Skip to main content

वारसा स्पर्धेच्या निमित्ताने (वारसा स्पर्धा)

 वारसा स्पर्धेच्या निमित्ताने 



                                   या वर्षातील खुप जास्त आणि  वारंवार वापरले जाणारे शब्द म्हणजे 'कोव्हीड-१९' , 'करोना' , 'टाळेबंदी' . आणि यामुळे घरादारातच नाही तर संपुर्ण जगभरातच एक भयानक नकारात्मकता पसरली आहे . अगदी प्रत्येकाची दैनंदिनी पार बदलुन गेलीये . पण या सगळ्या वाईट परिस्थितीत आणि नकारात्मकते मध्ये सुद्धा खुप सकारात्मक गोष्टी घडत आहेत . या सगळ्या गोष्टीबद्दल नंतर सविस्तर लिहिनच . आत्ता फक्त या एका सकारात्मक गोष्टीबद्दल . 
                                   ती म्हणजे वारसा स्पर्धा ! इंटॅक संस्थेचे भारतभर वेगवेगळे विभाग आहेत . हे सगळे विभाग सतत काही ना काही कार्यक्रम राबवत असतात . या कठीण काळात सुद्धा अनेक कार्यक्रम राबविणे सुरूच आहे , या संस्थेचे . अगदी भरभरून माहिती , ज्ञान  मिळते आहे . त्यापैकी सोलापुर विभागाने सुद्धा या काळात एक छान आणि स्त्युत्य कार्यक्रम राबवला . तो म्हणजे ही "वारसा स्पर्धा" ! या स्पर्धेच्या दोन फेऱ्या झाल्या . या दोनही फेऱ्यांमध्ये मी भाग घेतला होता . यात सगळ्या मिळुन मी अकरा प्रवेशिका पाठविल्या होत्या . तर या सगळ्या प्रवेशिका फक्त स्पर्धेच्या प्रवेशिका , नाहीत तर या सगळ्या दस्तावेजीकरणाच्या कामाचा एक महत्वाचा भाग आहे . 
                                  पहिल्या एक दोन प्रवेशिका पाठविल्यानंतर माझे मलाच जाणवले , या स्पर्धेच्या निमित्ताने माझ्याच वारस्याशी , माझी नव्याने आणि खुप वेगळ्या आणि महत्वाच्या दृष्टीकोनातून ओळख झाली . आणि त्या खुपच वेगळ्या दिसल्या , भासल्या . त्या किती महत्वाच्या आहेत याची जाणीव झाली . एरव्ही मला ही जाणीव झाली नसती , त्या दृष्टीने . आणि मग वाटून गेले बक्षीस मिळणे वगैरे फार महत्वाचे नाही . पण या निमित्ताने ही एक वेगळी जाणीव आणि दृष्टी मिळाली आहे . त्यामुळे शक्य तितक्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होईल , कायमचे . पुढच्या पिढ्यांना सुद्धा त्यांची ओळख होत राहील आणि माहीती मिळेल . 
                                 मग मी शक्य तितक्या गोष्टींचे दस्तावेजीकरण अगदी झपाटून टाकल्या सारखे केले . तेव्हढ्यावरच न थांबता पुढेही केले आणि करत राहण्याचा मानस आहे . चौधरी सदनाच्या दस्तावेजीकरणासोबत , हे ही सगळे दस्तावेजीकरण या स्पर्धेच्या निमित्ताने सुरु झाले आहे . यातील कित्तेक गोष्टी नामशेष झाल्या आहेत , होण्याच्या मार्गावर आहेत . तर या सगळ्या बद्दलचे लिखाण आणि छायाचित्र सुद्धा  या ब्लॉग च्या माध्यमातुन वाचायला उपलब्ध करून देत आहे . स्पर्धेत शब्दांची मर्यादा होती , त्यामुळे तितक्याच शब्दांत विषय लिहावा लागलेला आहे . तसेच त्यात वारसा मुल्यांवर जास्त भर आहे . पण काही गोष्टींचे ब्लॉग मध्ये इतर ठिकाणी उल्लेख आलेले आहेत किंवा पुढेही येत राहतील . त्या ठिकाणी मात्र त्याची बाकी माहिती सुद्धा नक्कीच मिळेल . 
                               इंटॅक संस्थेच्या सोलापुर विभागाचे खुप खुप मनःपुर्वक आभार ! माझ्याच वारस्याची माझ्याशी अशी छान ओळख करून दिल्याबद्दल . या पुढेही अश्याच छान छान उपक्रमांचे आयोजन होत राहील अशी आशा करते आणि शुभेच्छाही देते ! 

