Skip to main content

आनंदी सोहळा - ७ (featured)

 🪔🪷 🌿 आनंदी सोहळा - ७ 🌿🪷 🪔 
(featured)
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 


🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 

               आज "आनंदी पाऊस" सात वर्षाचा झाला. त्यानिमित्ताने हे सप्तरंगी इंद्रधनुष्य! "आनंदी पावसा"च्या नियमित वाचकांपैकी सात वाचक, "आनंदी पावसा"च्या आपापल्या अभिप्रायासह आपल्या भेटीस आले आहेत. प्रत्येकाची सविस्तर ओळख करून द्यायची म्हटली, तर एक मोठ्ठा लेखच तयार होईल. हे सारेच आपापल्या व्यक्तिगत आयुष्यात अतिशय व्यस्त असतात. हे सर्वच निरनिराळ्या प्रकारचे लेखन सुद्धा करतात. तथापि त्यांनी त्यांच्या व्यस्त दैनंदिनीतून वेळ काढून अभिप्राय लिहून पाठविले आहेत. ते सर्व खाली जोडलेले आहेत!

 
🪔🪔🪔 शनिवार 

दिनांक : ४/७/२०२६ 

विषय :  - आनंदी पाऊस  

शीर्षक : - वर्षाभिनंदन  💐

सर्वच जाणतात की पाऊस फक्त वर्षा ऋतूतच पडतो. पण आमच्या वर्षाचा "आनंदी पाऊस" मात्र सतत वर्षभर पडत असतो. हे एक विशेष आहे  😀

तोच आमच्या वर्षाचा आनंदी पाऊस आता सात वर्षाचा झाला. 
  अभिनंदन आनंदी पाऊस! सातव्या वाढदिवसाच्या खूप खूप आनंदी शुभेच्छा 💐
👍😀

 तर असा हा आनंदी पाऊस कुठेही केव्हाही कसाही बरसतो. त्याला काळ,वेळ,ऋतू, काही काही लागत नाही.
 कधी गच्चीतल्या बागेत, तर कधी रेल्वेच्या रूळावर, सर्व प्रेक्षणीय स्थळी, दळण नेताना एकावर एक रचलेली उडतन, कधी खाद्य भ्रमंती, किती किती सांगायचं त्याच्याबद्दल काही समजत नाही. तो जिथे पडला तिथे सगळा आनंदी आनंद! 
आमच्या वर्षाच्या नावातच वर्षा ऋतू आहे. तो सतत आनंद घेऊन आनंदी पाऊस पडत असतो. खरंच ते वाचताना मन इतके आनंदी होते, कधी कधी हसून पुरे वाट होते. आमची वर्षा म्हणजे जॉली आहे. आनंदी पावसात सगळ्यांना चिंब चिंब भिजवून टाकते. मी तर वाटच बघत असते कधी आनंदी पाऊस पडतो माझ्या घरात आणि मी कधी त्याचा आनंद घेते! तिला कुठून कसं सुचतं असं त्याच मला आश्चर्य वाटतं. खरंच तिच्या बुद्धीच्यातुर्याचं कौतुक करावंसं वाटतं. तिला ती ईश्वरी देणगीच आहे. कुठून काय विषय शोधून आणते आणि त्याचा आनंदी पाऊस पाडते आणि सर्वांना प्रफुल्लित करते. आनंदी पाऊस पडून गेल्यावर सगळे टवटवीत होतात. काय जादू करते ते मला माहिती नाही. या सात वर्षात कितीतरी वेळा आनंदी पावसाची बरसात झाली असेल ते अगणित आहे, मोजता न येण्यासारखं!! हा असा आनंदी पाऊस सर्वांनाच पाडायला जमत नाही, ती किमया मात्र वर्षांमध्ये आहे. आणि ती किमया जरी दुसऱ्याकडे असली तरी ते सादर करण्याची जिद्द तुझ्यात जेवढी आहे तेवढी कोणातच नसेल.तू पुरेपूर प्रतिभा संपन्न आहे. तुझ्यातील प्रतिभेला खरोखरच मनापासून आनंदी सलाम 🫡🥰✒️
 असाच आनंदी पाऊस सर्वांच्या घरात पडो आणि सर्वांना आनंद प्राप्त होवो. कोमेजलेल्या मनाला या आनंदी पावसामुळे टवटवीत होण्याचे भाग्य लाभू दे. आनंदी पाऊस शतायुषीतर झालाच असेल " तुम जियो हजारो साल "
हीच  आनंदी सदिच्छा.
 अशा  आमच्या वर्षा राणीच्या  आनंदी पावसाला सातव्या वाढदिवसाच्या खूप खूप  आनंदी शुभेच्छा. 👍👍💐💐👏👏🤝🌹✒️🥰🙋‍♀️👑🪷🌺🌸🌈

🌈श्रीमती लिला प्रभाकर गाजरे. ठाणे.
या लीला काकूंना मी चार वर्षापूर्वी एकदाच भेटले आहे.

