रांगोळी नायिका - १
(व्यक्ती विशेष)
जशी पाखरे आभाळात पंख पसरुनी तरंगतात
दिसतील तैसे पतंग रंगीत
खेळ किती चांगला
पांढऱ्या शुभ्र रांगोळीने, दाराला सजवू या I
रंगांच्या उधळणीत, आज संस्कृती जपू या II
मी : नमस्कार
मला आपल्याशी बोलायचे आहे. शक्य होईल का?
त्या : बोला
कुठल्या ग्रुपवर आहात?
त्या : कशाच्या संदर्भात बोलायचे आहे?
मी : रांगोळी संदर्भात
.
.
.
मी : खादाड खाऊ गटावर
.
.
.
मी : मी ब्लॉग लिहिते
मला तुमच्या रांगोळी छंदाबद्दल लिहिण्याची इच्छा आहे.
तुमची परवानगी असेल तर.
त्यासाठी बोलायचे आहे.
त्या : तुमचा फोन लागत नाही.
मी परत नंबर दिला आणि त्यांचाही मागितला. मी फोन करते म्हटलं तर म्हणाल्या मी करते दुपारी.
यानंतर दैनंदिन कामाच्या व्यापात मला या संवादाचा विसर पडला. दुपारी बहिणीशी भ्रमणध्वनीवर बोलत होते. तर मध्येच एक अनोळखी नंबर वरून सारखा फोन येत होता, कुठल्यातरी टूर्स् आणि ट्रव्हल्स असे नाव येत होते. दोनदा लक्ष दिले नाही. कारण मी तसल्या कुणाशीही, कसल्याही प्रकारचा संपर्क केलेला नव्हता. तरीही प्रवास माझा वीक-पाॅइंट तसेच त्या फोन मुळे आमच्या दोघींच्या संवादात सारखी बाधा येत होती. बहिणीला म्हटले थांब तू जरा थोडा वेळ, मी जरा बघते हे कोण ते नक्की.
तो फोन घेतला आणि सांगाण्याच्याच बेतात होते, जरा वैतागूनच, का तुम्ही सारखा फोन करत आहात? मी तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची चौकशी केलेली नाही. परंतु पलीकडून अतिशय शांत शब्दांत संवाद सुरु झाला, मी तुम्हाला सांगितल्या प्रमाणे दुपारी फोन केलाय. मग माझ्या लक्षात आले कोण बोलतेय? आधी मी फोन का घेत नव्हते त्याचे कारण सांगितले, तर त्यांना आश्चर्यच वाटले. कारण त्यांनी सुद्धा त्या टूर्स बरोबर कधी प्रवास केलेला नव्हता. परंतु त्यांनी काहीतरी चौकशी केली होती त्यांच्याकडे. आम्ही दोघीही थक्क! काय म्हणावे याला? या तंत्र प्रगतीला? असो. त्यानंतर मात्र मी, ट्रु-काॅलरवर त्यांच्या नावाची दुरुस्ती केली.
पुढे मात्र आमचा छान संवाद सुरु झाला. त्या, "मी काही इतकी मोठी नाही, की कुणी माझ्यावर लिहावे." मी, "असे बोललात यातच सगळे आले. तुमच्यात काहीतरी खास असल्याशिवाय का मला तुमच्याबद्दल लिहावे वाटले?" आणि पुढे बराच वेळ हे संभाषण सुरु होते. कारण काहीही लिहायचे म्हटले की त्याबद्दल पूर्ण अभ्यास हवा, माहिती हवी, तरच त्याला काही अर्थ, अन्यथा अर्थहीन. शेवटास अशाच एकमेकींच्या संपर्कात राहू असे म्हणत, आम्ही परस्परांचा निरोप घेतला.
तर आज याची सविस्तर गोष्ट सांगते. हल्ली आपण संगणकावर, भ्रमणध्वनीवर अनेक सार्वजनिक माध्यमं हाताळतो, बघतो, काही वेळा त्यात सहभाग नोंदवितो. यापैकीच एक माध्यम आपण सारेच हाताळतो, मुख पुस्तिका. तर माझ्या खाण्याच्या आवडीमुळे मी यावर काही गटात देखील सामील झाले. त्यापैकी एक म्हणजे खादाड खाऊ. या गटावर खरतरं खाद्यपदार्थ, त्यांच्याबद्दल लेखन, त्यांची प्रकाशचित्रं या गोष्टी अपेक्षित होत्या.
