण हे शिजविण्याची सुरुवात सकाळी पाच वाजताच चालू होत असे . दुसरे म्हणजे यासाठी भरपूर लसूण आणि पिवळ्या(लाल किंवा हिरव्या ) वाळलेल्या मिरच्यांचं जाडंभरडं वाटण करून ठेवावे लागे . फार आधी घरात मिक्सर नव्हते तेव्हा हे खलबत्त्यात आदल्या दिवशीच रात्री करून ठेवावे लागे आणि त्यात मीठ , जीरं , तीळ , बडीशोप अख्खीच घातली जात असे . ते सुद्धा प्रमाणात रात्रीच काढून ठेवायचे . एक कारण म्हणजे सकाळी सगळं पटकन हाताशी असावे आणि दुसरं म्हणजे भल्या पहाटे घरात खुडबुड करून बाकीच्यांची झोप मोड होवू नये .
मग दुसऱ्या दिवशी पहाटे पाच-साडेपाचलाच गच्चीवरच्या भट्टीवर शिजवण्याची क्रिया चालू होत असे . त्यासाठी एक भले मोठे पितळी भांडे होते आमच्याकडे . छान पिवळे चकचकीत बाहेरून आणि आतून चंदेरी कल्हई केलेले . साधारण तीन फूट व्यास आणि दोन-अडीच फूट उंचीचे . शिजवताना हलविण्यासाठी एक विशिष्ट आकाराचा लाकडी चमचा होता साधारण दोन-अडीच फूट लांबीचा. त्याला "चाटू" म्हणतात . अजूनही असेल कदाचित . शिजवताना त्यात गरम पाणी घालावे लागे , त्यासाठी एक खास दांडाचे भांडे होते . हे म्हणजे नेहमीचे स्टीलचे भांडे पण त्याला एक दांडा होता धरण्यासाठी . हे ही असेल अजून बहुशः घरात आणि मोठ्या पितळेच्या भांड्यावर झाकण म्हणून , तितकीच मोठ्ठी पितळेची परात .
ही शिजविण्याची क्रिया झाली , की मग प्रत्यक्ष पापड करण्यास सुरुवात होत असे. बाकी सगळे पापड साधारण लाटून केले जातात पण हे पापड मात्र थापून करावे लागतात . ह्याची सुद्धा थोडी पूर्व तयारी करावी लागते . थापतांना हाताला चिकटू नये , म्हणून एका भांड्यात पाणी आणि त्यात थोडे तेल घालून ठेवलेले असते . थापतांना प्रत्येक वेळी हात या पाण्यात बुडवावा लागतो . थापण्यासाठी पोळपाट असतोच . पण चौकोनी आकाराचे साधारण पोळपाट व्यापेल असे जाड सुती कापडाचे तुकडे कायमचे करून ठेवलेले असत , खास फक्त या कामासाठी . मग ही फडकी सुद्धा पाण्याने ओली करून थोडी पिळून घेतलेली असत . थापलेले बिबडे वाळत घालण्यासाठी सुती धोतर किंवा नऊवारी पातळ लागे . हे पण पाण्यात बुडवून नीट ओले करून थोडे पिळून घेतलेले असे . मग हे मोकळे करून झटकून गच्चीवर अंथरले जाई . अंथरताना त्यात हवा शिरत असे , ती सगळ्या बाजुंनी काढून घेऊन , सगळ्या बाजुंनी कडेवर विटांचे किंवा फरशीचे तुकडे ठेवले जात असत , जेणे करून ते हवेने उलटून किंवा उडून जाऊ नये म्हणून . मग धोतराच्या किंवा पातळाच्या एका टोकापासून सुरवात करून , हळूहळू सरकत दुसऱ्या टोकापर्यंत थापलेले पापड टाकण्याची क्रिया चाले . आधी ते शिजलेलं रवण , ज्याला खास शब्द आहे "घाटा !" , तर हा घाटा वाढायच्या चमच्याने पोळपाटावरच्या फडक्यावर घ्यायचा आणि त्याचा हाताने थापून गोल मोठा पोळपाट भरून पापड तयार करायचा . मग त्या फडक्याची एका बाजूची दोन टोकं धरून उचलायचं आणि उलटे करून गच्चीवर अंथरलेल्या धोतरावर बरोबर ठेवायचं आणि मग वरून ते फडकं अलगदपणे काढून घ्यायचं , पापड बरोबर धोतरावरच राहतो . अशी ही क्रिया भांड्यातील सगळा घाटा संपेपर्यंत चाले . मग अशी पाच-सहा धोतरं किंवा पातळं भरून जात पापडांनी . एका दिवशी जवळ जवळ शंभर पापड होत असत . असे आठ-दहा दिवस चाले .