🪻🍁🪻🍁🪻🍁🪻🍁🪻


🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 

🪔🪔🪔 यावर्षी आनंदी पाऊसला सात वर्ष झाले.
माझी यांच्याशी ओळख साधारण तीन चार वर्षांपूर्वी झाली असेल. नावच खूप कलात्मक आहे..... वर्षाताईंच्या नावाचा अर्थ आहे पाऊस... आणि त्यांच्या लेखणीतून झरझरणारा हा पाऊस आपल्या सर्वांच्या मनाला आनंद देऊन जातो... त्यामुळे त्यांचा ब्लॉग म्हणजे शब्दशः आनंदी पाऊसच आहे.. 
         चौथीपर्यंत मी भुसावळला होते . त्यामुळे तेथील बऱ्याचश्या पारंपारिक पद्धती अगदी जवळून बघितलेल्या आहेत. अर्थात एवढ्या वर्षानंतर काही मनावर बिंबलेल्या आहेत तर काही विस्मरणात गेल्यात. त्या सगळ्यांची एक झलक मला परत आनंदी पावसात बघायला मिळाली. यातील लेखांच्या मार्फत मला माझ्या बालपणात परत एकदा डोकावता आले.. आणि मग जाणवले की मी किती नशीबवान होते मला असं बालपण मिळालं. प्रत्येक लेख म्हणजे इथंभुत आणि सविस्तररित्या तरीही  रंजकपणे मांडलेला माहितीचा खजिनाच आहे . ते कुठेही कंटाळवाणं होत नाही. आणि त्यासोबत असलेल्या चित्रांनी सगळं काही अगदी डोळ्यासमोर येत. उन्हाळ्यातली वाळवण करण्याचा घातलेला घाट, लोणचं करण्याची प्रक्रिया... या साऱ्या गोष्टी ज्यांनी कधी ऐकल्याही नसतील त्यांना देखील नक्कीच खास वाटल्या असतील. मोठ्या माणसांची लगबग , माणसांचं बायकांना मदत करणं, त्यात लहान मुलांचं मध्येच लुडबुड करण.... असं वाटतं परत एकदा त्या काळात जावं. आणि ती संधी आनंदी पाऊसने मला दिली. 
त्यांचे गुरु  मोरवंचीकर यांच्यावरचे लेख,  स्थापत्यशास्त्रामधील रंजक माहिती, रांगोळ्यांवरचे विशेष लेख आणि सुंदर रांगोळ्यांचे फोटो हे सगळंच मला खूप आवडलं. विशेष आवडली ती त्यांनी काढलेली चित्र आणि नमुन्यादाखल सादर केलेले विविध भांड्यांचे , वस्तूंचे फोटो.....
बऱ्याच देशांमध्ये आनंदी पाऊसचा आधीच प्रसार झालेला आहे...
दिवसेंदिवस तो प्रसार आणखीन वृद्धिंगत व्हावा आणि उत्तर उत्तर आनंदी पाऊस ची यशोगाथा वाढत जावी यासाठी वर्षाताईंना माझ्या खूप खूप शुभेच्छा .
 🌈- डॉ सुवर्णा नारखेडे, ठाणे 
यांची आणि माझी तर प्रत्यक्ष भेट झालीच नाही अजून.


🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺 



🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 

🪔🪔🪔 आनंदी पाऊस भरभरून पडतो आहे आणि आपण सगळे वाचक त्या सोहळ्यात चिंब भिजून जातो आहोत. 

सतत ७ वर्ष, प्रत्येक महिन्यातील प्रत्येक आठवड्यात ब्लॉगवर कमीत कमी एक तरी लेख प्रकाशन करणे सोपे काम नाही.  वर्षाली, ज्या आत्मीयतेने आणि उत्साहाने हे लिहीत आहेस ना त्याचे खरोखर कौतुक आहे. सोप्या भाषेतील आणि भरपूर माहिती देणारे तुझे लेखन आमच्यापण ज्ञानात भर पाडतात, आम्ही समरस होऊन जातो.

इंद्रधनुष्यातील रंगांप्रमाणे तुझे लेख पण वेगवेगळे रंग दर्शवितात. तू सगळेच विषय सहजगत्या लिहून काढलेस. सुरवात केलीस माहेरून, चौधरी सदनातून आणि नंतर तुझे पर्यटन, व्यक्ती विशेष, चित्र मालिका, वारसा स्पर्धा, पुस्तक परिचय, काही अनुभवलेले, अश्या एक ना अनेक शीर्षकांखाली कितीतरी गोष्टी आम्हा वाचकांपर्यंत कौशल्याने लिहून पोचवल्यास. काही निवडक लेख जे तुझ्या गुरूंनी लिहिले तेपण आम्हा सगळ्यांना तुझ्यामुळे वाचावयास मिळाले. आणि गंमत म्हणजे तू तुझ्या लेखांची ध्वनिफीत पण केलीस, फारच छान .

तुझी ७ वर्षाची यात्रा अशीच पुढे ७० वर्ष चालू राहू दे हीच सदिच्छा!

🌈- रुपाली, लंडन 
हिला भेटून जवळपास २७-२८ वर्ष उलटून गेली असतील.


