Skip to main content

संकल्प + सातत्य = संकलन (काही अनुभवलेलं...)

 संकल्प + सातत्य = संकलन 
(काही अनुभवलेलं...) 




               सन २०२४ च्या अखेरीस भारतीय टपाल खात्याने एक स्पर्धा आयोजित केली होती "अडीच अक्षर" "ढाई अक्षर". आधीच बरीच कामं हाती घेतली होती, त्यामुळे खूप इच्छा असूनही या स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाही. तथापि त्या निमित्ताने आनंदी पावसात अजून एक नवीन सदर सुरू झाले! "अडीच अक्षर!"  या व्यतिरिक्त मी २०२५ च्या सुरुवातीला एक संकल्प केला, "येत्या वर्षात सर्वांना शुभेच्छा पत्राच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायच्या!" 
               या संकल्पाच्या निमित्ताने, निरनिराळ्या प्रकारच्या शुभेच्छा पत्रांचे परत एकदा रेखाटन सुरू झाले. हो, परत एकदा, कारण अगदी अलीकडे काही वर्षांपर्यंत मी अगदी नियमित हे काम करत असे. तथापि मधल्या काही वर्षांत डिजिटल माध्यमांचे वर्चस्व वाढले अणि मी सुद्धा याच माध्यमाचा वापर करू लागले. त्यामुळे ही रेखाटने मागे पडली. त्याचे फार वाईट सुद्धा वाटत होते. 
               एका वर्षात निमित्त तरी किती! माझी तर पुरती दमछाक झाली. मग शक्य तितकी शुभेच्छा पत्र हाताने रेखाटून केली तर काही डिजिटल माध्यमाचा वापर करून तयार केली अणि काही दोन्ही माध्यमांचा वापर करून तयार केली. तथापि हाताने रेखाटने करून ती प्रत्यक्ष टपाल स्वरुपात पाठविण्यात जो आनंद मिळाला त्याची सर इतरांना नाहीच! तथापि या नवीन माध्यमामुळे तत्परतेने वेळ साधता आली, हे मान्यच करावे लागेल! 
                पूर्वी टपाल मिळाल्याचा एक सुखद धक्का बसत असे अणि त्यातून अपरिमित आनंद मिळत असे. हल्ली मात्र यातील सुखद धक्का प्रकार लुप्त झाला आहे. कारण ज्या क्षणी तुम्ही टपाल खात्यात नोंदणी करता त्याक्षणी पाठवणाऱ्याला तर संदेश मिळतोच परंतु ज्याला पाठविले आहे त्याला सुद्धा एक संदेश मिळतो. त्यामुळे त्यांना आधीच माहिती होते त्याबद्दल! त्यामुळे surprise मधून मिळणारा आनंद गायब होतो. असो. सुरक्षेच्या दृष्टीने ते योग्यच आहे. काही महत्त्वाची कागदपत्रे असतील आणि गहाळ झाली तर शोधण्यास नक्कीच मदत होते, याचा मी पुरेपुर अनुभव घेतला आहे. टपाल खात्याच्या सुविधेला पर्याय नाही, तेही अगदी वाजवी दरात! टपाल खाते प्रेम! 
               काही वेळा तारीख नीट लक्षात येत नाही, काही वेळा इतर कामाच्या व्यापात हे काम राहून जात असे. मग अशा वेळी मी काढलेल्या प्रकाशचित्रांचा वापर करून काही शुभेच्छा पत्र तयार केली. यातही एक आगळा आनंद मिळाला हे मान्यच करावे लागेल, परत वेळ वाचून वेळ साजरी करता आली! 
               काही वेळा स्वतः केलेली शुभेच्छा पत्र तयार होती, तथापि ती टपाल खात्याने पाठविणे शक्य झाले नाही. अशा वेळी त्याचाच वापर करून डिजिटल शुभेच्छा पत्र तयार करून ते, त्या त्या व्यक्ति पर्यंत डिजिटल माध्यामातून पोहोचते केले. डिजिटल माध्यमाची आगळी जादू!
               हे काही एखादे महत्त्वाचे वर्ष ठरवून केले नव्हते. तथापि योगायोग म्हणजे कुणाची पंच्याहत्तरी, कुणाची पन्नाशी, कुणाची पंचविशी, कुणाचे लग्न असे एक ना अनेक महत्त्वाचे योग आले अणि ते सर्व या छोट्याशा संकल्पाने, विशेष पद्धतीने साजरे झाले! असीम आनंद! 
               एक छोटासा संकल्प केला, त्यात सातत्य ठेवले अणि वर्ष अखेरीस पाहिले तर या शुभेच्छा पत्रांचे एक भले थोरले संकलन झाल्याचे लक्षात आले! खाली या संकलनाची झलक स्वरुपात काही शुभेच्छा पत्र आहेतच, अर्थातच डिजिटल माध्यामातून आपल्या पर्यंत पोहोचवित आहे! झलक आहे कारण काहींचे छायाचित्र घ्यायचे विसरले अणि तसेच पाठवून दिले, तर काही डिजिटल स्वरूपातील खोडून टाकले वगैरे वगैरे अशा अनेक कारणांमुळे सर्व संकलन माझ्याकडे झालेच नाही. या सगळ्या बद्दल आपल्याला काय वाटले ते जाणून घेण्यास उत्सुक आहे... आपल्या अभिप्रायातुन नक्की कळवा! 






























