पण आमची फारच मज्जा असे हे आठ-दहा दिवस ! हे पापड उन्हाळ्याच्या दिवसातच होतात , शिवाय करायचे खूप प्रमाणात असत . त्यामुळे जितक्या पहाटे सुरु केले तितके बरे , कारण आठ-साडेआठ वाजताच उन्हाचा चांगलाच चटका बसतो . उन्हाळा असल्याने आम्ही गच्चीवरच झोपलेलो असायचो . आमची झोप उघडायच्या आधीच घाटा तयार होऊन , बिबडे थापायला सुरुवात झालेली असे . मग आम्हाला जाग आलेली बघून मम्मी म्हणत असे , जा , खाली जाऊन दात घासून ,अंघोळ करून , आवरून या आणि वर येताना ताटल्या-चमचे घेऊन या . मग काय , आम्ही पडत्या फळाची आज्ञा घेऊन , लगेच खाली जाऊन , आवरुन , ताटल्या-चमचे घेऊन , परत गच्चीवर हजर होत असू . या ताटल्या-चमचे घाटा खाण्यासाठी असत . जाम भारी लागतो हा घाटा ! मस्त गरम गरम ताटलीत घ्यायचा , त्यावर भरपूर तीळ आणि तेल घालायचे , हे सगळं छान पैकी कालवून घ्यायचे आणि मग हल्ला बोल ! अहाहा काय भारी , लिहिता लिहिता सुद्धा तोंडाला पाणी सुटले आणि मग आम्ही पोटभर हेच खात असू . काही लोक यात दूध साखर घालून सुद्धा खातात हे फार उशिरा कळले . पण मी मात्र अजूनही तसे खाऊन पाहायची हिम्मत नाही केली , कसे लागेल चवीला , या भीतीने . पण माझी वाहिनी मात्र खूप आवडीने खाते आणि मी फक्त ते बघत असते . एकीकडे मम्मी लोकांचे बिबडे थापणे आणि दुसरीकडे आमचे खाणे ह्या दोन्ही गोष्टी सगळा घाटा संपेपर्यंत अखंडपणे चालत असत . बरं , हा घाटा सगळ्यांनाच खायला आवडतो . मग शेजारी-पाजारी आणि नातेवाईकांकडे देण्यासाठी डबे भरले जात आणि खाली घरात सगळ्या मोठ्या लोकांना खाण्यासाठी एक वेगळे भांडे भरून खाली घरात जात असे .
घाटा संपला की त्या भल्या मोठ्या भांड्याच्या तळाला एक कडक पापुद्रा तयार झालेला असे . त्याला ही खास शब्द आहे "खरोड" ! महत् प्रयासाने ही खरोड काढली जाई . ही सुद्धा खायला फार भारी लागते म्हणे . अगदी आवडीने खातात खाणारे ! मी मात्र आजतागायत एकदाही खाल्लेली नाही , एव्हढेच काय मी नीटपणे बघत सुद्धा नाही त्यादिशेने , कारण मला अजिबातच आवडत नाही खायला आणि बघायला सुद्धा !
मग ही सगळी वापरलेली खरकटी भांडी तेथेच गच्चीवर आमच्या लाडक्या टाक्यातील पाण्याने धुतली जात . कारण परत दुसऱ्या दिवशी ही सगळी भांडी लागत . ही भांडी घासण्यासाठी भट्टीतीलच राख वापरली जाई आणि भट्टीत जाळण्यासाठी लाकडं त्या खालच्या टाकीतून काढावी लागत . मग सगळं घासून पुसून लख्ख झालं , की आम्ही खाली जात असू . पण परत पापडाचे पक्षांपासून रक्षण करण्यासाठी थोड्या-थोड्या वेळाने वर येऊन पाहून जावे लागे किंवा कुठे थोडी सावली असेल तर तिथे आम्ही बसून राहयचो .
