भाग-९
(निवडक रा श्री मो)
🪔🪔🪔
🪔🏵️🏵️🏵️🪔
🪔🪔🪔
ज्ञानेश्वर-तुकारामांच्या दिंड्यांमध्ये सामील होऊन पंढरीची वारी करण्याची
स्पर्धा अलीकडे उच्चविद्या विभूषितांमध्येही पहावयास मिळते.
शिक्षित-अशिक्षित वारकरी वर्षानुवर्षे दिंड्या-पताकांचे पालख्यांचे वारसदार आहेतच.
पण अहंकार विसरून हे तथाकथित विद्याविभूषित खऱ्या अर्थाने वारकऱ्यांपर्यंत पोहोचत असतील
तर भावी काळात समाजधारणेत परिवर्तन झाल्याचे दृश्य खरोखरच पहावयास मिळू शकेल आणि ज्ञानेश्वरांनी
अपेक्षा केल्याप्रमाणे "विश्व हे मोहरे लावावे" याची अनुभूती कदाचित येऊ शकेल.
🌸🌼🌸🌼🌸
🌸🪔🌸🪔🌸
🌸🌼🌸🌼🌸
अहंकाराचा त्याग ही असामान्य बाब या वारकऱ्यांनी सहजतेने आचरणात आणलेली असते.
ही सहजता ज्याला ज्ञानदेवांनी सहजसमाधी असे म्हटले आहे,
ती सहजसमाधी विठ्ठल भक्तीने भारावलेल्या या समाजाचे अविभाज्य अंग असते.
🌸🪔🌸🪔🌸
🌸🌼🌸🌼🌸
🌸🪔🌸🪔🌸
सर्व सजीवांमध्ये खलप्रवृत्तीचा अंश कायमच कार्यरत असतो.
या खलप्रवृत्तीला आपण प्रयत्नपूर्वक कसे रोखू शकतो यावरच कुटुंबातील,
समाजातील तथा राष्ट्रातील संतुलन अवलंबून असते.
ज्ञानदेवांचा संघर्ष हा खलांविरुद्ध नसून खलप्रवृत्तींच्याविरुद्ध होता.
म्हणून ज्ञानेश्वरांचे अवतार कार्य हे कालातीत मानले जाते.
🌷🪔🌷🪔🌷
🌷🌼🌷🌼🌷
🌷🪔🌷🪔🌷
सकाम कर्माचा त्याग, जीवा-शिवाचे अद्वैत,
जन्म-मृत्यूचा पाठलाग ही वैश्विक प्रक्रिया असून
याविषयी कोणताही अहंकार तथा ममत्व न बाळगता
त्यामध्ये सहज सामावून जाणे ही ज्ञानेश्वरांची शिकवण आहे.
हेच जीवाचे कर्तव्य आहे.
मोक्षाप्रत नेणाऱ्या साधनांची आवश्यकता ही कालातीत गरज असणार आहे - म्हणून ज्ञानेश्वरी!
🌷🌼🌷🌼🌷
🌷🪔🌷🪔🌷
🌷🌼🌷🌼🌷
संपूर्ण ज्ञानेश्वरीभर त्यांनी कुठेही कोणत्याही फलाची याचना केलेली नाही
किंवा आपण स्वतः तथा हा समाज पापी आहे आणि आमचा उद्धार कर,
अशी करुणाही भाकलेली नाही.
कारण त्यांना आत्मविकासावर आत्म्याच्या प्रकाशावर विश्वास होता.
म्हणून नऊ हजार ओव्यांचा नैवेद्य समर्पिला गेल्याने संतुष्ट झालेल्या
सर्वात्मक देवाकडे त्यांनी खळांची व्यंकटी नष्ट करण्याचे दान मागितले आहे.
त्यांचे शत्रुत्व खलाशी नसून खल-प्रवृत्तीशी आहे.
🪔🪔🪔
🪔🌷🌷🌷🪔
🪔🪔🪔
खूप सुंदर ! 👌👌🙏
ReplyDeleteDivineच अगदी...परत एकदा peace of mind, good thoughts & आनंदी ऊर्जा प्राप्त होणे निश्चिंत. ...वाचून आनंद जाहला...
ReplyDelete