पाव-विश्व
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)
अवघ्या विश्वात 'शेती प्रधान देश' अशी आपल्या भारताची ओळख आहे. किनारपट्टीच्या भागात भात अतिशय मुबलक प्रमाणात पिकत असल्याने, त्या भागातील भात हे मुख्य अन्न. तथापि उर्वरित भारतात सर्वत्र पोळी, भाकरीचे विविध प्रकार, हा मुख्य अन्नाचा भाग असतो. यात पोळीचे प्रकार म्हटले तर, फुलका, घडीची पोळी, पुरणपोळी, शेंगापोळी, गुळपोळी, फुटण्याची पोळी, खव्याची पोळी, खोबऱ्याची पोळी, गुलाबजामची पोळी, पेढ्याची पोळी, गोड दशमी, सांज्याची पोळी; पराठ्याचे प्रकार म्हणजे मेथी-पालक या सारख्या पालेभाज्यांचे पराठे, लाछा/केरला पराठा, तिखटमिठाचे पराठे, सारण भरून करायचे पराठे म्हणजे बटाट्याचे, पनीरचे, कांद्याचे, कोबीचे अशी न संपणारी यादी आहे. भाकारीचेही तसेच ज्वारीची, बाजरीची, मेथीची, तांदुळाची, बेसनाची, नाचणीची असे बरेच प्रकार आहेत.
तथापि आपल्या भारत देशाच्या बाहेर पडले की आपली गाठ पडते ती, पावांच्या दुनेयेशी! भारतात जसे पोळी-भाकरीचे असंख्य प्रकार बघायला, खायला मिळतात, तसेच भारता बाहेर पडले की असंख्य पावाचे प्रकार बघायची आणि चाखायची संधी मिळते. व्यक्तिगत रित्या मला, पाव आणि इतर सगळे बेकरीत तयार होणारे पदार्थ फारसे आवडत नाही. त्याचे मुख्य करणे म्हणजे यापैकी कशाचाही एक छोटा तुकडाही जिभेवर ठेवला तरी लगेच माझे पित्त डोकं वर काढते. तरीही मला वाढदिवसाचे केक म्हणजे भरपूर क्रीम असलेले, फार म्हणजे फारच आवडतात. पूर्वी मी अगदी किलोने हे खात असे, आता अगदी तोलून मापून खावे लागतात. असो
खायला अडचणी असल्या तरी, हे सगळे बघायला काहीच अडचणी नसतात. त्यामुळे जिथे कुठे हे पदार्थ असतात, तिथे मी माझ्याही नकळत आकर्षित होते. डोळे भरून सारे बघते आणि माझे मन आणि पोट दोन्हीही अगदी आनंदाने तुडुंब भरते. त्यासोबतच मला या सगळ्या छान-छान आकाराच्या आणि झळाळत्या रंगांच्या पदार्थांची प्रकाशचित्रे टिपायला फार आवडते. त्यामुळे चालता-चालता सुद्धा मी भराभर भरपूर प्रकशचित्रे टिपून घेत असते, अगदी माझ्याही नकळत. या प्रवासात सुद्धा हे पदार्थ माझ्या भ्रमणध्वनित न टिपले तरच नवल.
तर ही गोष्ट आहे फ्रँकफर्ट विमानतळावरील पाव-विश्वाची गोष्ट! फ्रँकफर्ट विमानतळावर उतरल्यावर पुढच्या विमानासाठी आम्हाला थोडा वेळ होता. या विमानतळावर अनेक दुकानं थाटलेली होती. त्यात असंख्य प्रकारचे पाव किंवा बेकरीत बनवलेले पदार्थ विक्री साठी ठेवलेले होते. अर्थातच, मला खाण्याची इच्छा तर झालीच नाही, परंतु माझ्या भ्रमणध्वनीला मात्र मोह आवरला नाही. चालता-चालता भराभर काढलेली ही काही प्रकाशचित्रं खाली जोडत आहेत. त्याच्या रंगाचा, आकाराचा, मापाचा, पोताचा, प्रदर्शित करण्याचा पद्धतीचा मी अगदी भरभरून आनंद लुटला. तोच आनंद आपणा सर्वांनाही निश्चितच लुटता येईल!
यापैकी एकही प्रकाराचे नाव मला माहिती नाही. काही ठिकाणी त्यांच्या नावाचे फलक आहेत, किंमत आहे. पण ते सर्व फारच प्रेक्षणीय आहेत हे निश्चित. त्यामुळे त्यांची नावे, ते बनविण्यासाठी लागणारे साहित्य, त्याची कृती या सगळ्या गोष्टी फार गौण होऊन जातात. असे माझे स्पष्ट मत आहे. सोबतच बऱ्याच वाचकांना या सहलीची प्रकाशचित्रं पाहण्याची सुद्धा खूप इच्छा होती. मग निरनिराळे विषय योजून, त्याप्रमाणे विषयवार काही प्रकाशचित्रे, त्यांच्या माहिती सहित प्रकाशित करण्याचा मानस आहे. त्यातील आजचा विषय पाव-विश्व! या पाव-विश्वाचा भरभरून आनंद लुटा. डोळे इतके तृप्त होतील की माझ्या सारखे तुमचे मन आणि पोट दोन्हीही तुडुंब भरून जातील...
🍞🥐🥖🥨🥯🫓🥞🧇🍔🍕🌭🥪🍩🍪🥮🥧
©®आनंदी पाऊस
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)
१० जुलै २०२६













खुप छान माहीती आहे .
ReplyDeleteवाह.. वाह...!!
ReplyDeleteया पावाची दुनियाच न्यारी.
वाचायला छान आणि चावायला पण छान..
पण स्वास्थ्यकारक असेलच असे नाही.
पण बाहेरदेशी गेल्यावर याच्याशिवाय पण पर्याय नाही.
Tari Vada paav 1 number
ReplyDeleteसुंदर🌹
ReplyDeleteCroissant is my Favourite ❤️
ReplyDeleteI have it for breakfast almost every morning at 8:30 AM
खरोखरच अतिशय आकर्षक आहेत निरनिराळ्या प्रकारचे पाव 🍞🥯🧇🥪
ReplyDeleteखुपच छान, किती variety आहे, उचलून खावेसे वाटतात.
ReplyDeleteकितीतरी प्रकार समजले! तुमच्या लिखाणातून!!👏🏻
ReplyDelete