Skip to main content

संकल्प + सातत्य = संकलन (काही अनुभवलेलं...)

 संकल्प + सातत्य = संकलन 
(काही अनुभवलेलं...) 




               सन २०२४ च्या अखेरीस भारतीय टपाल खात्याने एक स्पर्धा आयोजित केली होती "अडीच अक्षर" "ढाई अक्षर". आधीच बरीच कामं हाती घेतली होती, त्यामुळे खूप इच्छा असूनही या स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाही. तथापि त्या निमित्ताने आनंदी पावसात अजून एक नवीन सदर सुरू झाले! "अडीच अक्षर!"  या व्यतिरिक्त मी २०२५ च्या सुरुवातीला एक संकल्प केला, "येत्या वर्षात सर्वांना शुभेच्छा पत्राच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायच्या!" 
               या संकल्पाच्या निमित्ताने, निरनिराळ्या प्रकारच्या शुभेच्छा पत्रांचे परत एकदा रेखाटन सुरू झाले. हो, परत एकदा, कारण अगदी अलीकडे काही वर्षांपर्यंत मी अगदी नियमित हे काम करत असे. तथापि मधल्या काही वर्षांत डिजिटल माध्यमांचे वर्चस्व वाढले अणि मी सुद्धा याच माध्यमाचा वापर करू लागले. त्यामुळे ही रेखाटने मागे पडली. त्याचे फार वाईट सुद्धा वाटत होते. 
               एका वर्षात निमित्त तरी किती! माझी तर पुरती दमछाक झाली. मग शक्य तितकी शुभेच्छा पत्र हाताने रेखाटून केली तर काही डिजिटल माध्यमाचा वापर करून तयार केली अणि काही दोन्ही माध्यमांचा वापर करून तयार केली. तथापि हाताने रेखाटने करून ती प्रत्यक्ष टपाल स्वरुपात पाठविण्यात जो आनंद मिळाला त्याची सर इतरांना नाहीच! तथापि या नवीन माध्यमामुळे तत्परतेने वेळ साधता आली, हे मान्यच करावे लागेल! 
                पूर्वी टपाल मिळाल्याचा एक सुखद धक्का बसत असे अणि त्यातून अपरिमित आनंद मिळत असे. हल्ली मात्र यातील सुखद धक्का प्रकार लुप्त झाला आहे. कारण ज्या क्षणी तुम्ही टपाल खात्यात नोंदणी करता त्याक्षणी पाठवणाऱ्याला तर संदेश मिळतोच परंतु ज्याला पाठविले आहे त्याला सुद्धा एक संदेश मिळतो. त्यामुळे त्यांना आधीच माहिती होते त्याबद्दल! त्यामुळे surprise मधून मिळणारा आनंद गायब होतो. असो. सुरक्षेच्या दृष्टीने ते योग्यच आहे. काही महत्त्वाची कागदपत्रे असतील आणि गहाळ झाली तर शोधण्यास नक्कीच मदत होते, याचा मी पुरेपुर अनुभव घेतला आहे. टपाल खात्याच्या सुविधेला पर्याय नाही, तेही अगदी वाजवी दरात! टपाल खाते प्रेम! 
               काही वेळा तारीख नीट लक्षात येत नाही, काही वेळा इतर कामाच्या व्यापात हे काम राहून जात असे. मग अशा वेळी मी काढलेल्या प्रकाशचित्रांचा वापर करून काही शुभेच्छा पत्र तयार केली. यातही एक आगळा आनंद मिळाला हे मान्यच करावे लागेल, परत वेळ वाचून वेळ साजरी करता आली! 
               काही वेळा स्वतः केलेली शुभेच्छा पत्र तयार होती, तथापि ती टपाल खात्याने पाठविणे शक्य झाले नाही. अशा वेळी त्याचाच वापर करून डिजिटल शुभेच्छा पत्र तयार करून ते, त्या त्या व्यक्ति पर्यंत डिजिटल माध्यामातून पोहोचते केले. डिजिटल माध्यमाची आगळी जादू!
               हे काही एखादे महत्त्वाचे वर्ष ठरवून केले नव्हते. तथापि योगायोग म्हणजे कुणाची पंच्याहत्तरी, कुणाची पन्नाशी, कुणाची पंचविशी, कुणाचे लग्न असे एक ना अनेक महत्त्वाचे योग आले अणि ते सर्व या छोट्याशा संकल्पाने, विशेष पद्धतीने साजरे झाले! असीम आनंद! 
               एक छोटासा संकल्प केला, त्यात सातत्य ठेवले अणि वर्ष अखेरीस पाहिले तर या शुभेच्छा पत्रांचे एक भले थोरले संकलन झाल्याचे लक्षात आले! खाली या संकलनाची झलक स्वरुपात काही शुभेच्छा पत्र आहेतच, अर्थातच डिजिटल माध्यामातून आपल्या पर्यंत पोहोचवित आहे! झलक आहे कारण काहींचे छायाचित्र घ्यायचे विसरले अणि तसेच पाठवून दिले, तर काही डिजिटल स्वरूपातील खोडून टाकले वगैरे वगैरे अशा अनेक कारणांमुळे सर्व संकलन माझ्याकडे झालेच नाही. या सगळ्या बद्दल आपल्याला काय वाटले ते जाणून घेण्यास उत्सुक आहे... आपल्या अभिप्रायातुन नक्की कळवा! 






























































आनंदी पाऊस 
(काही अनुभवलेले...) 
१ जानेवारी २०२६ 


Comments

  1. डॉ दीपक शिरसाठJanuary 01, 2026 7:32 am

    छान लेख

    ReplyDelete
  2. दीपाली कात्रेJanuary 01, 2026 7:34 am

    आठवतात मला ही पत्र

    ReplyDelete
  3. छान शुभेच्छा पत्रे आणि लेखही.
    —-प्रा वैशाली चौधरी

    ReplyDelete
  4. संगीता निर्मळJanuary 01, 2026 8:00 am

    अप्रतिम लेख. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप सार्‍या शुभेच्छा. ✨✨✨💐💐💐💐💐

    ReplyDelete
  5. रमेश शिवडेकरJanuary 01, 2026 8:00 am

    जय श्रीराम...!!! 🙏🏻🙏🏻
    जय हिंद...!!!