🪷 🌱🪷 🌱🪷 🌱🪷 🌱🪷 

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 

🪔🪔🪔 आनंदीपाऊस.कॉम – ७ वा आनंदसोहळा
आज आनंदीपाऊस.कॉम आपल्या यशस्वी प्रवासाची सात वर्षे पूर्ण करत आहे. हा केवळ वर्धापनदिन नसून, सातत्य, समर्पण आणि सकारात्मक विचारांच्या देवाणघेवान,अखंड प्रवासाचा आनंदसोहळा आहे.गेल्या सात वर्षांत आनंदीपाऊस.कॉमने ज्ञान, संस्कार, अध्यात्म आणि प्रेरणादायी गोष्टी, माहिती, विचारांचा वर्षाव करून असंख्य वाचकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रत्येक लेख, प्रत्येक विचार आणि प्रत्येक उपक्रमाने समाजात आशावाद, आनंद आपुलकिचि आणि माणुसकीची भावना अधिक दृढ केली आहे. या सात वर्षांच्या प्रवासामागे असंख्य शुभेच्छा, वाचकांचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम आहेत. माझ्या कडून वर्षा ताईना शुभेच्छा असाच हा प्रवास अधिक समृद्ध आणि यशस्वी होवो.या ७ व्या आनंदसोहळ्याच्या निमित्ताने आनंदी पावूस आनंदी अभिनंदन! पुढील वाटचालही अशीच प्रेरणादायी, समाजहिताची आणि आनंदाचा वर्षाव करणारी ठरो, हीच हीच सदिच्छा.
हार्दिक शुभेच्छा अजून नविन गोष्टी साठी!
🌈- डॉ अर्चना महाजन, बंगळूरू
यांची सुद्धा अजून प्रत्यक्ष भेट झालेली नाही.


🌼🍂🌼🍂🌼🍂🌼🍂🌼

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 


🪔🪔🪔 आनंदी पाऊस - एक आनंददायी अनुदिनी

२५ ऑगस्ट या अनुदिनीचा वर्धापन दिन!
आपल्या वैशिष्टपूर्ण लेखनाने मनाला, रिमझिम आनंदी पावसाने मनाला आल्हाददायक टवटवी आणणाऱ्या सदरच्या निमित्ताने...
काहीतरी मनातलं...
                मनापासून....
                            सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या खानदेशच्या वारसा लाभलेल्या, आमच्या गावच्या सुनबाई, लेखिका उच्च विद्या विभूषित असून, गुरुवर्य डॉ रा. श्री. मोरवंचीकर यांच्या आशीर्वादाने मंदिर स्थापत्य या विषयावर संशोधन करीत आहे. जलव्यवस्थापन, मंदिर आणि शिल्पं आवडीचा विषय आणि पर्यटनाचा छंद! त्यांचे जन्मस्थान असलेली इमारत 'चौधरी सदन' हे त्यांचे स्फूर्तीस्थान! त्यांच्या लेखनात गावरान मातीची झलक, बहिणाबाई यांच्या भाषेचा गोडवा आणि पूज्य साने गुरुजी यांची ओघवती भाषा; यामुळे आपल्या लेखानाने रसिक जनांचे मन चिंब चिंब रिझवून टाकतात.
                             मला त्यांच्या लेखनातील भावलेले वैशिष्ठे -
                             आनंदी पाऊस एक आनंदी अनुदिनी -
                             त्यावर मराठी संस्कृती, आठवणी, घरगुती गोष्टी, कला आणि निसर्ग संबंधित सुंदर लेख व चित्रं रेखाटन मला खूप आवडतात.
                           त्यातील गावाकडच्या आठवणी, गच्चीवरील गमती-जमती, स्वयंपाक घरातील पदार्थ, वाळवणं इत्यादी लेख हे माझ्या स्मृतीची पाने चाळतात व काहीतरी सतत नवीन करण्यासाठी प्रेरणा देतात.
                           येत्या भविष्यकाळात हा "आनंदी पाऊस" असाच टपटप पडत राहो. रसिक जनांचे मन आनंदाने चिंब चिंब भिजत राहो, ही शुभेच्छा!
                                                                        धन्यवाद!
🌈- श्री प्रफुल्ल पाटील, पुणे.
काकांच्या बाबतीत सुद्धा तेच, अद्याप प्रत्यक्ष भेट नाही.


🪻🍃🪻🍃🪻🍃🪻🍃🪻

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 

🪔🪔🪔 आनंदी पाऊस 

“आनंदी पाऊस” कथासंग्रह वाचतांना मन माझ्या लहानपणीच्या आठवणीत रमून गेले वेगवेगळे सण, त्या सणांच्या साजरे करण्याच्या पद्धती. त्यांना अनुसरून केलेले खाद्यपदार्थ यांची वर्णने वाचून मन त्यावेळच्या गोड आठवणीत हरखून गेले. मन बालपणात हरवून गेले. लहानपणीची मौज मजा परत अनुभवता आली. 
“आनंदी पाऊस” ही माला ७ वर्षे पूर्ण करतेय हे पाहून आनंद झाला. 
वर्षाली यांचे “आनंदी अभिनंदन” आणि पुढील लिखाणाबद्दल “आनंदी शुभेच्छा” 
🌈डॉ. सुभाष ओरोसकर, मुंबई
यांना एकदाच भेटले, सात वर्षापूर्वी.

