Skip to main content

खानदेशी खाण्यासाठीचा घाटा

 

खानदेशी खाण्यासाठीचा घाटा 



 घाटा
 प्रत्येक खान्देशी व्यक्तीचा वीकपॉईंट !
घाटा म्हणजे बिबडे (एक प्रकारचे पापड ) करण्यासाठी लागणारे रवण . पण पापड करण्या आधी हे रवण म्हणजे घाटा खूप आवडीने खाल्ला जातो घरोघरी ! एकदा केला की अगदी सगळ्या जवळच्या नातेवाईक आणि मित्र मंडळींकडे डबे भरून पाठविले जातात किंवा घाटा खाण्यासाठी या असे आमंत्रण केले जाते . मग भल्या पहाटेच आमंत्रीत मंडळी उत्साहाने आणि आवडीने जातात घाटा खायला! माझ्याकडे हे पापड करणे फारच अवघड होऊन जाते, जागा आणि ऊन या कारणांनी. पण घाटा खायला आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडतो. खान्देश माझे मूळ आहे, म्हणजे जन्मापासून बारावी पर्यन्त मी तिथेच होते. पण नंतर शिक्षण आणि लग्न या कारणांनी बाहेर पडले. त्यामुळे माझ्याकडे डबा येण्याची किंवा आमंत्रण येणे शक्यच नसते. मग मीच अधून मधून करते. खरंतरं घाटा उन्हाळ्यात केला जातो, पापड करण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याने, तसेच शेतीच्या कामातून तेव्हाच मोकळीक असल्याने. पण लेकीला थंडी आणि पावसाळ्यात खायला जास्त आवडतो. मग मी करत असते असेच अधून मधून, फक्त खाण्यासाठी म्हणून. तो गरम गरमच खाण्यात मज्जा! मग रविवार सोयीचा.  रविवारी सकाळी हा बेत होतो मग आमच्याकडे. वाटले तुम्हा सगळ्यांसोबत हा आनंद शेअर करावा. 

घाटा करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती -

               ज्वारी स्वच्छ धुवून घ्यावी. मग पाण्यात भिजत घालावी, तीन दिवस. दररोज यातील पाणी बदलावे. चौथ्या दिवशी मिक्सर मधून काढून घ्यावी, फार अगदी बारीक वाटू नये, थोडी भरडच ठेवावी. ही वाटलेली ज्वारी पुन्हा बारा तास तशीच ठेवावी. घाटा करण्या आधी लसूण, पिवळी वाळलेली मिरची, थोडे धणे मिक्सर वर वाटून घ्यावे. हे सुद्धा थोडे भरडच ठेवावे. तसेच सोबत बडीशोप, तीळ घ्यावी. ही मात्र अख्खीच ठेवावी. गॅस वर जाड बुडाच्या भांड्यात पाणी ठेवावे. त्याला छान उकळी फुटली की त्यात आधी करून ठेवलेले वाटणं, बडीशोप, तीळ आणि मीठ घालावे. त्यानंतर त्यात ती वाटून ठेवलेली ज्वारी घालावी. पण ही टाकतांना सतत हलवावे लागते. नाहीतर गाठी होण्याची शक्यता असते. टाकून झाल्यावर सुद्धा हलवत राहावे. खरंतर हा घाटा हलविण्यासाठी एक खास लाकडी चमचा असतो, चाटू. परंतु हा मापाने बराच मोठा असतो. त्यामुळे हा फक्त खाण्यासाठी केलेला घाटा हलविण्यासाठी लाकडी रवीची मागची बाजू वापरता येते. चांगला शिजू द्यावा. शेवटी त्या घाट्याला छान चमक येते. छान चमक आली म्हणजे, हा घाटा तयार झाला. 
               गरम गरमच खावा. ताटलीत घेऊन त्यावर सढळ हाताने तीळ घालावी आणि थोडे तेल घालावे. छान कालवून घ्यावे आणि मग हल्ला बोल! ही पारंपारीक पद्धत खाण्याची. काही लोक दूध आणि साखर घालून पण खातात. पण हे शक्यतो टाळावे. मीठ आणि दूध एकत्र नको. पण आवड आपली आपली. किंवा नुसताच खाल्ला तरी छान लागतो! अतिशय पौष्टिक, चविष्ट!

