Skip to main content

आरोग्यदायी पेय(काही अनुभवलेलं...)

 आरोग्यदायी पेय
(काही अनुभवलेलं...)






गोकर्णाच्या फुलांचे पेय
दाराशी गोकार्णाचा वेळ असेल तर ताजी फुले वापरून हे पेय तयार करता येते.
दाराशी नसेल तर, ज्यांच्याकडून मिळू शकतील, त्यांच्याकडून घेऊन कडकडीत वळवून 
ठेवून सुद्धा हे पेय तयार करता येते.
उकळत्या पाण्यात ही फुले टाकावी किंवा 
पाणी गरम करण्याच्या विजेरी उपकरणात पाणी गरम करून, 
ते पेल्यात घालावे आणि त्यातच ही फुले घालावी आणि काही मिनिटे 
पेला झाकून ठेवावा. पाण्यात फुलांचा रंग उतरला की झाले हे पेय तयार.
त्याला चव असते, परंतु अगदी सौम्य!
थोडी चव हवी असेल तर आवडीप्रमाणे लिंबाचा रस घालू शकता. 
वाळलेल्या गोकर्णाच्या फुलांचा चहा म्हणून ही वाळलेली फुले 
असलेले डबे विकत सुद्धा मिळतात, अतिशय महाग!


पाण्यात हळद आणि थोडीशी दालचिनी घालून पाणी उकळावे.
पाणी साधारण ७५ टक्के होईपर्यंत उकळावे.
झाले तयार हे पेय.


यात मी गाजर, आवळा आणि बीट घातले आहे.
सर्व जिन्नस मिक्सर मध्ये घालून फिरवून घ्यावी, त्यात पाणी 
घालावे आवडतं असल्यास काळे मीठ, रक्तदाबाचा त्रास नसल्यास 
साधे मीठ सुद्धा घालू शकता.


फक्त गाजराचा रस



हे पेय म्हणजे फक्त हळद गरम पाण्यात उकळून,
पाणी ७५ टक्के होई पर्यंत उकळू देणे.


गोकर्णाची फुलं वापरण्या ऐवजी जास्वंदाची फुले 
वापरून, त्याच पद्धतीने हे पेय तयार करावे.
वाळलेल्या जास्वंदाच्या फुलांचा चहा म्हणून ही वाळलेली फुले 
असलेले डबे विकत सुद्धा मिळतात, अतिशय महाग!





हे हरित पेय माझ्या अतिशय आवडीचे!
यात कोथिंबीर, पुदिना, आवळा, पेरू, गाजर 
आणि काळे मीठ एकत्र करून तयार केलेले आहे.
यापैकी एखादे जिन्नस घरात नसेल तर त्याशिवाय सुद्धा 
मी हे पेय तयार करते.
किंवा पेरू नसेल तर लाल टमाटे घालते.

उपरोक्त सर्व पेय गरम पाण्यात तयार केली आणि गरमच प्यायले तर अतीशय उत्तम!
©️®️आनंदी पाऊस
(काही आरोग्यदायी...)
२१ ऑगस्ट २०२६





Comments

Popular posts from this blog

दळणं (घरातील गमती जमती)

दळणं (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                  ...

चीकन मधील आंबा (घरातील गमती जमती)

चीकन मधील आंबा   (घरातील गमती जमती)                               लेखाचे नाव वाचून चमकलात ना? आता हा कुठला नवीन पदार्थ? नेमका चीकन पासून बनवलेला? की आंब्यापासून? की दोघंही वापरून? सांगते, सगळं सांगते या बद्दल. मला अगदी खात्री आहे, सगळे समजल्यावर तुम्ही सगळे सुद्धा प्रेमात पडाल, आमच्या सारखे, या चीकन मधील आंब्याच्या! खरतर मी सुद्धा अशीच चमकले होते काही वर्षांपूर्वी. माझ्या थोरल्या बहिणीचा संदेश आला होता मला. त्यात तिने लिहिले होते, चीकन मधील आंबा आठवतो का? मी आजच खाल्ला! कित्ती डोकेफोड केली, खूप आठवायचा प्रयत्न केला, ती नक्की काय सांगते आहे यावर. पण काही केल्या काही आठवेना आणि काहीच कळेना. शेवटी तिला फोन केला आणि तिलाच विचारले काय संदेश आहे हा? याचा नेमका अर्थ काय? मग तिने जे काही उत्तर दिले ते ऐकून, त्याक्षणी मी भूतकाळातील स्वर्गीय दिवसांमध्ये पोहोचले. ते दिवस, तो आनंद आठवला आणि आता ते दिवस नाहीत म्हणून खूप वाईटही वाटले...    ...

दाय गंडोरी-पद्धत१(मिरचीची भाजी)(थोडं झणझणीत...)

  दा य गंडोरी-पद्धत१ (मिरचीची भाजी)   (थोडं झणझणीत...)                           दाय गंडोरी ! खास खानदेशी शब्द आणि खास खानदेशी भाजी! अवघ्या खानदेश वासीयांची अतिशय लाडकी, आवडती भाजी.                          दाय गंडोरी यातील दाय शब्दाचा अर्थ आहे डाळ आणि गंडोरी म्हणजे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे. थोडक्यात मिरचीची डाळ घालून केलेली भाजी. दाय गंडोरी खास 'लेवा गणबोली' तील शब्द!                          यासाठी लागणारे साहित्य म्हणजे तुरीची डाळ, हिरव्या मिरच्या, आंबटचुका, वांग, कच्चे टमाटे, आलं, लसूण, हळद, शेंगदाणा कुट, सुक्या खोबऱ्याचा कीस, भरपूर, खूप सारी कोथिंबीर, तेल मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि मीठ. उपरोक्त उल्लेखाप्रमाणेच ही भाजी अतिशय झणझणीत असते. परंतु आता सगळेच तिखट थोड्या कमी प्रमाणात खातात त्यामुळे फार तिखट नसते. पण आवड असलेले, पट्टीचे खाणारे असलेल्या घरांतून अजूनही चांगली झणझणी...