Skip to main content

उन्ह दाखविणे( गच्चीवरील गमती जमती)

उन्ह दाखविणे
( गच्चीवरील गमती जमती)
                                                            
                                                       
                                                     उन्हाळी कामामधला हा खूपच महत्वाचा भाग . हे काम ज्या ज्या दिवशी असे , त्या त्या दिवशी एक महत्वाचे काम असे , ते म्हणजे सगळी गच्ची छान झाडून स्वच्छ करणे . हे काम मात्र आम्ही मुली आनंदाने करत असू ! आमच्या कडे वर्षभराचे लागणारे सगळे धान्य एकदम घेऊन ठेवत असत . यात गहू , ज्वारी , तांदूळ , तूर डाळ , मूग डाळ , हरबरा डाळ , उडीद , मूग ,भुईमुगाच्या शेंगा , अगदी गूळ , साखर एव्हढेच काय पण पोहे , साबुदाणा , मुरमुरे सुद्धा . हे सगळं पोत्यापोत्याने घ्यावे लागे एकत्र कुटुंब  असल्याने . मग हे सगळे एक एक करत आणले , की  ते साफ करणे , निवडणे हे तर आलेच . पण हे वर्षभर साठवून ठेवायचे असे आणि ते टिकून राहावे , त्याला कीड लागू नये , म्हणून मग प्रत्येक धान्य गच्चीवर घेऊन जावे लागे . मग आम्ही मुली सुद्धा छोट्या छोट्या घमेल्या भरून , डोक्यावर घेऊन , गच्चीवर जात असू . मग ते सगळं धान्यं नीट पसरवून  ठेवावे लागे आणि मग दिवसभर या धान्याची राखण करावी लागे . कारण खूप खूप पक्षी असत आसपास . हे काम परत आम्हा मुलींचेच . डोक्याला पांढरा खादीचा रुमाल बांधायचा आणि जिथे कुठे सावली असेल तिथे बसायचे  आणि हातात एक काठी पक्षांना हुसकावण्यासाठी . भर उन्हाळा , त्यामुळे सारखी तहान पण लागे , मग आळीपाळीने एकेकीने खाली जाऊन पाणी पिऊन यायचे . अधून मधून मम्मी , काकू क्वचित आई (आजी ) ह्या वर येऊन जात आणि वाळत घातलेलं धान्य सगळीकडून थोडं थोडं हलवून जात , जेणेकरून सगळं धान्य नीट तापून निघाले पाहिजे म्हणजे मग वर्षभर त्या धान्याला  कीड  लागत नसे . मग  संध्याकाळी पुन्हा हे सगळे धान्य गोळा करायचे आणि घमेल्या भरभरून परत खाली घेऊन यायचे  आणि मग ते वर्षभरासाठी कोठीत भरून ठेवले जात असे .
                                                       प्रत्येक धान्याचे  प्रमाण खूप असल्याने सगळी धान्यं एका दिवसात  होत नसत . प्रत्येक धान्याचा वेगवेगळा एक एक दिवस असे . मग असे बरेच दिवस हा कार्यक्रम होत असे . सगळ्यात जास्त प्रमाण गव्हाचे असे , त्या पाठोपाठ ज्वारी आणि तांदूळ आणि सगळ्या प्रकारच्या डाळी . या सगळ्या धान्यांचे , बाजारात जाऊन नमुने आणि भाव पहिला जात असे . साधारण कधी योग्य भाव मिळेल याचा अंदाज घेतला जात असे . नमुने घरी आणून सगळे मोठे लोक बघून ठरवत , कुठल्या प्रतीचे आणि जातीचे घ्यायचे ते . मग त्याप्रमाणे एक-एक करून धान्य आणले जाई . मग त्यांची साफसफाई आणि सरते शेवटी उन्हं दाखविणे . कधी कधी हवामान एकदम दगा देत असे . अचानकच पाऊस येण्याची लक्षणं दिसत , मग अशावेळी प्रचंड धावपळ होत असे . एव्हढे सगळे धान्य गोळा करणे , घमेल्यांमध्ये भरणे आणि एक मजला उतरून खाली घेऊन येणे . प्रचंड दडपण येत असे . कारण वेळेत खाली नाही आणले गेले , तर ते पावसात भिजून वाया जाण्याची फार शक्यता ! धान्य वाया जायची भीती असेच  , पण