मग काही तासांनी वर येऊन किमान दोनदा तरी या धोतरांची जागा बदलावी लागे लवकर वाळावे म्हणून . असे साधारण दोनदा केल्यावर आणि पापड वरून नीट वाळला आहे याची खात्री झाली , की ही सगळी धोतरं उलटी करून ठेवली जात , जेणेकरून पापड खालच्या बाजूने सुद्धा नीट वाळायला हवा . मग काही तासांनी नीट वाळल्याची खात्री झाली , की हे काढण्याचा कार्यक्रम असे . हा आम्हा मुलींचा सगळ्यात आवडता कार्यक्रम असे . हा कार्यक्रम फार इंटरेस्टींग असतो आणि हे काम आम्ही पण करू शकत असू . हे पापड काढण्याची सुद्धा एक खास पद्धत आहे . या धोतरांना उचलून असे खाटेवर ठेवायचे , की पापड खालच्या बाजूला असले पाहिजेत . अशी सगळी धोतरं एकावर एक घालून घेतली तरी चालतं किंवा एक झाल्यावर एक ठेवले तरी चालते . मग या धोतरावर वरून पाणी शिंपडायचे . एक-दोन मिनिटातच छान मुरते . मग पापड छान भराभर न तुटता निघतात . मग सगळ्या बाजूने आम्ही सगळ्या भिडायचो ते पापड काढायला . धोतर थोडे उचकावयाचे आणि एक एक पापडाचा थोडा भाग धोतरापासून काढायचा आणि मग हा भाग एका हातात आणि दुसऱ्या हातात धोतराचा थोडा भाग पकडायचा आणि दोन्ही विरुद्ध दिशेने हळुवार ओढायचे , की सलग अख्खाच्या अख्खा पापड धोतरापासून सुटून वेगळा होतो . जास्त घाई केली की फाटतो , जे आम्ही करत असू . कारण अख्खा पापड खायला परवानगी नसे आणि आम्हाला खायची घाई . म्हणून आम्ही पापड मुद्दाम फाडत असू . मम्मीचे सांगणे सुरु असे , अग भवान्यान्नो हळू जरा , फाडू नका पापड . काही वेळा पापड नीट वाळलेले नसले , तर पापडाचा मधला थोडा भाग धोतरालाच चिकटून राही आणि बाकी ओला ओला पापड निघून येई . मग टेन्शन , अरे बापरे! आज नीट वाळले नाहीत , "पोटं फाटताहेत पापडां चे" , असा शब्द प्रयोग केला जात असे . हे पापड काढण्याची मजा तर असतेच पण तापलेली जमीन , तापलेलं धोतर आणि पापड आणि यावर टाकलेले पाणी , या सगळ्यांचा एकत्रित फारच सुंदर आणि हवाहवासा वास येतो ! फारच भारी ! तो अनुभवल्या शिवाय नाहीच कळणार ........
बरं काढण्याची तर मज्जा असतेच , पण ते काढून झाल्यावर खाण्याची जास्त घाई असते . हे पापड वाळलेले म्हणजे धोतरावरून काढण्या इतपतच वाळलेले असतात , पण तसे ओलेच असतात . मग या पापडाला मस्त तेल लावायचे , त्याची छान सुरळी करायची आणि सोबत भाजलेले शेंगदाणे ! अहाहा !! स्वर्ग !!! सगळी पक्वान्न फिकी वाटतात यासमोर . मग आम्हा मुलींचे संध्याकाळचे जेवण यावरच असे , पोट भरून आम्ही हेच खायचो ! ओले पापड सुद्धा सगळ्यांच्या आवडीचे , मग पाच-सहा पापडांच्या सुरळ्या करून-करून किंवा त्या-त्या घरात किती लोक आहेत , त्याप्रमाणे कमी जास्त संख्येने पापड घेऊन , त्यांच्या सुरळ्या करून , नातेवाईक आणि शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडे रवाना होत.