या सगळ्या गोष्टी तर बघायला मिळतच होत्या. तथापि यासोबतच एक महिला त्यांनी स्वतः काढलेल्या रांगोळ्या, त्या-त्या दिवशी प्रकाशित करत असतं. आता रांगोळ्या काय सगळेच काढतात, काही तर अगदी दररोज. मग यांच्या रांगोळ्यांचे काय कौतुक?, असे वाटू शकते. तथापि त्यांची खासियत आहे आणि म्हणूनच आनंदी पावसात त्या समाविष्ट करणे मला आवश्यक वाटले. त्या बघून तर आनंद मिळेलच, परंतु एखादा छंद कुठल्या पातळीवर नेता येऊ शकतो, आपली सर्जनशीलता कशी योग्य दिशेला जाऊ शकते, वगैरे गोष्टींचा अंदाज येईल. इतकेच नव्हे तर, वाचकांना सुद्धा त्यातून प्रेरणा मिळेल, आपापले छंद अभ्यासपूर्ण रीतीने एका उच्च पातळीवर घेऊन जाता येतील, नवनवीन कल्पना सुचतील आणि एका स्वर्गीय सुंदर अशा आनंदाची अनुभूती मिळेल!
तर या रांगोळ्या मी नियमित बघत असे. सुरुवातीला अनोळखी व्यक्तीच्या आहेत म्हणून फक्त बघत असे, काही दिवसांनी मी स्वतःला लाईक कळ दाबण्यापासून रोखू शकले नाही, इतक्या त्या विशेष असतं. त्यातील रेषांची सुबकता, नीटनेटकेपणा, स्पष्टता, रंगसंगती, त्यातील विषय, नक्षीची क्लिष्टता सारे बघून वाटले, कुणीतरी तरुण महिलेचे हे काम असावे. तथापि त्यांनी त्यांच्या एका वाढदिवशी एक रांगोळी प्रकाशित करून सांगितले आज माझा वाढदिवस आहे, सोबत वयही सांगितले आणि मी थक्कच झाले. या साऱ्याबद्दल लिहावे आणि त्यांची ही कला जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवावी असे मनापासून वाटले. पण व्यक्ती अनोळखी. कसे विचारणार? कशी परवानगी काढणार? असे सगळे प्रश्न मनात उभे राहिले.
एके दिवशी ठरवले आणि त्यांच्याशी मेसेंजर माध्यमातून संपर्क केला. लेखाच्या सुरवातीला आलेला तोच हा संवाद. या संवादा दरम्यान असे कळले की आजच्या दिवशी म्हणजे २ मार्चला, त्या ७४ वर्ष पूर्ण करून ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. मग मनाशी ठरविलेच, त्यांना या खास जन्मदिनी आनंदी पावसाकडून ही लेखरुपी आनंदी भेट द्यावी! तर या रांगोळी नायिकेला या खास जन्मदिनानिमित्त
🌿🌿🌿
🌿झळाळत्या रंगांच्या,🌺
🌿झळाळत्या आनंदाच्या🌺
🌿खूप खूप🌺
🌿आनंदी शुभेच्छा!🌺
🌺🌺🌺