बिबडे करण्यासाठी सविस्तर माहिती खालील लिंक वर उपलब्ध आहे.

https://www.anandipavus.com/2019/11/blog-post.html

©️®️आनंदी पाऊस 
२९ जाने २०२६



Comments

  1. आर्किटेक्ट अविनाश भावेJanuary 30, 2026 8:45 am

    काॅंपोझिशन सातहि कलात असतेच तसेच पाककलेतहि असावे प्रत्येक पाकक्रिया हे एक काॅंपोझिशन प्रायोगीक
    स्वरूची हि नवनिर्मिती
    मीहि चटण्या कोशिंबीरी भाज्या यात करून पहातो रिकामपणाचा उद्योग

    ReplyDelete
  2. ज्योती किरंगेJanuary 30, 2026 8:45 am

    😍

    ReplyDelete
  3. भूमिका चौधरीJanuary 30, 2026 8:46 am

    😋😋😋

    ReplyDelete
  4. भारती फेगडेJanuary 30, 2026 8:47 am

    मस्त!! तोंडाला पाणी सुटले.
    😋😋😋😋😋

    ReplyDelete
  5. संजय कोल्हेJanuary 30, 2026 8:47 am

    👌👌👌😍❤️

    ReplyDelete
  6. अनिल जंगलेJanuary 30, 2026 8:48 am

    🤭😳😄🫣😘😝🌷🙋‍♂️

    ReplyDelete
  7. Dr Manish ChaudharyJanuary 30, 2026 8:50 am

    Chchan ghata
    Tel takun khates ka doodh sakhar??
    Mi tel takun khato
    Ole bibde tar khup khato
    Ghata chi kharod n ghatyatale gole gole pan faar aavadtat mala

    ReplyDelete
  8. डॉ दीपक शिरसाठJanuary 30, 2026 8:51 am

    Wow
    पाठवून तरी द्या

    ReplyDelete
  9. Bhari

    Sagale athwale
    Ya pudhchya pidhi la mahiti nasel he

    ReplyDelete
  10. गव्हाचा चिकही असाच करून खातो, मीठ मसाला आपल्या आवडी प्रमाणे

    ReplyDelete
  11. श्रेया नारखेडेJanuary 30, 2026 11:08 am

    😄😋😋

    ReplyDelete
  12. फरंच छान पदार्थ. नवीन पदार्थ कळला..

    ReplyDelete
  13. I salute you ... तोंडाला पाणी सुटल..

    ReplyDelete
  14. मंदा चौधरीJanuary 30, 2026 2:49 pm

    वा तोडाला पाणी सुटते छान रेसिपि आहे करण्याची आणि खाण्याची छान लिहीले आहे .

    ReplyDelete
  15. रमेश शिवडेकरJanuary 30, 2026 2:50 pm

    तू केलेले वर्णन वाचून लहानपणी खात असलेला गव्हाचा चिक याची आठवण झाली. पांढराशुभ्र, गरम चिक व त्यावर कच्चे तेल....आताही तोंडाला पाणी सुटते, नुसत्या आठवणींनी.

    एकूण काय? करणाऱ्याची मेहनत, पण 'घाटा' खाणाऱ्याचा फायदाच फायदा होतो....😀😀😜😜😋😋

    ReplyDelete
  16. रुपाली मुतालिकJanuary 30, 2026 2:51 pm

    ज्वारीचा घाटा कधी खाल्ला नाही . मी try करेन एकदा नक्की.
    गव्हाचा चीक मला खूप आवडतो आणि मी करते पण गव्हाच्या रव्याचा.

    ReplyDelete
  17. विकास गायकवाडJanuary 30, 2026 2:51 pm

    Ghatyala pahun ytondala pani sutale.. ...lahanpanchi aathavan zali ......👌🏻👌🏻😋😋😋😋👍🏻👍🏻🌹💐🌹💐

    ReplyDelete
  18. जितेंद्र महाजनJanuary 30, 2026 2:52 pm

    तोंडाला पाणी सुटले ताई खूपच छान 👌👌👌

    ReplyDelete
  19. गुलाबराव पाथरकरJanuary 30, 2026 3:42 pm

    छान आहे, आपल्या भारतामधे खाण्याच्या खूप विवीधपूर्ण पाककला आहेत कदाचीत जगात कुठेही एवढी विवीधता नसेल असे मला वाटते.

