Skip to main content

कलात्मक धातू (बुडापेस्ट)(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

कलात्मक धातू (बुडापेस्ट)
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

               कला, मग ती कुठल्याही माध्यमातील असो, बघणाऱ्या रसिकाला भरभरून आनंद देते. तथापि कला केव्हा बहरास येते, तर सर्वत्र शांतता(राजकीय) असेल, पोटं भरलेली असतील वगैरे वगैरे. असे असले तरी प्रत्येक गोष्टीला अपवाद हे असतातच. सर्वज्ञात उदाहरण द्यायचे झाले तर व्हॅन गाॅख. आज सर्वत्र या चित्रकलेचे प्रचंड कौतुक होते, अगदी अभिमानाने सांगितले जाते, व्हॅन गाॅखचे हे पेंटिंग माझे अत्यंत आवडीचे आहे. वगैरे. त्याने स्वतःचीच बरीच व्यक्तीचित्रं केली. जोपर्यंत त्याबद्दल सखोल माहिती नसते तोपर्यंत वाटते, स्वतःवरच्या प्रेमामुळे त्याने ती केली. पण खरी माहिती समजली की लक्षात येते, उत्तम कला साकारण्यासाठी कलाकार कुठल्याही चांगल्या परिस्थितीची वाट बघत नाही. असेल त्या परिस्थितीत उतमोत्तम कलाकृती साकारतो. असो.
               उपरोक्त विषय मनात आला, कारण आज युरोपातील काही कलेचे नमुने सादर करत आहे. ते सर्वच अतिशय उत्तम आहेत, त्यामुळेच ते इथे सादर होत आहे, हे उघड आहे. तर हे असे का? आपल्याकडे का जिथे तिथे अशा कलाकृती बघायला मिळत नाही? हे प्रश्नचिन्ह मनात उभे राहिले. याकारणे वरील विचार मांडला. आपल्याकडे बऱ्याच अडचणी आहेत, परंतु तितक्याच मोठ्या प्रमाणात कलाकार सुद्धा आहे. आजकाल आंतरजालामुळे ते काही प्रमाणात आपल्या पर्यंत पोहोचू शकतात, पण त्याचे फारसे मोल होत नाही. असो, हा फार विस्तीर्ण विषय आहे, त्यावर नंतर कधीतरी.
              अलीकडेच बुडापेस्ट, हंगेरीची राजधानी असलेल्या शहरास भेट देण्याचा योग आला. ही भेट अगदी दीड दिवसापेक्षाही कमी कालावधीची होती. ह्या भेटीत बुडा किल्ल्याला भेट दिली. तथापि इतक्या छोट्या कालावधीत ह्या बुडा किल्ल्यात, प्रत्येक आणि सर्व माध्यमातील कलेचे नमुने बघायला मिळाले. ह्यातील प्रत्येक माध्यमातील प्रत्येक नमुना अतिशय उत्कृष्ट! प्रत्येक वेळी तोंडात बोट घालण्याची वेळ येत होती. त्यापैकी शक्य तितक्या माध्यमातील कलाकृती छायाचित्रं माध्यमात दस्तावेजीकरण करून घेतल्या. आजचा विषय आहे. धातू! अर्थातच कलात्मक धातू! 
               हे कलात्मक धातूचे नमुने किती वेगवेगळ्या प्रकारात, आकारात, मापात, घटकात बघायला मिळाले, याची मोजदाद करणे केवळ अशक्य. आपण स्वतः बघा, म्हणजे मला काय म्हणायचे आहे ते नीट कळेल.
               


प्याऊ किंवा पिण्याच्या पाण्याचा नळ 


भित्ती दिवा 

सायकल लावण्यासाठीची सोय, रचना 

झाडाभोवतीची जाळी

मुख्य दरवाज्याचे डोळा छिद्र 

झाडाभोवतीची जाळी

चर्च कळस

मुख्य दाराची मुठ 

कुंपणासाठीची साखळी

घर क्रमांक आणि नाव लिहिण्यासाठीचा फलक

दाराची मुठ 

हवा खेळती राहण्यासाठी जाळी

नावाचा फलक 

मुख्य दरवाजा मुठ 
आणि डोळा झरोका 

मुख्य दरवाज्यावरील अंकात्मक(डिजिटल) कुलूप

कचरा टोपली

नावाचा फलक

रस्त्यावरील विजेरी दिवे आणि खांब 

विजेरी दिवा आणि खांब 

कचरा पेटी 

फाटकाचा भाग 
कलश सदृश्य नक्षी 

संपूर्ण फाटक 

ऊन आणि पावसापासून बचाव
व्हावा म्हणून असलेली घडीची छत्री 

विजेरी दिवा आणि खांब 

लाडकी टपाल पेटी 
©️®️आनंदी पाऊस
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)
२८ सप्टेंबर २०२६


