खानदेशी खाण्यासाठीचा घाटा
घाटा
प्रत्येक खान्देशी व्यक्तीचा वीकपॉईंट !
घाटा म्हणजे बिबडे (एक प्रकारचे पापड ) करण्यासाठी लागणारे रवण . पण पापड करण्या आधी हे रवण म्हणजे घाटा खूप आवडीने खाल्ला जातो घरोघरी ! एकदा केला की अगदी सगळ्या जवळच्या नातेवाईक आणि मित्र मंडळींकडे डबे भरून पाठविले जातात किंवा घाटा खाण्यासाठी या असे आमंत्रण केले जाते . मग भल्या पहाटेच आमंत्रीत मंडळी उत्साहाने आणि आवडीने जातात घाटा खायला! माझ्याकडे हे पापड करणे फारच अवघड होऊन जाते, जागा आणि ऊन या कारणांनी. पण घाटा खायला आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडतो. खान्देश माझे मूळ आहे, म्हणजे जन्मापासून बारावी पर्यन्त मी तिथेच होते. पण नंतर शिक्षण आणि लग्न या कारणांनी बाहेर पडले. त्यामुळे माझ्याकडे डबा येण्याची किंवा आमंत्रण येणे शक्यच नसते. मग मीच अधून मधून करते. खरंतरं घाटा उन्हाळ्यात केला जातो, पापड करण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याने, तसेच शेतीच्या कामातून तेव्हाच मोकळीक असल्याने. पण लेकीला थंडी आणि पावसाळ्यात खायला जास्त आवडतो. मग मी करत असते असेच अधून मधून, फक्त खाण्यासाठी म्हणून. तो गरम गरमच खाण्यात मज्जा! मग रविवार सोयीचा. रविवारी सकाळी हा बेत होतो मग आमच्याकडे. वाटले तुम्हा सगळ्यांसोबत हा आनंद शेअर करावा.
घाटा करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती -
ज्वारी स्वच्छ धुवून घ्यावी. मग पाण्यात भिजत घालावी, तीन दिवस. दररोज यातील पाणी बदलावे. चौथ्या दिवशी मिक्सर मधून काढून घ्यावी, फार अगदी बारीक वाटू नये, थोडी भरडच ठेवावी. ही वाटलेली ज्वारी पुन्हा बारा तास तशीच ठेवावी. घाटा करण्या आधी लसूण, पिवळी वाळलेली मिरची, थोडे धणे मिक्सर वर वाटून घ्यावे. हे सुद्धा थोडे भरडच ठेवावे. तसेच सोबत बडीशोप, तीळ घ्यावी. ही मात्र अख्खीच ठेवावी. गॅस वर जाड बुडाच्या भांड्यात पाणी ठेवावे. त्याला छान उकळी फुटली की त्यात आधी करून ठेवलेले वाटणं, बडीशोप, तीळ आणि मीठ घालावे. त्यानंतर त्यात ती वाटून ठेवलेली ज्वारी घालावी. पण ही टाकतांना सतत हलवावे लागते. नाहीतर गाठी होण्याची शक्यता असते. टाकून झाल्यावर सुद्धा हलवत राहावे. खरंतर हा घाटा हलविण्यासाठी एक खास लाकडी चमचा असतो, चाटू. परंतु हा मापाने बराच मोठा असतो. त्यामुळे हा फक्त खाण्यासाठी केलेला घाटा हलविण्यासाठी लाकडी रवीची मागची बाजू वापरता येते. चांगला शिजू द्यावा. शेवटी त्या घाट्याला छान चमक येते. छान चमक आली म्हणजे, हा घाटा तयार झाला.
गरम गरमच खावा. ताटलीत घेऊन त्यावर सढळ हाताने तीळ घालावी आणि थोडे तेल घालावे. छान कालवून घ्यावे आणि मग हल्ला बोल! ही पारंपारीक पद्धत खाण्याची. काही लोक दूध आणि साखर घालून पण खातात. पण हे शक्यतो टाळावे. मीठ आणि दूध एकत्र नको. पण आवड आपली आपली. किंवा नुसताच खाल्ला तरी छान लागतो! अतिशय पौष्टिक, चविष्ट!
बिबडे करण्यासाठी सविस्तर माहिती खालील लिंक वर उपलब्ध आहे.
https://www.anandipavus.com/2019/11/blog-post.html
©️®️आनंदी पाऊस
२९ जाने २०२६


काॅंपोझिशन सातहि कलात असतेच तसेच पाककलेतहि असावे प्रत्येक पाकक्रिया हे एक काॅंपोझिशन प्रायोगीक
ReplyDeleteस्वरूची हि नवनिर्मिती
मीहि चटण्या कोशिंबीरी भाज्या यात करून पहातो रिकामपणाचा उद्योग
😍
ReplyDelete😋😋😋
ReplyDeleteमस्त!! तोंडाला पाणी सुटले.