ते घरी आणून ते साफ करण्याची मेहनत सुद्धा वाया जायची शक्यता असे ! अशावेळी तर सगळेच धावपळ करून सगळे धान्य लवकरात लवकर खाली आणण्यासाठी धडपडत असत ! आम्ही मुली सुद्धा छोट्या छोट्या घमेल्या घेऊन धान्य भरून खाली घेऊन जायला मदत करत असू . पण काही वेळा अति उत्साह किंवा अति धावपळ करण्याच्या गडबडीत काही वेळा घमेलीच खाली पडून जात असे किंवा आमची एकमेकींशी टक्कर होऊन कधी फक्त घमेली , कधी आम्ही सुद्धा पडून जात असू . मग अशा वेळी मदत होण्यापेक्षा काम वाढतच असे ! मग जोरात ओरडा खावा लागत असे ! बापरे , आता नुसते हे सगळे लिहिता लिहिताही जामच दमल्यासारखे झाले मला , जणू काही मी ते सगळे आता प्रत्यक्षच करते आहे असे वाटले ! 
                                                       बरं हे उन्हं दाखवणे फक्त धान्यापर्यंतच सीमित नव्हते . एक आगळा वेगळा कार्यक्रम चाले आमच्या घरी , म्हणण्यापेक्षा गच्चीवर भर उन्हात . बऱ्याच जणांना माहित सुध्दा नसेल या बद्दल . या दिवशी सुद्धा गच्ची झाडून छान स्वच्छ केली जात असे . पण या स्वच्छ गच्चीवर , जुन्या चादरी किंवा दऱ्या-सतरंज्या अंथरल्या जात असत  आणि मग त्यावर उन्हं दाखविण्याचा कार्यक्रम ! तर या दिवशी सगळे ठेवणीतले कपडे , म्हणजे मम्मी लोकांच्या जरीच्या साड्या , शालू , वडील लोकांचे  सूट , कोट , आजीची पैठणी , आमच्या सगळ्यांकडे थंडीचे काश्मिरी कोट होते ते कोट , स्वेटर  आणि असे सगळे काय काय सुटकेस मध्ये भरून आणून गच्चीवर दाखल होत असत . माझा पिस्ता रंगाचा काश्मिरी कोट होता . तो तेंव्हा मला मुळीच आवडत नसे . मम्मीचा ग्रे रंगाचा कोट होता तो रंग फार आवडे मला  आणि मालू काकूचा कोट , तो सगळ्यात जास्त आवडता होता . नारिंगी रंगाची छान छटा होती आणि एकदम मोठ्या आकाराचे बटण होते त्याला , फारच भारी दिसे त्यामुळे तो कोट . दादांकडे दोन सूट होते . एक काळा आणि एक पिस्ता रंगाचा . जरा मोठे झाल्यावर , म्हणजे त्यांच्या उंचीची झाल्यावर , मी या सूटस् च्या पँटस्  थंडीत सकाळी शिकवणीला जाताना वापरत असे . उंचीला बरोबर होत , पण कमरेत सैल होत , तरीही  मी पट्टा वगैरे लावून वापरत असे , इतक्या त्या मला आवडत . त्याकाळी  तिथे भरपूर थंडी पडत असे आणि आमच्या शिकवण्या सकाळी सहा वाजताच असत .घरून सकाळी साडेपाचलाच निघावे लागे . शिवाय आम्ही सायकल वर जात असू , त्यामुळे जास्तच थंडी वाजत असे . मग या पँटस् मुळे छान उबदार वाटत असे . एक तर त्या होत्याच उबदार आणि परत दादांच्या असल्याने आणखीनच उबदार वाटत असे मला ! जामच भारी वाटे मला त्या पँटस् घातल्यावर....... 
                                                          मग हे सगळे कपडे आधीच अंथरलेल्या चादरी आणि सतरंज्यांवर ठेवून ते उन्हात चांगले तापू दिले जात असत . एक बाजू चांगली तापली , की उलटून दुसरी बाजू तापू दिली जात असे आणि मग एक एक करत त्यांच्या छान नीट घड्या घालून परत सुटकेस मध्ये ठेवल्या जात . मग खाली नेवून कपाटात डांबरगोळ्या घालून नीट रचून ठेवले जात असत ! 
                                                                                                                           
