Skip to main content

भाग-७ (निवडक रा श्री मो)

 भाग-७  

(निवडक रा श्री मो) 


🌷🌷🌷

🪔🪔🪔

🌷🌷🌷


🌺🌺🌺ज्ञानेश्वरीमध्ये उपयोजिलेला एकही शब्द हीन दर्जाचा,
 
मनाला बोचणारा, समाजबाह्य तथा रूढीबाह्य 

असा शोधूनही सापडणार नाही. 

त्यांचे निरुपण म्हणजे केवळ शब्दांचा फुलोरा नसून भाव-रसांचा,
 
ज्ञानेंद्रियांना तृप्त करणाऱ्या अमृतसरितेचा महापूर आहे.🌺🌺🌺


🪔🪔🪔


🌺🌺🌺ज्ञानेश्वरी इतका लोकप्रिय ग्रंथ महाराष्ट्रात दुसरा आढळणार नाही.
 
ज्ञानेश्वरी समजो, न समजो, तिचं पारायण करण्याची संधी मिळो न मिळो,

पण ज्ञानेश्वरी घरात असण्याचा आनंदही शब्दातीत आहे.

घरात ज्ञानेश्वरी असणे म्हणजे मात्यापित्यांचे 

विशेषतः माउलीच्या अस्तित्वाचे प्रतिक मानले जाते.🌺🌺🌺


 🪔🪔🪔


🌺🌺🌺माऊली हे बिरूद लोकांनी स्वतःहून त्यांना अर्पण केलेले आहे. 

म्हणून ज्ञानदेव शब्द उच्चारताच स्वतःच्या माऊलीची आठवण तर होतेच होते, 

शिवाय आपल्या पाठीशी माऊली असल्याचा भास होतो. 

ज्ञानेश्वरीचे पारायण करताना आपण ठायी-ठायी वात्सल्याने चिंब-चिंब होऊन जातो. 

क्षणाक्षणाला गहिवरून येते. याची मोकळी प्रचीती आषाढीच्या पंढरपूर वारीत घेता येते.🌺🌺🌺


 🪔🪔🪔



🌺🌺🌺ज्ञानदेवांना माऊली का म्हटले जाते? 

साधारणपणे दहाव्या वर्षी मातृ-पितृ छत्र हरपल्यावर 

आणि निवृत्ती खऱ्या अर्थाने वृत्ती विरहित, 

अत्यंत ब्रह्मनिष्ठ करडे योगी असल्याने, 

त्यांनी स्वतःच निसर्गात केव्हाच विसर्जन केले असल्याने 

ते केवळ देह धर्माने अस्तित्वात होते. 

द्वेष, राग, लोभ, मोह, मद या सर्वांच्या ते अतीत असल्याने 

ज्ञानेश्वरांना आपले असे कोणीच नव्हते.
 
त्यात मुक्ताई चार वर्षांची, सोपान सहा वर्षांचे
 
आणि स्वतः ज्ञानदेव दहा वर्षांचे.
 
निवृत्ती मुक्त असल्याने त्यांना आपल्या प्रपंचाशी काही देणे-घेणे नव्हते. 

मग ज्ञानदेवांशिवाय ही दोन पोरं अन्य कोणाच्या मायेच्या छत्राखाली वावरणार?🌺🌺🌺


🪔🪔🪔
🌷🌷🌷
🪔🪔🪔

Comments

  1. ज्ञानेश्वर माऊली🙏🏻

    ReplyDelete
  2. माऊली माऊली माऊली!

    ReplyDelete
  3. माऊली माऊली माऊली!

    ReplyDelete
  4. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानबा तुकाराम
    ज्ञान माऊलींना साष्टांग दंडवत
    त्याचबरोबर तुमचेही खूप अभिनंदन तुम्ही खूप
    नव नवीन वैचारिक माहिती देतात. 💐🙋‍♀️

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दळण (घरातील गमती जमती)

दळण (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                   ...

💃गुलाबाईची गाणी💃 (गच्चीवरील गमती जमती )

  💃गुलाबाईची गाणी💃  (गच्चीवरील गमती जमती ) 💃💃💃💃💃💃💃💃💃💃 💃गुलाबाईची गाणी💃  पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा गुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून गुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा गुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउले पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून गुलाबाईचे माहेर दिसे. 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃  सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफि...

थोडं (खूप सारं😉😆) गोडाचं-१(दराबा) (घरातील गमती जमती)

थोडं (खूप सारं) गोडाचं-१(दराबा) (घरातील गमती जमती)                                                          घरात सगळेच खाण्याचे शौकीन, मुख्य म्हणजे आमचे बाबा सुद्धा! त्यामुळे सारखं काही ना काही करणं आणि खाणं अखंडपणे चालूच असे. खाण्याच्या बाबतीत तर सगळ्यांचा भरपूर उत्साह होताच, पण करणाऱ्यांचा (सगळ्या मम्मी लोकांचा) सुद्धा उत्साह तेव्हढाच किंवा काकणभर जरा जास्तच मी तर म्हणेन. सगळं अगदी उत्साहाने करत. त्यांच्या या उत्साहाला आणि मेहनतीला तर कायमच आणि वारंवार सलाम करावासा वाटतो. कारण कुठलीही गोष्ट करायची असो, कधीही थोडी थोडकी करून भागतच नसे. त्यामुळे खूप बांधीलकी आणि वचनबद्धता असणे आवश्यक असे. बरं त्यांनी कुठलीही गोष्ट करायची म्हणून केली असे होत नसे . सगळं अगदी साग्रसंगीतच, योग्य आणि व्यवस्थितच करत असतं. जणू कंटाळा, थकवा असले शब्दच त्यांना माहीती नव्हते.  बरं घरातील सगळेच, सगळ्याच  म्हणजे गोड, तिखट, मसालेदार, चटपटीत, आंबटगोड अशा ...