    ReplyDelete
  20. Prajakta DongareJanuary 30, 2026 3:46 pm

    Wa wa mast👌👌 tondala pani sutale read karun😅😇

    ReplyDelete
  21. मीनल खेराडेJanuary 30, 2026 4:01 pm

    भारी हं, फारच खाण्याशी उपयोगी पदार्थ, आता घाटा खाल्ला नाही पण चव आली तोंडांत ,हेच तुझ्या लेखाणाचे श्रेय आहे वर्षा.

    ReplyDelete
  22. छान 🥲👍

    ReplyDelete
  23. जयश्री फेगडेJanuary 30, 2026 9:41 pm

    आवडता पदार्थ! मी ज्वारी कांडून मग भिजवते.

    ReplyDelete
  24. Khup ch chhan
    Pani sutale agdi tondala 😋

    ReplyDelete
  25. gavhachya chikasarkhach aahe ha ghata. Mala aawadto gavvacha chick.

    ReplyDelete
  26. अनिल जंगलेJanuary 31, 2026 10:40 am

    घाटा खाणारी…. ?
    मला पण लई आवडतो…पण घाट्याची खरोड त्याच्या पेक्षा जास्त ! 😄😄

    ReplyDelete
  27. घाट्यासोबत शेंगदाणे 😍😍

    ReplyDelete
  28. कोकणात तांदळाची उकड करतात तसाच प्रकार दिसतोय
    संध्याकाळच्या भुकेला अत्यंत योग्य पदार्थ

    ReplyDelete
  29. डॉ नंदाJanuary 31, 2026 7:07 pm

    बाजरीच्या पिठाचा घाटा पण करतात, स्पेशल नवीन च आई झाल्यानंतर , त्या आईला आवर्जून देतात.

    ReplyDelete
  30. तोंडाला पाणी सुटले. मी डिसेंबर मधे गावाला गेली होती, तेव्हा अचानक मला खायला मिळाला होता. आजकाल गहू व तांदूळ पण घालतात. पण फक्त ज्वारीचा जास्त चांगला लागतो.
    प्रा सौ वैशाली चौधरी
    ठाणे

    ReplyDelete
  31. पापडाचा घाटा हा एक नविन‌ पदार्थ पाहिला बिबड्याचे पापड Collegechya eka 2018 la Ek मैत्रीणीने दुपारच्या जेवणावेळेस खाऊ घातले just remembered.. तेव्हापासून पापडाची पारख कळाली...
    रेसिपी छानच बरं प्रचि छान.
    उन्हाळ्यात परत वाचेनच:-..संजिता

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

💃गुलाबाईची गाणी💃 (गच्चीवरील गमती जमती )

  💃गुलाबाईची गाणी💃  (गच्चीवरील गमती जमती ) 💃💃💃💃💃💃💃💃💃💃 💃गुलाबाईची गाणी💃  पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा गुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून गुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा गुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउले पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून गुलाबाईचे माहेर दिसे. 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃  सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफि...

दळण (घरातील गमती जमती)

दळण (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                   ...

🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

  🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕 (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) प्राचीन होयसळ श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा, जिल्हा तुमकुरु, कर्नाटक बंगळूरू पासून साधारण १२७ किमी. गूगल सर्च इंजिन मध्ये Ancient Hoysala Shri Kedareshwar Swami temple, Nagalapura असे शोधले की लगेचच गूगल ते दाखवते, तिथे जायचा रस्ताही दाखवते. त्याचे सगळे ऐकायचे की बरोब्बर तिथे पोहोचता येते.                 होयसळ राजवट, मूळ कर्नाटकात. त्यांनी अकरावे ते चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले. या कालावधीत त्यांनी जी मंदिरे उभारली, त्या मंदिरांना होयसळ मंदिर आणि त्या शैलीला होयसळ शैली म्हणून ओळखले जाते. होयसळ राजवट काळात जवळ-जवळ दीड हजार मंदिरे उभारली. तथापि त्यातील आज फक्त शंभर-दीडशेच मंदिरे अस्तित्वात आहेत. त्यातील फार थोडी सुस्थितीत आहेत. त्यापैकी अगदी बोटावर मोजण्या इतकी मंदिरे सर्वज्ञात आहेत. ती म्हणजे चन्न केशव मंदिर, बेलूर, होयसाळेश्वर मंदिर, हाळेबिडू आणि चन्न केशव मंदिर, सोमनाथपुर. ही तीनही स्थळे जागतिक वारसा या...