इति उन्हं दाखविणे !!!




आनंदी पाऊस 
गच्चीवरील गमती जमती 
  ३१ मे २०१९







Comments

  1. Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद !!!🙏 आपण कोण कळेल का?

      Delete
  2. रम्य त्या आठवणी छान

    ReplyDelete
    Replies
    1. आपण कोण? खरंच रम्य त्या आठवणी !!!😇😇😇

      Delete
  3. Ramya te balpan ani Ramya tya aathavani!!!

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्याला तर खूप छान  संधी मिळाली आहे ! we are too lucky n blessed !!!😇😇😇

      Delete
  4. गमती जमती तर लिहायच्या राहूनच गेल्या वाटते.

    ReplyDelete
  5. खरच ग आता ते सर्व miss करतोय आपण आणि आपली मुले तर आता मदत पन करत नाही.. मस्तच

    ReplyDelete
    Replies
    1. हो ग , पण ह्यालाच जनरेशन गॅप म्हणतात ना !?🤔😆😁

      Delete
  6. Wa mastach varnan👌
    Dadanchi pant ti ter ajunch ubdar vate hey vakkya ter khoop kahi sangun jate kharach👌👍

    ReplyDelete
    Replies
    1. u said it!!! आपण कोण कळेल का? खूपच आवडला आपला अभिप्राय !!!💖
      मनःपूर्वक धन्यवाद !!! 🙏🙏🙏

      Delete
  7. जनार्दन चौधरीDecember 01, 2019 5:04 pm

    बारकाईने केलेले निरिक्षण आणि त्याचि ओघवत्या भाषेमधे केलेले वर्णन खरच कौतुस्पदापद आहेच

    ReplyDelete
    Replies
    1. tons of love 💖💖💖💖💖😍😍😍😇😇😇!!!!!

      Delete
  8. मंदा चौधरीDecember 01, 2019 5:06 pm

    बापरे काय काय आठवणी साठवून ठेवल्या आहेत सगळ्या गोष्टीना उजाळा मिळाला

    ReplyDelete
  9. एल झेड कोल्हेJanuary 31, 2020 1:05 pm

    ऊन्हातीलधान्य वाळवण,राखण,आई-काकींना मदत करणे,मदत करता करता आनंद लुटणे सारे प्रसंग बारकाव्याने टिपले आहेत.��बेस्ट��

    ReplyDelete
    Replies
    1. खरंच कुठलेही काम असो , ते कधी काम वाटलेच नाही तेव्हा , त्यामुळे त्यातील आनंद कायमच लुटता आला ! सप्रेम धन्यवाद !!!🙏🙏😍

      Delete
  10. ����वा..
    अगदी साध्या गोष्टींचे तुझ्या वर्णनाने भारी काहीतरी करून टाकतेस..
    खूप छान.

    ReplyDelete
    Replies
    1. आणि तुझ्या या एका ओळीच्या कौतुकाने मूठभर मास चढते माझ्या अंगावर !!! खूप सार प्रेम !!😍❤🤩

      Delete
  11. छानच आहे......धान्य वाळवणे मी ही बघितले/केले आहे. कपडे मात्र नाही.
    आता वेगवेगळ्या प्रकारचे पापड लाटणे हा जो कार्यक्रम असायचा , त्यांवर लिही. खूप पूर्वतयारी करावी लागायची, पण मुलांची चंगळ असायची तेंव्हा.....लाट्या, गव्हाचा चिक खाणे......अहाहा moments!!! (ही फक्त एक सूचना आहे, अंमलात आणंच असा आग्रह नाही. ����)

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद ! yeah of course , u will get to read all those beautiful moments too !

      Delete
  12. Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      आपण कोण कळले नाही?

      Delete
  13. Khup chan. Balpanachi athvan ali. As dhany valvaych kam khup kely. Lahanpani. Agdi 16 sherachya ghanekar ghalun khalun tuzya majhyavar dhany nyaych ,valt ghalayacv n per khali gheun yalach. Majja pn yaychi khup n mg nantr ice cream pn milaycha. Ata 5 kilo suddha uchlta yet nahi,,😑🤣🤣

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरंय तेव्हा मोठमोठ्या घमेल्या भरून धान्य खालुन वर आणि वरुन खाली आणलंय . पण आता पाच किलो वजन पण उचलणे होत नाही . 

      Delete
  14. Khup chan. Balpanachi athvan ali. As dhany valvaych kam khup kely. Lahanpani. Agdi 16 sherachya ghanekar ghalun khalun tuzya majhyavar dhany nyaych ,valt ghalayacv n per khali gheun yalach. Majja pn yaychi khup n mg nantr ice cream pn milaycha. Ata 5 kilo suddha uchlta yet nahi,,������

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺

      Delete
  15. Khup chan...aadhisarkh rahilch nai ata tr kahi....

    ReplyDelete
  16. स्वाती चौधरीDecember 02, 2020 2:10 pm

    खूप बारकाईने लिहिले आहे खूप छान

    ReplyDelete
    Replies
    1. खुप सारे प्रेम आणि धन्यवाद माउली !