तर आता मुख्य विषय म्हणजे या खास रांगोळ्या आणि या छंदाबद्दल सांगते. त्यांचे रांगोळी कौशल्य पाहिले तर असे वाटले, अगदी वर्षानुवर्ष त्या रांगोळ्या काढत आहेत. परंतु तसे अजिबात नाही. करोना काळ आपण साऱ्यांनीच अनुभवला. सुरवातीला सारेच गोंधळून गेले होते, वेळ भरपूर होता, परंतु काय करावे समजत नव्हते. कालांतराने परिस्थितीचा अंदाज येऊन थोडी स्थिरता आल्यावर, प्रत्येकानेच सद्य परिस्थितीत जे जे शक्य होते, ते ते करायला सुरुवात केली. याच काळात यांनी म्हणजे स्वाती काणे यांनी फावल्या वेळात रांगोळ्या काढायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी एक लाकडी पाट तयार करून घेतला. काही काळ दाराबाहेर जानिमीवर बसून त्या रांगोळ्या काढत. तथापि रांगोळ्यांचे माप, त्यातील क्लिष्टता वगैरेचा विचार केला तर, वेळ हा एक महत्वाचा घटक. किती वेळ घराबाहेर बसणार? अशा वेळी तो पाट घरातच ठेवून त्यावर रांगोळी काढायची, जमिनीवर बसूनच. तथापि वय हा सुद्धा एक मुद्दा होताच. मग जितका वेळ बसता येईल तितका वेळ बसायचे, मग थोडावेळ उठायचे आणि इतर कामं किंवा थोडा आराम करायचा. पुढे उर्वरित रांगोळी पूर्ण करायची. रांगोळी प्रमाणे, मध्ये एक किंवा दोन-तीन वेळा उठायचे आणि रांगोळी पूर्ण करायचे. दुसरा उपाय म्हणजे टेबलवर पाट ठेवून उभ्याने रांगोळी काढायचे. जसे जमेल आणि शक्य होईल तसे. शेवटास रांगोळी पूर्ण झाली की मग हा पाट बाहेर ठेवायचा! हा झाला एक भाग.
दुसरा आणि महत्वाचा भाग म्हणजे रांगोळी! त्या-त्या दिन-विशेष प्रमाणे त्यांचे रांगोळीचे विषय ठरतात. रांगोळीसाठी त्यांना कुठलाही विषय वर्ज्य नाही. हल्ली बरेच पाश्चिमात्य दिन-विशेष साजरे केले जातात. या दिवसांना सुद्धा त्या विषयाप्रमाणे त्यांची विशेष रांगोळी साकारली जाते. बाकी आपले भारतीय सणवार, उत्सव, उपास-तपास, काही खास निमित्त हे विषय तर आहेतच. आधी यादीच देते या सगळ्या विषयांची आणि मग एकेक विषय घेऊन रांगोळ्या सुद्धा दाखवते. हे विषय आणि रांगोळ्या अगदी विविध प्रकारच्या आहेत. त्यामुळे या लेखात संपूर्ण यादी देते आणि काही विषयांच्या रांगोळ्या. बाकीच्या रांगोळ्या उर्वरित दोन-तीन भागात तर देईनच पण त्यासोबत रांगोळ्या, त्यांचा इतिहास, पद्धती, प्राचीनता आणि त्याचे उल्लेख अशी शक्य तितकी आणि अभ्यासपूर्ण माहिती सुद्धा देईन!
रांगोळीचे विषय - ही यादी जानेवारी महिन्यापासून सुरु केलेली आहे, ते डीसेंबर महिन्या पर्यंत अशी क्रमवार दिलेली आहे. सगळे हिंदू सण मराठी तिथी प्रमाणे असतात. त्यामुळे एखादा क्रम थोडा पुढे मागे झालेला असू शकतो.