🌻☘️🌻☘️🌻☘️🌻☘️🌻

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 

अणि 

🪔🪔🪔 आनंदी पावसाने सप्तरेषा ओलांडून जगभरात अत्यंत लोकप्रियता निर्माण केलेली आहे. या आजच्या धावपळीच्या व AI युगात वर्षा मॅडम यांनी लिहिलेले आपले बालपणाचे अनुभव वाचकांना त्यांच्या बालपणाची ओळख करून देणारे असेच आहे. सदर मॅडम यांचे अनुदिनीतील पहिला प्रस्तावनेचा लेख त्यांच्या बालपणाच्या स्मरणशक्तीची ओळख करून देतो. त्यांनी त्यांच्या आजोबांच्या चौधरी सदन विषय लिहिलेले बालपणीचे अनुभव खरंच बालपणात घेऊन जातात. त्यातून त्यांच्या बालपणाचे यथार्थ वर्णन, त्यांचे अनुभव मनाला एक वेगळ्या बालपणाच्या आठवणीत घेऊन जातात. धावपळीच्या युगात दर आठवड्याला एक नवीन विषय घेऊन त्यांनी केलेले लिखाण व एखाद्या विषया विषयी केलेले वस्तुनिष्ठ वर्णन अतिशय वाचनिय असते. माझ्या मतानुसार त्यांनी अनुदिनीच्या माध्यमातून स्थानिक इतिहासाच्या अनेक संकल्पना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा उत्तम प्रयत्न केलेला आहे. या माध्यमातून कधीही न वाचलेल्या संकल्पना, स्थळे, सण, उत्सव, परंपरा, संस्कृती, मंदिर स्थापत्य, अनुभव याविषयीचे त्यांचे लेख जनसामान्य व वाचकांना प्रेरणा देणारे अभूतपूर्व आहे. सप्तरेषा ओलांडल्यानंतर व्यक्ती आचार्य होतो. अशी कथा आहे. खरंच आनंदी पावसाने सप्तरेषा ओलांडल्या नंतर आचार्य या पदाला मार्गक्रम करीत आहे, असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. देशात आणि परदेशात त्यांची अनुदिनी नित्याने वाचक आवडीने व हौशीने वाचतात. आपला अभिप्राय ही नोंदवितात. एवढेच नव्हे तर त्यांच्या मनातील एखादा विषय ही पुढच्या आठवड्यात यावा अशी शक्यता  ते वर्तवतात. यावरून वाचक आणि वर्षा मॅडम यांची वैचारिक देवाणघेवाण पहावयास मिळते. मी पण मॅडमची ओळख झाल्यापासून नित्याने आठवड्यात त्यांची अनुदिनी वाचत आहे. त्यांची साधी सोपी मनाला काळजाला भिडणारी एखाद्या विषयाची मांडणी नेहमी वाचनीय ठरते. एखाद्या विषयाचे वर्णन कशा स्वरूपात वाचनिय केले पाहिजे. हा त्यांचा नित्याचा अनुदिनी लिहिण्याचा प्रयत्न एखाद्या साहित्यिकांपेक्षा कमी नाही. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेऊन सुद्धा व संसार प्रपंचात राहून नित्याने अनुदिनी लिहिण्याचे त्यांचे काम वाखाण्याजोगेच असेच आहे. शब्दातील ,वाक्यातील, वाक्यरचनेतील चढउतार, प्रत्यक्ष प्रसंग समोर उभे करण्याची त्यांची शब्दांची मर्यादा व सामर्थ्य उल्लेखनीय व प्रेरणादायी असेच आहे. त्यामुळे वाचक कितीही दैनंदिन काम करून आला तरी आनंदी पाऊस या अनुदिनीच्या लिंकला भेट देतोच!!
   सप्तरेषा ओलांडलेल्या आनंदी पावसाला व वर्षा मॅडम यांना खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा!!  त्यांच्या हातून अजून असेच लिखाण भविष्यातही होत राहो अशीच आशा व अपेक्षा...💐
  -डॉ दीपक शिरसाट
यांच्याशी मात्र गेल्या २-३ वर्षांपासून अधून मधून भेट होत असते.

🌧️🌼🌦️🌼🌈🌼🌧️ 


🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 
               यासोबतच सांगण्यास अतिशय आनंद होत आहे, की आनंदी पाऊस जगभरात कान्याकोपऱ्यात पोहोचला आहे. आजपर्यंत जवळपास १४२ देशांतून आनंदी पावसाचे वाचन होत आहे. खाली या देशांच्या नावाची यादी जोडलेली आहे. मला तर यातील बऱ्याच देशांची नावे आणि स्थान सुद्धा माहिती नव्हते. आनंदी पावसामुळे मला त्याबद्दल माहिती झाली!
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 

जगभरातील आनंदी वाचकांचे, आनंदी देश!