हा झाला एक दिवस . असे आमच्याकडे जवळ जवळ आठ-दहा दिवस चाले . आम्ही रोज घाटा आणि ओले बीबडे अगदी पोटभर खात असू , तरी सुद्धा आमचे मन भरत नसे . घाटा आणि पापड आमच्याकडून जसे बाकीच्यांकडे जात असत , तसेच बाकीच्यांकडून सुद्धा आमच्याकडे येत असत . त्यांचा सुद्धा लगेच फडशा पडे . मग बाकीचे पापड कोरडे ठणठणीत होण्यासाठी पुन्हा खाटेवर वाळत घालून , त्यावर जड आणि जाड चादर घातली जाते , जेणे करून वाळल्यावर ते वाकडे तिकडे न होता सरळ राहतील . कारण हे वर्षभरासाठी साठवून ठेवलेले असत आणि हेच आमचं मधल्या वेळातील खाणं . साधारणतः महिन्यातून एकदा हे बिबडे कोळश्याच्या शेगडीवर भाजून , मोठमोठे डबे भरून ठेवले जात . मग कधी तसाच घेऊन खायचा , कधी तेल लावून , तर कधी शेंगदाण्याची चटणी तेल घालून . पण सगळ्यात आवडता प्रकार म्हणजे हे पापड मोडायचे , चांगला भुगा करायचा हाताने , मग त्यावर चटणी , तेल , लोणच्याचा खार आणि कांदा बारीक चिरून घालायचा आणि मस्त एकत्र कालवयाचे ! तोंडाला पाणी सुटणार नक्कीच आणि मग ताव मारायचा , फारच भारी ! या सगळ्या आनंदामागे आमच्या मम्म्यांचे अपार कष्ट ! त्यांच्या ह्या अपार आणि उत्साही कष्टांना त्रिवार सलाम !! त्या आज सुद्धा आमच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त कष्ट करतात , या वयात सुद्धा ! लव्ह यु ऑल माय मॉम्स !!
पण हल्ली बऱ्याच वर्षात मला हे सगळं अनुभवायला आणि खायला मिळालेले नाही , पण भाजून खायला मात्र नक्की मिळते . माझी बालपणापासूनची सख्खी मैत्रीण , न चुकता दर वर्षी खोक्यात भरून , हेच नाही तर बाकी सगळ्याप्रकाराचे पापड मला आवर्जून पाठवते ! या वर्षी पण मिळतीलच , कारण दोन-तीन दिवसापूर्वीच तिने तिकडून पाठवलेत ......तिच्या ह्या निरागस आणि निर्व्याज प्रेमाला त्रिवार सलाम !
(टीप - सगळ्या वाळवणांसाठी गच्चीवरील गमती जमती आणि घरातील गमती जमती या दोन्ही सदरात बघावे म्हणजे सगळी माहीती नीट आणि सविस्तर मिळेल )
आनंदी पाऊस
गच्चीवरील गमती जमती
१३ जून २-१९
घाटा शिजवतांना वापरला जाणारा लाकडी चमचा - चाटू
बिबडे थापतांना
धोतरावर घातलेले बिबडे
धोतरावर घातलेले बिबडे
पापडाचा कुस्करा 😋🤤😋🤤
छानच सगळ काहि,मी पण बर्याच वर्षात हि सगळि मजा अनुभवली नाहि...
ReplyDelete—सोनल चौधरी
💖💕😍 i think we both r sailing in the same boat .......v dont get to enjoy these moments ......but anyways now v have this wonderful way of experincing way to enjoy all these moments !!!😇💃💃 thnks tons !!! i think u r the only person to write ur abhipray on each of the article till today!!! so very very special thnks to u !!!!💖💖💖
DeleteAhhh tondala pani sutle
ReplyDeleteप्रत्येक वाचणाऱ्याच्या तोंडाला पाणी सुटलेच पाहिजे , तरच लिहिण्याचे सार्थक होईल !!!😍😇
DeleteJunya aathavani tajya zalyat mast akdam👌👌👌👍👍
ReplyDeleteJunya aathavani tajya zalyat mast akdam👌👌👌👍👍
ReplyDelete- Yogini Nehete
हो ग ! जुन्या छान आठवणी !!! भारीच असतात !😍😇💃
DeleteHy vershali wagle kaku bibde saptah wachtana tondala pani sutle aani mimd bhutkalat maheri dhawle lahapni ashich tandalache chamchiyane ghatle sandge salpapad wafun kelele khalet aai kaku te karat aastanachi madhech ludbud he sare tuze lekhamule aathwale sunder anubhav mast
ReplyDeleteकाकू तुमच्या अभिप्रायाशिवाय लेख पूर्णच होत नाही ! आणि तुमच्या आठवणी ऐकायलाही मिळतात त्या निमित्ताने ! खूपच छान वाटते !