आनंदी पाऊस 
(काही अनुभवलेले...) 
१ जानेवारी २०२६ 


Comments

  1. डॉ दीपक शिरसाठJanuary 01, 2026 7:32 am

    छान लेख

    ReplyDelete
  2. दीपाली कात्रेJanuary 01, 2026 7:34 am

    आठवतात मला ही पत्र

    ReplyDelete
  3. छान शुभेच्छा पत्रे आणि लेखही.
    —-प्रा वैशाली चौधरी

    ReplyDelete
  4. संगीता निर्मळJanuary 01, 2026 8:00 am

    अप्रतिम लेख. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप सार्‍या शुभेच्छा. ✨✨✨💐💐💐💐💐

    ReplyDelete
  5. रमेश शिवडेकरJanuary 01, 2026 8:00 am

    जय श्रीराम...!!! 🙏🏻🙏🏻
    जय हिंद...!!!

    स्व लिखित/हस्तलिखित पत्रं अथवा शुभेच्छा खासच असायच्या....त्यांना आजही तोड नाही. तू ही आवड जपून ठेवली आहेस, पण पोस्टाद्वारे त्या अपेक्षित व्यक्तीला पोहोचतील याचीच शाश्वती नाही....असो !!

    सर्वांना नवीन वर्ष २०२६ साठी अनेक हार्दिक शुभेच्छा......
    💐💐🚩🚩🇮🇳🇮🇳👍👍

    ReplyDelete
  6. शुभांगी पाटीलJanuary 01, 2026 8:57 am

    सुंदर..... पत्र लेखन हे आनंद देणारे क्षण होते.
    शुभांगी

    ReplyDelete
  7. डॉ सुनील पुरीJanuary 01, 2026 9:59 am

    अप्रतिम, जुन्या आठवणींना उजाळा

    ReplyDelete
  8. भारती फेगडेJanuary 02, 2026 10:44 am

    खुप सुंदर!!!

    ReplyDelete
  9. डॉ रा श्री मोरवंचीकरJanuary 02, 2026 10:45 am

    🌳🍦👣

    ReplyDelete
  10. शुभेच्छा पत्र सुंदर 👌
    जुन्या आठवणी जाग्या झाला ़ लेखही छान

    ReplyDelete
  11. कोकिळा ढाकेJanuary 06, 2026 6:33 pm

    👌🏻👌🏻 खूप छान संकल्प व शुभेच्छा पत्रे सुद्धा . मी त्या पोष्ट स्पर्धेत सहभागी झाले होते पण पुढे काय झाले कळलेच नाही .

    ReplyDelete
  12. वसंत बापट यांनी, इंदिरा संतांची...कितीतरी कविता आठवल्या...
    सुरेख रेखाटने👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दळण (घरातील गमती जमती)

दळण (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                   ...

💃गुलाबाईची गाणी💃 (गच्चीवरील गमती जमती )

  💃गुलाबाईची गाणी💃  (गच्चीवरील गमती जमती ) 💃💃💃💃💃💃💃💃💃💃 💃गुलाबाईची गाणी💃  पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा गुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून गुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा गुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउले पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून गुलाबाईचे माहेर दिसे. 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃  सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफि...

थोडं (खूप सारं😉😆) गोडाचं-१(दराबा) (घरातील गमती जमती)

थोडं (खूप सारं) गोडाचं-१(दराबा) (घरातील गमती जमती)                                                          घरात सगळेच खाण्याचे शौकीन, मुख्य म्हणजे आमचे बाबा सुद्धा! त्यामुळे सारखं काही ना काही करणं आणि खाणं अखंडपणे चालूच असे. खाण्याच्या बाबतीत तर सगळ्यांचा भरपूर उत्साह होताच, पण करणाऱ्यांचा (सगळ्या मम्मी लोकांचा) सुद्धा उत्साह तेव्हढाच किंवा काकणभर जरा जास्तच मी तर म्हणेन. सगळं अगदी उत्साहाने करत. त्यांच्या या उत्साहाला आणि मेहनतीला तर कायमच आणि वारंवार सलाम करावासा वाटतो. कारण कुठलीही गोष्ट करायची असो, कधीही थोडी थोडकी करून भागतच नसे. त्यामुळे खूप बांधीलकी आणि वचनबद्धता असणे आवश्यक असे. बरं त्यांनी कुठलीही गोष्ट करायची म्हणून केली असे होत नसे . सगळं अगदी साग्रसंगीतच, योग्य आणि व्यवस्थितच करत असतं. जणू कंटाळा, थकवा असले शब्दच त्यांना माहीती नव्हते.  बरं घरातील सगळेच, सगळ्याच  म्हणजे गोड, तिखट, मसालेदार, चटपटीत, आंबटगोड अशा ...