1. India 
2. USA 
3. France 
4. UAE
5. UK
6. Germany
7. Chin
8. Canada
9. Qatar
10. Russia
11. Singapore
12. Australia 
13. Japan 
14. Netherlands 
15. Myanmar 
16. New Zealand 
17. Sweden 
18. Kuwait 
19. Saudi Arabia 
20. Ukraine 
21. Oman 
22. South Africa 
23. Finland 
24. Switzerland 
25. Ireland 
26. Nepal 
27. Peru
28. Norway 
29. Israel 
30. Taiwan
31. CaymanIslands 
32. Turkey 
33. Hongkong
34. Indonesia 
35. Brazil 
36. Uganda 
37. Jordan 
38. Serbia 
39. Poland 
40. Pakistan 
41. Argentina 
42. Thailand 
43. Denmark 
44. Azerbaijan 
45. Bahrain 
46. Morocco 
47. Iran 
48. Kenya 
49. Spain 
50. Belgium 
51. Colombia 
52. Moldova 
53. Philippines 
54. Luxemburg 
55. Hungary 
56. Mauritius 
57. South Korea 
58. British Virgin island
59. Vietnam 
60. Bangladesh 
61. Romania 
62. Belarus 
63. Malaysia 
64. Cameroon 
65. Bulgaria 
66. Seychelles 
67. Lithuania 
68. Mexico 
69. Italy 
70. Georgia 
71. Bulgaria 
72. Armenia 
73. Mozambique 
74. Antigua & Barbuda 
75. Zambia 
76. Chile 
77. Ecuador 
78. Paraguay 
79. Tunisia 
80. Uruguay 
81. Dominican Republic 
82. Ethiopia 
83. Botswana 
84. Lebanon 
85. Panama 
86. Palestine 
87. Egypt 
88. Guyana 
89. Honduras 
90. Jamaica 
91. Senegal 
92. Kosovo 
93. Kazakhstan 
94. Kyrgyzstan 
95. Latvia 
96. Cote D'ivoire
97. Nicaragua
98. Venezuela 
99. Slovenia 
100. Nigeria 
101. Angola 
102. Bolivia 
103. Costa Rica 
104. Algeria 
105. Guatemala 
106. Mongolia 
107. North Macedonia 
108. Congo Brazzaville 
109. El Salvador
110. Uzbekistan 
111. Sri Lanka 
112. Albania 
113. Czechia 
114. Gabon 
115. Togo 
116. Syria 
117. Turkmenistan 
118. Croatia 
119. Slovakia 
120. Malta  
121. Western Sahara 
122. Poland 
123. Mali 
124. Puerto Rico 
125. Greece 
126. Magnolia
127. Ethiopia 
128. Portugal 
129. Georgia 
130. Bosnia & Herzegovina 
131. Sierra 
132. Maldives 
133. Cape Verde
134. Rwanda 
135. Brunei 
136. Bermuda 
137. Barbados 
138. Austria 
139. Cyprus  
140. Andorra 
141. Burkina Faso  
142. Sao Tome & Principe

२५ ऑगस्ट २०२६ नंतर
143. St.Martin
144. Somalia 
145. Namibia 
146. Tajikistan
147. Estonia 
148. Suriname 
149. Armenia 
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 

               गूगल म्हणजे जादुगारच आहे असे म्हणावे वाटते, बऱ्याच वेळा. "आनंदी पाऊस" या ब्लॉग बाबत बरीच माहिती देत असतो. म्हणजे कुठल्या देशातून किती वेळा वाचला गेला, कुठला ब्लॉग किती वेळा वाचला गेला, गेल्या तीन तासात, चोवीस तासात, सात दिवसात, एक महिन्यात ते संपूर्ण काळात कुठला लेख किती वेळा वाचला गेला, कुठले साॅफ्टवेअर वापरले गेले, कुठला भ्रमणध्वनी किंवा संगणक वगैरे वापरला गेला असे एक न अनेक प्रकारची माहिती देत असतो. आज पर्यंत "दळण" हा लेख सर्वात जास्त वेळा म्हणजे चार हजार चारशे वेळा पेक्षा जास्त वेळा वाचला गेला आहे!
               असेच आपणासर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद यांचा "आनंदी पावसा"वर वर्षाव होत राहो! तुमच्या स्नेहामुळे खरतरं "आनंदी पाऊस"च अगदी आतून, मनापासून आनंदी झाला आहे. तुम्हा सर्वांच्या या ऋणात असण्यातच धन्यता वाटते....
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 


🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 


🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 


🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 


🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 


🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
 
आपणा साऱ्यांच्या कायम ऋणात....

(आज या रंगीत अक्षरांमुळे वाचन करणे थोडे गैरसोयीचे झाले आहे, त्याबद्दल क्षमस्व.... इंद्रधनुष्याचे सप्त रंग दाखविण्याचा माझा अट्टाहास आणि सोहळा आहे..... सारे कसे झळाळते रंगीत दिसायला हवेच म्हणून)

🪔🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪔 
II या सप्तभूमीवरील आनंदी पावसाच्या समस्त वाचकांस अर्पण मस्तु II
🪔🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪔 

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 
©️®️आनंदी पाऊस 
(featured)
२५ ऑगस्ट २०२६
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 



Comments

  1. रवी भालेरावAugust 25, 2026 7:18 am

    💐अनेकोत्तम शुभेच्छा💐

    ReplyDelete
  2. लीना सोमणAugust 25, 2026 7:21 am

    Great वर्षाली
    खूप सुंदर लेख आहेत सगळेच..

    तू insta gram वर का नाही येत हे लेख घेऊन?
    Readability आणि viewers दोन्ही जास्त होतील.

    ReplyDelete
  3. गुलाबराव पाथरकरAugust 25, 2026 7:34 am

    आपल्या अथक प्रयत्नास " सलाम " आपले मनापासुन अभिनंदन जी

    ReplyDelete
  4. डॉ मनिषा वर्माAugust 25, 2026 7:35 am

    अभिनंदन!