    स्व लिखित/हस्तलिखित पत्रं अथवा शुभेच्छा खासच असायच्या....त्यांना आजही तोड नाही. तू ही आवड जपून ठेवली आहेस, पण पोस्टाद्वारे त्या अपेक्षित व्यक्तीला पोहोचतील याचीच शाश्वती नाही....असो !!

    सर्वांना नवीन वर्ष २०२६ साठी अनेक हार्दिक शुभेच्छा......
    💐💐🚩🚩🇮🇳🇮🇳👍👍

    ReplyDelete
  6. शुभांगी पाटीलJanuary 01, 2026 8:57 am

    सुंदर..... पत्र लेखन हे आनंद देणारे क्षण होते.
    शुभांगी

    ReplyDelete
  7. डॉ सुनील पुरीJanuary 01, 2026 9:59 am

    अप्रतिम, जुन्या आठवणींना उजाळा

    ReplyDelete
  8. भारती फेगडेJanuary 02, 2026 10:44 am

    खुप सुंदर!!!

    ReplyDelete
  9. डॉ रा श्री मोरवंचीकरJanuary 02, 2026 10:45 am

    🌳🍦👣

    ReplyDelete
  10. शुभेच्छा पत्र सुंदर 👌
    जुन्या आठवणी जाग्या झाला ़ लेखही छान

    ReplyDelete
  11. कोकिळा ढाकेJanuary 06, 2026 6:33 pm

    👌🏻👌🏻 खूप छान संकल्प व शुभेच्छा पत्रे सुद्धा . मी त्या पोष्ट स्पर्धेत सहभागी झाले होते पण पुढे काय झाले कळलेच नाही .

    ReplyDelete
  12. वसंत बापट यांनी, इंदिरा संतांची...कितीतरी कविता आठवल्या...
    सुरेख रेखाटने👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दळणं (घरातील गमती जमती)

दळणं (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                  ...

दाय गंडोरी-पद्धत१(मिरचीची भाजी)(थोडं झणझणीत...)

  दा य गंडोरी-पद्धत१ (मिरचीची भाजी)   (थोडं झणझणीत...)                           दाय गंडोरी ! खास खानदेशी शब्द आणि खास खानदेशी भाजी! अवघ्या खानदेश वासीयांची अतिशय लाडकी, आवडती भाजी.                          दाय गंडोरी यातील दाय शब्दाचा अर्थ आहे डाळ आणि गंडोरी म्हणजे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे. थोडक्यात मिरचीची डाळ घालून केलेली भाजी. दाय गंडोरी खास 'लेवा गणबोली' तील शब्द!                          यासाठी लागणारे साहित्य म्हणजे तुरीची डाळ, हिरव्या मिरच्या, आंबटचुका, वांग, कच्चे टमाटे, आलं, लसूण, हळद, शेंगदाणा कुट, सुक्या खोबऱ्याचा कीस, भरपूर, खूप सारी कोथिंबीर, तेल मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि मीठ. उपरोक्त उल्लेखाप्रमाणेच ही भाजी अतिशय झणझणीत असते. परंतु आता सगळेच तिखट थोड्या कमी प्रमाणात खातात त्यामुळे फार तिखट नसते. पण आवड असलेले, पट्टीचे खाणारे असलेल्या घरांतून अजूनही चांगली झणझणी...

चीकन मधील आंबा (घरातील गमती जमती)

चीकन मधील आंबा   (घरातील गमती जमती)                               लेखाचे नाव वाचून चमकलात ना? आता हा कुठला नवीन पदार्थ? नेमका चीकन पासून बनवलेला? की आंब्यापासून? की दोघंही वापरून? सांगते, सगळं सांगते या बद्दल. मला अगदी खात्री आहे, सगळे समजल्यावर तुम्ही सगळे सुद्धा प्रेमात पडाल, आमच्या सारखे, या चीकन मधील आंब्याच्या! खरतर मी सुद्धा अशीच चमकले होते काही वर्षांपूर्वी. माझ्या थोरल्या बहिणीचा संदेश आला होता मला. त्यात तिने लिहिले होते, चीकन मधील आंबा आठवतो का? मी आजच खाल्ला! कित्ती डोकेफोड केली, खूप आठवायचा प्रयत्न केला, ती नक्की काय सांगते आहे यावर. पण काही केल्या काही आठवेना आणि काहीच कळेना. शेवटी तिला फोन केला आणि तिलाच विचारले काय संदेश आहे हा? याचा नेमका अर्थ काय? मग तिने जे काही उत्तर दिले ते ऐकून, त्याक्षणी मी भूतकाळातील स्वर्गीय दिवसांमध्ये पोहोचले. ते दिवस, तो आनंद आठवला आणि आता ते दिवस नाहीत म्हणून खूप वाईटही वाटले...    ...