Deleteबिबडे + तेल + शेंगदाणे = यम्मी
ReplyDeleteलहानपण देगा देवा... परेश झोपे
yesssss totally!!!!💃💃💃💖😍😇
Deleteखूप छान ताई।
ReplyDeleteआपण कोण कळेल का? मनःपूर्वक धन्यवाद !!! 😍🙏
Deleteमस्त... फोटो मुळे आणखीनच मज्जा आली लेख अनुभवताना...
ReplyDeleteहो खरंय ज्यांनी प्रत्यक्ष बघितले नाहीये , त्यांना फोटो मुळे समजायला खूप छान मदत झाली !😍
Delete👌👌Tondala kharach pani sutale
ReplyDeletePhoto mule ter ajun tyat bhar 👍
मनःपूर्वक धन्यवाद !!! 🙏आपण कोण कळेल का?
DeleteKharach utarater 👌
ReplyDeletekitihi godache khya tyasamor yachi chav 👌
✔✔✔💖💖💖
DeletePan tey shabhadat lihane kathin tey tu sahajgata lihiles👌
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !!! 😍🙏🙏🙏
DeleteKhup chan😋
ReplyDeleteKhup chan😋
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !!! 😍😍🙏
Deleteबापरे केवढ आठवत आहे खुप मस्त लिहिले आहे
ReplyDelete😇😇😍😍💃💃💃💃💃💃
Deleteखूप भारी ,तोंडाला पाणी सुटले ��
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !!! 🙏🙏🙏
Deleteबापरे केवढ आठवत आहे खुप मस्त लिहिले आहे!!!
ReplyDelete😇😇😍😍😍💖💖!!!
DeleteBibde saptah
ReplyDeleteGhata, kharod, ole bibde������
all yummy yummy !!! 😍🤤😋🤤😋🤤😋
DeleteVachtana tondalla Pani sutle��������1dam bhari vranan ����
ReplyDeleteखरंच ! सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटले !!! त्या पाण्याचा आता पाटचं वाहायला लागेल !!!🤤🤤🤤😜😜😜😆😆😂😂😂
Deleteमस्त कधि बनवू आणि कधी खाऊ असे झाले इतके पाणी सुटले तोंडाला
ReplyDeleteतु माझ्या कडे ये आपण सगळे अनुभवू प्रत्यक्षात
तू लाग तयारीला , आलेच बघ मी लगेच !!! now i have direct flight from here to ur place!!!
Deleteतासा दीड तासात तुझ्याकडे !✈✈✈
बिबळयाची रेसिपी कळालि तोडाला पाणी सुटले����
ReplyDelete🤤🤤🤤😛
Deleteव्वा खूप छान
ReplyDelete🤩😍😇🙏🙏
Delete*बिबड्यांचा कारखाना बहुतेक लेवा समाजात खेड्यात गल्ली गल्लीत पहावयास मिळतो.ताे तुमच्याकडे गच्चीवर हाेता एवढेच !बिबडेबनविण्याची पद्धत नवशिक्या बाईला खूपच मार्गदर्शक ठरेल.घाटा खाणे सर्वांनाच आवडते यात तुम्ही खूप आनंद घेतलास.आता ते आठवाव एवढेच!
ReplyDeleteनमस्कार सर , तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय . बिबड्यांशिवाय खान्देश जगूच शकत नाही . आता मोठ्या शहरात राहायला लागल्यामुळे सगळ्या आठवणींवरच समाधान मानावे लागते . अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !🙏😊
DeleteKup chan
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !😍
Deleteतू खरोड खाल्ली नाहीस 😢 हाय कम्बख्त तूने पी ही नही
ReplyDeleteअरे भाई लोग के लिये छो दी ना सारी की सारी..
ReplyDelete😂 😝😜
खप छान वर्णन ..अगदी बारीक तपशिलासह एवढे कसे आठवते ग तुला ..
ReplyDeleteकोण आपण, नाव नाही ना,
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏
पापडांची मजा तू शहरात राहून घेतली त्या काळात गावी राहून आम्हाला फार मजा घेता आली नाही आजकाल पापड फारसे करत नाही खूप छान वाटले वाचून
ReplyDeleteहो ना, खुपच मज्जा केली आम्ही.