१. नूतन वर्ष - १ जानेवारी
२. राष्ट्रीय पक्षी दिन - ५ जानेवारी ३. संक्रांत - १४/१५ जानेवारी
४. प्रजासत्ताक दिन - २६ जानेवारी
५. गणेश जयंती - माघ शुल्क चतुर्थी / तीलकुंड चतुर्थी / वरद चतुर्थी
४. प्रजासत्ताक दिन - २६ जानेवारी
५. गणेश जयंती - माघ शुल्क चतुर्थी / तीलकुंड चतुर्थी / वरद चतुर्थी
६. रथसप्तमी - माघ शुद्ध सप्तमी / अर्क सप्तमी / आरोग्य सप्तमी / अचला सप्तमी / माघी सप्तमी
७. व्हॅलेंटाईन डे - १४ फेब्रुवारी
८. शिवरात्री - फाल्गुन कृष्ण चतुर्दशी
८. शिवरात्री - फाल्गुन कृष्ण चतुर्दशी
९. शिव जयंती - १९ फेब्रुवारी
१०. सावरकर पुण्यतिथी - २६ फेब्रुवारी
१०. सावरकर पुण्यतिथी - २६ फेब्रुवारी
११. रंगपंचमी - फाल्गुन कृष्ण पंचमी
१२. महिला दिन - ८ मार्च
१३. गुढीपाडवा - चैत्र शुद्ध प्रतिपदा
१४. रामनवमी - चैत्र शुद्ध नवमी
१५. वसंत ऋतु
१२. महिला दिन - ८ मार्च
१३. गुढीपाडवा - चैत्र शुद्ध प्रतिपदा
१४. रामनवमी - चैत्र शुद्ध नवमी
१५. वसंत ऋतु
१६. अक्षय्य तृतीया - वैशाख शुद्ध तृतीया
१७. महाराष्ट्र दिन - १ मे
१८. मदर्स दे - मे महिन्याचा दुसरा रविवार
१९. आंतर राष्ट्रीय चहा दिवस - २१ मे
२०. वटपौर्णिमा - जेष्ठ पौर्णिमा
२१. जागतिक संगीत दिन - २१ जून
२१. जागतिक संगीत दिन - २१ जून
२२. आषाढी एकादशी - देवशयनी एकादशी - आषाढ शु एकादशी
२३. गुरुपौर्णिमा - आषाढ पौर्णिमा
२३. गुरुपौर्णिमा - आषाढ पौर्णिमा
२४. स्वातंत्र्य दिवस - १५ ऑगस्ट
२५. श्रावण
२६. नागपंचमी - श्रावण पंचमी
२७. राखी पौर्णिमा - श्रावण पौर्णिमा
२८. दहीहंडी - श्रावण कृष्ण अष्टमी, जन्माष्टमी
२९. मैत्री दिन - ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार
२५. श्रावण
२६. नागपंचमी - श्रावण पंचमी
२७. राखी पौर्णिमा - श्रावण पौर्णिमा
२८. दहीहंडी - श्रावण कृष्ण अष्टमी, जन्माष्टमी
२९. मैत्री दिन - ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार
३०. बैल पोळा - श्रावण आमावस्या
३१. गणेश चतुर्थी - भाद्रपद शु चतुर्थी
३१. गणेश चतुर्थी - भाद्रपद शु चतुर्थी
३२. ऋषी पंचमी - भाद्रपद शु पंचमी
३२. अनंत चतुर्दशी - भाद्रपद शु चतुर्दशी
३२. अनंत चतुर्दशी - भाद्रपद शु चतुर्दशी
३३. आंतर राष्ट्रीय टपाल दिन - ९ ऑक्टोंबर
३४. नवरात्र - आश्विन शुद्ध ते अश्विन शु नवमी
३५. भोंडला
३६. दसरा - विजया दशमी - अश्विन शु दशमी
३६. दसरा - विजया दशमी - अश्विन शु दशमी
३७. दिवाळी - अश्विन कृ एकादशी ते अश्विन शु द्वितीया
३८. बालदिन - १४ नोव्हेंबर
३९. तुळशीविवाह - कार्तिक शु द्वादशी
३८. बालदिन - १४ नोव्हेंबर
३९. तुळशीविवाह - कार्तिक शु द्वादशी
४०. दत्तजयंती - मार्गशीर्ष पौर्णिमा
४१. गणित दिवस - २२ डिसेंबर - श्रीनिवास रामानुजन जन्मदिन
४२. मार्गशीर्ष प्रारंभ
४१. गणित दिवस - २२ डिसेंबर - श्रीनिवास रामानुजन जन्मदिन
४२. मार्गशीर्ष प्रारंभ
४३. अयोध्या राम मंदिर सोहळा - १० दिवस १० रांगोळ्या
४४. विश्व चषक रांगोळी
४५. स्वस्तिक रांगोळ्या
४६. ससा रांगोळी
४७. पक्षी रांगोळ्या
४८. फुलपाखरू रांगोळ्या
४९. घर, झाड, हत्ती, आईस क्रीम रांगोळ्या
५०. ज्ञान कमळ.