    ReplyDelete
  5. Apratim, superb,aaloukik,he shbda khup chote vattat.Aanandi , unspeecheble, khup khup manapasun shubhechha 💐❤️

    ReplyDelete
  6. ज्योती किरंगेAugust 25, 2026 7:44 am

    🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
    💐🌷🌹🪷🌺🌸🌼
    आनंदी पावसाच्या व तुझ्या वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा व खूप सारे प्रेम 😍😘
    🍫🎂🍰🍧🍧

    ReplyDelete
    Replies

    1. ​ताईंचे लेख वाचताना त्यांनी अनुभवलेला प्रत्येक क्षण आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होतो. आज 'आनंदी पाऊस' अनुदिनीला यशस्वी ७ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त साता समुद्रा पलीकडे उंच भरारी घेणाऱ्या आणि आपल्या रूपाने आम्हास प्रेमाची अन् प्रेरणेची शिदोरी देणाऱ्या आमच्या वर्षा ताईंना उदंड शुभेच्छा! हा ७ वर्षांचा सुंदर प्रवास भविष्यात असाच नवनवीन यशाची शिखरे गाठत, अधिक समृद्ध आणि सुंदर पद्धतीने पुढे चालू राहो, हीच मनःपूर्वक प्रार्थना!💐🎉

      Delete
  7. मेघा राऊतAugust 25, 2026 8:07 am

    Congratulations Mam
    हा प्रवास निरंतर असाच पाऊसचा वर्षाव करत राहो ही सदिच्छा 💐🎉💐

    ReplyDelete
  8. जय श्रीराम...!!! 🙏🏻🙏🏻
    जय हिंद...!!!
    वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!! 😀😀💐💐💐😀😀
    छान लिहिती रहा.... चित्रं (पेंटींग) काढत रहा...👍👍🎂🎂🚩🚩🇮🇳🇮🇳🖌️🖌️✍️✍️

    ReplyDelete
  9. बघताबघता 7 वर्ष झालेही!
    असे वाटते आत्ता तर लिहिण्यास सुरुवात केलेली.
    अनेकोत्तम आशीर्वाद व शुभेच्छा.
    अशीच लिहिती व आनंदी रहा. 💐🌹🎂🍰🧁

    ReplyDelete
  10. निलेश जनार्दन चौधरीAugust 25, 2026 8:39 am

    आनंदी पाऊसाला आणि तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असाच आनंदी पाऊस तुझ्या आयुष्यात पडत राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना ❤️❤️🍫🍫🍨🍨🍧🍧

    ReplyDelete
  11. Ar Shrikant BhateAugust 25, 2026 8:57 am

    💐💐 Great achivement. Keep it up. Lots of love and blessings. May the society enrich with your thoughts.

    ReplyDelete
  12. राजेंद्र टोनपेAugust 25, 2026 9:13 am

    खूप खूप अभिनंदन

    तुमच्यावर देवी सरस्वतीचा आशीर्वाद आहे
    तो असाच कायम राहो हीच सदिच्छा
    💐💐💐

    ReplyDelete
  13. संध्या रघोजीAugust 25, 2026 10:14 am

    हार्दिक अभिनंदन ! 140 देशात मराठी वाचक आजही आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो.

    ReplyDelete
  14. हिमाली चौधरीAugust 25, 2026 10:15 am

    खूप छान 💐💐
    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐🎂🍫🥳✨ तुमच्या जीवनातही आनंदाचा वर्षाव कायम राहो✨✨

    ReplyDelete
  15. डॉ दिनेश महाजनAugust 25, 2026 10:16 am

    मॅडम, आपले कार्य अतिशय प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण असते. आपल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमास शुभेच्छा. आपले हे कार्य निरंतर सुरू राहो ही सदिच्छा 💐💐

    ReplyDelete
  16. Ar Shrikant BhateAugust 25, 2026 10:17 am

    I feel you should become instrumental in making society more loving, compassionate, without any hatred, jealousy etc. You are so loving, joyful personality. Make society like you only. It will be great achivement and life worth lived for. Lots of blessings.

    ReplyDelete
  17. किशोर चौधरीAugust 25, 2026 10:17 am

    आनंदी अभिनंदन 💐💐

    ReplyDelete
  18. Aandndi paus v tula vadhdivsachya khup khup shubhecha 👏👏🎉🎉
    Tuze sarvch lekh sunder astat parat parat vachavese vatat👌👌

    ReplyDelete
  19. आर्किटेक्ट उदय बोरगावेAugust 25, 2026 10:49 am

    शब्द-थेंबांनी सजला हा सुंदर प्रवास,💦
    दरवळला मनात साहित्याचा सुवास;🌹
    पूर्ण झाली आज सोनेरी वर्षे सात ,7️⃣
    बरसत राहो सदा 'आनंदी पाऊस'! सर्वांच्या हृदयात.❤️

    ReplyDelete
  20. Wow....great achievement!
    Hearty congratulations 👏👏👍👍🌹🌹
    Well done 👍👍🎊🎊