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏
Subject baghun, shevti vachayla vel kadhavach lagla. Khup chhan varnan kele ahe. Kharach bibabe ha 'close to heart' subject ahe aplya sagalyanna. Thanks for sharing. Keep it up.
ReplyDeleteचला तुझ्या आधी मला बीबड्याचे आभार मानले पाहिजेत! त्यांच्या मुळे तू वेळ काढलास, अणि तुझे पण खूप सारे धन्यवाद 😍, वेळ काढून वाचल्या बद्दल!!!
Deletesundar varNan !
ReplyDeleteआनंदी धन्यवाद!
DeleteNice. Keep it up.
ReplyDeleteछान आहे माहितीपूर्ण लेख
ReplyDeleteBibde cha ghata Ani kharod ekdam bharich👌👌👌
ReplyDeleteभारीच की...वाचून तोंडाला पाणी सुटले...😋😋😋
ReplyDeleteभुसावळ ला आमच्या गल्लीतच रांगेत इतक्या खाटा लागलेल्या असत...😃
छान लेख लिहिला आहेत..👌👍🙏
ReplyDeleteकिती वेगळं आहे हे, आमच्याकडे पश्चिममहाराष्ट्रात नाही करत!
ReplyDeleteआमच्या घरी किंवा आजूबाजूला ही नाही. आई बाजरीचे पापड करायची, पण त्यासाठी ही एवढी ,इतक्या दिवसांची तयारी नसते.
नवीन वाचायला मिळाले! नवीन रेसिपी मिळाली!
खरंच मागच्या पिढीतील समस्त आई वर्गाला सलाम😍🙏🏻
हे सर्व पापड, लोणचे,वाळवणे वगैरे काळाच्या ओघात लुप्त झाले आहे....तरी तुझ्या ब्लॉग मधून जीवंत राहील; ते तुझ्या photo Memory च्या वरदाना मुळे... त्याशिवाय इतके तपशिलवार लिहिणे अशक्य!!
ReplyDeleteछान...👍
खुप च छान वर्णन
ReplyDeleteआमच्या कडे याला भातोडया म्हणतो
सुरेख,छान बिबडे बर का, वर्णन ऐकून बिबडे, पापडाची खाण्याची इच्छा होते आहे💐🙏
ReplyDeleteनाविनच आहे पण छान आहे
ReplyDeleteKhup chhan lihile aahe tai
ReplyDeleteLahanpani chya sarv goshti aarhvlya
खूप छान वर्णन बिबडे चे केले आहेस.खरच तोंडाला पाणी सुटले. बिबडे बनविण्यासाठी खूप मेहनत लागते.आमच्या गावी बाजरीच्या बिबड्या करतात.अप्रतिम वर्णन आहे.तू खूप भाग्यवान आहेस तुला हे सगळे अनुभवता आले.
ReplyDeleteसूक्ष्मनिरीक्षण ,योग्य शब्द रचना आणि समर्पकशीर्षक या मग प्रत्येक खानदेशी माणसाला आपलाच वाटणारा लेख ...
ReplyDeleteअगदी शब्द नि शब्द आम्ही अनुभवले ,विदर्भातील खेड्यात ,दर उन्हाळ्यात .आम्ही याला धापोडे म्हणत असू .आधी काही वर्षे धोतरावर ,नंतर पळसाच्या पानांवर पण घातले
ReplyDeleteखारोडया बाजरीच्या ,जाडसर घरी जात्यावर दळून
एकदम लहानपण झरझर नजरेसमोर आले ,बहिणींना पण पाठविले
वाहवा...पापड making Process वाचून ..lipsmacking आणि अगदी मस्तच वाटतंय...माला ओलसर कच्चापापड जाम आवडतो.. sun-dried tar आवडतच...
ReplyDeleteमाझी लहानपणीची मैत्रीण"पापड" आणत असे तेआठवलं..लेखवाचून...वाळलेल्याबिबड्याचtexture bhari आवडतं yaar...संजिता
चाटू,घाटा,
👌🏼👌🏼khup chan
ReplyDeleteखूप छान लहान पण आठवलं वर्षा . गोड आठवणींचा ठेवा.
ReplyDeleteKhoopach Chan Varsha.vachtana Mazya pan tondala pani sutal. Aamhi pan lahanpani ardhvat sukleli valvan khoop khaycho.
ReplyDelete