अबब! किती हे विषय! हे तर झाले मुख्य विषय. परंतु यातील काही विषयांचे उपविषय आहेत किंवा काही विषय एक दिवसाचे तर, काही विषय एका पेक्षा जास्त दिवस म्हणजे नऊ-दहा दिवसांचे. बरं, त्या-त्या दिन विशेष रांगोळ्या काढून त्या थांबल्या नाहीत. या रांगोळ्यांची छायाचित्रं काढून, त्या सार्वजनिक माध्यमात प्रकाशित करू लागल्या. परंतु त्यांना वाटले फक्त या रांगोळ्या प्रकाशित करण्यापेक्षा त्या रांगोळ्यांना योग्य त्या शीर्षक ओळी लिहिल्या, तर जास्त छान वाटेल. मग त्यांनी त्या दृष्टीने विचार सुरु केले, थोडी आंतरजालाची आणि इतर माध्यमांची मदत घेतली. प्रत्येक रांगोळीला योग्य अशा शीर्षक ओळी लिहिल्या, कधी एक ओळ, तर कधी दोन कधी चार. त्यांच्या या आगळ्या रांगोळी प्रकल्पाला उदंड, अगदी भरभरून प्रतिसाद मिळाला! साऱ्यांनी आनंदाने स्वागत केले, साऱ्यांनाच मनापासून आवडले. मलाही अतिशय आवडले. हे लेखन त्याचे प्रत्यक्ष प्रमाण आहे!
तर आता त्यांच्या या रांगोळ्या त्यांच्या शीर्षका सहित, आपण साऱ्या आनंदी पावसाच्या वाचकांसाठी! परत एकदा त्यांना -
🍀🍀🍀
🍀जन्मदिनाच्या 🌾
🍀झळाळत्या 🌾
🍀रंगांच्या 🌾
🍀रांगोळी🌾
🍀भरून,🌾
🍀झळाळत्या 🌾
🍀रंगीत🌾
🍀आनंदी 🌾
🍀शुभेच्छा! 🌾
🌾🌾🌾
जानेवारी महिन्यापासून सुरुवात केलीय आणि क्रमवार विषय घेऊन त्या प्रमाणे रांगोळ्या प्रकशित केलेल्या आहेत. हे सर्व सुरळीत व्हावे म्हणून आम्ही दोघी सलग ५-६ दिवस तरी सोबतीने whatsapp वर बसत होतो. त्यांना मी विषयाप्रमाणे रांगोळ्या द्यायला सांगत होते आणि त्या शोधून शोधून मला पाठवत होत्या. अगदी टीम वर्क! दोघीनांही त्यातून खूप आनंद मिळाला. या प्रवासाचा आम्ही पुरेपूर आनंद लुटला. शेवटच्या दिवशी त्या म्हणाल्या, "तुम्हाला धन्यवाद.तुमच्या मुळे मी मागच्या रांगोळ्या बघितल्या आणि मला पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. २३० च्या आसपास आहेत सगळ्या मिळून. मलाही खुप आनंद झाला. ३ फेब्रुवारी ला रांगोळी पाठवायला केली ती कालपर्यंत.फेसबुक वरील रांगोळी चे स्क्रीन शाॅट निघत नव्हते.मग ते सेव्ह करून कॅप्शन टाईप करून पाठवत होते. विषयवार रांगोळ्या शोधून पाठवत होते. कालपर्यंतचे दिवस खुप छान गेले. अभ्यास झाला. काॅलेज मध्ये असल्याचा फील आला. सगळं भारीच. याचं क्रेडिट नक्कीच तुम्हाला आहे. मी खुप सिनियर आहे. या वयात कोणीतरी आपल्याला प्रोत्साहन देत आहे, हे किती छान वाटतंय ते शब्दात नाही सांगता येणार. तुझा उपक्रम अगदी स्तुत्य आहे. मी आनंदी पाऊस आवर्जून वाचत जाईन."
आणि आता ह्या त्यांच्या रांगोळ्या...