    ReplyDelete
  21. Wonderful 👏👏👏

    ReplyDelete
  22. Ar Amol ChaphalkarAugust 25, 2026 11:15 am

    Just great 👍
    Keep it up

    ReplyDelete
  23. सीमंतीनी चाफळकरAugust 25, 2026 11:16 am

    अरे वा.. अभिनंदन 🎉💐

    ReplyDelete
  24. Congratulations 💐

    ReplyDelete
  25. प्राध्यापक ए पी पाटीलAugust 25, 2026 1:07 pm

    चि. वर्षाली,
    तुझ्या आनंदी पावसाला आज सात वर्षे पूर्ण होत आहेत, त्याबद्दल तुझे खूप खूप हार्दिक अभिनंदन. बऱ्याच दिवसांपासून तुझ्या आनंदी पावसाचा आनंद घेऊनही माझ्याकडून काहीही लिखाण झाले नाही, याबद्दल माझा मलाच खेद वाटतो. असो,
    या सात वर्षांमध्ये आनंदी पावसाने २५० पेक्षा जास्त लेख, १४० पेक्षा जास्त देश लांघून अगणित वाचक वर्ग आणि चाहते यांच्यावर जे गारुड निर्माण केले आहे, त्याबद्दल मला तुझा अभिमान वाटत आहे. विज्ञानाची पदवीधर असूनही तू वाङ्मयाच्या क्षेत्रात आपला पाय भक्कमपणे रोवला आहे,
    इतकेच नाही तर ऐतिहासिक स्थळे आणि तेथील शिल्पकला यांवर तुझे संशोधनही चालू आहे, तेही प्रापंचिक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळून! या तुझ्या यशाबद्दल तुझे करावे तेवढे कौतुक कमीच पडेल. कुठल्याही महान कार्याच्या यशस्वीतेच्या मागे त्याच्या जोडीदाराचे
    पाठबळ हे असतेच असते
    हे सत्य नाकारून चालणार नाही, म्हणून तुला तुझ्या पतीचीही (महेंद्रची) भक्कम साथ आहे हे ओघाने आलेच, ह्या करिता महेंद्रचेही यानिमित्ताने हार्दिक अभिनंदन करण्याचीही
    संधी मी घेत आहे. तुझ्या आनंदी पावसाला पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद🙏🏼

    ReplyDelete
  26. आनंदी पाऊस💦 च्या अनेक शुभेच्छा असाच पाऊस पडत राहो ़पाऊसा नंतर च्या सप्तरंगी इंद्रधनुष्य 👌👌
    तुझ्या वाढदिवसाच्या खुप खुप आनंदी शुभेच्छा 💐

    ReplyDelete
  27. Happy birthdayyy 🥳🥳

    ReplyDelete
  28. वृषाली महाजनAugust 25, 2026 9:00 pm

    शब्दांना हातात घेतलं,
    आठवणींना दिली वाट,
    आणि पाहता पाहता
    ‘आनंदी पावसा’ने गाठली सात वर्षांची पहाट!

    कधी चौधरी सदन,
    कधी उन्हाळ्यातले पापड,
    कधी सणांच्या गमती-जमती,
    तर कधी मनातले अगदी हळवे क्षण…

    सगळं काही अलगद उतरलं
    तुमच्या त्या साध्या-सोप्या शब्दांत,
    म्हणूनच ‘आनंदी पावसा’
    आपलासा वाटतो प्रत्येक वाचकाच्या मनात.

    शिक्षण कितीही मोठं असो,
    मायबोलीची ओढ काही वेगळीच…
    मराठीच्या या मायेपुढे
    मनाची भाषा नेहमीच मराठीच!

    देश असो वा परदेश,
    तुमच्या शब्दांची पोहोच झाली दूर,
    कुणासाठी आठवण,
    कुणासाठी प्रेरणा,
    तर कुणासाठी मनाला सुखावणारा निवांत क्षण भरपूर.

    सात वर्षं म्हणजे फक्त एक आकडा नाही,
    ही जपलेल्या आठवणींची शिदोरी आहे,
    वाचकांच्या प्रेमाची ऊब आहे,
    आणि तुमच्या लेखणीवरच्या विश्वासाची पावती आहे.

    ताई, लिहित राहा…
    असेच मनापासून,
    असेच आपलेसे,
    कारण तुमचे शब्द
    फक्त वाचले जात नाहीत—
    ते मनात कुठेतरी घर करून राहतात.

    ‘आनंदी पावसा’चा हा प्रवास
    असाच बहरत राहो,
    शब्दांची ही बरसात
    अशीच मनं भिजवत राहो…

    सात वर्षांच्या या सुंदर वाटचालीस
    मनःपूर्वक शुभेच्छा!
    आणि पुढच्या प्रत्येक पानावर
    नवी आठवण, नवा आनंद
    आणि असंख्य वाचकांची प्रेमळ साथ लाभो! 🌸

    ReplyDelete
  29. मनिषा चिंचोलकरAugust 26, 2026 6:47 am

    आनंदी पाऊस सात वर्षांचा झाला . खूप खूप शुभेच्छा वर्षा ताई . खुप छान लेखन असते तुमचे . फार फार आवडते .🙏🙏🌹

    ReplyDelete
  30. ऊन +पाऊस‌चे इंद्रधनुष्य 🌈 आणखी ब्लॉग चे सप्तक परीपूर्ण ह्या‌ त्रिवेणी संगम सोहळ्यासंगे आनंदी पाऊसाचे 8 व्या वर्षातील पदर्पणाचे सुस्वागतम् आणी हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आणखी अगणित रसिक व वाचकवर्ग प्राप्त होवो हीच इकडे सदिच्छा...
    आपला ब्लॉग मराठी कलाकार,इतरत्र नामवंत लेखक ,कवी ,गीतकार व सेलिब्रिटी, पर्यंत पण‌ पोहचावा हीच‌ इकडे मनाची इच्छाशक्ती...
    ब्लॉग चे रुपांतर पुढे पुस्तकात झाले तर volumes मी तर bookshelf वर ठेऊ... संजिता
    वाचन‌आणी वाचक चिरायू होवो होवो.संजिता....