ReplyDelete😋😋😋😋😋
👌👌👌😍❤️
ReplyDelete🤭😳😄🫣😘😝🌷🙋♂️
ReplyDeleteChchan ghata
ReplyDeleteTel takun khates ka doodh sakhar??
Mi tel takun khato
Ole bibde tar khup khato
Ghata chi kharod n ghatyatale gole gole pan faar aavadtat mala
Wow
ReplyDeleteपाठवून तरी द्या
Bhari
ReplyDeleteSagale athwale
Ya pudhchya pidhi la mahiti nasel he
गव्हाचा चिकही असाच करून खातो, मीठ मसाला आपल्या आवडी प्रमाणे
ReplyDelete😄😋😋
ReplyDeleteफरंच छान पदार्थ. नवीन पदार्थ कळला..
ReplyDelete😋😋😋
ReplyDeleteI salute you ... तोंडाला पाणी सुटल..
ReplyDeleteवा तोडाला पाणी सुटते छान रेसिपि आहे करण्याची आणि खाण्याची छान लिहीले आहे .
ReplyDeleteतू केलेले वर्णन वाचून लहानपणी खात असलेला गव्हाचा चिक याची आठवण झाली. पांढराशुभ्र, गरम चिक व त्यावर कच्चे तेल....आताही तोंडाला पाणी सुटते, नुसत्या आठवणींनी.
ReplyDeleteएकूण काय? करणाऱ्याची मेहनत, पण 'घाटा' खाणाऱ्याचा फायदाच फायदा होतो....😀😀😜😜😋😋
ज्वारीचा घाटा कधी खाल्ला नाही . मी try करेन एकदा नक्की.
ReplyDeleteगव्हाचा चीक मला खूप आवडतो आणि मी करते पण गव्हाच्या रव्याचा.
Ghatyala pahun ytondala pani sutale.. ...lahanpanchi aathavan zali ......👌🏻👌🏻😋😋😋😋👍🏻👍🏻🌹💐🌹💐
ReplyDeleteतोंडाला पाणी सुटले ताई खूपच छान 👌👌👌
ReplyDeleteछान आहे, आपल्या भारतामधे खाण्याच्या खूप विवीधपूर्ण पाककला आहेत कदाचीत जगात कुठेही एवढी विवीधता नसेल असे मला वाटते.
ReplyDeleteWa wa mast👌👌 tondala pani sutale read karun😅😇
ReplyDeleteभारी हं, फारच खाण्याशी उपयोगी पदार्थ, आता घाटा खाल्ला नाही पण चव आली तोंडांत ,हेच तुझ्या लेखाणाचे श्रेय आहे वर्षा.
ReplyDeleteछान 🥲👍
ReplyDeleteआवडता पदार्थ! मी ज्वारी कांडून मग भिजवते.
ReplyDeleteKhup ch chhan
ReplyDeletePani sutale agdi tondala 😋
Mast
ReplyDeletegavhachya chikasarkhach aahe ha ghata. Mala aawadto gavvacha chick.
ReplyDeleteघाटा खाणारी…. ?
ReplyDeleteमला पण लई आवडतो…पण घाट्याची खरोड त्याच्या पेक्षा जास्त ! 😄😄
घाट्यासोबत शेंगदाणे 😍😍
ReplyDeleteकोकणात तांदळाची उकड करतात तसाच प्रकार दिसतोय
ReplyDeleteसंध्याकाळच्या भुकेला अत्यंत योग्य पदार्थ
बाजरीच्या पिठाचा घाटा पण करतात, स्पेशल नवीन च आई झाल्यानंतर , त्या आईला आवर्जून देतात.
ReplyDeleteतोंडाला पाणी सुटले. मी डिसेंबर मधे गावाला गेली होती, तेव्हा अचानक मला खायला मिळाला होता. आजकाल गहू व तांदूळ पण घालतात. पण फक्त ज्वारीचा जास्त चांगला लागतो.
ReplyDeleteप्रा सौ वैशाली चौधरी
ठाणे
पापडाचा घाटा हा एक नविन पदार्थ पाहिला बिबड्याचे पापड Collegechya eka 2018 la Ek मैत्रीणीने दुपारच्या जेवणावेळेस खाऊ घातले just remembered.. तेव्हापासून पापडाची पारख कळाली...
ReplyDeleteरेसिपी छानच बरं प्रचि छान.
उन्हाळ्यात परत वाचेनच:-..संजिता