सुरवातीला ठरविले, त्यांच्या ७५ व्या वर्षात पदार्पण म्हणून त्यांच्याच ७५ रांगोळ्यांची भेट देऊ या त्यांना. तथापि आधीच विषय अनेक, त्यात बऱ्याचश्या विषयांच्या एका पेक्षा जास्त रांगोळ्या. कितीही संख्या कमी केली तरी ७५ च्या वरच जात होती. त्यामुळे या रांगोळ्या चार भागात विभागल्या आणि त्याचे चार भाग केले. प्रत्येक भागात त्यांच्या रांगोळ्या सोबत रांगोळी बद्दल निरनिराळी माहिती दिलेली आहे. जसे रांगोळीची प्राचीनता, इतिहास, संदर्भ, प्रदेश भिन्नता वगैरे वगैरे
©️®️आनंदी पाऊस
(व्यक्ती विशेष)
८ जानेवारी २०२६
जीवन गाणे गातच जावे...
झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे...
२०२५ ला निरोप आणि २०२६ चे हार्दिक स्वागत.....
किलबिल किलबिल पक्षी बोलती...
आज राष्ट्रीय पक्षीदिन...
५ जानेवारी
आठवणीतील चंद्रकळेवर हळदीकुंकू डाग पडे.....
संक्रांतीचे वाण घ्यावया पदर होतसे सहज पुढे...
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...
१४/१५ जानेवारी
भारतमाता आमुची माता...
आम्ही गातो या जयगीता...
हिमालयाच्या उंच शिरावर फडकत राही निशाण..
आमुचा भारतदेश महान...
प्रजासत्ताक दिन
२६ जानेवारी
भक्तांच्या प्रेमाने उदर तव भरे...
मग पर्वा मोदकांची ना मुळी उरे...
श्रीगणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..
माघ शुल्क चतुर्थी
तीलकुंड चतुर्थी / वरद चतुर्थी
रथ तुझा सोनियाचा धावे भरधाव...
रथसप्तमी च्या हार्दिक शुभेच्छा...
माघ शुद्ध सप्तमी / अर्क सप्तमी / आरोग्य सप्तमी
/ अचला सप्तमी / माघी सप्तमी
My valentine my grandsons.
Happy valentines day.
१४ फेब्रुवारी
पार्वती वेची बिल्वदले
शिवमुर्तीचे करीती चिंतन भावमुग्ध डोळे..,
भाव तुझा भोळा देवा तुच भोळा सांब..
तुझ्याठाई पाहिला मी सगुण हेरंब...
जयशंकरा परशुधरा उमापती तु महेश्वरा...
भस्मविलेपीत रुप साजिरे आणुनिया चिंतनी
अपर्णा तप करिते काननी..
शंकरा नटेश्वरा हे शिवा महेश्वरा
प्रारंभी नमन तुला कलारंगी रंग भरा...
ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला..
सावरकर पुण्यतिथी
२६ फेब्रुवारी
सांग श्याम सुंदरास काय जाहले...
रंग टाकल्याविना कुणा न सोडले
रंग पंचमी - फाल्गुन कृष्ण पंचमी
आज खेलो शामसंग होरी
यातील प्रत्येक रंगाचा भाव वेगळा..
स्वभाव वेगळा..
तरीही नेत्र सुखद आल्हाद दायक.
रंग पंचमी - फाल्गुन कृष्ण पंचमी
enjoy!
महिला दिन
८ मार्च
चांद तारोंको छुने की आशा
आसमानोंमे उडनेकी आशा...







धन्यवाद वर्षाताई.वाढदिवसाची अनोखी भेट . सकाळी सकाळी च एक गोड सरप्राइज.आजचा दिवस आनंदात जाणार.किती सुंदर लिहिले आहे.कमाल आहे तुमची . सतत वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करणं सोपी गोष्ट नाही.स्वत: चे व्याप सांभाळून वेळ देणं ही कठीण.वर्षाताई परत एकदा धन्यवाद.
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteअतिशय अप्रतिम.. खूप खूप अभिनंदन ताई..प्रत्येक महत्त्वपूर्ण दिवसांचे,सणांचे व देशप्रेम व्यक्त करणाऱ्या कृतज्ञता भावना आपण साकारल्या आहेत.. आपल्या कलेचे , सकारात्मक विचारांचे खूप खूप अभिनंदन आणि भविष्यातील प्रेरणादायी वाटचालीसाठी शुभेच्छा
ReplyDelete