    ReplyDelete
  31. भारती फेगडेAugust 26, 2026 9:28 pm

    अभिनंदन व शुभेच्छा 💐 सात वर्षे पूर्ण झाली. असेच उत्तरोत्तर लिखाण होत राहो व नवनवीन माहिती मिळू दे. तसेच फोटोमधून प्रत्यक्ष पाहिल्याची अनुभुती आम्हाला लाभो हीच सदिच्छा 👏🏻💐🍫🥳

    ReplyDelete
  32. मंदा चौधरीAugust 28, 2026 8:29 pm

    पावसाचे वेगवेगळे रुप आणि रंग बघून खरच खुप आनंद झाला.

    ReplyDelete
  33. सुजाता मोगरेAugust 30, 2026 7:46 am

    वर्षा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद तुझा उत्साह असाच कायम राहो... तुझ्या लिखाणामुळे गत काळच्या स्मृतींना उजाळा मिळतो, आणि खान्देशीच्या संस्कृतीची ओळख होते..... तो लिखते रहो.🙏🙏🙏

    ReplyDelete
  34. मनःपूर्वक अभिनंदन!
    ७ वर्ष एक मोठा टप्पा पार पाडलात!
    बारीक बारीक आठवणी..त्या साध्या सोप्या अनलंकृत शब्दात मांडण्याचे कसब! विषयांचे वैविध्य!
    मुद्दाम घेतलेले,अकस्मात पदरात पडलेले वेगळ्या झाकेचे अनुभव, चौफेर वाचन, भटकंतीत गोळा झालेलं निरीक्षण, हे तुमचं भांडवल..
    लेखनसातत्य,डोळस अभ्यास, विनम्र उपासना, निसर्गाचे अवलोकन,कष्टपूर्वक काढलेली टिपणं आणि स्पर्धाशून्य प्रसन्न मन.. हे तुमचे खास गुण आहेत.
    लिहित्या रहा!
    स्वस्ति पंथाम् अनुचरेत!💐💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दळणं (घरातील गमती जमती)

दळणं (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                  ...

दाय गंडोरी-पद्धत१(मिरचीची भाजी)(थोडं झणझणीत...)

  दा य गंडोरी-पद्धत१ (मिरचीची भाजी)   (थोडं झणझणीत...)                           दाय गंडोरी ! खास खानदेशी शब्द आणि खास खानदेशी भाजी! अवघ्या खानदेश वासीयांची अतिशय लाडकी, आवडती भाजी.                          दाय गंडोरी यातील दाय शब्दाचा अर्थ आहे डाळ आणि गंडोरी म्हणजे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे. थोडक्यात मिरचीची डाळ घालून केलेली भाजी. दाय गंडोरी खास 'लेवा गणबोली' तील शब्द!                          यासाठी लागणारे साहित्य म्हणजे तुरीची डाळ, हिरव्या मिरच्या, आंबटचुका, वांग, कच्चे टमाटे, आलं, लसूण, हळद, शेंगदाणा कुट, सुक्या खोबऱ्याचा कीस, भरपूर, खूप सारी कोथिंबीर, तेल मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि मीठ. उपरोक्त उल्लेखाप्रमाणेच ही भाजी अतिशय झणझणीत असते. परंतु आता सगळेच तिखट थोड्या कमी प्रमाणात खातात त्यामुळे फार तिखट नसते. पण आवड असलेले, पट्टीचे खाणारे असलेल्या घरांतून अजूनही चांगली झणझणी...

भरीत रविवार सकाळ (घरातील गमती जमती)

भरीत रविवार सकाळ   (घरातील गमती जमती)                                                                                                                                     हिवाळ्यात खूप महत्वाची आणि सगळ्यांचीच आवडती म्हणजे भरीत सकाळ!  ही सकाळ म्हणजे फक्त हिवाळ्यातच शक्य असते. आणि हो, हे भरीत म्हणजे तेच प्रसिद्ध खान्देशी  वांग्याचे भरीत! हे  जे खास भरीताचे वांगे असतात ते फक्त हिवाळ्यातच मिळत तेव्हा तरी. आता मिळतात जवळ जवळ वर्षभर, पण मग या वांग्यांना आणि भरताला छान चव नसते. खरी चव चाखायची तर ती फक्त आणि फक्त हिवाळ्यातच! या भरीतासाठी लागणारे दोन फार महत्वाचे घटक म्हणजे कांद्याची पाथ आणि भरीताच्या खास जाड मिरच्या! या दोन्ही घटक...