©आनंदी पाऊस 
(वारसा स्पर्धा)
१ सप्टेंबर २०२०











Comments

  1. Ho aplya traditional goshti,
    forts ,
    Food
    Wear etc ha sgla warsa pudhil pidhila kalala pahije��
    Stutya upkram��
    ������ ho g mujorpana nvta bai

    ReplyDelete
    Replies
    1. हो खरय अगदी!
      खुप सारे धन्यवाद 😍

      Delete
  2. Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद �� ☺

      Delete
  3. Manjusha ChaudhariSeptember 04, 2020 2:23 pm

    Mast vishay ahe ani subak ritine mandnyat tuza hatkhanda ahe

    ReplyDelete
    Replies
    1. तुझा कौतुक करण्यात चांगलाच हातखंडा आहे!
      सप्रेम धन्यवाद 😍

      Delete
  4. Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺

      Delete
  5. युगे युगे भावनांचे धागे
    जपावया मन तुझं लागे...
    Artifacts, space,people and expressions and happiness doccumentation ... Through Time..

    ReplyDelete
    Replies
    1. वावा माझ्या लेखनापेक्षा तुझा अभिप्राय जास्त छान आहे!
      Thnks a tons 😍

      Delete
  6. Chan upkram aahe
    Tula khup khup Shubhechha!!

    ReplyDelete
    Replies
    1. तुला खुप खुप धन्यवाद अणि प्रेम 😍!! ❤

      Delete
  7. Yekatra ktumbat rahyane sarvache sukh dukh samjun gheta yetat madat karne kalaji ghene he sarvach chan. Vadhi che varanan pan khup mast pangatit basun tyatun tup ghenyacha aanand ghetla aahe
    Aai kade pan baryach vadya aahet pan aata bicharya adagadit padalya ahet ....

    ReplyDelete
    Replies
    1. खरय पंगत मध्ये बसुन वाढी मधुन तुप वाढून घेण्याचा आनंद काही औरच असतो 😍
      छान आठवण करून दिलीस
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏 😇

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

दळण (घरातील गमती जमती)

दळण (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                   ...

💃गुलाबाईची गाणी💃 (गच्चीवरील गमती जमती )

  💃गुलाबाईची गाणी💃  (गच्चीवरील गमती जमती ) 💃💃💃💃💃💃💃💃💃💃 💃गुलाबाईची गाणी💃  पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा गुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून गुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा गुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउले पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून गुलाबाईचे माहेर दिसे. 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃  सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफि...

थोडं (खूप सारं😉😆) गोडाचं-१(दराबा) (घरातील गमती जमती)

थोडं (खूप सारं) गोडाचं-१(दराबा) (घरातील गमती जमती)                                                          घरात सगळेच खाण्याचे शौकीन, मुख्य म्हणजे आमचे बाबा सुद्धा! त्यामुळे सारखं काही ना काही करणं आणि खाणं अखंडपणे चालूच असे. खाण्याच्या बाबतीत तर सगळ्यांचा भरपूर उत्साह होताच, पण करणाऱ्यांचा (सगळ्या मम्मी लोकांचा) सुद्धा उत्साह तेव्हढाच किंवा काकणभर जरा जास्तच मी तर म्हणेन. सगळं अगदी उत्साहाने करत. त्यांच्या या उत्साहाला आणि मेहनतीला तर कायमच आणि वारंवार सलाम करावासा वाटतो. कारण कुठलीही गोष्ट करायची असो, कधीही थोडी थोडकी करून भागतच नसे. त्यामुळे खूप बांधीलकी आणि वचनबद्धता असणे आवश्यक असे. बरं त्यांनी कुठलीही गोष्ट करायची म्हणून केली असे होत नसे . सगळं अगदी साग्रसंगीतच, योग्य आणि व्यवस्थितच करत असतं. जणू कंटाळा, थकवा असले शब्दच त्यांना माहीती नव्हते.  बरं घरातील सगळेच, सगळ्याच  म्हणजे गोड, तिखट, मसालेदार, चटपटीत, आंबटगोड अशा ...