Skip to main content

भाग-९ (निवडक रा श्री मो)


भाग-९   

(निवडक रा श्री मो) 





🪔🪔🪔
🪔🏵️🏵️🏵️🪔
🪔🪔🪔



ज्ञानेश्वर-तुकारामांच्या दिंड्यांमध्ये सामील होऊन पंढरीची वारी करण्याची 

स्पर्धा अलीकडे उच्चविद्या विभूषितांमध्येही पहावयास मिळते. 

शिक्षित-अशिक्षित वारकरी वर्षानुवर्षे दिंड्या-पताकांचे पालख्यांचे वारसदार आहेतच. 

पण अहंकार विसरून हे तथाकथित विद्याविभूषित खऱ्या अर्थाने वारकऱ्यांपर्यंत पोहोचत असतील 

तर भावी काळात समाजधारणेत परिवर्तन झाल्याचे दृश्य खरोखरच पहावयास मिळू शकेल आणि ज्ञानेश्वरांनी

 अपेक्षा केल्याप्रमाणे "विश्व हे मोहरे लावावे" याची अनुभूती कदाचित येऊ शकेल. 


🌸🌼🌸🌼🌸
🌸🪔🌸🪔🌸
🌸🌼🌸🌼🌸


अहंकाराचा त्याग ही असामान्य बाब या वारकऱ्यांनी सहजतेने आचरणात आणलेली असते. 

ही सहजता ज्याला ज्ञानदेवांनी सहजसमाधी असे म्हटले आहे, 

ती सहजसमाधी विठ्ठल भक्तीने भारावलेल्या या समाजाचे अविभाज्य अंग असते.


🌸🪔🌸🪔🌸
🌸🌼🌸🌼🌸
🌸🪔🌸🪔🌸


सर्व सजीवांमध्ये खलप्रवृत्तीचा अंश कायमच कार्यरत असतो. 

या खलप्रवृत्तीला आपण प्रयत्नपूर्वक कसे रोखू शकतो यावरच कुटुंबातील, 

समाजातील तथा राष्ट्रातील संतुलन अवलंबून असते.
 
ज्ञानदेवांचा संघर्ष हा खलांविरुद्ध नसून खलप्रवृत्तींच्याविरुद्ध होता. 

म्हणून ज्ञानेश्वरांचे अवतार कार्य हे कालातीत मानले जाते. 


🌷🪔🌷🪔🌷
🌷🌼🌷🌼🌷
🌷🪔🌷🪔🌷



सकाम कर्माचा त्याग, जीवा-शिवाचे अद्वैत, 

जन्म-मृत्यूचा पाठलाग ही वैश्विक प्रक्रिया असून 

याविषयी कोणताही अहंकार तथा ममत्व न बाळगता 

त्यामध्ये सहज सामावून जाणे ही ज्ञानेश्वरांची शिकवण आहे. 

हेच जीवाचे कर्तव्य आहे. 

मोक्षाप्रत नेणाऱ्या साधनांची आवश्यकता ही कालातीत गरज असणार आहे - म्हणून ज्ञानेश्वरी!


🌷🌼🌷🌼🌷
🌷🪔🌷🪔🌷
🌷🌼🌷🌼🌷



संपूर्ण ज्ञानेश्वरीभर त्यांनी कुठेही कोणत्याही फलाची याचना केलेली नाही 

किंवा आपण स्वतः तथा हा समाज पापी आहे आणि आमचा उद्धार कर,

अशी करुणाही भाकलेली नाही.
 
कारण त्यांना आत्मविकासावर आत्म्याच्या प्रकाशावर विश्वास होता. 

म्हणून नऊ हजार ओव्यांचा नैवेद्य समर्पिला गेल्याने संतुष्ट झालेल्या 

सर्वात्मक देवाकडे त्यांनी खळांची व्यंकटी नष्ट करण्याचे दान मागितले आहे. 

त्यांचे शत्रुत्व खलाशी नसून खल-प्रवृत्तीशी आहे. 


🪔🪔🪔
🪔🌷🌷🌷🪔
🪔🪔🪔


  

Comments

  1. खूप सुंदर ! 👌👌🙏

    ReplyDelete
  2. Divineच अगदी...परत एकदा peace of mind, good thoughts & आनंदी ऊर्जा प्राप्त होणे निश्चिंत. ...वाचून आनंद जाहला...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दळणं (घरातील गमती जमती)

दळणं (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                  ...

थोडं (खूप सारं😉😆) गोडाचं-१(दराबा) (घरातील गमती जमती)

थोडं (खूप सारं) गोडाचं-१(दराबा) (घरातील गमती जमती)                        दराबा! तर या शब्दाचा अर्थ काय? हा शब्द कुठून आला? तर हा पदार्थ बऱ्हाणपूर येथील दरबारातील खास पदार्थ. हा पदार्थ रोबुन रोबुन करावा लागतो म्हणून हा दराबा!                                                           घरात सगळेच खाण्याचे शौकीन, मुख्य म्हणजे आमचे बाबा सुद्धा! त्यामुळे सारखं काही ना काही करणं आणि खाणं अखंडपणे चालूच असे. खाण्याच्या बाबतीत तर सगळ्यांचा भरपूर उत्साह होताच, पण करणाऱ्यांचा (सगळ्या मम्मी लोकांचा) सुद्धा उत्साह तेव्हढाच किंवा काकणभर जरा जास्तच मी तर म्हणेन. सगळं अगदी उत्साहाने करत. त्यांच्या या उत्साहाला आणि मेहनतीला तर कायमच आणि वारंवार सलाम करावासा वाटतो. कारण कुठलीही गोष्ट करायची असो, कधीही थोडी थोडकी करून भागतच नसे. त्यामुळे खूप बांधीलकी आणि वचनबद्धता असणे आवश्यक असे. बरं त्यां...

दाय गंडोरी-पद्धत१(मिरचीची भाजी)(थोडं झणझणीत...)

  दा य गंडोरी-पद्धत१ (मिरचीची भाजी)   (थोडं झणझणीत...)                           दाय गंडोरी ! खास खानदेशी शब्द आणि खास खानदेशी भाजी! अवघ्या खानदेश वासीयांची अतिशय लाडकी, आवडती भाजी.                          दाय गंडोरी यातील दाय शब्दाचा अर्थ आहे डाळ आणि गंडोरी म्हणजे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे. थोडक्यात मिरचीची डाळ घालून केलेली भाजी. दाय गंडोरी खास 'लेवा गणबोली' तील शब्द!                          यासाठी लागणारे साहित्य म्हणजे तुरीची डाळ, हिरव्या मिरच्या, आंबटचुका, वांग, कच्चे टमाटे, आलं, लसूण, हळद, शेंगदाणा कुट, सुक्या खोबऱ्याचा कीस, भरपूर, खूप सारी कोथिंबीर, तेल मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि मीठ. उपरोक्त उल्लेखाप्रमाणेच ही भाजी अतिशय झणझणीत असते. परंतु आता सगळेच तिखट थोड्या कमी प्रमाणात खातात त्यामुळे फार तिखट नसते. पण आवड असलेले, पट्टीचे खाणारे असलेल्या घरांतून अजूनही चांगली झणझणी...