      Delete
  17. रंजना राणेDecember 02, 2020 2:13 pm

    खरंच खुपच सुंदर लिहितात तुम्ही ते वाचून तर खूप आठवणी येतात
    अरे असे होते की रिप्लाय द्यायला सुचतच नाही त्या आठवणीत रमून जातो जीव

    ReplyDelete
    Replies
    1. किती सुंदर पावती आहे ही माझ्या लिखाणाला तुम्ही दिलेली ! अगदी आभाळभर प्रेम आणि धन्यवाद !

      Delete
  18. गुलाबराव पाथरकरFebruary 24, 2024 3:33 pm

    त्या काळात आजी किंवा आई अजून एक फर्मान सोडत असायची की , जरा वाळवनाला " हात देऊन ये बरं "

    ReplyDelete
  19. भाग्यश्री पाटसकरFebruary 24, 2024 3:42 pm

    छान लिहिल्या आहेत बालपणीच्या आठवणी! आज दुर्मिळच आहेत या गोष्टी.

    ReplyDelete
  20. अगदी मस्तच....ह्या लहानपणीच्या आठवणी मी पहिल्यांदाच वाचल्या... खरोखरच थंडीपासून रक्षण करणारे कपडे ऊन खाऊन ‌आणखीन ऊबदार बनतात...गच्चीत पापड वाळविणे, ओले असताना‌हळूच खाणे..अंगतपगंत,दुर्बीण भिंग घेऊन कागदावर ज्वलीत चित्र नक्क्षी‌काढणेआठवणी माला‌आठवतात...
    लहानपणीचा‌ कोट पँट outfits वरील एखादा फोटो दाखवा.......संजिता

    ReplyDelete
  21. योगेंद्र आरेकरFebruary 24, 2024 7:00 pm

    खरच आहे.साधारण पंचेचाळीस वर्षापूर्वी मला आठवते आम्ही उन्हाळ्यात शेतातुन गावातून शेण गोळाकरून सरपणासाठी गौर्या थापायचो व इतरही बरिच ऊन्हाळी कामे करायचो.

    ReplyDelete
  22. वंदना गावंडेFebruary 24, 2024 9:02 pm

    Ma’am खूप छान👌 लिहल आहे. तुम्ही एकदम बालपणात गेले अस वाटत होत. खरच आज काल ह्या गोष्टी दुर्मिळ होत आहेत, पण Thank God तुमच्या सारखे मित्र असेल तर बालपण कधीच हरवत नाही. 👒👍

    ReplyDelete
  23. खूप छान लिहिले आहे मॅम.

    ReplyDelete
  24. उन्हातील धान्य वाळवणे,कपड्यांना उन्हं दाखवणे,या लहानपणीच्या आठवणी आपण कधीही विसरू शकत नाही.या कामात ही तेव्हा मज्जा होती .सगळे जण मिळून एकत्र काम करत.या आठवणींना खूप छान उजाळा मिळाला तुझ्या लीहिण्यामुळे.खूप छान .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

  🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕 (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) प्राचीन होयसळ श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा, जिल्हा तुमकुरु, कर्नाटक बंगळूरू पासून साधारण १२७ किमी. गूगल सर्च इंजिन मध्ये Ancient Hoysala Shri Kedareshwar Swami temple, Nagalapura असे शोधले की लगेचच गूगल ते दाखवते, तिथे जायचा रस्ताही दाखवते. त्याचे सगळे ऐकायचे की बरोब्बर तिथे पोहोचता येते.                 होयसळ राजवट, मूळ कर्नाटकात. त्यांनी अकरावे ते चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले. या कालावधीत त्यांनी जी मंदिरे उभारली, त्या मंदिरांना होयसळ मंदिर आणि त्या शैलीला होयसळ शैली म्हणून ओळखले जाते. होयसळ राजवट काळात जवळ-जवळ दीड हजार मंदिरे उभारली. तथापि त्यातील आज फक्त शंभर-दीडशेच मंदिरे अस्तित्वात आहेत. त्यातील फार थोडी सुस्थितीत आहेत. त्यापैकी अगदी बोटावर मोजण्या इतकी मंदिरे सर्वज्ञात आहेत. ती म्हणजे चन्न केशव मंदिर, बेलूर, होयसाळेश्वर मंदिर, हाळेबिडू आणि चन्न केशव मंदिर, सोमनाथपुर. ही तीनही स्थळे जागतिक वारसा या...

दळण (घरातील गमती जमती)

दळण (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                   ...