Comments

  1. Antiques👍
    Very nice👌👌

    ReplyDelete
  2. निखिल महाजनNovember 20, 2026 12:08 pm

    Mast 😊👌👍

    ReplyDelete
  3. अनिला फडणवीसNovember 20, 2026 12:09 pm

    हो अत्यंत मजबूत काम केलेले असते, आणि नतद्रष्ट ते उखडूनही नेत नाहीत. रस्तो रस्ती अशी कलात्मकता दिसते. आणि उन्हाळ्यात खांबांवर टांगलेल्या डिझाईनच्या रंगीत फुले लोंबणाऱ्या कुंड्या खूप छान दिसतात.

    ReplyDelete
  4. ज्योती किरंगेNovember 20, 2026 12:10 pm

    👏🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  5. Mast 👌👌👍

    ReplyDelete
  6. मंजुषा चौधरीNovember 20, 2026 4:04 pm

    मस्त 😍

    ReplyDelete
  7. डॉ सुभाष ओरसकरNovember 20, 2026 4:08 pm

    छान 👌

    ReplyDelete
  8. डॉ दीपक शिरसाठNovember 20, 2026 4:08 pm

    छान

    ReplyDelete
  9. मिलिंद ढेरेNovember 20, 2026 4:10 pm

    👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दळणं (घरातील गमती जमती)

दळणं (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                  ...

चीकन मधील आंबा (घरातील गमती जमती)

चीकन मधील आंबा   (घरातील गमती जमती)                               लेखाचे नाव वाचून चमकलात ना? आता हा कुठला नवीन पदार्थ? नेमका चीकन पासून बनवलेला? की आंब्यापासून? की दोघंही वापरून? सांगते, सगळं सांगते या बद्दल. मला अगदी खात्री आहे, सगळे समजल्यावर तुम्ही सगळे सुद्धा प्रेमात पडाल, आमच्या सारखे, या चीकन मधील आंब्याच्या! खरतर मी सुद्धा अशीच चमकले होते काही वर्षांपूर्वी. माझ्या थोरल्या बहिणीचा संदेश आला होता मला. त्यात तिने लिहिले होते, चीकन मधील आंबा आठवतो का? मी आजच खाल्ला! कित्ती डोकेफोड केली, खूप आठवायचा प्रयत्न केला, ती नक्की काय सांगते आहे यावर. पण काही केल्या काही आठवेना आणि काहीच कळेना. शेवटी तिला फोन केला आणि तिलाच विचारले काय संदेश आहे हा? याचा नेमका अर्थ काय? मग तिने जे काही उत्तर दिले ते ऐकून, त्याक्षणी मी भूतकाळातील स्वर्गीय दिवसांमध्ये पोहोचले. ते दिवस, तो आनंद आठवला आणि आता ते दिवस नाहीत म्हणून खूप वाईटही वाटले...    ...

दाय गंडोरी-पद्धत१(मिरचीची भाजी)(थोडं झणझणीत...)

  दा य गंडोरी-पद्धत१ (मिरचीची भाजी)   (थोडं झणझणीत...)                           दाय गंडोरी ! खास खानदेशी शब्द आणि खास खानदेशी भाजी! अवघ्या खानदेश वासीयांची अतिशय लाडकी, आवडती भाजी.                          दाय गंडोरी यातील दाय शब्दाचा अर्थ आहे डाळ आणि गंडोरी म्हणजे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे. थोडक्यात मिरचीची डाळ घालून केलेली भाजी. दाय गंडोरी खास 'लेवा गणबोली' तील शब्द!                          यासाठी लागणारे साहित्य म्हणजे तुरीची डाळ, हिरव्या मिरच्या, आंबटचुका, वांग, कच्चे टमाटे, आलं, लसूण, हळद, शेंगदाणा कुट, सुक्या खोबऱ्याचा कीस, भरपूर, खूप सारी कोथिंबीर, तेल मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि मीठ. उपरोक्त उल्लेखाप्रमाणेच ही भाजी अतिशय झणझणीत असते. परंतु आता सगळेच तिखट थोड्या कमी प्रमाणात खातात त्यामुळे फार तिखट नसते. पण आवड असलेले, पट्टीचे खाणारे असलेल्या घरांतून अजूनही चांगली झणझणी...