भाग-७
(निवडक रा श्री मो)
🌷🌷🌷
🪔🪔🪔
🌷🌷🌷
🌺🌺🌺ज्ञानेश्वरीमध्ये उपयोजिलेला एकही शब्द हीन दर्जाचा,
मनाला बोचणारा, समाजबाह्य तथा रूढीबाह्य
असा शोधूनही सापडणार नाही.
त्यांचे निरुपण म्हणजे केवळ शब्दांचा फुलोरा नसून भाव-रसांचा,
ज्ञानेंद्रियांना तृप्त करणाऱ्या अमृतसरितेचा महापूर आहे.🌺🌺🌺
🪔🪔🪔
🌺🌺🌺ज्ञानेश्वरी इतका लोकप्रिय ग्रंथ महाराष्ट्रात दुसरा आढळणार नाही.
ज्ञानेश्वरी समजो, न समजो, तिचं पारायण करण्याची संधी मिळो न मिळो,
पण ज्ञानेश्वरी घरात असण्याचा आनंदही शब्दातीत आहे.
घरात ज्ञानेश्वरी असणे म्हणजे मात्यापित्यांचे
विशेषतः माउलीच्या अस्तित्वाचे प्रतिक मानले जाते.🌺🌺🌺
🪔🪔🪔
🌺🌺🌺माऊली हे बिरूद लोकांनी स्वतःहून त्यांना अर्पण केलेले आहे.
म्हणून ज्ञानदेव शब्द उच्चारताच स्वतःच्या माऊलीची आठवण तर होतेच होते,
शिवाय आपल्या पाठीशी माऊली असल्याचा भास होतो.
ज्ञानेश्वरीचे पारायण करताना आपण ठायी-ठायी वात्सल्याने चिंब-चिंब होऊन जातो.
क्षणाक्षणाला गहिवरून येते. याची मोकळी प्रचीती आषाढीच्या पंढरपूर वारीत घेता येते.🌺🌺🌺
🪔🪔🪔
🌺🌺🌺ज्ञानदेवांना माऊली का म्हटले जाते?
साधारणपणे दहाव्या वर्षी मातृ-पितृ छत्र हरपल्यावर
आणि निवृत्ती खऱ्या अर्थाने वृत्ती विरहित,
अत्यंत ब्रह्मनिष्ठ करडे योगी असल्याने,
त्यांनी स्वतःच निसर्गात केव्हाच विसर्जन केले असल्याने
ते केवळ देह धर्माने अस्तित्वात होते.
द्वेष, राग, लोभ, मोह, मद या सर्वांच्या ते अतीत असल्याने
ज्ञानेश्वरांना आपले असे कोणीच नव्हते.
त्यात मुक्ताई चार वर्षांची, सोपान सहा वर्षांचे
आणि स्वतः ज्ञानदेव दहा वर्षांचे.
निवृत्ती मुक्त असल्याने त्यांना आपल्या प्रपंचाशी काही देणे-घेणे नव्हते.
मग ज्ञानदेवांशिवाय ही दोन पोरं अन्य कोणाच्या मायेच्या छत्राखाली वावरणार?🌺🌺🌺
🪔🪔🪔
🌷🌷🌷
🪔🪔🪔
ज्ञानेश्वर माऊली🙏🏻
ReplyDeleteमाऊली माऊली माऊली!
ReplyDeleteमाऊली माऊली माऊली!
ReplyDeleteज्ञानेश्वर माऊली ज्ञानबा तुकाराम
ReplyDeleteज्ञान माऊलींना साष्टांग दंडवत
त्याचबरोबर तुमचेही खूप अभिनंदन तुम्ही खूप
नव नवीन वैचारिक माहिती देतात. 💐🙋♀️